The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या भामट्याने केलेल्या ‘स्कॅम’पुढे आजचे सगळेच घोटाळे फिके पडतील..!

by द पोस्टमन टीम
18 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण जितकं भूतकाळात डोकावू शकतो, तितकीच प्रगल्भ दूरदृष्टी आपल्याला प्राप्त होते, इतिहास अभ्यासाच्या बाबतीत आपण अनेकदा हे वाक्य ऐकतो. मानवाचा इतिहास अनेक रंगांनी भरलेला आहे. अगणित व्यक्तिमत्त्वं, त्यांची कर्तृत्वं, राष्ट्रांचे उदय आणि अस्त, यु*द्ध, कला, साहित्य, इत्यादी.

लोकांना फसवून किंवा घोटाळे करून पैसे कमवण्याऱ्या धुर्तांची नोंदसुद्धा इतिहास ठेवतो हे आपल्याला कदाचित विचित्र वाटेल. पण युरोपीय देशांमध्ये अशा अनेक लोकांची नोंद इतिहासाने घेतली आहे. चार्ल्स पोंझी, बर्नी मेडऑफ, फ्रँक अँबॅगनेल आणि अशा अनेक कॉनमेन्स (लोकांना फसवून किंवा घोटाळे करून पैसे कमवणारे धुर्त) युरोपीय इतिहासाने पाहिले, पण यांपेक्षाही वरचढ कॉनमॅन ग्रेगर मॅकग्रेगर. ज्याचं आजही अनेक इतिहासकारांना आणि अभ्यासकांना कुतूहल वाटतं. ग्रेगर मॅकग्रेगर इतिहासातील सर्वांत यशस्वी कॉनमॅन मानला जातो.

ग्रेगरचं व्यक्तिमत्त्व बहुरंगी होतं. सैनिक, एक उत्तम सेल्समन, समुद्रावरील लुटारु यांबरोबरच एक “खोटारडा” म्हणूनही तो ओळखला जात असे. इतकंच काय तर इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा करण्याचं रेकॉर्डही ग्रेगरच्याच नावावर आहे.

‘ग्रेगर’ या क्षात्र वंशातून आलेला ग्रेगर मॅकग्रेगर हा ब्रिटिश सैन्यात १८०३ ते १८१० दरम्यान सैन्याधिकारी होता. १८०७ साली फ्रेंच सैन्याविरोधी लढल्या गेलेल्या पेनिंसुलर यु*द्धात त्याचे मोठे योगदान होते. १८१२ साली झालेल्या वेनेझुअन स्वातंत्र्ययु*द्धात त्याने प्रजासत्तीय बाजू घेतली आणि या यु*द्धातील विजयानंतर “जनरल” पदावर बढती मिळवली, पुढच्या सुमारे चार वर्षांतच त्याने वेनेझुला आणि वेनेझुलाचा शेजारी देश असलेला न्यू ग्रॅनडाच्या वतीने स्पॅनिश सैन्याविरोधी कारवाया केल्या.



१८१७ साली क्रांतिकारकांच्या प्रतिनिधींच्या आज्ञेनुसार त्याने फ्लोरिडामधील अमेलिया बेटावर ताबा मिळवला. याच बेटावर त्याने अत्यन्त कमी काळ तग धरून राहिलेले “फ्लोरिडाचे प्रजासत्ताक” (रिपब्लिक ऑफ फ्लोरिडा) जाहीर केले.

पुढे १८१९ साली त्याने दोन अनिष्ट कामगिरी पार पाडल्या, ज्यामुळे त्याला सैन्याला रामराम ठोकावा लागला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सन १८२१ साली ग्रेगरने लंडनमध्ये आपल्या ‘लॅटिन अमेरिकन देशांतील पोऐंस क्षेत्रात भरपूर फायदा’ आहे अशा भूलथापा मारल्या. होंडूरसच्या आखातातील मोस्कीटो किनाऱ्याचा राजा असलेल्या जॉर्ज फ्रेडरिक ऑगस्ट्स याने आपल्याला पोऐंस क्षेत्राचा कझिक घोषित केल्याचा दावा ग्रेगरने केला.

लंडनमध्ये येऊन ग्रेगर त्या स्थानाचं वर्णन अतिशय तन्मयतेने करीत, पोऐंसचं पाणी इतकं निर्मळ की कोणाचीही तहान शांत करू शकतं, तिथली झाडं तर अनेकविध फळांनी लगडलेली आहेत आणि या थापासुद्धा नाही चालल्या तर नदीपात्रांमध्ये सोन्याचे तुकडेही सापडतात अशीही थाप तो मारत.

