The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराट कोहलीची फेव्हरेट ऑडी R8 पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात का पडली आहे..?

by द पोस्टमन टीम
28 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आपली पहिली गाडी ही आपल्याला बरीच प्रिय असते. कित्येक तरुण तर आपल्या पहिल्या बाईकला आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडपेक्षाही अधिक जपतात. माणसांपेक्षा गाड्यांंमध्येच अधिक रमणारे लोकही आपण पाहिले असतील. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान विराट कोहलीलाही असंच लक्झरियस गाड्यांचं वेड आहे.

विराटच्या ताफ्यामध्ये ऑडी, रेंज रोव्हर, बेंटली अशा तब्बल १२ गाड्या आहेत. यांपैकी सात गाड्या तर ऑडीच्याच आहेत. विराटला पहिल्यापासूनच ऑडी गाड्यांचं मोठं आकर्षण आहे. आता तर तो ऑडीचा भारतातील ब्रँड अँबॅसिडरही आहे. मात्र, ब्रँड अँबॅसिडर होण्याआधीच त्याने एक ऑडी आर 8 विकत घेतली होती. ही विराटची पहिली ऑडी कार होती. पहिली कार शक्यतो आपण जिवापाड जपतो. मात्र, विराटची ही पहिली गाडी चक्क मुंबईतील एका पोलीस स्टेशनच्या आवारात धूळ खात पडली आहे.

अर्थात, पोलिसांनी विराटवर कारवाई म्हणून ही गाडी जप्त नाही केली. ही गाडी पोलिसांकडे पडून राहण्याला दुसरं कारण आहे. २०१६ साली विराटने आपली ही गाडी विकली होती. एका ब्रोकरच्या थ्रू त्याने ही गाडी सागर ठक्कर, उर्फ शॅगी नावाच्या व्यक्तीला विकली होती. सागरने ही गाडी आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी म्हणून घेतली होती. मात्र, त्यानंतर काही काळातच सागर हा एका मोठ्या स्कॅममध्ये अडकला.

ठाण्यातील फेक कॉल सेंटर रॅकेट प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सागरचं नाव पुढे आलं होतं. यामुळे पोलिसांनी सागरकडे असलेली ऑडी आर 8 ही गाडी जप्त केली होती. पोलिसांनी ही गाडी दिल्लीमधून जप्त करुन मुंबईला आणली होती, आणि तेव्हापासून ती ठाण्यातील पोलीस स्टेशनच्या आवारात पडून होती.

ही गाडी विराटच्या मालकीची असल्यामुळे या प्रकरणात त्याचंही नाव समोर आलं होतं. मात्र, विराटने ही गाडी विकल्याचं कागदोपत्री सिद्ध झाल्यानंतर त्याचा या स्कॅमशी कसलाही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं. २०१६-१७ मध्ये जप्त करण्यात आलेली ही गाडी पुढे कित्येक महिने तिथेच पडून होती. २०१९ मध्ये ऑटोमोबाईल अर्डेंट या सोशल मीडिया हँडलने या गाडीचा फोटो पोस्ट केला होता. “ही विराट कोहलीची ऑडी आर8 व्ही10 आहे. ठाण्यातील एका पोलीस स्टेशनच्या आवारात ही पडून आहे. मुंबईमधील पुराच्या वेळी ही गाडी इथेच होती. पुराच्या पाण्यात वाहून ती या आवाराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचली आहे. अशा चांगल्या गाड्या इतक्या खराब अवस्थेत पाहणं खरंच वाईट आहे. ही गाडी आता दुरुस्तही होण्याच्या परिस्थितीत आहे की नाही, काय माहित.” अशा आशयाचं कॅप्शन देत या गाडीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. यावर कोहलीच्या फॅन्सनी विविध प्रतिक्रियाही दिल्या होत्या.



