The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जर्मनीनं ब्रिटनच्या या गँगस्टरलाच आपला हेर बनवलं होतं, त्यानेच त्यांचा घात केला..!

by द पोस्टमन टीम
30 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्याकडे इकडच्या गोष्टी तिकडे करून दोन व्यक्तींमध्ये वाद लावणाऱ्या व्यक्तीला ‘कळीचा नारद’ म्हणतात. अशा लोकांपासून आपण दूर राहिलेलचं बरं असे सल्लेही आपल्याला मिळतात. मात्र, दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात अशा लोकांना प्रचंड महत्त्व होतं. तेव्हा त्यांना कळीचा नारद नाही तर ‘डबल एजंट’ या काहीशा ‘सोफिस्टिकेटेड’ नावानं ओळखल जाई.

साधारण चालाख बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना एजंट म्हणून शत्रूच्या गोटात पाठवलं जात. सैन्यातील एखाद्या जवानाप्रमाणं ते असतात. जर्मनीनं मात्र, ब्रिटनमधील एका कुख्यात गँगस्टरलाच आपला एजंट बनवलं होतं. याबाबत ब्रिटन तर जर्मनीच्याही एक पाऊल पुढे निघाला. त्यांनी याचं गँगस्टर एजंटला आपल्याबाजून वळवून पुन्हा जर्मनीच्या गोटात सोडलं. असं तुफानी आयुष्य जगलेल्या व्यक्तीचं नाव होतं एडी चॅपमन. दुसऱ्या महायु*द्धातील मोजक्या कुशल डबल एजंटपैकी एडी एक होता.

एडी चॅपमन दुसऱ्या महायु*द्धापूर्वी ब्रिटनमधील एक अट्टल गुन्हेगार होता. जेलीग्नाइट स्फो*टकांचा वापरून तिजोऱ्या लुटण्यात माहिर असलेल्या ‘जेली टोळी’ या गँगचा तो सदस्य होता. चोरीच्या कौशल्यानं त्याला अमाप पैसा मिळवून दिला. तो सोहोमध्ये आपल्या साथीदारांसह एका प्लेबॉयप्रमाणं ऐषोआरामात आयुष्य जगत होता.

१९३९ च्या सुरुवातीला मात्र पोलिसांनी त्याच्याविरोधात शोधमोहिम सुरू केली. त्यामुळं तो साहोमधून जर्सीला पळून गेला. पण म्हणतात ना ‘जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही’ असचं काहीसं एडी चॅपमनच्या बाबतीत झालं. त्यानं फेब्रुवारी १९३९ मध्ये जर्सीतील नाईट क्लबमध्ये चोरी केली. या घटनेनंतर जर्सी पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला एका वर्षाची शिक्षा झाली. मात्र, त्यानं सप्टेंबरमध्ये तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्याच्या शिक्षेत आणखी एका वर्षाची भर पडली. जुलै १९४० मध्ये जर्मनांनी चॅनेल बेटे हस्तगत केल्यानंतरही तो तुरुंगातच होता. शेवटी ऑक्टोबर १९४१ मध्ये त्याला सोडण्यात आलं.



