The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘प्रीमिअर लीग’मधल्या एका बेस्ट क्लबची भारताच्या वेंकीजने पुरती वाट लावून टाकली आहे.

by द पोस्टमन टीम
30 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सर्वांचा आपापला असा आवडता खेळ असतो. पण जगात फुटबॉल हा खेळ आवडणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे. याला कारण आहे फुटबॉलमध्ये असलेले काही महान खेळाडू आणि एकंदर त्या खेळाचा रुबाब!

फुटबॉल या नावाचा उगम कसा झाला याविषयी लोकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. काहींच्या मते, फुटबॉल हा सुझू नावाच्या चिनी खेळाचा विकसित प्रकार आहे. हा खेळ चीनमध्ये हूण राजवटीच्या काळात खेळला जात असे. जपानमध्ये असुका राजवटीत फुटबॉल हा खेळ कॅमरी या नावाने ओळखला जात असे. इ. स. १५८६ मधे जॉन डेव्हिस नावाच्या कप्तानाने आणि त्याच्या कामगारांनी ग्रीनलँडमध्ये हा खेळ खेळला. १५ व्या शतकात हा खेळ स्कॉटलंडमध्ये खेळला जात असे. यावरून फुटबॉल हा तसा प्राचीन खेळ आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असे हे लक्षात येते.

फुटबॉल या खेळाला फुटबॉल असे नाव मिळाले ब्रिटनचा राजकुमार चौथा हेन्री याच्या कारकिर्दीत म्हणजे इ.स. १४०८ मध्ये. १५२६ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याला फुटबॉल खेळण्यात रस होता. त्याने त्यासाठी एक खास प्रकारचा बूटही बनविला होता.

१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १७ व्या शतकाच्या सुरुवातीला गोलची कल्पना उदयास आली. याने खेळामध्ये स्पर्धेची भावना निर्माण व्हायला मदत झाली. त्यावेळी खेळाडू शेताच्या दोन विरुद्ध बाजूस झाडे लावून गोलपोस्ट बांधत असत. १७ व्या शतकात ८ किंवा १२ गोलांचा सामना खेळला जात असे.

आपल्या देशातदेखील फुटबॉलप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हा खेळ जास्त खेळला जातो. पण तरी एकूण या खेळातील भारताचं योगदान फारसं आहे असे म्हणता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत, जी वाचून भारताच्या मालकीचे असल्याने एका मातब्बर संघाचे कसे नुकसान झाले हे दिसून येते.



हा संघ म्हणजे ब्लॅकबर्न रोव्हर्स. हा इंग्लंडचा फुटबॉल संघ आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये पुण्याच्या वेंकीजने या संघाची मालकी मिळवली. मे २०१७ पासून ब्लॅकबर्न रोव्हर्स हा एकेकाळचा विजेता संघ तिसऱ्या दर्जाचा संघांमध्ये गणला जाऊ लागला. वेंकीजने या संघाची मालकी मिळवली तेव्हापासून त्याची उतरणीकडे वाटचाल सुरूच आहे आणि याला वेंकीजचे चुकीचे व्यवस्थापन कारणीभूत आहे असे म्हटले जाते. संघाच्या या अपयशाचे खापर स्टीव्ह कीन या संघ प्रशिक्षकावर फोडण्यात येते.

वेंकीजने टेक ओव्हर करण्याआधी ब्लॅकबर्नने प्रीमियर लीगमधील ९ मोसमांत भाग घेतला होता. हा त्या वेळचा अग्रणी संघ समजला जाई. वेंकीजने टेक ओव्हर केल्यानंतर त्याच्या प्रशिक्षकपदी स्टीव्ह कीन याची नियुक्ती झाली, जो फार कुणाला माहितीपण नव्हता. त्यानंतर ब्लॅकबर्नने मे २०१०मध्ये कशीबशी तग धरली पण नंतर मात्र त्यांची जोरदार घसरण सुरू झाली.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

त्याच वेळी अजून एक व्यक्तिमत्त्व समोर आले, ते म्हणजे जेरोम अँडरसन. हा सोनी एंटरटेनमेंट मीडिया या कंपनीचा हेड. त्याने ब्लॅकबर्न रोव्हर्सला वेंकीजच्या व्यवस्थापनाकडे होणाऱ्या ट्रान्सफर दरम्यान आणि एकंदर क्लबच्या कामकाजासाठी कन्सल्टेशन सर्व्हिसेस देऊ केल्या. सोनी एंटरटेनमेंट मीडिया आणि केंटारो ही फुटबॉल एजन्सी यांच्याबरोबर रोव्हर्सचा व्यवहार झाल्यावर क्लबचे बोर्ड मेंबर्स पायउतार झाले. मात्र चुकीच्या व्यवस्थापनामुळे ब्लॅकबर्न रोव्हर्स यांची सोनी एंटरटेनमेंट अँड मीडिया आणि केंटारोबरोबरची पार्टनरशिप फार काळ टिकली नाही. जोडीला केंटारो आणि वेंकीज यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचाही यावर परिणाम झाला.