विराटने २०१२ साली ही ऑडी आर8 विकत घेतली होती. पहिलीच ऑडी असल्यामुळे त्याला ही गाडी अगदी प्रिय होती. कित्येक वेळा तो या गाडीमध्ये ड्राईव्हवर गेलेला दिसून आला आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल जेव्हा आपल्या संघासह भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा विराटने आपली ही गाडी त्याला फिरण्यासाठी दिली होती. २०१६ साली ही गाडी त्याने विकली. अर्थात, विराटकडे सध्या कित्येक लग्झरियस गाड्या आहेत.

स्पोर्ट्सकीडा या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, विराटकडे असलेल्या गाड्यांमध्ये ऑडीच्या आर8 व्ही10 प्लस, आर8 एलएमएक्स, ए8 एल, क्यू8, क्यू7, आरएस5 आणि एस5 या मॉडेल्सचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत प्रत्येकी सुमारे एक ते चार कोटींच्या घरात आहे. या ऑडींव्यतिरिक्त विराटकडे एक रेंज रोव्हर व्होग, बेंटली कॉन्टिनेंटल जीटी आणि बेंटली फ्लाईंग स्पर या गाड्या आहेत. विराटने २०१५ साली एक लँबॉर्गिनी गल्लार्डोही घेतली होती, मात्र २०१७ साली त्याने ती विकली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

विशेष म्हणजे, या सर्व लग्झरियस गाड्यांसोबतच विराटकडे एक टोयोटा फॉर्च्युनर आणि रेनॉल्ट डस्टरही आहे. विराटकडे असणारी रेंज रोव्हर ही त्याच्या दिल्लीच्या घरी आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माकडेही रेंज रोव्हरचं सेम मॉडेल आहे. कार्ससोबतच आपल्याला बाईक्सचंही वेड असल्याचं विराटने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

बाईकवर लॉंग राईडला जाणं आपल्याला आवडत असल्याचं त्याने म्हटलं. मात्र, आपल्याकडे बाईक्सचं असं कलेक्शन नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतंं. कित्येक दिवस आपण बाईकवर कुठे फिरलो नाही. बाईकवर फिरणं आपण मिस करत असल्याचंही तो म्हणाला होता.

सध्या विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत ॲक्टिव्ह क्रिकेटर आहे. खरंतर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीमध्ये विराटचा नंबर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीच्या नंतर लागतो. मात्र, सचिन आणि धोनी निवृत्त झाले आहेत. विशेष म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिघांकडेही प्रायव्हेट जेट्स आहेत. विराट कोहलीकडे सेस्ना 680 हे प्रायव्हेट जेट आहे. याची किंमत साधारणपणे १२५ कोटी रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

२०१९ साली भारताचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर असताना विराट आणि अनुष्का या जेटमधून फिरताना दिसून आले होते. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडेही प्रायव्हेट जेट आहे, ज्याची किंमत सुमारे २६० कोटी आहे. सचिन तेंडुलकरकडे प्रायव्हेट जेट आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, २०१६ साली सचिनचा अभिनेता वरूण धवनसोबत प्रायव्हेट जेटमध्ये फिरतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन सचिनकडेही धोनीसारखंच प्रायव्हेट जेट असल्याच्या चर्चा होत आहेत. या तिघांव्यतिरिक्त, भारताचे आणखी एक माजी कर्णधार आणि 83च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार कपिल देव यांच्याकडेही खासगी जेट आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

स्वतःची नोकरी धोक्यात घालून या जपानी अधिकाऱ्याने ६००० ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका केली

Next Post

या खटल्यानंतर स्त्री आणि पुरुषांच्या पलीकडची ओळख आपल्या देशाने मान्य केली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या खटल्यानंतर स्त्री आणि पुरुषांच्या पलीकडची ओळख आपल्या देशाने मान्य केली

अमेरिकन इतिहासातील एकमेव माणूस जो मृत्यूनंतर बुटांच्या जोडीमध्ये रुपांतरीत झाला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.