जर्मनव्याप्त चॅनेल बेटांवर जीवन अतिशय कठीण होतं. चतुर चॅपमननं बेटांवरून ब्रिटनला परतण्याचा मार्ग शोधला. त्यानं जर्मन लोकांसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी ब्रिटनमधील जर्मन हेरांच्या नेटवर्कमधून अत्यंत कमी दर्जाची माहिती मिळत होती. त्यामुळं जर्मन गुप्तहेर एजन्सी अबव्हेरनं त्याला आनंदानं स्वीकारलं.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला चॅपमन गुप्तहेरीसाठी नेमका व्यक्ती असल्याचं जर्मनांना वाटलं. गुन्हेगार आणि अंडरवर्ल्डशी त्याच्या संबंधांमुळं तो जर्मनीसाठी अतिरिक्त एजंटस् देखील आणू शकतो. याशिवाय स्फो*टकांबाबत त्याला असलेलं ज्ञान तोडफोडीचं काम करण्यात फायद्याचं ठरू शकतं, हा विचार जर्मन्सनी केला. सरळ सांगायचं झाल्यास, ज्या ठिकाणी मस्किटो बॉ*म्बर नावाचं विमान तयार झालं होतं, त्या डी हॅव्हिलँड (हर्टफोर्डशायर) विमान कारखान्यावर चॅपमननं ह*ल्ला करावा, अशी त्यांची इच्छा होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर्मनव्याप्त फ्रान्समध्ये एडी चॅपमनला वर्षभर प्रशिक्षण दिलं गेलं आणि ‘फ्रिट्झचेन’ या कोडनेमसह १६ डिसेंबर १९४२ रोजी पॅराशूटद्वारे केंब्रिजशायरमधील एका शेतात सोडण्यात आलं. तिथे गेल्यानंतर त्यानं अंडरवर्ल्डमध्ये सामिल होऊन काम करावं, अशी जर्मनीची अपेक्षा होती. मात्र, चॅपमन सरळ ‘एमआय५’च्या (ब्रिटिश गुप्तचर संघटना) कार्यालयात गेला.

आपण स्वत:हून त्याठिकाणी आलो आहोत असा त्याचा समज होता. मात्र, जरी तो त्याठिकाणी गेला नसता तरी ब्रिटिशांनी त्याला तिथे उचलून आणलाच असता. कारण ब्रिटिशांनी जर्मनीचे गुप्त कोड डिकोड करण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळं एजंट ‘फ्रिट्झचेन’ (एडी चॅपमन) ब्रिटनमध्ये येणार असल्याचं एमआय५ ला अगोदरचं माहिती होतं.

चॅपमनला पश्चिम लंडनमधील एमआय ५च्या एका गुप्त डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं. त्या जागेला अधिकारी कॅम्प ०२० म्हणून म्हणत. तिथे लेफ्टनंट कर्नल रॉबिन (टिन आय) स्टीफन्सनं त्याची चौकशी केली. चॅपमन सहकार्य करण्यास पूर्णपणं तयार होता. त्यानं चौकशीकर्त्यांना जर्मन लोकांच्या मिशनबद्दल सर्व माहिती दिली.

स्टीफन्सननं  जर्मनीचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा निश्चय केला. त्यानं चॅपमनला डबल एजंट होण्याचा प्रस्ताव दिला. चॅपमनला आपला जीव वाचवणं महत्त्वाचं होतं आणि काहीही झालं तरी शेवटी तो देखील एक ब्रिटिशचं होता. त्यानंही जर्मनीच्या विरोधात ब्रिटिशांसाठी काम करण्यास होकार दिला. अशाप्रकारे एडी चॅपमन दुसऱ्या महायु*द्धातील सर्वात महत्त्वाचा डबल एजंट झाला.

त्याला ‘झीगझॅग’ असं लबाडीचं नाव देण्यात आलं होतं. एमआय ५ नं चॅपमनला पुन्हा जर्मनीमध्ये पाठवण्याचा आणि अबव्हेरबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा निर्णय घेतला. एमआय ५ च्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली चॅपमननं जर्मन लोकांशी रेडिओ संपर्क साधला आणि त्यांना माहिती दिली की, तो डी हॅव्हिलँड कारखान्यातील आपलं मिशन सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्याला एमआयच्या अधिकाऱ्यांसह ह*ल्ल्याची योजना आखण्यासाठी पाठवण्यात आलं, जेणेकरून तो नंतर याबाबत जर्मनांना सांगू शकेल.

