The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्लश टॉयलेट्समुळं हानोई शहरात उंदरांचं मोठं ह*त्याकांड घडलं होतं..!

by द पोस्टमन टीम
19 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आतापर्यंतच्या जागतिक इतिहासाचा धांडोळा घेतला तर अनेकदा मानवी क*त्तली झाल्याच्या घटना आपल्याला दिसतात. मात्र, कधी उंदरांची क*त्तल झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? व्हिएतनामची राजधानी असलेल्या हानोई शहरामध्ये ही घटना घडली होती. याठिकाणी नेमकं असं काय घडलं होतं की, उंदरांची मोठ्या प्रमाणात क*त्तल करावी लागली, पाहूया या लेखाच्या माध्यमातून.. 

हानोई शहराचा विचार केला तर त्याला विविध गोष्टींमध्ये फ्रेंचांकडून समृद्ध वारसा लाभलेला आहे. या वारशाचा विचार केल्यास इमारती आणि आधुनिक पायाभूत सुविधा डोळ्यांसमोर येतात. मात्र, फ्रेंचांनी इतर गोष्टींसोबत हानोई शहराला वारशामध्ये फ्लश टॉयलेट्स दिले होते! फ्रेंचांना या गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान होता. फ्लश टॉयलेट्सला ते स्वच्छता आणि सभ्यतेचं प्रतीक मानत होते. पण याच फ्लश टॉयलेट्समुळं हानोई शहरात १९०२ साली उंदरांचं मोठं हत्या*कांड घडलं!

१८९७ साली, पॉल डूमर आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन व्हिएतनामची राजधानी हानोई येथे आले. (नवीन आयकर योजना अयशस्वी झाल्यावर ४० वर्षीय पॉल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता) त्यानंतर, दक्षिणपूर्व आशियातील वसाहतींचा गट असलेल्या फ्रेंच इंडोचायनाचा गव्हर्नर म्हणून त्यांना हानोईमध्ये पाठवण्यात आलं.

डुमरनं संपूर्ण इंडोचायना आणि विशेषत: हानोई शहराचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्समध्ये असलेल्या अनेक पायाभूत सुविधा हानाईमध्ये राबवण्यास त्यांनी सुरुवात केली. हानोईमध्ये पॉल एका प्रशस्त व्हिलामध्ये राहत होता. ज्यामध्ये अनेक उत्तम युरोपियन सुविधा होत्या. विशेष म्हणजे त्याच्या व्हिलामध्ये ‘टॉयलेट’ होते!



टॉयलेट हीच गोष्ट फ्रेंच हानोईला इतरांपासून वेगळं करण्याचा मार्ग असल्याचा विचार पॉल डुमरनं केला. हानोई शहराचा जो भाग फ्रेंचांच्या ताब्यात होता त्याठिकाणी जमिनीखालून वाहणारी सांडपाणी व्यवस्था होती. हे त्याच्या धोरणाचचं प्रतिक होतं. फ्रेंचांनी जमिनीखालून नऊ मैलांपेक्षा लांबीची सांडपाणी व्यवस्था तयार केली होती. 

मात्र, असं करून त्यांनी अनावधानानं त्याठिकाणी उंदरांचं नंदनवनचं तयार केलं. कालांतरानं या उंदरांनी भूमीगत मार्गानं रिट्झिएस्ट रिअल इस्टेटमध्ये प्रवेश मिळवला आणि शहरात धुमाकूळ घातला. त्याच सुमारास आशियातील काही युरोपियन वसाहतींमध्ये बुबोनिक प्लेगची प्रकरणं उदयास येऊ लागली होती आणि उंदरांच्या माध्यमातून हा रोग हानोईमध्ये पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

यावर तातडीनं उपाय शोधण्याची गरज होती. म्हणून डुमरनं व्हिएतनामी शिकाऱ्यांची उंदीर मारण्यासाठी नियुक्ती केली. भूमीगत गटारींमध्ये उतरून उंदीर मारण्याचं काम त्यांना देण्यात आलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

९०च्या दशकात इतिहासकार मायकल व्हॅन फ्रान्समध्ये होते. ते फ्रेंच वसाहतवादावर संशोधन करत होते. तेव्हा त्यांनी उंदरांच्या क*त्तलीबद्दल माहिती लिहून ठेवली होती. १९०२ साली होनोईमध्ये उंदरांच्या र*क्तपा*ताला सुरुवात झाली. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ७ हजार ९८५ उंदीर मारण्यात आले. ही तर फक्त सुरुवात होती.

