The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्त्रीने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती रशियाला पुरवली होती

by द पोस्टमन टीम
12 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अमेरिकेच्या (यूएसए) अल्बुकर्कीमधील एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये नेहमीप्रमाणं काही ग्राहक निवांत बसलेले होते. प्रत्येक जण रेस्टॉरंटच्या मेनूचा आस्वाद घेत होतं. त्यातील एकजण रेस्टॉरंटचा नियमित ग्राहक होता. खाऊन झाल्यानंतर नेहमीप्रमाणं त्यानं वेटरसाठी टीप सोडली. त्यासोबतच एक पॅकेज देखील सोडलं. काही वेळातचं ते पॅकेज एका कुरियरबॉयनं उचललं. ज्यांनी-ज्यांनी ते पॅकेज पाहिलं असेल त्यापैकी एकालाही कल्पना नव्हती, त्या बॉक्समध्ये अशी कागदपत्रे होती जी त्यावेळची पृथ्वीवर अस्तित्वात असलेली सर्वात गोपनीय माहिती होती!

हो! ती कागदपत्रे अमेरिकेच्या गुप्त अणुप्रकल्पाची होती, ज्याला आता आपण सर्व ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ म्हणून ओळखतो. अमेरिकेचा तो सर्वात महत्त्वाकांक्षी आणि घातक प्रकल्प होता. मात्र, त्यात शिरकाव करण्यात सोव्हिएत हेरांना यश आलं होतं. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती बाहेर काढण्यामागे एका स्त्रीचा हात होता! एलिझाबेथ झारुबिना, असं या चतुर महिलेचं नाव आहे.

युक्रेनमधील एका ज्यु कुटुंबात १ जानेवारी १९०० रोजी एलिझाबेथचा जन्म झाला होता. सोव्हिएत डिप्लोमॅट असलेल्या वस्ली झारुबिनाशी एलिझाबेधनं लग्न केलं होतं. रोमानिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रियातील विद्यापीठांमध्ये तीन इतिहास आणि तत्वज्ञान(फिलॉसॉफी) या विषयांचं शिक्षण घेतलं.

तिला नवनवीन भाषा शिकण्याची प्रचंड आवड होती. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रोमानियन, रशियन आणि येदिश या ६ भाषा तिला अवगत होत्या. तिच्या याचं क्षमतेमुळं पुढे ती एक यशस्वी गुप्तहेर बनू शकली. अमेरिकेत जाण्यापूर्वी तिनं अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या.

एलिथाबेथ झारुबिनानं कम्युनिस्ट पक्षाच्या मदतीनं दुसऱ्या महायुद्धापूर्वी पोलंडमध्ये गुप्तहेरांचं मोठं नेटवर्क तयार केलं होतं. टर्कीतील याकोव ब्लमकिन या फितुर सोव्हिएत गुप्तहेरचा मागोवा घेण्याची कामगिरी तिच्याकडे देण्यातं आली होती. एक गुप्तहेर म्हणून तिची ही पहिली मोहिम होती. याकोव ब्लमकिन हा टर्कीचा बेकायदेशीर रहिवासी आणि सोव्हिएत गुप्तचर संस्थेचा हेर होता. जन्मानं ज्यू असल्यामुळं त्याला हिब्रू भाषा अवगत होती. एका मोहिमेदरम्यान त्याच्या हाती काही महत्त्वाची हिब्रू हस्तलिखितं लागली. त्यानं बेकायदेशीरपणे ती कागदपत्रे संग्रहालयांना विकल्या आणि त्यातून पैसे मिळवले.



टर्कीमध्ये असताना याकोव्ह ब्लमकिन, स्टॅलिनपासून विभक्त झालेल्या लिओन ट्रॉटस्कीच्या संपर्कात आला. ब्लमकिन आणि ट्रॉटस्की यांची जुळलेली मैत्री सोव्हिएत गुप्तचर एजन्सीला रुचली नव्हती. ब्लमकिनशी जवळीक वाढवून त्याची व ट्रॉटस्कीची माहिती मिळवण्याचं काम झारुबीनाला मिळालं होतं. एलिझाबेथनं ब्लमकिनला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याला सोव्हिएतच्या ताब्यात दिलं. तिची पहिली मोहिम तिनं यशस्वीपणे पार पाडली होती.