डी हॅव्हिलँड विमान कारखान्यावरील ह*ल्ला दुसऱ्या महायु*द्धातील सर्वात उल्लेखनीय फसवा ह*ल्ला होता. २९ व ३० जानेवारी १९४३ च्या रात्री, डी हॅविलँड कारखान्यात मोठे स्फो*ट घडवून आणले गेले. जेणेकरून जर्मन विमानांना कारखान्याच्या पॉवर प्लांटमध्ये खूप मोठे बॉ*म्ब फुटल्या विश्वास होईल.

अगदी बॉ*म्ब ह*ल्ल्यात झालेलं नुकसान देखील खरं वाटावं यासाठी लाकडापासून आणि कागदांपासून ट्रान्सफॉर्मर बनवले गेले होते. इमारतींना देखील रंगवलेल्या ताडपत्रींचं आवरण घालण्यात आलं. एमआय ५ नं देखील डेली एक्सप्रेसमध्ये ‘लंडन बाहेरील एका कारखान्यात स्फो*ट झाल्याची’ बनावट बातमी लावण्याची व्यवस्था केली होती.

ब्रिटन आणि एडी चॅपमनचा ही फसवणूकीची योजना पूर्णपणे यशस्वी झाली. चॅपमॅननं जर्मन लोकांना कारखान्यातील पॉवर प्लांटच्या यशस्वी ‘वि*ध्वंसा’बद्दल रेडिओवरून माहिती दिली. चॅपमनच्या कामामुळं अबव्हेरमध्ये आनंदी आनंद झाला होता. मार्च १९४३ मध्ये चॅपमन पोर्तुगालमार्गे जर्मनीला परतला आणि जर्मनव्याप्त नॉर्वेमधील एका सेफ हाऊसमध्ये राहिला. त्याच्यावर जर्मन इतके खुश होते की त्यांनी त्याला जर्मनीचा सर्वोच्च सन्मान असलेला ‘आयर्न क्रॉस’ देऊन सन्मानित करण्यात केलं. हा सन्मान मिळवणारा ते एकमेव ब्रिटिश नागरिक आहे.

जून १९४४ मध्ये ब्रिटनला परतला. त्यानंतर पुन्हा त्यानं आपल्या जुन्या साथीदारांसह लहान मोठे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. मात्र, जेव्हा त्याला अटक होई तेव्हा तो गुप्तचर यंत्रणेला मदतीसाठी बोलवत असे. त्याचं दुसऱ्या महायु*द्धातील योगदान पाहता नाईलाजानं का होईना त्याला मदत केली जात होती. ११ डिसेंबर १९९७ रोजी त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूनंतर २००१ मध्ये एमआय५ नं चॅपमॅनच्या फाइल्स ‘द नॅशनल आर्काइव्हज’ला दिल्या. नॅशनल आर्काइव्हजच्या ग्रंथालयाचं तिकिट असलेली कोणतीही व्यक्ती या फाईल्स वाचू शकतो.

त्यावेळच्या जर्मनीतील क्रू*र लोकांमध्ये राहून त्यांच्याच डोळ्यात धूळ फेकण्याचं कठिण काम एडी चॅपमननं केलं. जर याबाबत जर्मनीला थोडा जरी संशय आला असता तरी चॅपमनचा क्षणात जीव गेला असता. मात्र, त्यानं हा धोका पत्करून दुसऱ्या महायु*द्धात आपल्या देशाला मदत केली. या गोष्टीसाठी आजही ब्रिटिश लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर आहे. कदाचित तो ब्रिटनमधील एकमेव गुन्हेगार असावा ज्याची लोक आदरानं आठवण काढतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश पोलिसांना मिशा ठेवण्यासाठी विशेष ‘भत्ता’ मिळतो..!

Next Post

नागांची संख्या कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी स्कीम काढली, ज्यामुळे नागांची संख्या अजूनच वाढली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

नागांची संख्या कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी स्कीम काढली, ज्यामुळे नागांची संख्या अजूनच वाढली

अण्व*स्त्र चाचण्या घेऊन अमेरिकेने हे बेट अक्षरशः बेचिराख करून टाकलंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.