The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रच्या सैन्याचा सेनापती ज्याला शेवटी विषप्राशन करून आत्मह*त्या करावी लागली

by द पोस्टमन टीम
5 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


फिल्ड मार्शल रोमेल – दोन्ही वैश्विक महायु*द्धांत सहभाग असलेला प्रचंड पराक्रमी आणि सर्वोत्तम रणनितीकार म्हणून प्रसिद्ध असलेला सैन्य अधिकारी. भारतात आणि जगातही सर्वोत्तम सैन्य अधिकाऱ्यांच्या कुटुंबातच बहुधा सैन्याची परंपरा असते. पण रोमेलच्या कुटुंबात अशी कोणतीही क्षात्र परंपरा नसताना, दोन वैश्विक महायु*द्धात सहभाग घेऊन आणि काही मोठ्या कारवाया करूनही तो इतिहासातील सर्वोत्तम सैन्याधिकाऱ्यांमध्ये गणला जातो. वाळवंटात लढल्या जाणाऱ्या यु*द्धांमध्ये कुशलता प्राप्त असल्याने त्याला “डेजर्ट फॉक्स” असेही संबोधले जाते. इजिप्तमध्ये लढल्या गेलेल्या एल-अलामीनच्या यु*द्धात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती.

रोमेलचे वडील त्याच्या आजोबांप्रमाणे एक शिक्षक होते, तर आई एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मुलगी. दक्षिण जर्मनीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या रोमेलची सैनिकी कारकीर्द सन १९१० साली सुरु झाली. घरात कोणतीही सैन्याची परंपरा नसलेला रोमेल अधिकारी-विद्यार्थी (ऑफिसर कॅडेट) म्हणून १२४वी वुर्टेमबर्ग इन्फट्री रेजिमेंटमध्ये सैन्य सेवेत रुजू झाला.

पहिल्या महायु*द्धात रोमेलने लेफ्टनंट या पदावर काम करत फ्रांस, रोमेनिया आणि इटली या ठिकाणी लढाया केल्या. नैसर्गिकरित्या अंगी बाणलेले नेतृत्वगुण, त्याचा असामान्य पराक्रम, आणि त्याला स्वतःच्या माणसांची उत्तमरीत्या असलेली ओळख या गोष्टींमुळे त्याला निवडलेल्या क्षेत्रात मोठं यश मिळणार हे स्पष्ट होतं.

पर्शियन-जर्मन सैन्यामध्ये सामान्य सैन्यकर्मचारी होणं हा अनेकांकडून सामान्यतः निवडला जाणारा मार्ग त्याच्यासाठीही उपलब्ध असताना त्याने मात्र तो स्वीकारला नाही. वेमर रिपब्लिकच्या रिक्श्वारकडे आणि जर्मनीच्या हि*टल*रकडे त्याने आघाडीचा सैन्याधिकारी राहण्याचं ठरवलं.



अनेक महान सेनापतींसारखंच तोसुद्धा एक उत्तम शिक्षक होता, अनेक सेनापती उत्तम शिक्षक असतात याचं कारण बहुधा कोणत्याही प्रकारचं शिक्षण म्हणा किंवा तत्त्वज्ञान म्हणा हे यु*द्धभूमीवरच माणूस खऱ्या अर्थाने “अनुभवतो”, म्हणूनच कदाचित भग्वद्गीतेसारखा तत्त्वज्ञानाचा सर्वोत्तम ग्रंथ यु*द्धभूमीवर तयार झाला. त्याच्या या शिकवण्याच्या कलेमुळे तो अनेक उत्तम सैनिकी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून नेमला गेला.

रोमेलकडे नव्याने सैन्यात दाखल झालेल्या “कालच्या पोरांना” प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना यु*द्धात पारंगत करण्यासाठी अनेक कल्पना होत्या, त्या भन्नाट कल्पना आणि त्याचा पहिल्या वैश्विक महायु*द्धातील दांडगा अनुभव यांमुळे सन १९३७ मध्ये त्याने एका असामान्य सैनिकी पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली, इन्फन्टरी अटॅक्स, जे आजही अनेक लोकांची पसंती ठरते.

