The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान लाभलेला यो*द्धा आयुष्याच्या शेवटी अमेरिकेत लिफ्टमन म्हणून काम करत होता

by द पोस्टमन टीम
25 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दोन दोन महायु*ध्दं ज्यानं लढली, मायभूमीतून वंशद्वेषातून जीव वाचविण्यासाठी ज्यानं पलायन केलं, फ़्रान्सचा लोकनायक म्हणून ज्यानं ओळख प्राप्त केली. फ़्रान्सचे सर्वोच्च सन्मान ज्याला लाभले असा युजिन बुलार्ड, आयुष्याच्या अखेरच्या काळात अमेरिकेत लिफ़्टमॅन म्हणून सामान्य काम करत सर्वसामान्य आयुष्य जगला. जन्मभूमीवर निस्सीम प्रेम असणार्‍या बुलार्डला अमेरिकेनं मनापासून कधीच स्विकारलं नाही ही त्याची खरी शोकांतिका आहे.

युजिन बुलार्ड हे नाव फ्रान्समध्ये सर्वतोमुखी असलं तरिही ज्या अमेरिकेकडून तो युध्द लढला त्या अमेरिकेच्या हे नाव खिजगणतितही नव्हतं. फ़्रान्सचा वैमानिक ज्यानं अमेरिकेकडून यु*ध्दात भाग घेतला त्याची साधी नोंदही नंतर अमेरिकन इतिहासानं ठेवली नाही हे दुर्दैव आहे.

कोलंबस, जॉर्जिया येथे एका कृष्णवर्णीय कुटुंबात १८९५ सली युजिनचा जन्म झाला. युजिनचे वडील विल्यम बुलार्ड मार्टिनिक या फ़्रेंच बेटावरून आले होते. विल्यमचे कुटुंब त्या काळातल्या रिवाजानुसार फ़्रेंच वसाहतीत गुलाम म्हणून काम करत असे. या गुलामीतून सुटका करून घेण्यासाठी म्हणून ते हैतीला पळून आले.

कालांतरानं हे कुटुंब अमेरिकेतील निर्वासी छावणीत रहायला आलं. युजिन बुलार्डची आई जोसेफ़िन एक क्रिक इंडियन होती. युजिन लहान असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला. आईविना पोरक्या युजिननं वंशवादाला घाबरून अनेकदा घरातून पळून जाण्याचे असफ़ल प्रयत्न केले. त्याला पूर्वजांसारखं गुलामीत आयुष्य काढायचं नव्हतं. मात्र पळून गेल्यानंतर दरवेळेस तो सापडला की वडील त्याला मारहाण करत असत. एकूणच युजिन हा विल्यमच्या डोक्याचा त्रास होता.



१९०६ रोजी वयाच्या बाराव्या वर्षी तो जे पळून गेल त्यानंतर सहा वर्षं घराकडे फ़िरकलाही नाही. १९१२ साली त्यानं हॅम्बर्गला जाणार्‍या जर्मन मालवाहू मार्ता रूसमधून स्कॉटलंडकडे प्रयाण केलं. तिथून तो लंडनला गेला आणि याठिकाणी असणार्‍या अमेरिकन अफ़्रिकन मनोरंजन मंडळ बेले डेविसच्या फ़्रीडमॅन पिकनिनीजमधे बॉक्सर तसेच स्लॅपस्टिक परफ़ॉर्मर म्हणून काम करू लागला. 

१९१३ मध्ये तो बॉक्सिंग सामन्यांसाठी फ़्रान्सला गेला. पॅरिसमध्ये स्थायिक झाल्यावर इथल्या संस्कृतीत, वातावरणात तो इतका रुळला की त्यानं इथेच घर घेऊन कायमचं रहाण्याचा निर्णय घेतला. १९१४ च्या उन्हाळ्यात पहिल्या महायु*ध्दाला सुरवात झाली आणि १९ वर्षाचा बुलार्ड फ़्रेंच फ़ॉरेन लिजनमध्ये भर्ती झाला. फ़्रेन्च सैन्याच्या प्रतिष्ठीत अशा १७० व्या इन्फ़्रंट्री रेजिमेंटमध्ये सेवा करत असताना बुलार्ड वुर्डुनच्या लढाईत सहभागी झाला. या रेजिमेंटमध्ये बुलार्ड एकमेव कृष्णवर्णिय होता आणि इथे त्याला द ब्लॅक स्वालो ऑफ़ डेथ या टोपण नावानं ओळखलं जाऊ लागलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

वुर्डुनची लढाई ही त्यांनी लढलेल्या लढाईतली सर्वात जास्त धोकादायक लढाई होती. पण मार्च १९१६ मध्ये लढाईत गंभीररित्या जखमी झालेल्या बुलार्डला रणभूमीवरून परत बोलविण्यात आले आणि लियोन येथे उपचारांसाठी पाठ्विण्यात आले. त्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की ते पुन्हा चालू शकतील की नाही याबाबत डॉक्टरनेही शंका व्यक्त केली होती.

