The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्टमन ज्याने रस्त्यात लागलेल्या दगडांपासून सर्वांगसुंदर महाल बनवला

by द पोस्टमन टीम
14 July 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मोबाईल, ईमेल्स आणि सोशल मीडियाच्या वापरामुळं पोस्ट ऑफिस आणि पोस्टमनचं महत्त्व कमी-कमी होत चाललंय. पूर्वी असं नव्हतं, खाकी गणवेश आणि गळ्यात पत्रांची थैली अडकवलेला पोस्टमन प्रत्येकाला अगदी घरातला वाटे. ज्या कुटुंबातील कुणी व्यक्ती घरापासून काही कारणानिमित्त दूर राहत असेल त्या कुटुंबात तर पोस्टमनची अगदी चातकासारखी वाट पाहिली जात असे. दुर्गम भागात, खेडोपाडी कधी सायकलवर तर कधी पायी फिरून लोकांचे निरोप पाठवण्याचं काम पोस्टमन करतात.

पूर्व फ्रान्सच्या डोंगराळ भागात देखील असाच एक पोस्टमन इमाने इतबारे आपली नोकरी करत होता. जंगलातून आणि डोंगरातून मार्ग काढत तो दररोज ३२ किलोमीटरचा प्रवास करायचा. या प्रवासात रानफुलं, जंगलातील पक्षी आणि रस्त्यावरचे दगड त्याच्या सोबतीला असत.

दररोजच्या या कामानं आणि वातावरणानं त्याची कल्पनाशक्ती इतकी कमालीची कुशाग्र झाली की, या पोस्टमननं चक्क एका महालाची निर्मिती केली. फर्डिनांड शेवल, असं या पोस्टमनचं नाव होतं.

पोस्टमन फर्डिनांड शेवल ग्रामीण फ्रान्समध्ये अगदी सामान्य आयुष्य जगत होते. एक दिवस आपल्या नेहमीच्या मार्गावर चालत असताना एका दगडावरून पाय घसरून त्यांचा तोल गेला. गेलेला हा तोल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असेल, याचा त्यावेळी त्यांनी देखील विचार नसेल केला. ज्या दगडावरून पाय घसरला त्या दगडाच्या विचित्र आकारानं आणि रंगानं फर्डिनांडचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तो दगड खिशात घातला आणि आणखी तसेच दगड गोळा करण्याचं ठरवलं. त्यानंतर पुढची तब्बल ३४ वर्ष, शेवल दररोज दगड जमा करत होते. जमा केलेल्या दगडांपासून त्यांनी जगातील सर्वात विलक्षण अशा ‘आयडियल पॅलेस’ची निर्मिती केली.

हाऊटराईव्हसारख्या छोट्याशा शहरात असलेला आयडियल पॅलेस हा अगदी वाळवंटात असलेल्या ओऍसिसप्रमाणं भासतो. त्याची रचना समुद्रकिनारी उभारण्यात आलेला एका काल्पनिक कॅसलसारखी आहे. मॅक्स अर्नेस्ट आणि पाब्लो पिकासोसारख्या मूलगामी आधुनिक कलाकारांसाठी तर ही जागा तीर्थक्षेत्र बनली. काँक्रीट, चुनखडी, वायर आणि असंख्य दगडांपासून बनवलेल्या या पॅलेसला दरवर्षी सव्वा लाखपेक्षा जास्त पर्यटक आपल्या डोळ्यांमध्ये साठवतात.



१९ एप्रिल १८३८ मध्ये फ्रान्सच्या चार्म्स सर हरबिसमधील एका शेतकरी कुटुंबात फर्डिनांड यांचा जन्म झाला होता. त्यांचं शालेय शिक्षण मर्यादित होतं. त्यानंतर त्यांनी काही दिवस एका बेकरीमध्ये काम केलं होतं. १८५८ साली त्यांनी रॉसलिन रेव्हॉलशी लग्न केलं.