मार्च १९३८ मध्ये ऑस्ट्रिया ना*झी जर्मनीमध्ये विलीन झाल्यानंतर “कर्नल” रोमेलला व्हिएनाजवळील व्हिएनर न्यूसडॅटमधील सैन्याधिकारी प्रशिक्षण संस्थेचा मुख्याधिकारी म्हणून नेमण्यात आलं. १९३९ मध्ये दुसरं महायु*द्ध सुरु झाल्यानंतर रोमेलची नियुक्ती फुहरर मुख्यालयाला संरक्षण देणाऱ्या सैन्य तुकडीचा मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली आणि याच ठिकाणी रोमेल आणि हि*टल*रची ओळख झाली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

स्वतःच्या सैन्य-क्षमतांना सिद्ध करण्याची संधी रोमेलला खऱ्या अर्थाने सन १९४० मध्ये सेव्हन्थ पँझर डिव्हिजनवर त्याची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मिळाली. ही जर्मन सैन्य तुकडी मुख्यत्वाने रणगाड्याच्या साहाय्याने यु*द्ध करण्यात तरबेज होती, या आधी रोमेलने कधीही अशा प्रकारच्या सैन्यतुकडी बरोबर काम केलं नसल्याने त्याला अशा यु*द्धतंत्राचा अनुभवही नव्हता.

असं असलं तरी स्वयंचलित शस्त्रांच्या आणि रणगाड्यांच्या तुकडीत आक्र*मक पवित्रा घेत काम करण्यात त्याने लवकरच कौशल्य प्राप्त केलं. मे १९४० मधील त्याने केलेल्या फ्रांसवरील आक्र*मणाने त्याचं धैर्य आणि शौर्य सिद्ध केलं.

एका वर्षापेक्षा कमी कालावधीतच, ६ फेब्रुवारी १९४१ रोजी कर्नल रोमेलची लिबियामधील “आफ्रिका ट्रूप्स” या जर्मन सैन्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. हे जर्मन सैन्य लिबियामधील वाताहात झालेल्या इटलीच्या सैन्याची मदत करण्यासाठी पाठवण्यात आलं होत. उत्तर आफ्रिकेमधील विस्तीर्ण आणि भकास वाळवंट हे त्याच्या मोठ्या विजयाला आणि प्रिसिद्धीला कारणीभूत ठरतील असा विचार तरी कोणी केला असेल काय?

तीन दिवसांतच त्याला लेफ्टनन्ट जनरल या पदावर बढती मिळाली आणि त्याने आपला मुक्काम लिबियामधील ट्रिपोलीला हलवला. ब्रिटिश कॉमनवेल्थ फोर्सेसने पराभूत केलेल्या इटालियन फौजेला मदत देण्यासाठी रोमेलने त्या वाळवंटात अतुलनीय शौर्याचं प्रदर्शन केलं आणि त्यानंतर ब्रिटिश पत्रकारांनी त्याला “डेजर्ट फॉक्स” म्हणून संबोधायला सुरुवात केली, त्याचा वेग आणि विस्मयजनक ह*ल्ल्यांमुळे त्याने समोरच्या सैन्याला धूळ चारली.

त्याच्या या जबरदस्त पराक्रमामुळे शत्रू आणि मित्रपक्षाचे लोक प्रभावित झाले, या यु*द्धानंतर हि*टल*रने रोमेलला फिल्ड मार्शल या सैन्यातील सर्वोच्च पदवीने सन्मानित केलं.

इतक्या मोठ्या विजयानंतरही संकटांनी काही फिल्ड मार्शल रोमेलची साथ सोडली नाही. यशस्वीतेबरोबर मोठ्या अपेक्षाही येतात, बहुधा याच अपेक्षा माणसाला पुढे ओझं वाटू लागतात, आणि त्या पूर्ण होतीलच याची काय खात्री?
उत्तर आफ्रिकेतील हे यु*द्ध अतिशय अवघड असतानाही फिल्ड मार्शल रोमेलने जिंकलं, पण कदाचित तिथे उपस्थित नसल्याकारणाने हि*टल*रसाठी ती लढाई दुय्य्म होती.

