The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि कुलकर्ण्यांचा मुलगा इतिहास गाजवणारा लावणीसम्राट बनला..!

by द पोस्टमन टीम
10 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


महाराष्ट्राच्या मातीला जसा इतिहासाचा वारसा आहे, तशी सांस्कृतिक परंपराही आहे. सांस्कृतिक परंपरेतील महाराष्ट्राची एक प्रमुख ओळख म्हणजे “लावणी”.

अखिल भारतात जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, दक्षिणेचा कथ्थक प्रसिद्ध आहे तशी महाराष्ट्राची लावणीही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या लावणीने आज सातासमुद्रापार नाव कोरलंय.

अनेक कलाकार,संगीतकार यासाठी अतोनात मेहनत घेत असतात. पण लावणीने जे यश मिळवला आहे त्याच सर्वस्वी श्रेय कोणाच असेल तर ते पठ्ठे बापूराव यांचं.

पठ्ठे बापूराव अर्थात श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी हे मुळचे सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष गावचे. त्यांचे वडील कृष्णाजी यांच्याकडे या गाव व परिसराचे कुळकर्णीपद होते.

त्यांनी तसेच संस्कार आपला मुलगा श्रीधरला दिले. पण श्रीधरला यात म्हणावा तसा उत्साह नव्हता. म्हणूनच कृष्णाजींनी औंध संस्थानाचे महाराज पंतप्रतिनिधी यांच्या आश्रयाखाली श्रीधरला ५ वी पर्यंतचे शिक्षण दिले.



यातच मिळेल त्या वेळेत मित्रांसोबत भटकणे, कवने करणे याचा छंद लहानग्या श्रीधरला जडला. घरच्यांनी प्रथमदर्शनी याला विरोध केला खरा पण तो होताच पठ्ठा, ऐकणार कसला!

हे सर्व छंद म्हणून ठीक आहे पण यातून उदरनिर्वाह चालत नाही असे घरच्यांनी सुनावल्यानंतर ते गावातील एका तमाशा फडासोबत मिळून काम करू लागले. गावोगाव प्रवास करू लागले. श्रीधररावांच्या लेखणीतून येणाऱ्या लावण्या प्रचंड लोकप्रिय ठरू लागल्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आधी केवळ वग, गौळणी आणि लावण्याच तमाशात सदर केल्या जायच्या पण लावण्यांबरोबर असेही काही असावे ज्यातून लोकांचे मनोरंजन तर होईलच शिवाय लोकांची उपस्थितीही वाढेल.

मग पठ्ठे बापुरावानी यात भेदिक लावण्या, संवाद, पदे, झगड्याच्या लावण्या असे प्रयोग करत यात लिखाण केले. लोकांनीही याला भरभरून प्रतिसाद दिला.

लावणीचं अस्तित्व पहिल्यापासून टिकून होते पण तिला नावरूप मिळवून देण्यासाठी पठ्ठे बापुरावांनी अथक परिश्रम घेतले. गावातील तमाशाच्या फडाबरोबर इतरही तमाशाचे लोक पठ्ठे बापुरावाकडे काम घेऊन येऊ लागले.

प्रत्येक तमाशात, लावणीतील वगात पठ्ठे बापूरावांचे शब्द नाचू लागले. यातूनच ते सबंध महाराष्ट्रात सर्वोत्मुख झाले.

त्यांची लोकप्रियता व आवड एवढी वृद्धिंगत झाली की काही काळानंतर त्यांनी व्यवसाय व संसार सोडून स्वतःचा तमाशा फड सुरू केला. पठ्ठे बापूरावांचा फड आलाय हे ऐकताच लोकांची झुंबड उडू लागली. या फडात पठ्ठे बापुराव त्यांनी लिहिलेल्या लावण्या सादर करण्याबरोबरच गावूही लागले.

लोकांचा प्रतिसाद वाढतच राहिला, श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी आता शाहीर पठ्ठे बापूराव म्हणून सर्वश्रुत झाले होते.

गण, गौळण, भेदिक, झाग्द्या, राणी, रंगबाजी अशा अनेक प्रकारच्या लावण्या त्यांनी स्वतः लिहिल्या, त्यांनी हयातीत २ लाखांहून अधिक लोक लावण्या व वग लिहिले असे अनेक लेखक सांगतात पण याचा नेमका आकडा मात्र आजून तरी उपलब्ध नाहीये. त्यांच्या काहीच रचना आज संग्रहात आढळतात.

पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या  व पठ्ठे बापूराव यांच्या ढोलकीवरील लावण्या असे दोन प्रकारचे पुस्तकही आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यांनी रचलेला मिठाराणीचा वग तर महाराष्ट्राने डोक्यावरच घेतला होता.

थोडीफार बेपर्वाई असली तरी प्रसंगावधान राखून त्यांच्या लावण्या समर्पक असतात असे त्याकाळातील साहित्यिक सांगत.

तमाशात होणारे संवाद, लोकांची मानसिकता यावरही पठ्ठे बापुरावांनी आपल्या लेखणीतून भाष्य केले, लोकही याला सहज स्वीकारू लागले.

पठ्ठे बापूराव हे मुळातच हजरजबाबी होते, दिसणाऱ्या व घडणाऱ्या प्रत्येक बाबीवर ते तत्काळ काही ना काही मत व्यक्त करत. त्यांचं लिखाण हे एवढ बोलकं असायचं की  न.चि. केळकरांनी त्यांना शीघ्रकवी हा सन्मानाच बहाल केला.

पुढे पठ्ठे बापूराव लावणी भाग १, भाग २,भाग ३ असे काही संग्रह प्रसिद्ध झाले आणि विशेष म्हणजे याला न.चि.केळकरांनी स्वतः प्रास्ताविक दिले.

पठ्ठे बापुरावांनी लिहिलेली चौदा रत्नांचा जन्म व तीन वस्तूची भेदिक लावणी ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी पठ्ठे बापूराव ही व्यक्ती किती कल्पक होती याचा प्रत्यय आपल्याला येतो.

महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या सीमा पार करत आज लावणी जगात गाजत आहे. लावणीमुळे महाराष्ट्राचा सन्मान वाढतोय, सांस्कृतिक परंपरा जपली जातेय.

सांगलीसारख्या जिल्ह्यातून येऊन पठ्ठे बापुरावांनी लावणीला एक नव संजीवनी देत तिला लोकप्रिय केले, छोट्याश्या हरणाक्ष गावच्या कुलकर्ण्यांचा मुलगा महाराष्ट्राचा एकमेव लावणी सम्राट बनला. एक छंद म्हणून सुरु केलेल्या लावणीने पठ्ठे बापुरावाना अजरामर केले.

साहित्य कला यांचा अभ्यास करणाऱ्या व त्यात सहभागी असणाऱ्या अनेकांसाठी पठ्ठे बापूरावांचे लिखाण नक्कीच कमी येते.

महाराष्ट्रात तर लावणीवरील अभ्यासक्रमही विद्यापीठातून चालवला जातो. लावणी सम्राट पठ्ठे बापुरावांनी दिलेल्या योगदानास आमचा सलाम..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Artist
ShareTweet
Previous Post

आजन्म अनवाणी फिरून शिक्षणप्रसार करणारा खराखुरा शिक्षणमहर्षी

Next Post

सलग २१ ओव्हर ‘मेडन’! – या गोलंदाजाने जगभरातील फलंदाजांना घाम फोडला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सलग २१ ओव्हर 'मेडन'! - या गोलंदाजाने जगभरातील फलंदाजांना घाम फोडला होता

शेवटची संख्या माहिती असणारा भारतीय गणिती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.