The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या रशियन माणसाची अमेरिका आजन्म ऋणी राहिली तरी कमीच आहे

by द पोस्टमन टीम
25 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९७७ च्या जानेवारीमधील एका थंड आणि शांत सायंकाळी मॉस्कोत अमेरिकन दूतावासाशेजारील एका पेट्रोल पंपावर पन्नाशीतील एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला जाऊन धडकला. खरं तर हा काही योगायोग नव्हता, कारण या दोन व्यक्तींनी पुढे रशियाच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. यातील एक व्यक्ती होती मॉस्को सीआयए स्टेशन चीफ तर दुसरी व्यक्ती होती अ‍ॅडॉल्फ टोकाशेव्ह.

इंजिनियर असलेला अ‍ॅडॉल्फ सोव्हिएत मिलीटरी-डिझाइन लॅबमध्ये एअरबॉर्न रडार तज्ज्ञ होता. पाच फूट सहा इंचाच्या अ‍ॅडॉल्फला कुटुंबिय आणि मित्र ‘अ‍ॅडिक’ म्हणत. तो अतिशय एकलकोंड्या स्वभावाचा होता. इतका की, आपण काय काम करतो हे देखील त्यानं कधीच आपल्या मुलाला सांगितलं नाही. राखाडी रंगाचे भेदक डोळे आणि दाट तपकिरी केसांमुळं तो अतिशय शांत वाटे. मात्र, त्याचं मन नक्कीच शांत नव्हतं. सोव्हिएतच्या इतिहासातील काही अमानुष घटना त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या होत्या. याचं घटना त्याच्या मनात बदल्याची भावना तयार करत होत्या.

अ‍ॅडॉल्फ टोकाशेव्ह हा रशियन इतिहासातील सर्वात धोकादायक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. १९७९ ते १९८५ या सहा वर्षांच्या काळात त्यानं अतिशय उच्च पातळीची गोपनीय माहिती अमेरिकेला पुरवली.

सीआयएसाठी काम करत असताना, त्यानं इस्त्राईललासुद्धा सोव्हिएत विमान तंत्रज्ञानाची माहिती पुरवली. या सर्व प्रपंचासाठी त्याला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पगारापेक्षाही अधिक मासिक पगार मिळत होता. वरकरणी पाहता तो सोव्हिएत सैन्याचा एक इंजिनिअर होता आणि काम मात्र, ‘स्फेअर’या कोडनेमसह, सीआयएचं सुरू होतं. 

मॉस्कोमधील फाजोट्रॉन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये लष्कराच्या विमान वाहतुकीसाठी रडार-जॅमिंग टेक आणि लेसर मार्गदर्शन प्रणालीवर काम करणारा अ‍ॅडॉल्फ अतिशय हुशार होता. त्यामुळं त्याला अतिशय गोपनिय माहितीचा अ‍ॅक्सेस होता. मात्र, या माणसाचे सरकार आणि टॉप सिक्रेट क्लीयरन्स विभागासोबत मतभेद देखील होते. आणि हिचं गोष्ट सोव्हिएतसाठी कमालीची धोकादायक ठरली.



एप्रिल १९७९ मध्ये, त्यानं सीआयएला एक पत्र लिहिलं. आपल्याला सीआयएमध्ये सामील करून घ्यावं, अशी मागणी त्यानं त्या पत्रात केली होती. सॉल्झनिट्सिन(रशियन बंडखोर)कडून आपल्याला प्रेरणा मिळाली आहे. “जरी प्रत्यक्षात कधी अमेरिका पाहिली नसली तरी मिळालेल्या माहितीच्या आधारे अमेरिका नक्कीच रशियापेक्षा चांगली आहे. मी अमेरिकेला पाहिजे ती माहिती पुरवू शकतो, म्हणून सीआयएनं माझ्याशी हातमिळवणी करावी”, असं अडॉल्फनं पत्रात लिहिलं होतं.

काहींच्या मते टोकाशेव्ह हा ‘रिअल फॅमिली मॅन’ होता. त्याची पत्नी नतालिया इवानोव्हाचा जन्म एका प्राज(रशियातील बंडखोर पार्टी) समर्थक व्यक्तीच्या घरी झाला होता. ती सुद्धा फाजोट्रॉन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ‘अँटेना स्पेशालिस्ट’म्हणून काम करत होती. १९३८मध्ये नतालिया लहान असताना तिच्या आईला फाशी देण्यात आली आणि तिच्या वडिलांना सश्रम कारावासात टाकण्यात आलं होतं. बालपणातील या सर्व घटनांचा त्रास नतालियाला होत असे. आपल्या पत्नीच्या आई-वडिलांचा जोसेफ स्टॅलिनच्या काळात झालेल्या छळाचा बदला म्हणून त्यानं अमेरिकेला माहिती पुरवली होती, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

टोकाशेव्हनं जेव्हा सीआयएसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आणि सीआयए सतर्क झाली, कारण टोकाशेव्हचा वापर करून सोव्हिएत डबल गेम खेळत असल्याचा अमेरिकेला संशय होता. त्यांनी तब्बल दोन वर्ष टोकाशेव्हवर नजर ठेवली होती. एक दिवस टोकाशेव्हनं पुरवलेल्या अतिशय महत्त्वाच्या माहितीमुळं सीआयएला त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग पडलं.