रसद पुरवठ्याच्या वाढत्या अडचणींमुळे आणि इतक्या मोठ्या लढाईने थकलेल्या सैन्याच्या समस्येमुळे फिल्ड मार्शल रोमेल वारंवार हि*टल*रकडे परत मागे फिरण्याच्या विनवण्या करीत होता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत १९४२ च्या भर उन्हाळ्यामध्ये हि*टल*रने त्यांना कैरो आणि सुएझ कालव्यावर चाल करून जाण्याचे आदेश दिले. फिल्ड मार्शल रोमेल आणि त्याच्या जर्मन-इटालियन सैन्याने त्या आदेशांचे पालन करीत आक्र*मण तर केले पण त्यांना ब्रिटिशांनी अलेक्सान्ड्रियापासून ६० मैलांवर असलेल्या एल-अलामेन येथे आडवलं.

या वेळी फिल्ड मार्शल रोमेलला अरब विश्वात अविश्वसनीय प्रसिद्धी मिळाली, त्याला ‘ब्रिटिश सत्तेपासून मुक्त करणारा’ अशी ओळख प्राप्त झाली. जर्मनीमध्येही त्याला “फोल्क्समार्शल” म्हणजे “लोकांचा सैन्याधिकारी” अशी ओळख प्राप्त झाली. पण, एल-अलामेन येथील यु*द्धामुळे त्याच्या सैनिकी संसाधनांवर मोठा परिणाम झाला. ज्यामुळे १९४२ च्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या एल-अलामेनच्या दुसऱ्या यु*द्धात त्याला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे फिल्ड मार्शल रोमेलने आपले मोर्चे मागे घेतले आणि यानंतर मार्च १९४३ मध्ये हि*टल*रने त्याला माघार घेण्याचे आदेश दिले.

सन १९४३ मध्ये फिल्ड मार्शल रोमेलवर फ्रान्समधील नॉर्मंडी येथील खाडीच्या किनाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली. या किनाऱ्यांवर दोस्तराष्ट्रांच्या कारवाईची दाट शक्यता होती. यु*द्धशास्त्रात पारंगत असलेल्या या फिल्ड मार्शलने किनाऱ्यावरील सुरक्षाकामांची योजना अतिशय कल्पकतेने केली. त्याने मध्ये अटलांटिक भिंतीची उभारणी सुरु करून त्या भिंतीवर अनेक मशीन गन बंकर्स तयार केले, अनेक बीच-माईन्सचं जाळं तयार केलं आणि शिवाय किनाऱ्यावर दोस्तराष्ट्रांचे पॅराटृपर्स (विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उतरणारे सैनिक) उतरल्यास त्यांच्यासाठी सापळा म्हणून दलदलीचे प्रदेशही तयार करून घेतले. उत्तर आफ्रिका आणि एल-अलामीनचा अनुभव असलेल्या फिल्ड मार्शल रोमेलच्या मते दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला ब्रिजहेड (पूल-सदृश उपकरण) बांधू न देणं हा सर्वोत्तम सुरक्षा पर्याय होता.

किनाऱ्यावरील सुरक्षा कामांच्या मागे काही प्रमाणात राखीव सैन्य ठेवण्याचा सल्ला फिल्ड मार्शल रोमेलने दिला, पण त्याच्या या मताला वरिष्ठांची मान्यता नव्हती, त्यांच्या मते राखीव सैन्याला नेहमीप्रमाणे तैनात करायला हवे होते

मित्र राष्ट्रांना मागे ढकलणाऱ्या या संघटनांमधील मतभेदामुळे जर्मन संरक्षणाचा प्रभाव कमकुवत झाला.

