The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या छोट्या हॉटेलसमोर अमेरिकन फूड जायंट ‘मॅकडोनाल्ड’लाही हार मानवी लागली

by द पोस्टमन टीम
16 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईजसाठी जीव टाकणारी नवी पिढी आणि अश्या खाद्यपदार्थांचा आघाडीचा विक्रेता ब्रँड ‘मॅकडोनाल्ड’ यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. जगभरातल्या फूड इंडस्ट्रीत, विशेषतः स्नॅक्स आणि फास्टफूड इंडस्ट्रीमध्ये ‘मॅकडोनाल्ड’ या अमेरिकन ब्रँडचा विशेष दबदबा आहे.

१९४०मध्ये रिचर्ड आणि मॉरीस या ‘मॅकडोनाल्ड’ बंधूंनी कॅलिफोर्नियामध्ये सुरु केलेल्या एका छोटेखानी रेस्टॉरंटच्या शाखा आज शंभरहून अधिक देशांमध्ये पसरल्या आहेत. भारतात ‘मॅकडोनाल्ड’ माहित नाही अशी मुलं सापडणं दुर्मिळ होऊन बसलंय. नुसत्या नावावरच मार्केट गाजवणाऱ्या या रेस्टॉरंटच्या भल्यामोठ्या साखळीला एका छोट्या दुकानासमोर हात टेकावे लागले होते. इतकंच नव्हे तर पुन्हा त्या देशात पाय ठेवण्याचीही ‘मॅकडोनाल्ड’ची कधी हिंमत झाली नाही.

पश्चिमी कॅरिबियन समुद्रात वसलेला आणि ब्रिटीशांच्या अखत्यारीत येत असलेला हा केमन बेटांचा विस्तीर्ण भूभाग ग्रँड केमन, लिटल केमन आणि केमन ब्रॅक या तीन बेटांपासून बनलेला आहे. निसर्गसंपन्न समुद्रकिनारे लाभलेल्या या प्रदेशाची बहुतांशी अर्थव्यवस्था इथल्या पर्यटनावर आपली भिस्त ठेवून आहे. त्याचबरोबर या प्रदेशाची आणखी एक खासियत म्हणजे इथे कर भरण्यात मिळणारी भरघोस सूट. त्यामुळे इथं सद्य लोकसंख्येपेक्षाही २५ टक्के अधिक व्यवसाय उभे राहिले आहेत. पर्यटकांचा ओघ आणि कर भरण्याच्या जाचातून सुटका हे नफेखोर समीकरण कोणत्याही व्यवसायासाला या प्रदेशाच्या प्रेमात पाडू शकते आणि त्यामुळेच इथे आपली शाखा सुरु करण्याचा मोह ‘मॅकडोनाल्ड’ला आवरता येणं अशक्य होतं पण त्यांचा हा प्रयत्न इथल्या एका छोट्याश्या हॉटेलने सपशेल हाणून पाडला.

‘मॅकडोनाल्ड’ने जेव्हा या प्रदेशात आपली फ्रँचायझी उघडायचं ठरवलं तेव्हा त्यांनी राजधानीचा प्रदेश असलेल्या ग्रँड केमन या बेटाची निवड केली. राजधानी जॉर्जटाऊनमध्ये इथल्या जागेसाठी चौकशी करत असताना त्यांना एक जुनाट हॉटेल दिसलं आणि त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. त्या छोट्या दुकानाचं नावही ‘मॅकडोनाल्ड’च होतं. मुळात या दुकानाचं नाव MacDonalds असं होतं तर ‘मॅकडोनाल्ड कंपनी’चं स्पेलिंग McDonalds असं होतं. फक्त एका टीचभर अक्षराचाच काय तो फरक पण तरीही

‘मॅकडोनाल्ड’सारख्या जगविख्यात कंपनीच्या नजरेत ही सरळसरळ चोरीच होती, त्यांच्या नावाची आणि जगभरात मिळवलेल्या ओळखीची! आपला ब्रँड, लोगो, मेन्यू याबाबत अतिशय काटेकोर असलेल्या ‘मॅकडोनाल्ड कंपनी’साठी हे स्थानिक दुकान एक मोठं आव्हान होतं आणि त्यामुळे त्यांनी याविरोधात सरळ न्यायालयात दाद मागितली.



या छोट्या दुकानाची सुरुवात १९७० मध्ये जेम्स ‘मॅकडोनाल्ड’ यांनी केली होती. जेम्स ‘मॅकडोनाल्ड’ हे या बेटावरचे पहिलेच वकील होते. इतकंच नव्हे तर ग्रँड केमन या बेटाला ‘टॅक्स हेवन’ बनवणारे कायदे निर्माण करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. या वकिलाशी पंगा घेणं ‘मॅकडोनाल्ड कंपनी’ला चांगलंच महागात पडलं. वास्तविक ‘मॅकडोनाल्ड कंपनी’ ही अशावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार घेत नाही, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे.

