The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जसं रायफलमध्ये AK-47 तसं पिस्तूलमध्ये ग्लॉक १७..!

by द पोस्टमन टीम
6 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


प्राचीन काळात शिकारीसाठी किंवा यु*द्धातही धनुष्यबाण हे एक शस्त्र म्हणून वापरलं जाई. श्रीराम असो किंवा महाभारतातील अर्जुन, एकलव्य, कर्ण असे एकाहून एक सरस नेमबाज, धनुर्धारी झाले. नंतरच्या आधुनिक काळात धनुष्यबाणाची जागा ही बंदुका व पिस्तुलांनी घेतली.

AK-47 ही रायफल जशी तिच्या नॉनस्टॉप भेदक माऱ्यासाठी ओळखली जाते, तसंच छोट्या बंदुका किंवा पिस्तुल्समध्ये सर्वात प्रसिद्ध नाव आहे, ग्लॉक मार्क-17 किंवा ग्लॉक-17 या नावाने ओळखलं जाणारं पिस्तुल! या पिस्तुलसारखं जगात दुसरं कोणतंच पिस्तुल नाही.

गॅस्टन ग्लॉक या व्यक्तीने हे पिस्तुल बनवलं, म्हणून त्यांच्याच नावाने हे पिस्तुल ओळखलं जातं. गॅस्टन ग्लॉक यांना आधी पिस्तुल बनवण्याचं कोणतंही ज्ञान नव्हतं. ते सैनिकांकरिता चाकू व बंदुकीच्या गोळ्या ठेवता येणारे बेल्ट्स तयार करत.

ज्यावेळी दुसरं महायु*द्ध संपलं, तेव्हा प्रत्येक देशाला जाणीव झाली की, आपला शस्त्रसाठा आणखी मजबूत करायला हवा. त्याचवेळी गॅस्टननी विविध शस्त्रांमधील जाणकार लोकांना एकत्र जमवून बंदुकी बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यांना पॉलिमरबद्दल बरीच माहिती होती. त्याचाच उपयोग करून त्यांनी नवीन पिस्तुल बनवण्याचं ठरवलं, ज्याचा कुठेही वापर करता येईल.

ऑस्ट्रियाचं सैन्य तेव्हा उत्तम दर्जाच्या पिस्तुलच्या शोधात होतंच. ग्लॉक आणि त्यांच्या टीमने एकत्र येऊन १९७९ साली केवळ तीन महिन्यांत एक पिस्तुल तयार केलं. त्यानंतर त्याची टेस्टिंग सुरू झाली.



गॅस्टन आणि त्यांच्या टीमला कल्पनाही नव्हती, की ते काय दर्जाची वस्तू बनवत आहेत. या पिस्तुलाचा बॅरल हा फक्त ९ मिमी व्यासाचा होता, ज्याला ‘पेन्सिल बॅरल’ असंही म्हटलं जात असे. हे एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुल होतं. याचं वैशिष्ट्य असं की, याच्या मॅगझीनमध्ये एकावेळी १७ गोळ्या राहू शकत होत्या. पॉलिमरपासून बनल्याने या पिस्तुलाचं वजन खूप कमी होतं, त्याशिवाय ते उच्च तापमानातसुद्धा अगदी व्यवस्थित राहू शकत होतं. याचं डिझाईन अगदी सहजपणे हातात धरता येईल अशाप्रकारे केलं होतं. याचा नेमदेखील अगदी अचूक असल्याने सुटलेली गोळी थेट आपलं लक्ष्य भेदत असे. गॅस्टन ग्लॉक यांचा यासाठी पॉलिमर वापरायचा निर्णय त्यांना अशाप्रकारे फारच फायदेशीर ठरला.

गॅस्टन यांनी जेव्हा प्रथम हे पिस्तुल ऑस्ट्रियाच्या सैनिकांना दिलं, तेव्हा ते थक्क झाले. इतकं चांगलं पिस्तुल त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. पुढच्याच वर्षी १९८० मध्ये ऑस्ट्रियाच्या लष्कराने त्यांच्याकडील वॉल्थर हँडगन्सच्या ऐवजी ग्लॉक पिस्तुलांचा वापर सुरु केला.

गॅस्टन एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी पुढचा विचार करत १९८२ साली युरोपातील सैन्य, पोलिस व नेमबाजीमधल्या जाणकार पिस्तुल तज्ज्ञांची टीम एकत्र केली. या सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा रिसर्च करून ग्लॉक पिस्तुलाच्या जुन्या मॉडेलमध्ये सुधारणा करून एक नवीन मॉडेल तयार केलं. यात मॅगझीनला सेल्फ-लोडिंगची सोय होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हळूहळू ग्लॉक पिस्तुलाची ख्याती पसरत गेली. एवढी की, अमेरिकेचं लक्षही त्यानं वेधून घेतलं. १९८८ साली ग्लॉक पिस्तुलाचा प्रवेश अमेरिकेमध्ये झाला. अमेरिका त्यावेळी ड्र*ग्स रॅकेट्सने त्रस्त झालेली होती. जिकडे तिकडे गुन्हेगार ह*त्यारं घेऊन वावरत होते. तिथल्या पोलिसांना अशावेळी एका चांगल्या पिस्तुलाची गरज होती, जी नेमकी गॅस्टन ग्लॉक यांच्या या पिस्तुलाने पूर्ण केली. अमेरिकन पोलीस तर या पिस्तुलाने इतके प्रभावित झाले की, त्यांचे सगळे नेम आता अगदी बिनचूक लागायला सुरुवात झाली. नवीन भरती झालेल्या पोलिसांना याचा सराव करायला केवळ एका दिवसाचा अवधी पुरेसा ठरू लागला.