मॉस्कोतील तत्कालीन सीआयए प्रमुख गार्डनर हॅथवे आणि त्यांच्या पत्नीशी त्यानं संपर्क साधला. त्यानं त्यांच्या गाडीमध्ये एक चिठ्ठी सोडली होती. हॅथवे यांनी टोकाशेव्हनं सांगितलेल्या ठिकाणी आपल्या पत्नीला पाठवण्याचा धोका पत्करला.

मात्र, टोकाचेव्हनं त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्यानं रशियन विमानांबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती अमेरिकेला पुरवली. त्या दिवसापासून तो सीआयएचा अधिकृत एजंट झाला.

अमेरिकेसाठी काम करत असताना त्याच्या जीवाचा धोका दिवसेंदिवस वाढत होता. तिकडे अमेरिकेची देखील चिंता वाढली होती. कारण शीतयु*द्धाच्या पटलावर जर त्यांच्या ‘खास रशियन हेर’ पकडला गेला असता तर अमेरिकेच्या संकटात वाढ झाली असती. केजीबीच्या (रशियन गुप्तचर संस्था) गोटातून सीआयएच्या अधिकाऱ्यांना माहिती पुरवणं निश्चितच धोकादायक होतं.

जेव्हा आपल्या कामाशी थेट संबंध नसलेल्या कागदपत्रांसाठी कार्यालयाची लायब्ररी वापरावी लागली तेव्हा टोकाशेव्हसाठी गोष्टी अधिक धोकादायक झाल्या. १९८३ मध्ये, फाजोट्रॉन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय क्लिष्ट अशी नवीन सुरक्षा यंत्रणा लागू करण्यात आली. सोव्हिएत लढाऊ विमानांच्या ‘टार्गेट रेकग्नाइझिंग सिस्टीम’बाबत आपल्याच कार्यालयामध्ये कुणीतरी अनधिकृतपणे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय केजीबीला आला होता.

१३ जून १९८५ या दिवशी टोकाशेव्हला भेटण्याचा प्रयत्न करत असताना सीआयएच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. लुब्यांका येथील केजीबी मुख्यालयात त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून कॅमेरा आणि हेरगिरीसाठी वापरलं जाणारं काही घातक साहित्य जप्त केलं. मात्र, सीआयएनं तो आपल्या अधिकारी असल्याचं नाकारलं. त्याचं नाव एडवर्ड ली हॉवर्ड असून तो सीआयएचा माजी अधिकारी होता. त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप असल्यानं त्याला सेवेतून काढून टाकलेलं आहे. त्याला आपल्या ताब्यात देण्यासाठी अमेरिकनं यापूर्वीच सोव्हिएतला विनंती केली होती, असं स्पष्टीकरण सीआयएनं दिलं होतं.

या सर्व प्रकरणानंतर सावध झालेल्या केजीबीनं शेवटी टोकाशेव्हचा माग काढलाचं. एक दिवस तो गावाकडून मॉस्कोकडे येत असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि १९८६ मध्ये त्याला अमेरिकन हेर म्हणून फाशी देण्यात आली. मात्र, तोपर्यंत टोकाचेव्हनं आर -२३, आर -२४, आर -३२, आर -२७, आणि आर -६०, एस -३०० या प्रकल्पांबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती सीआयएला दिली होती. ही सर्व यंत्रणा सोव्हिएतच्या मिग -२९, मिग -३१ आणि एसयू -२७ या फाइटर-इंटरसेप्टर एअरक्राफ्टच्या रडारमध्ये वापरली गेली होती. अतिशय हुशारीनं काम करून टोकाचेव्हनं सोव्हिएतमध्येच राहून त्यांना शह दिला होता.

त्यानं पुरवलेल्या माहितीसाठी अमेरिका आजन्म त्याची ऋणी राहिली तरी कमीच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गोदरेजच्या या साबणाची जाहिरात लागली की पालक पोरांना पाणी आणायला पाठवायचे

Next Post

‘सिंगर कप’ पाकिस्तानने जिंकला पण तो फेमस झाला ‘सनथ जयसूर्या’मुळे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

'सिंगर कप' पाकिस्तानने जिंकला पण तो फेमस झाला 'सनथ जयसूर्या'मुळे

'इंटरस्टेलर'साठी 'नोलन'ने ५०० एकरात मका लावली होती, त्यातून बक्कळ पैसे पण कमवले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.