एक दिवस त्यांनी एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात ते एका खडकापासून पॅलेसची निर्मिती करत होते. दुसऱ्या दिवसापासून ते अचानक गायब झाले होते. सहा वर्षांनंतर १८६३ मध्ये ते परत घरी आले व त्यांनी पोस्टमनची नोकरी धरली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

१८७९ मध्ये वयाच्या ४३व्या वर्षी फर्डिनांड शेवल यांनी याची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. उतारवयात म्हाताऱ्या पोस्टमनच्या डोक्यावर परिणाम झाला, असं देखील काही लोक म्हणाले होते. मात्र, फर्डिनांड यांनी लोकांकडं दुर्लक्ष केलं.

त्यांनी पॅलेसच्या एका भिंतीवर एक पाटी कोरलेली आहे त्यावर एक वाक्य आहे- ‘With this rock, I wanted to prove what willpower can achieve’.

शेवल यांनी जमीन खोदून एका लहान तळ्याची निर्मिती केली. त्याच्या बाजूनं दगडाच्या कपाटांमध्ये प्राण्यांची शिल्पं बसवली. त्यानंतर त्यांनी लहान-लहान धबधबे आणि ओबडधोबड लेणी तयार केल्या. दगडांपासून अनेक मनोरे तयार केले. त्यांच्या अवतीभोवती पालेभाज्या, फळझाडे, फुलझाडे आणि पाम वृक्षांची लागवड केली. या पॅलेसमध्ये ग्रीक देवता, हिंदू देवता आणि इजिप्शियन ममींची देखील काही शिल्पं आहेत.

१९१२ मध्ये तब्बल ३४ वर्षांनंतर फर्डिनांडचा आयडियल पॅलेस पूर्ण झाला. त्यावेळी त्यांचं वय होतं ७५ वर्ष. पॅलेसची उंची ३३ फूट होती तर रुंदी ८५ फूट होती. विस्ताराची तुलनाच करायची झाल्यास फ्रान्सची राणी मेरी अँटिनिओच्या इस्टेटशी त्याची तुलना करता येईल. हळूहळू त्यांच्या पॅलेसबाबत लोकांना माहित झालं. परदेशी लोक या पॅलेसकडे आकर्षित झाले.

एवढंच नाही तर, चित्रपट निर्माता आणि लेखक जॅक-बर्नार्ड ब्रूनियसनं १९२८ मध्ये पॅलेस आयडिलवर माहितीपट तयार केला. पॅरिसमधील अस्तीत्ववादाचा जनक आंद्रे ब्रेटन यांनी देखील पॅलेसला भेट दिली. फोटोग्राफर असलेल्या ली मिलर आणि ब्रॅसे यांनीही फर्डिनांड शेवल व पॅलेसवर काही चित्रफिती तयार केल्या. मॅक्स अर्नेस्ट यांनी पोस्टमॅन शेवल (ले फॅक्चर शेवल १९३२) हे कोलाज तयार केलं. सध्या हे कोलाज व्हेनिसमधील पेगी संग्रहालयात लावलेलं आहे. १९३७ मध्ये जगप्रसिद्ध चित्रकार पिकासोनं १२ चित्रांची एक चित्रमालिका रेखाटली. त्यात आयडियल पॅलेसच्या एका मनोऱ्यावरील नग्न स्त्रीच्या पुतळ्याचा समावेश आहे.

२०१८ मध्ये फ्रेंच दिग्दर्शक निल्स टेवर्नियर यांनी ‘द आयडियल पॅलेस’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटात शेवलच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल सांगण्यात आलं आहे. जॅक गॅबलिनने पोस्टमन फर्डिनांड शेवल यांची भूमिका केली आहे.

१९ ऑगस्ट १९२४ रोजी फर्डिनांड शेवल यांचं निधन झालं. अस्तित्ववाद्यांनी त्यांचा नायक म्हणून गौरव करण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर केवळ दगड वापरून तयार केलेल्या पॅलेसनं त्यांना अजरामर केलं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अपघाताने लागलेल्या ‘गन पावडर’च्या शोधाने जगाचा नकाशाच बदलून टाकला

Next Post

सुई बनवणारा उद्योग पुढे चालून ‘बुलेट’ बनवेल असं सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

सुई बनवणारा उद्योग पुढे चालून 'बुलेट' बनवेल असं सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता

पैलवान नरसिंह यादवचं करियर संपवण्यासाठी सुशील कुमारने त्याच्या जेवणात भेसळ केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.