या लढाईतील शौर्यासाठी त्यांना दोन दोन सर्वोच्च सैनिकी पदक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. सगळ्यांना वाटलं होतं की आता बुलार्ड निवृत्तीचं आयुष्य जगतील. मात्र बुलार्ड यांचा लढवैय्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. इन्फ़्रंट्रीसाठी अनफ़िट असल्यानं तो मार्ग तर बंद झाला होता मात्र त्यांनी फ़्रेन्च फ़्लाईंग कॉर्प्ससाठी प्रयत्न करण्याचा विचार केला.

हा विचार ऐकूनच अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं. कारण इतकी मेहेरनजर असण्यासाठी बुलार्ड फ़्रेन्चचे अधिकृत नागरिकही नव्हते शिवाय कृष्णवर्णीय होते. यादरम्यान सुट्टीवर असताना बुलार्डनं त्याच्या एका मित्राशी २ हजार डॉलर्सची पैज लावली की त्याचा वर्ण लक्षात न घेता त्याला फ़्रेन्च फ़्लाईंग सर्व्हिसमधून बोलावणं येईल.

१९१६ च्या नोव्हेंबरमध्ये बुलार्डनं एरॉनॉटिक मिलट्रीमध्ये प्रवेश केला होता. बुलार्ड हे जगातले पहिले कृष्णवर्णिय वैमानिक ठरले. तसेच पहिल्या महायु*ध्दात सहभागी होणारे पहिले कृष्णवर्णिय वैमानिक म्हणूनही पुढे त्यांची इतिहासात नोंद झाली. वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची एस्काड्रिल स्पा ९३ वर नियुक्ती करण्यात आली. यानंतर नोव्हेंबर १९१७ मधे बुलार्डनी दोन हवाई ह*ल्ले विजयाचा दावा केला मात्र यापैकी एकालाच अधिकृत पुष्टी मिळाली.

बुलार्डना फ़्रेन्च मिलिट्रीनं कायमच सौहार्द दाखविलेलं असलं तरीही जन्मभूमी असलेल्या अमेरिकेकडून यु*ध्दात उतरण्याची त्यांची इच्छा होती. १९१७ साली अमेरिकेनं यु*ध्दात भाग घेतल्यानंतर बुलार्डनं वीस अमेरिकन सहवैमानिकांसहित एअर सर्व्हिसमध्ये भरती होण्याचा प्रयत्न केला.

सर्वांचा अर्ज स्विकारला गेला मात्र त्याचा एकट्याचा अर्ज ‘एअर सर्व्हिसमध्ये भरती होण्यासाठी कमीत कमी प्रथम श्रेणी लेफ़्टनंट असण्याची अट आहे’ या कारणाने नाकारण्यात आला. खरंतर त्याची मागणी फ़ेटाळण्यामागचं खरं कारण त्या काळात अमेरिकन सैन्यात असणारा वांशिक दुस्वास हा होता. 

बुलार्ड फ़्रेन्च एरोनॅटिक मिलिटरीमध्ये परतले आणि यु*ध्दसमाप्तीपर्यंत तेथेच राहिले. फ्रांमध्ये सर्वात जास्त पदकं मिळविणारा हा यो*ध्दा फ्रान्सचा राष्ट्रीय नायक बनला तरीही अमेरिकेच्या मात्र खिजगणतीतही नव्हता हे दुर्दैव.

यु*ध्दसमाप्तीनंतर त्यानं प्रसिध्द फ्रेंच नाईटक्लबमध्ये नोकरी पत्करली आणि कालांतरानं स्वत:चा लीएस्कॅड्रिल हा नाईटक्लबही चालू केला. लवकरच त्यानं लग्न करून गृहस्थाश्रम पत्करला. बुलार्डनं काही वर्षं सुखी संसारी माणूस म्हणून व्यतीत केली.