याच वेळी दक्षिण आणि मध्य अमेरिकेत अनेक गुंतवणूका होत होत्या, साहजिकच या मुळेही अनेक गुंतवणूकदारांना पोऐंस हा उत्तम पर्याय वाटत होता.

शेकडो लोकांनी या तथाकथित पोऐंस सरकारबरोबर करार करून आर्थिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यांमध्ये हे सरकार गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर व्याजरुपाने आधिक आर्थिक परतावा देण्यास बंधनकारक होतं. अशाच अनेक लोकांनी आपली गुंतवणूक जमिन खरेदी करण्यातही केली होती.

१८२२-२३ मध्ये सुमारे दोनशे लोकांनी ग्रेगरच्या त्या तथाकथित देशात स्थलांतरही केलं, पण तिथे प्रचंड दाट जंगलांशिवाय काहीही नव्हतं. गेलेल्यांपैकी निम्मे लोक मृत पावले, ही घटना सन १८२५ च्या आर्थिक मंदीला मोठं योगदान देणारी ठरली. यात शेअर बाजाराला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

या सगळ्यात अनेक युरोपीय सरकारंसुद्धा फसली. इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गौरव्यवहार केल्यानंतर कोणत्याही अभ्यासकाचं लक्षं आपसूकच या स्कॉटिश माणसाकडे जाईल. अनेक बँक्स, गुंतवणूकदार आणि सामान्य माणसांनाही मोठ्या आर्थिक फायद्याचं भुरळ पाडून त्याने लाखो पौंड्सची अफरातफर केली होती.

अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते स्कॅमर्सच्या दोन प्रकारच्या मानसिकता असतात, पहिली म्हणजे समोरच्याला आपण आपलं बोलणं पटवून देऊन आपला स्वार्थ साध्य करवून घेऊ शकतो, ज्यामध्ये समोरचा माणूस स्वतःची बुद्धी वापरू शकत नाही, आणि त्यांची दुसरी मानसिकता म्हणजे समोरच्याच्या बुद्धीला जरी आपला प्रस्ताव पटला नाही तरी त्याच्या बुद्धीवर मात करून तो प्रस्ताव स्विकारतो, इतक्या प्रभावशाली रितीने आपण आपलं बोलणं करू शकतो.

मॅकग्रेगरने अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये मुलाखती प्रकाशित केल्या, त्यांच्यामध्ये पोऐंसमध्ये गुंतवणूक किंवा स्थायिक होण्यातून मिळणारे फायदे अशा आशयाचे विषय असत. ग्रेगर लिहितो, डोंगराळ प्रदेशात राहणारे स्कॉटिश लोक त्यांच्या काटकपणा आणि साहसीपणासाठी ओळखले जातात, त्यामुळे पोऐंसची भूमी म्हणजे एक अवघड कसोटी, एक आकर्षक भेट आणि एक असामान्य आव्हान असं “ऑल-इन-वन” ठिकाण आहे.

पण अगदी सरकारमधील लोकसुद्धा ग्रेगरच्या या फसवफसवीला बळी कसे पडले असावेत??, त्याचं उत्तर मानसशास्त्रातच दडलं आहे.

अर्कान्सास विद्यापीठातील एरीक नोवेल्स आणि विडेनेर विद्यापीठातील जे लिन या दोन मानसशास्त्रज्ञांनी सन २००३ साली ‘मानवाचं मन वळवण्याच्या’ पद्धतींची म्हणजेच माईंड मॅनिप्युलेटिंग टेक्निक्सची मुद्देसूद मांडणी केली होती. त्यातील पहिली अल्फा, ही पद्धत वारंवार वापरण्यात येते एखाद्या गोष्टीचा आग्रह धरून राहणे, दुसरी म्हणजे ओमेगा, ज्यात एखाद्या गोष्टीला होणारा विरोध कमी करणे,

पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला जे समोरच्याला पटवून द्यायचं ते आणखी आकर्षक बनवणे, एखादी गोष्ट तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी का घेऊन येत आहे, किंवा तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी परिपूर्ण व्यक्ती कसे आहात हे पटवून देणे आणि दुसऱ्या पद्धतीत, तुम्ही विनंती करता किंवा एखादा प्रस्ताव मांडता, पण अधिक प्रोफेशनली आणि आकर्षक पद्धतीने. मानसशास्त्रज्ञ याला अटीट्युड-लेस माईंड मॅनिप्युलेटिंग टेक्निकचा नमुना मानतात. कारण या दोन्ही पद्धतींमध्ये आपण ज्याला पटवून देत आहोत त्याचा दृष्टिकोन आपण ठरवतो.

