The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या चिनी खलाशाने कोलंबसच्या दुप्पट समुद्री प्रवास करून चिनी माल जगभर पसरवला होता

by द पोस्टमन टीम
14 July 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


ख्रिस्तोफ़र कोलंबस नवीन जगाच्या शोधार्थ समुद्रप्रवासाला निघण्यापूर्वी ८७ वर्षं आधीच एका चिनी खलाशानं नवीन जगाचा प्रवासही करून झालेला होता. कोलंबसकडे असणार्‍या तीन महाकाय जहाजांचं कौतुक आपण ऐकलं वाचलं आहेच मात्र या चिनी खलाशाकडे याहून दुप्पट महाकाय अशी एक दोन दहा नव्हे तर तब्बल ३१७ महाकाय जहाजं होती.

कोलंबससोबत ८७ सहखलाशांचा ताफ़ा होता तर या चिनी खलाशाकडे तब्बल ३० हजार सहखलाशांचा ताफ़ा होता. कोलंबसनं जर ४ हजार मैलांचा समुद्री प्रवास केला असेल तर या चिनी खलाशानं ७ हजार मैलांची सफ़र केलेली आहे. मात्र कोलंबसनं ज्याप्रमाणे शोधलेल्या जमिनींवर हक्क प्रस्थापित केला तसा या खलाशानं न करता त्या त्या भूमीवर त्यानं आपल्या देशातील वस्तू विकल्या आणि अनेक मौल्यवान वस्तू आपल्या देशात नेल्या. हा, पण त्यानं आपल्या धर्माचा प्रसार मात्र प्रत्येक देशात केला!

कोण होता हा चिनी खलाशी?

ॲडमिरल झिंग हा चीनमधील सर्वात महान “नेव्हल एक्सप्लोरर” म्हणून ओळखला जातो. ख्रिस्तोफ़र कोलंबसलाही मागे टाकेल अशा महाकाय जहाजांचा ताफ़ा बाळगत त्यानं पूर्व आफ्रिकेपर्यंत प्रवास केला आणि चीनच्या व्यावसायिक समुद्री सीमा विस्तारल्या. चिनी वस्तूंचा व्यापार करत त्यानं सात सफ़री करून १४०० च्या दशकात चिनची आशिया खंडातली सर्वात प्रबळ नौदल शक्ती म्हणून ओळख प्रस्थापित केली.

चीनच्या इतिहासात ज्याच्या गोष्टी आवडीनं सांगितल्या जातात त्या ‘ॲडमिरल झेंग हे’ चा जन्म १३७१ साली एक सधन मुस्लिम कुटुंबात झाला. गंमत म्हणजे सर्वात शक्तीशाली आणि सर्वाधिक समुद्र सफ़री केलेल्या झेंगचा जन्म मात्र समुद्रातल्या बेटावर असणार्‍या पर्वतावर असणाऱ्या गावात झाला. लहानपणी “मा हे” नावानं ओळखला जाणार्‍या झेंगचे बालपण मंगोल नियंत्रित युनानी प्रांतात गेले.



लहानपणापासूनच जवळच्या बंदरांमधून काही महिन्यांचा प्रवास करून येणारा “मा हे” जेंव्हा दहा वर्षांचा होता तेव्हा चिनी सैन्यानं आक्र*मण करून मंगोलांचा पाडाव केला. या आक्र*मणात त्याचे वडील मारले गेले. लहानग्या ‘मा’ला कैदी बनवलं गेलं. ही कैद हाच खरंतर त्याचा ऐतिहासिक असा समुद्र प्रवासी बनण्याची सुरवात होती.

या आक्र*मणात बंदी बनवण्यात आलेल्या अनेक तरूण, लहान मुलांना नपुंसक करण्यात आले, जेणेकरून त्यांचं निर्वंशिकरण व्हावं. यानंतर त्यांना झु दी अर्थात भावी सम्राट योंग्ले यांच्या दरबारात हजर केले. या मुलांना गुलाम बनवून त्यांच्याकडून कामे करवून घेतली जाऊ लागली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मा तो त्याच्या हुशारीनं सगळ्यांच्यात वेगळा उठून दिसते असे. याच कारणानं त्याला युवरांजांचा सेवेकरी म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि आपल्या हुशारीनं, प्रामाणिकपणानं त्यानं विश्वास संपादन केला इतकंच नाही तर तो सल्लागारही बनला.

यु*ध्द कौशल्य, मुत्सद्देगिरीत तरबेज अशा या युवकानं राजदरबारात खास स्थान बनवलं. सात फ़ूट उंची असणारा हा तरूण धीर गंभीर खोल आवाजाचा होता, त्याला बघताक्षणी त्याच्याविषयी दरारा वाटत असे. बीजिंगजवळील झेंगलुन्बाच्या यु*ध्दादरम्यान त्याने कमांडर म्हणून सैन्यातली प्रतिष्ठा वाढविली. १४०२ साली झु दी यॉन्गल सम्राट बनल्यानंतर ‘मा’चे नाव झेंग असे ठेवण्यात आले.