१९३० हे वर्षं उजाडलं तेच बुलार्डचे बदललेले ग्रह घेऊन. हे वर्षं संपता संपता बुलार्डच्या आयुष्यात नाट्यमय वळण आलं. दुसरं महायु*ध्द अद्याप अधिकृतरित्या सुरू व्हायचं होतं १९४० साली यु*ध्द अधिकृतपणे फ़्रान्समध्ये आलं. बुलार्डला फ़्रेन्च आणि जर्मन दोन्ही भाषा उत्तमरित्या येत असल्यानं बुलार्डनं आपल्या नाईटक्लबच्या मदतीनं चक्क फ़्रान्ससाठी हेरगिरी चालू केली.

नाईटक्लबमध्ये येणार्‍या जर्मन अधिकार्‍यांकडून तो नकळत माहिती काढून घेत असे. मात्र जर्मन सैन्य पॅरिसकडे येऊ लागलं तसं त्यानं मुलीसह पलायन केलं आणि तो फ़्रेन्च ४१व्या रेजिमेंटमध्ये सहभागी झाला. शत्रू पक्षानं केलेल्या एका गंभीर ह*ल्ल्यात त्याच्या युनिटमधील सर्वजण मारले गेले आणि बुलार्ड पुन्हा एकदा गंभीररित्या जखमी झाला. जर्मन गेस्टापो बुलार्डला पकडतील या भितीनं त्याच्या काही मित्रांनी बुलार्ड आणि त्याच्या मुलीला स्पेनमार्गे अमेरिकेला गुप्तपणे पाठविलं.

फ़्रान्सप्रमाणे अमेरिकेत तो फ़ारसा कोणाला माहीत नसणं त्याच्या पथ्यावर पडलं कारण त्याच्या जखमा गंभीर होत्या आणि त्यावर इलाज होणं आवश्यक होतं अन्यथा त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. तसेच त्याच्यावरचा इलाज दीर्घकाळ चालणार असल्यानं त्याची ओळख लपलेली रहाणं हिताचं होतं. गंमत म्हणजे, यातून बरा झाल्यावरही त्यानं अमेरिकेतच इलेव्हेटर ऑपरेटरची नोकरी मिळवली.

तब्बल दोन महायु*ध्दांत सहभागी असणारा हा फ़्रान्सचा लोकनायक अमेरिकेत एक सामान्य नोकरी करत होता आणि कोणाला याचा पत्ताही नव्हता. फ़्रान्सनं १९५९ साली त्याला त्याच्या या कार्यासाठी फ़्रान्सचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करायचं ठरवलं तेव्हा अमेरिकन माध्यमांनी त्याची थोडीफ़ार दखल घेतली.

एनसीबीनं त्याची मुलाखत घेतली तेंव्हाही त्यानं इलेव्हेटर ऑपरेटरचा गणवेष घातला होता कारण ज्या ठिकाणी या शोचं शुटिंग होतं त्याच इमारतीचा लिफ़्टमन म्हणून बुलार्ड काम करत होता. १९६१ साली त्याचं निधन झालं आणि त्याचं फ्रांसच्या राष्ट्रध्वजात लपेटून फ़ेडरेशन ऑफ़ फ़्रेन्च वॉर ऑफ़िसर्सची खास मानवंदना देत त्याच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.

आयुष्यभर त्यानं जन्मभूमी असणार्‍या अमेरिकेवर मनापासून प्रेम केलं मात्र या देशानं त्याला योग्य ती ओळख कधीच दिली नाही. वर्णद्वेषी अमेरिकेतून जीव वाचविण्यासाठी त्यानं अमेरिकेतून पलायनही केलं. कर्मभूमी असणार्‍या फ़्रान्सनं मात्र बुलार्डवर भरभरून प्रेम केलं. जिवंतपणी अमेरिकेनं त्याला कायम नाकारलं आणि त्याच्या मृत्युनंतर ३३ वर्षांनी त्याचं कार्य मान्य करत त्याच्या कार्याची थोडीफ़ार का होईना दखल घेतली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘कपिल देव’ने १७५ धावा काढल्या आणि जगाला कळलं हा विश्वचषक भारताचा आहे..!

Next Post

जगप्रसिद्ध ‘कार्ल्सबर्ग बिअर’च्या लोगोतच त्यांनी स्वस्तिक वापरलं होतं..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जगप्रसिद्ध 'कार्ल्सबर्ग बिअर'च्या लोगोतच त्यांनी स्वस्तिक वापरलं होतं..!

अमेरिकेला खुन्नस म्हणून रशियाने महाकाय हेलिकॉप्टर बनवलं होतं जे अजूनही धूळ खात पडलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.