टोरी हिगीन्स या कोलंबिया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञाच्या मते, बहुतांश लोक एक किंवा जास्तीत जास्त दोन “मोटिव्हेशनल” वाक्य ऐकली किंवा वाचली की वशीभूत होऊन जातात. काही लोक कोणत्याही प्रकारे आपला फायदा पाहत असतात, तर काही लोक एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला किती नुकसान होईल किंवा आपण ही गोष्ट केल्याने काही चूक तर करत नाही ना असा विचार त्यांच्या मनात घर करून असतो. त्यामुळे अनेकजण अशा भुलथापांना बळी पडतात. 

माईंड मॅनिप्युलेटिंग टेक्निकच्या अग्रगण्य तज्ञांपैकी एक असलेला मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट सियालडीनीच्या मते सहा गोष्टी माईंड मॅनिप्युलेट करतात:

१. पारस्परिकता (तू माझं एक काम कर, मी तुझं एक करतो)
२. सुसंगतता (काल मी एखादी गोष्ट केली आणि ती यशस्वी झाल्याने ती गोष्ट मी आजही करणार)
३. सामाजिक प्रमाणीकरण (एखादी गोष्ट केल्याने मी तुमच्यातलाच एक होणार)
४. मैत्री (आपसूकच मित्रांचा मित्रावर विश्वास असतोच )
५. संसाधनांची टंचाई
६. अधिकार (आपण जे सांगतो त्या बद्दल आपल्याला सर्व काही माहित आहे असा दावा करणे)

ग्रेगरने कळत-नकळत या माईंड मॅनिप्युलेशन टेक्निक्स वापरून अनेक गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. अपेक्षेप्रमाणे ग्रेगरचा डाव यशस्वी झाला होता, अपेक्षेपेक्षा जास्त म्हटलं तरी अतिशयोक्त ठरणार नाही. मॅकग्रेगरने या फसवाफसवीतून २ लाख युरोजची कमाई केली, २ लाख युरोज जरी असले तरी त्यांचं तत्कालीन मूल्य सुमारे १३ लाख युरोज आणि आजमितीस त्याचे मूल्य सुमारे ३६ लाख युरोज इतके होईल.

ग्रेगरने त्या आभासी शहरात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी व्यवस्था केली, यातील दोन जाहजं सप्टेंबर १८२२ आणि जानेवारी १८२३ मध्ये २५० प्रवासी घेऊन निघाली, सर्व प्रवासी उत्सुक होते.

स्थायिक व्हायची इच्छा असलेले हे लोक जेव्हा पोऐंसला आले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला असावा, कारण ग्रेगरच्या ब्रोशरमध्ये दाखवलेल्या जागेपेक्षा ते संपूर्णतः वेगळं होतं, ना तिथे कोणतंही बंदर होतं, ना कसला विकास, पूर्णपणे पडीक जमीन. पोऐंस हे कधी अस्तित्वातच नव्हतं, ते फक्त ग्रेगरच्या “कल्पनेतील” एक गाव होतं. तिथे गेलेल्या बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला, जे वाचले त्यांना त्या बेटाजवळून जाणाऱ्या जहाजांनी वाचवलं आणि बेलीझ या ठिकाणी आणलं गेलं . सगळा घोटाळा बाहेर येण्यापूर्वीच ग्रेगरने ब्रिटनमधून पळ काढला होता.

तो फ्रान्सला गेला. फ्रांसमध्येही त्याने आपलं जाळं पसरवलं, पण फ्रान्सची परवाना मिळवण्याची प्रक्रिया आणि व्यवस्था इंग्लड पेक्षा जास्त कडक आणि जागरूक असल्याने तिथल्या अधिकाऱ्यांना एकाच देशात जाण्यासाठी अनेक अर्ज येत असल्याचं जाणवलं, संशय आल्यानंतर फ्रान्सने तपासासाठी एका समितीची स्थापना केली आणि यातच ग्रेगर पकडला गेला.

कैदेतून मुक्त झाल्यानंतर तो स्कॉट्लंडमधील एडिनबर्गमध्ये परतला. १८४५ साली त्याचा मृत्यू झाला, पण पोऐंसची भूमी आजवर एक कल्पनाच आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सगळ्यात महागडा खटला : ही केस जिंकण्यासाठी राजाने ३०,००० एकर जमीन विकली होती

Next Post

भारतातली ही जिप्सी जमात माणसाचा मृत्यू झाल्यावर आनंदोत्सव साजरा करते..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भारतातली ही जिप्सी जमात माणसाचा मृत्यू झाल्यावर आनंदोत्सव साजरा करते..!

टिळकांच्या अनुपस्थितीतही न. चिं. केळकरांनी 'केसरी'ची धार कमी होऊ दिली नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.