आता तो सम्राटाचा खास निकटवर्ती तर बनलाच होता पण साम्राज्यात सम्राटाच्या बरोबरीनं त्याचाही दरारा होता. त्याला चीनच्या सर्वात महत्त्वाच्या अशा नौदलाची जबाबदारी सोपविण्यात आली. झेंगनं ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यानं चिनी व्यापाराच्या कक्षा रुंदावायला सुरवात केली. जपानला जोडणार्‍या पूर्व चीन समुद्राला ओलांडून जाण्यासाठी सध्याच्या शांघाय येथून चिनी जहाजांचे ताफ़ेच्या ताफ़े प्रवासासाठी सज्ज झाले. साधारण तीस हजार नाविकांचा ताफ़ा यात सहभागी झाला होता. या सर्वांचे नेतृत्व ‘झेंग ही’ करत होता. या जहाजांमधे विविध धातुंची भांडी, कांस्य, तांदूळ, चहा तसेच काही बौध्दीक साहित्याचाही समावेश होता. यात लेखन प्रणाली, सुलेखन कला, बौद्ध साहित्य आदींचा समावेश होता.

१४०५ ते १४३३ दरम्यान त्यानं तब्बल सात समुद्री मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या मोहिमांमध्ये सध्याच्या मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, भारत, श्रीलंका, इराण, ओमान, येमेन साऊदी अरेबिया, केनिया अशा अनेक देशांचा समावेश होता.

या ताफ़्यात तो एकटाच मुस्लिम नव्हता तर अनेक चायनीज मुस्लिमांचा यात सहभाग होता तसेच त्याच्या सल्लागारातही मुस्लिमांचा समावेश होता. माहवान नावाचा दुभाषीही यात ताफ़्यात होता. त्याच्या या सफ़रींना त्यानं शब्दबध्द करून त्याचा ग्रंथही लिहिला. आजच्या तारखेलाही या ग्रंथांचा मार्गदर्शक म्हणून वापर केला जातो. याच सफ़रींदरम्यान त्यानं हज यात्रेची पूर्तता करत मक्केलाही भेट दिली.

झेंग आणि त्याचा जहाजांचा ताफ़ा केवळ व्यापारी प्रवासच करत असे असं नाही तर जिथे जातील तिथे मुस्लिम धर्मप्रसाराचं कामही ते करत असत.

साऊथ इस्ट एशियात मुस्लिम धर्म मोठ्या प्रमाणात पसरण्याचं कारण झेंग हे आहे. त्यानं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रामुख्यानं व्यापार आणि धर्मप्रसार हे कार्य केलं. त्याच्या मृत्युनंतरही हे काम तितक्याच प्रबळपणे पुढे चालविण्यात आलं.

‘झेंग हे’नं ज्या जहांजांचा वापर केला त्यांना महाकाय हा शब्दही थिटा पडेल. या जहाजांच्या पोटांतून अफ़्रिकेतील जिराफ़ही आणले गेले यातच काय ते आलं!

व्यापारी सफ़र पूर्ण करून परतताना झेंगनं जहाज भरभरून जगातील मौल्यवान सामान चीनमध्ये आणलं होतं. यात श्रीलंकेतील हस्तीदंतापासून, आफ्रिकेतील जिराफ़ आणि भारतातील सोनं यांचा समावेश होता. या सफ़रींनी जगाला स्पष्ट संदेश दिला की चीन महासत्ता बनला आहे.

अकराव्या शतकापर्यंत चिनी जहाजांनी समुद्रावर अधिसत्ता स्थापन केली होती. इतकेच नाही तर प्रवासादरम्यान बिघाड झालेली जहाजं किरकोळ दुरूस्तीसाठी समुद्री केंद्रांवरच नेली जाऊ लागली. हा एक ऐतिहासिक बदल म्हणावा लागेल. बाराव्या शतकापर्यंत चिनी नौदल हे जगभरातलं सर्वात सामार्थ्यशाली नौदल म्हणून गणलं जाऊ लागलं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

इजिप्तमधील या जुळ्या मंदिरांना वाचवण्यासाठी सगळं जग एकवटलं होतं

Next Post

अपघाताने लागलेल्या ‘गन पावडर’च्या शोधाने जगाचा नकाशाच बदलून टाकला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अपघाताने लागलेल्या 'गन पावडर'च्या शोधाने जगाचा नकाशाच बदलून टाकला

पोस्टमन ज्याने रस्त्यात लागलेल्या दगडांपासून सर्वांगसुंदर महाल बनवला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.