दुसऱ्या महायु*द्धापूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचं मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे, याची पुरेपुर कल्पना सोव्हिएतला होती. अमेरिकन सरकारसाठी संशोधनाचं काम करणाऱ्या व्यक्तींकडून माहिती मिळवण्याची एक दीर्घकालीन योजना सोव्हिएत गुप्तहेर संस्थेनं आखली. हे काम अतिशय धोकादायक होतं. अमेरिकेच्या भूमीवर जाऊन अतिशय गुप्त माहिती बाहेर काढणं म्हणजे उंबराचं फूल तोडण्यासारखं होतं. ही जबाबदारी एलिझाबेथ झारूबिनाच्या खांद्यावर देण्यात आली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१९३२ मध्ये झारुबिना अमेरिकेला गेली. तिथे तिनं उच्च पदांवर कार्यरत असलेल्या आणि कम्युनिस्टांबद्दल सहानुभूती असलेल्या व्यक्तींची चांगले संबंध प्रस्थापित केले. असं म्हणतात एलिझाबेथ समोरच्या व्यक्तीचं मतपरिवर्तन करण्यात माहिर होती. आपल्या या कौशल्याच्या बळावर तिने अमेरिकेत स्वत:चं एक नेटवर्क तयार केलं. भविष्यात कामी येतील अशा अनेक व्यक्तींना तिनं जवळ केलं. यात रॉबर्ट ओपेनहायमरच्या पत्नीचाही समावेश होता. रॉबर्ट ओपेनहायमर म्हणजे ज्यांनी पुढे ‘मॅनहॅटन प्रोजक्ट’चं नेतृत्व केलं होतं. त्याचवेळी ती युरोपमधील ज्यू लोकांना मदतही करत होती. जर्मनीत नाझी पक्ष सत्तेवर आला तेव्हा झारुबीनानं अनेक ज्यूंना युरोपमधून अमेरिकेत पळून जाण्यास मदत केली. याचं लोकांनी पुढे तिला अमेरिकेत वेळोवेळी मदत केली.

आइन्स्टाईनकडून आलेल्या एका पत्रानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी ‘द युरेनियम ऍडव्हायझरी कमिटी’च्या बॅनरखाली एक समिती स्थापन केली. १९४१ मध्ये झारुबिना दाम्पत्यानं अमेरिकेतील शास्त्रज्ञांची हेरगिरी सुरू केली. एलिझाबेथ झारुबिनानं यूएसएमध्ये असलेलं तिचं जुनं नेटवर्क पुन्हा ॲक्टिव्ह केलं.

तिचे कनेक्शन्स इतके स्ट्राँग होते की, तिनं आईनस्टाईनची प्रेयसी कोनेन्कोव्हला देखील आपल्या प्रभावाखाली आणलं होतं. कोनेन्कोव्हच्या मदतीनं झारुबिनानं आईनस्टाईनच्या अनेक कल्पना सोव्हिएत गुप्तचर संस्थेला पुरवल्या.

सप्टेंबर १९४२ मध्ये, ‘द युरेनियम ॲडव्हायझरी कमिटी’चं रूपांतर ‘ऑपरेशन एनॉर्मस’ व नंतर ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मध्ये करण्यात आलं. मॅनहॅटन प्रोजेक्ट अमेरिकन सैन्याच्या हाती देण्यात आला. रॉबर्ट ओपेनहायमरची नियुक्ती या प्रकल्पाचा वैज्ञानिक प्रमुख करण्यात आली. रॉबर्ट ओपेनहायमर अतिशय हुशार होते. १९३०च्या दशकात त्यांना कम्युनिझमबद्दल सहानुभूती होती. ओपेनहायमरला मॅनहॅटन प्रकल्पासाठी एका योग्य जागेच्या शोधात होता. जी संपूर्ण जगाच्या नजरेपासून दूर असेल. न्यू मेक्सिकोतील लॉस आल्मोस या दुर्गम भागातील एका मुलांच्या शाळेत हा प्रकल्प सुरू केला गेला. ओपेनहायमरनं या प्रकल्पासाठी विविध क्षेत्रांतील लोकांची भरती केली. त्या अगोदर त्यांनी या लोकांच्या लष्करी पार्श्वभूमीची देखील पडताळणी केली होती.