अमेरिकेत आल्यावर ग्लॉकचे दिवसच पालटले. पोलीस, सैन्य एवढंच काय तर हॉलिवूडच्या ॲक्शन मूव्हीजमध्येही दाखवायला ग्लॉक पिस्तुलच वापरलं जाऊ लागलं, इतकी त्याची क्रेझ वाढू लागली. या पिस्तुलाच्या वाढत्या वापराने त्याआधीच्या इटलीच्या बेरेटा पिस्तुलांचं स्थान आपोआपच निकालात निघालं.

ग्लॉक पिस्तुलाने जर्मनीतील हेकलर अँड कोच, स्वित्झर्लंडमधील एसआयजी सॉअर, बेल्जियमचं हर्स्टल आणि ऑस्ट्रियन स्टीयर मॅनलिश्चर या पिस्तुल-बंदुकीच्या सर्व प्रसिद्ध ब्रँड्सना मागे टाकलं.

ग्लॉक पिस्तुलाची अनोखी वैशिष्ट्यं हीच त्याची बलस्थानं आहेत. हे पिस्तुल ९ मिमी आकाराच्या गोळ्यांवर चालतं. त्यामुळेच याच्या मॅगझीनमध्ये एकावेळी १७ गोळ्या मावू शकतात. एवढंच नाही, तर इतर पिस्तुलांप्रमाणे ग्लॉकला केवळ त्याच्यासाठीच बनलेल्या गोळ्या हव्यात असं नाही. कुठल्याही पिस्तुलाची ९ मिमी आकाराची गोळी ग्लॉकला चालू शकते. अशा गोळ्या सहजपणे उपलब्ध होत असतात. याला ग्लॉक-17 असं नाव पडण्याचं कारण, हे कंपनीला मिळालेलं १७वं पेटंट होतं.

सुरवातीच्या काळात ग्लॉक पिस्तुल्स ही टपरवेअरसारख्या प्लॅस्टिक डब्यांतून पॅक केली जात, नंतर त्यासाठी खास ॲल्युमिनियमचे डबे डिझाईन करण्यात आले. त्यामध्ये या पिस्तुलासोबत ९ मिमीच्या १७ गोळ्याही येत असत. काही काळाने सरकारी नियमानुसार गोळ्यांऐवजी फक्त पिस्तुलच डब्यांतून विकलं जाऊ लागलं. आताच्या काळात पेन्सिल बॅरलचं ग्लॉक पिस्तुल हे अतिशय दुर्मिळ मानलं जातं.

काही काळानंतर ग्लॉकने आणखी सुधारणा करत बॅरलची साईझ पुन्हा बदलली, ती अधिक मजबूत करण्यात आली. ट्रिगर गार्ड आणि सिंगल रिकॉल स्प्रिंगचा समावेश करण्यात आला. मॅगझीनमध्येही काही बदल करण्यात आले. ग्लॉक पिस्तुलाची त्यानंतर बरीच मॉडेल्स आली, त्यात बरेच बदल करून त्याला अधिक अपग्रेड करण्यात आलं जसं लेझर, स्कोप, फ्लॅशलाईट वगैरे. ज्यामुळे त्याची ताकद अजूनच वाढली.

ग्लॉक पिस्तुल हे बऱ्याच कठीण परीक्षा पार करून आलेलं आहे. ते टेस्टिंगकरिता हेलिकॉप्टरमधून खाली टाकण्यात आलं, जमिनीत गाडण्यात आलं, बर्फात पुरून तसंच अगदी चिखलात बुडवून ठेवण्यात आलं होतं. पण या सगळ्यांचा कसलाही परिणाम न होता त्याने तितक्याच क्षमतेने अचूक नेम टिपला.

तर अशी आहे, जगातल्या नंबर वन पिस्तुलाची कहाणी!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या भामट्याने ताजमहाल, संसद, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनसुद्धा विकलं होतं

Next Post

या माणसाने ब्रिटिश राजघराण्याशी पंगा घेत चक्क शाही मुकुटावरच डल्ला मारला होता..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या माणसाने ब्रिटिश राजघराण्याशी पंगा घेत चक्क शाही मुकुटावरच डल्ला मारला होता..!

बोट बुडाली, पण जगण्याच्या जिद्दीने हा पठ्ठयाने १३३ दिवसांनी समुद्रातून जिवंत परत आला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.