या कंपनीने आपली ओळख आणि आपला ब्रँड आपल्याच मालकीत राहावा यासाठी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींवरूनही तीस तीस वर्षं खटले लढले आहेत. हे सगळेच खटले ‘मॅकडोनाल्ड’ला जिंकण्यात यश मिळालेलं नसलं तरी त्यांची चिवट आणि लढाऊ वृत्ती मात्र आजतागायत टिकून आहे आणि त्यामुळेच या ब्रँडचा आणि त्यांच्या कायदेशीर कारवायांच्या जाचाचा धसका भल्याभल्यांनी घेतला आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पण ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती’ या उक्तीला सार्थ ठरवत वकीलसाहेबांचं मोडकळीला आलेलं ते हॉटेल ‘मॅकडोनाल्ड’च्या कायदेशीर झंझावातातही तग धरून उभं राहिलं आणि तेही आपलं नाव अबाधित ठेवूनच!

ग्रँड केमन बेटावरच्या या छोटेखानी हॉटेलविरोधात ठोकलेला दावा ‘मॅकडोनाल्ड कंपनी’ कशी हरली, हा किस्सा एक दंतकथा बनून राहिली आहे. इथले स्थानिक लोकच नव्हे तर बाहेरून येणारे पर्यटकही हा किस्सा तासन्तास चवीचवीने घोळवत बसलेले दिसतात. ‘मॅकडोनाल्ड कंपनी’साठी हा खटला अतिशय दुर्दैवी ठरला. यात फक्त त्यांना त्या हॉटेलसमोर हातच टेकावे लागले नाहीत तर केमन बेटांवर कधीही व्यवसाय न करण्याची नामुष्कीही ओढवून घ्यावी लागली.

या छोटेखानी ‘मॅकडोनाल्ड’ची मालकी सध्या ख्रिस ह्यू या व्यावसायिकाकडे आहे. संपूर्ण केमन बेटावर आता हे एकमेव ‘मॅकडोनाल्ड’ आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या हॉटेलमध्ये ‘मॅकडोनाल्ड कंपनी’च्या इतर आऊटलेट्ससारखा बर्गर आणि फ्रेंच फ्राईजच्या वैविध्यांनी नटलेला मेन्यू नाही तर इथं फक्त पारंपारिक कॅरिबिअन खाद्यपदार्थ आणि पेयांची विक्री केली जाते.

ह्यू यांना त्या सुप्रसिद्ध खटल्याबाबत विचारलं असता त्यांनी ‘मॅकडोनाल्ड कंपनी’शी आपली कोणतीही स्पर्धा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या मते, ‘मॅकडोनाल्ड कंपनी’च्या मनात असेल तर ती आत्ताही इथे त्यांच्या भरपूर शाखा उघडू शकते पण त्याबदल्यात त्यांनी आमच्या दुकानाचं नामांतर करण्याच्या फंदात न पडलेलंच बरं!

खरंतर केमनचे जुने कायदे आता बरेच सुधारले असून कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडला आपल्या स्वामित्व हक्कासाठी स्थानिक व्यवसायांविरोधात आवाज उठवणं सहज शक्य होणार आहे. असं असलं तरीही स्थानिक प्रशासनाने केमनमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांना जुन्या स्थानिक व्यवसायांवर स्वामित्व हक्कावरून खटले भरण्यापूर्वी त्यांची एकंदरीत सद्य परिस्थिती आणि आपल्या भविष्यकालीन नफातोट्याचा सारासार विचार करण्याचे आवाहनही केले आहे.

पण केमनमध्ये एका छोट्या हॉटेलकडून झालेला मानहानीजनक पराभव पाहता ‘मॅकडोनाल्ड’ पुन्हा केमन बेटांवर व्यापार करण्याच्या शक्यता पूर्णतः धूसर झालेल्या दिसून येतात. याचं आणखी एक कारण म्हणजे इथं ‘मॅकडोनाल्ड’च्या स्नॅक्ससोबत मिळणाऱ्या कोकची क्रेझ बिलकुल नाही. या तिन्ही बेटांवर क्वचितच कोक मिळू शकेल.

केमन बेटांवर फक्त पेप्सी ब्रँडचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे केमन बेटांवरच्या कर भरण्यासाठी मिळणाऱ्या भरघोस सवलतींचं आलोभन टाळण्यातच ‘मॅकडोनाल्ड’ने सध्या धन्यता मानली आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या कंपनीने जगभरातील करोडो लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधलाय

Next Post

अजय, शाहरुख, अमिताभ तर करतातच पण ‘जेम्स बॉण्डने’सुद्धा एकदा पान मसाल्याची जाहिरात केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अजय, शाहरुख, अमिताभ तर करतातच पण 'जेम्स बॉण्डने'सुद्धा एकदा पान मसाल्याची जाहिरात केली होती

या पाकिस्तानी माणसाने बिल गेट्सला १०० मिलियन डॉलर्सला गंडवलय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.