रोव्हर्सचे पाठीराखे आणि फॅन्स असलेले फुटबॉलप्रेमी यासाठी वेंकीजला, पर्यायाने भारताला जबाबदार धरत आहेत. पण याच गोष्टीला दुसरीही बाजू आहे. त्यासाठी वेंकीज चिकन या कंपनीचीही माहिती असायला हवी.

वेंकीज चिकनचे प्रवर्तक आहेत तेलंगणाचे उद्योजक बंडा वासुदेव राव. तरुणपणी होतकरू असलेल्या बंडा यांना शेतीशी संबंधित उद्योग सुरु करायचा होता. हेच ध्येय समोर ठेवून त्यांनी एका कृषी विद्यापीठामध्ये एका अल्प कालावधीच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्या विद्यापीठातून त्यांनी डेअरी आणि पोल्ट्री फार्मिंग विषयीचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्याआधी काही दिवस त्यांनी एका ठिकाणी – एका पोल्ट्री कंपनीत – नोकरी केली. कामाचा पुरेसा अनुभव घेतल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला.

त्यानंतर त्यांनी पुणे येथे व्यंकटेश्वरा हॅचरीज उर्फ वेंकीज या पोल्ट्री व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. ही कंपनी भारतातली पोल्ट्री उद्योगातली सगळ्यात मोठी कंपनी बनली. अंडी उत्पादन करणे, शेतकऱ्यांना पोल्ट्री उद्योगासंबंधी मार्गदर्शन करणे, कोंबड्यांसाठी लसनिर्मिती, पोल्ट्री फीड असे अनेक पूरक उद्योग वेंकीजच्या छताखाली सुरू झाले.

पुढे त्यांच्या मुलांनी आपला व्यवसाय सातासमुद्रापार नेला. पण वेंकीज एवढ्यावर समाधानी नव्हती. त्यांना अजून मोठी झेप घ्यायची होती.

त्यामुळे त्यांनी २०१० मध्ये इंग्लिश फुटबॉल क्लब म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या ब्लॅकबर्न रोव्हर्सची खरेदी केली. मात्र कोणे एके काळी आपल्या गुलामीखाली असणाऱ्या एका गरीब देशातील एका चिकन कंपनीने आपल्याच देशातील फुटबॉल क्लब विकत घेणे ही गोष्ट ब्रिटीश फुटबॉलप्रेमींना पचवता आली नाही. त्यामुळे सुरुवातीपासून वेंकीजच्या व्यवस्थापनाला अनेक लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. ब्रिटिश लोकांनी त्यांना सहकार्य न करता उलट त्यांच्या कामात अडथळे आणले. मात्र तोटा सहन करूनसुद्धा वेंकीज चिकाटीने उभी राहिली. अजूनही ब्लॅकबर्न रोव्हर्सना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याची ती स्वप्ने पाहत आहे.

तर ही आहे ब्लॅकबर्न रोव्हर्स आणि वेंकीजची संघर्षगाथा. नक्की यात चूक कुणाची हा जरी अनुत्तरित प्रश्न असला तरी कधीतरी ही लीग पुन्हा टॉपला येईल अशी आशा तिचे समर्थक बाळगून आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा माणूस अशक्य वाटणाऱ्या पद्धतीने दगडांना बॅलन्स करून कलाकृती बनवतो..!

Next Post

अमेरिकेने रशियाची हेरगिरी करण्यासाठी मांजरांना ट्रेनिंग दिलं होतं..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

अमेरिकेने रशियाची हेरगिरी करण्यासाठी मांजरांना ट्रेनिंग दिलं होतं..!

इतिहासाच्या पानात लपवून ठेवलेलं वंचिनाथनचं क्रांतिकार्य सर्वांसमोर येणं गरजेचं आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.