मारेकऱ्यांनी मे महिन्यात ही संख्या आणखी वर नेली होती. एकट्या मे महिन्यात १५ हजार ४१ उंदीर मारण्यात आले होते. जून महिन्यात दररोज तब्बल १० हजार उंदीर मारले जात होते. यावरूनच आपल्या लक्षात येऊ शकतं की, हानोई शहरात उंदरांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात उंदीर नेमके कसे मारले जात होते याबाबत तपशील उपलब्ध नाही. कित्येक महिने उंदीर मारण्याची मोहिम हाती घेऊनही हानोईमधील उंदरांची संख्या कमी झाली नाही.

उंदीर मारण्याची पहिली मोहिम अयशस्वी झाल्यानंतर फ्रेंचांनी ‘प्लॅन बी’सुद्धा तयार केला होता. त्यांनी स्थानिक व्यावसायिकांना उंदीर मारण्याचं कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. त्यात देखील यश आलं नाही. शेवटी एका उंदराच्या मृत्यूमागं एक सेंट याप्रमाणं नागरिकांसाठी बक्षिस योजना घोषित करण्यात आली. 

उंदीर मारल्याचा पुरावा म्हणून नागरिकांना पालिका कार्यालयात त्याची शेपटी जमा करण्याची अट घालण्यात आली होती. याला काही प्रमाणात यश देखील आलं. हीच गोष्ट भविष्यात व्हिएतनाममधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी ठरली होती.

इतक्या सगळ्या उपाययोजना करूनही हानोई शहराभोवती पुन्हा जिवंत आणि निरोगी उंदीर दिसू लागले, गंमत म्हणजे या उंदरांना शेपट्या नव्हत्या! याची चौकशी केली असता धक्कादायक गोष्ट समोर आली. बक्षिस मिळवण्यासाठी लोक उंदीर मारण्याऐवजी फक्त त्यांचे शेपूट कापून घेऊन जात. 

त्यामुळं शहरातून उंदरांची संख्या कमी झालीचं नाही. उलट प्रजननामुळं त्यांची संख्या वाढतचं राहिली. काही व्हिएतनामी शहरात परदेशी उंदरांची तस्करी करत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. आरोग्य निरीक्षकांच्या तपासात आणखी एक बाब समोर आली. हानोईच्या बाहेरील ग्रामीण भागात, उंदरांच्या प्रजननासाठी पॉप-अप शेती केली जात होती. 

उंदीर बुबोनिक प्लेगचे वाहक असल्याची अंदाज १९०६ साली सत्यात उतरला. शहरातील उंदरांची संख्या अनियंत्रित होत असतानाच हानोईमध्ये प्लेगचा उद्रेक झाला. त्यात सुमारे २६३ लोक मरण पावले. त्यापैकी बहुतेक व्हिएतनामी नागरिक होते.

उंदीर मारण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. याचा ताण सरकारी तिजोरीवर पडला होता. तरी देखील जेव्हा डुमर फ्रान्सला परत गेला. तिथे त्याला इंडोचायनाचा सर्वात प्रभावी गव्हर्नर-जनरल म्हणून सन्मानित केलं गेलं. डुमर पुढे फ्रान्सचे अध्यक्ष झाले.

आताच्या काळात, हानोई उंदीर ह*त्याकांड हे ‘कोब्रा इफेक्ट’चं उदाहरण म्हणून अभ्यासलं जातं. गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिल्यास त्याचे कशा प्रकारे अनपेक्षित परिणाम होतात याबद्दलचा हा एक सिद्धांत आहे.

अभ्यासक त्यांचा निष्कर्ष काढतील तेव्हा काढतील. मात्र, आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी उंदरांच्या क*त्तलीची ही घटना नक्कीच रंजक आहे. तसंही उंदरासारखा लहानसा प्राणी काय करू शकतो याची प्रचिती आपल्याला देखील पुण्यातील प्लेगच्या साथीवेळी आलीच होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या ब्रिटिश संशोधकामुळे भारतीय इतिहासातील कित्येक घटना प्रकाशात आल्या

Next Post

९/११चा ह*ल्ला झाला तेव्हा अमेरिकेला धार्मिक द*हश*तवादाच्या गंभीर समस्येची जाणीव झाली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

९/११चा ह*ल्ला झाला तेव्हा अमेरिकेला धार्मिक द*हश*तवादाच्या गंभीर समस्येची जाणीव झाली

'पीपल्स कार' बनवण्यासाठी सरकारने जनतेचे करोडो रुपये अक्षरशः पाण्यात घातले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.