१९४४ मध्ये एका टप्प्यावर, रोमेलला दुसऱ्या महायु*द्धात जर्मनीच्या अंतिम विजय-पराभवाच्या शक्यता तसेच हि*टल*रच्या वास्तविकतेला सामोरे जाण्याची आणि पाश्चात्त्य शक्तींशी शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता याबद्दल शंका निर्माण झाली.

१९४४ च्या वसंत ऋतूमध्ये हि*टल*रविरोधात गुप्तपणे केलेल्या कारवाईत सामील झालेल्या रोमेलच्या मित्रांनी त्याला गाठले आणि हि*टल*रच्या पाडावानंतर राज्याचा प्रमुख होणं ही रोमेलची जबाबदारी आहे हे त्याला पटवून दिलं. रोमेलने हा सल्ला नाकारला नाही. खरंतर रोमेलच्या या मित्रांनी हि*टल*रच्या ह*त्येचा कट रचला होता.

पण जर्मनीला यु*द्धजन्य स्थितीतून बाहेर काढू इच्छिणाऱ्या या चांडाळचौकडीने रोमेलला हे कधीच कळू दिलं नाही. राजकीय हेतूने कोणाची ह*त्या करणं हे फिल्ड मार्शल रोमेलला मान्य नाही हे त्यांना निश्चितपणे माहित होतं, कारण फिल्ड मार्शल रोमेलने अशा प्रकारच्या हि*टल*रने दिलेल्या आज्ञा सरळ सरळ झिडकारल्या होत्या.

ज्या वेळी प्रत्यक्ष यु*द्ध सुरु झालं त्या वेळी पाश्चिमात्त्य सत्तेच्या सर्व अटी हि*टल*रने मान्य कराव्या या हेतूने फिल्ड मार्शल रोमेलने आपण यु*द्ध हरतोय हे अनेकदा हि*टल*रला भासवण्याचा प्रयत्न केला, पण हि*टल*रने हार मानली नाही.

मोठ्या प्रमाणात यु*द्ध माजलेलं असताना १७ जुलै १९४४ रोजी फिल्ड मार्शल रोमेलच्या कारवर ब्रिटिश वायुसेनेच्या विमानांनी ह*ल्ला केला, या ह*ल्ल्यात रोमेल गंभीररीत्या जखमी झाला आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली. ऑगस्ट महिन्यात तो संपूर्णतः बरा होऊन त्याला आराम करण्यासाठी घरी पाठवण्यात आलं. याच दरम्यान २० जुलै १९४४ रोजी हि*टल*रचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला, या कटामध्ये फिल्ड मार्शल रोमेलसुद्धा सामील असण्याचं उघड झालं.

पण हि*टल*रने “पीपल्स मार्शल”ला कोर्टासमोर उभं करण्याचं टाळलं, कारण त्याच्या शत्रूंना सरळ फाशीच होत असे. हि*टल*रने रोमेलला विषप्रयोग करून ठार करण्यासाठी त्याच्या घरी दोन सैन्याधिकाऱ्यांना पाठवलं, जेणेकरून त्याच्या आणि त्याच्या परिवाराचं नावाला कुठंही काळिमा फसली जाणार नाही.

अंतिमतः यु*द्धभूमीवर क्वचितच हारलेल्या या फिल्ड मार्शल एर्विन रोमेलने कपटी संगतीत राहिल्या कारणाने १४ ऑक्टोबर १९४४ रोजी विष घेऊन (पूर्वनियोजित) आत्मह*त्या केली. त्याचे अंतिम संस्कार संपूर्ण सन्मानाने, लष्करी इतमामात पार पडले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेने मीम्सच्या संशोधनासाठी इंडियाना युनिव्हर्सिटीला तब्बल १ मिलियन डॉलर दिले आहेत

Next Post

उडिसातल्या एका महिलेने चक्क एका सापाशी लग्न केलं होतं..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

उडिसातल्या एका महिलेने चक्क एका सापाशी लग्न केलं होतं..!

अमेरिकेच्या न्यू*क्लिअर टेस्टचं सिक्रेट सर्वात आधी कोडॅकला कळलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.