मॅनहॅटन प्रकल्पात संपूर्ण यूएसएमधील सर्वोत्तम शास्त्रज्ञांचा भरणा होता. सुरुवातीच्या काळात लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांच्यात लहान-मोठ्या गोष्टींवरून संघर्ष उद्भवत असे. एलिझाबेथनं याचाचं फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोव्हिएत हेरांनी अप्रत्यक्षपणे ओपेनहायमरशी देखील संपर्क साधला होता. मात्र, त्यानं त्यांना सहकार्य करण्यास नकार दिला. नंतर झारुबिना व तिच्या टीमनं क्लाऊस फुचेसला आपल्या जाळ्यात ओढलं. क्लाऊस फुचेस हा मॅनहॅटन प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण सदस्य होता. आण्विक विखंडन प्रतिक्रियेसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण वस्तुमानाची गणना करण्याचं काम त्यानं केलं होतं.

एलिझाबेथनं लॉस आल्मोसपासून जवळ असलेल्या अल्बुकर्की आणि सॅन्टा फे याठिकाणी फास्ट-फूड रेस्टॉरंट्स सुरू केले. या रेस्टॉरंट्समध्ये येऊन क्लाऊस फुचेस मॅनहॅटन प्रकल्पाची कागदपत्रे सोडत असे आणि सोव्हिएत हेर ते गोळा करत. मॉरिस कोहेन आणि लोना कोहेन या जोडीनं कागदपत्रे हाताळण्याची जबाबदारी पार पाडली. कोहेन दाम्पत्य रेस्टॉरंटमधून कागदपत्रे रेल्वेनं वॉशिंग्टनला घेऊन जात. तिथून सोव्हिएत दुतावासाच्या असंख्य कुरिअरसोबत ही कागदपत्रे सोव्हिएतमध्ये पोहचत.

क्लाऊस फुचेसप्रमाणं थिओडोर हॉल हा देखील एलिझाबेथच्या गळाला लागलेला मासा होता. ‘फॅट बॉय’ या अणूबॉम्बच्या डिझाइनमध्ये थिओडोर सामील होता. त्यानं देखील सोव्हिएत एजंट्सला माहिती पुरवली.

एलिझाबेथ झारुबिनानं एकाचवेळी १८ एजंट्सचा समन्वय साधून मॅनहॅटन प्रकल्पाची माहिती सोव्हिएतपर्यंत पोहचवली होती. या माहितीसोबत सोव्हिएत शास्त्रज्ञ त्यांची निरीक्षण व्हेरिफाय करत. यामुळे त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गती मिळण्यास मदत झाली. 

पुढे मॅनहॅटन प्रकल्पाची माहिती लीक होत असल्याचा संशय एफबीआयला आला. अमेरिकेनं मॅनहॅटन प्रकल्पाभोवती सुरक्षा कडक केली. मात्र, तोपर्यंत एलिझाबेथ झारुबिना आणि तिच्या टीमनं आपलं बहुतांशी काम पूर्ण केलं होतं.

आपली मोहिम फत्ते करून एलिझाबेथ आणि तिचा पती मॉस्कोला परतले. मात्र, त्यांना अटक करण्यात आली. दोघांवर जर्मनीसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. सहा महिन्यांच्या चौकशीनंतर दोघांची निर्दोष मुक्तता झाली. एलिझाबेथनं सोव्हिएतसाठी केलेल्या असामान्य कामगिरीसाठी तिला ‘ऑर्डर ऑफ रेड स्टार’ देऊन सन्मानित केलं. १४ मे १९८७ रोजी बसमधून पडून रहस्यमयरित्या तिचा मृत्यू झाला.

एलिझाबेथ झारुबिनाच्या रुपात एका महिलेनं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला आव्हान देण्याचं महाकठीण काम केलं होतं. तिनं ज्या हुशारीनं मॅनहॅटनसारख्या अतिगुप्त प्रकल्पाची माहिती मिळवली त्यावर अमेरिकन गुप्तचर संस्थेतील अधिकारीसुद्धा फिदा झाले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एका पिंजऱ्यात खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना तो आपल्या भोवती खेळवायचा

Next Post

स्वतःची नोकरी धोक्यात घालून या जपानी अधिकाऱ्याने ६००० ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका केली

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

स्वतःची नोकरी धोक्यात घालून या जपानी अधिकाऱ्याने ६००० ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका केली

विराट कोहलीची फेव्हरेट ऑडी R8 पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात का पडली आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.