The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

DNA स्ट्रक्चर शोधलं ‘रोझालिंड फ्रँकलिन’ने, नोबेल मिळाला ‘वॉट्सन आणि क्रिक’ला

by द पोस्टमन टीम
24 July 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गेल्या वर्षी ‘फॉरेन्सिक’ नावाचा मल्याळम् सायकोलॉजिकल थ्रीलर चित्रपट आला. यात टविनो थॉमस आणि ममता मोहनदास यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मानसिकदृष्ट्या कमजोर असलेला मुलगा आणि ममता मोहनदासच्या मुलीच्या मदतीनं डॉ. कुरियन नावाची व्यक्ती लहान मुलींचे खून करतो. पोलीस अधिकारी असलेल्या ममतावर डॉ. कुरियनला सूड उगवायचा असतो म्हणून तो हे खू*न करतो. स्वत: डॉक्टर असलेला आरोपी अतिशय हुशारीनं खून करतो. तपासादरम्यान तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी देखील होतो. मात्र, फॉरेन्सिक एक्सपर्ट असलेला सॅम्युअल (टविनो थॉमस) डीएनएच्या मदतीनं खरा आरोपी डॉ. कुरियन असल्याचं सिद्ध करतो.

उघड्या डोळ्यांना न दिसणारा डीएनए हा घटक एखाद्या व्यक्तीची ओळख असू शकतो, याचा शोध जीम वॉटसन, फ्रान्सिक क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांनी लावल्याचा सर्व जगाला माहित आहे.

मात्र, या तिघांच्या बरोबरीनं एका महिलेनं देखील डीएनएच्या संशोधन मोलाचं योगदान दिलं होतं हे अनेकांना माहितीच नाही. रोझालिंड फ्रँकलिन, असे या महिलेचं नाव आहे. ‘द डार्क लेडी ऑफ डीएनए’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोझालिंड फ्रँकलिन नेमक्या कोण होत्या आणि त्यांनी संशोधनात काय योगदान दिलं होतं याबाबत जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

रोझालिंड एल्सी फ्रँकलिनचा जन्म २५ जुलै १९२० रोजी लंडनमधील सुखवस्तू कुटुंबात झाला. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात तिच्या कुटुंबाचं मोठं योगदान होतं. फ्रँकलिनच्या वडिलांना शास्त्रज्ञ व्हायचं होतं. परंतु, पहिल्या महायुद्धाच्या गोंधळात त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि त्यांना महाविद्यालयीन शिक्षक व्हावं लागलं. रोझालिंड फ्रँकलिन अत्यंत हुशार होती. आपण एक शास्त्रज्ञ व्हायचं हे वयाच्या पंधराव्या वर्षीचं तिनं निश्चित केलं होतं.



संशोधन क्षेत्रात करियर करणे स्त्रियांसाठी कठिण होते तरी देखील तिच्या वडिलांनी त्याकाळी मुलींना भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) शिकवणाऱ्या ‘सेंट पॉल्स गर्ल्स स्कूल’मध्ये तिला शिकवले. १९३८मध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी फ्रँकलिननं केंब्रिंज विद्यापिठात प्रवेश घेतला.

केंब्रिजमधून पदवी घेतल्यानंतर फ्रँकलिनला संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीअंतर्गत तिने आरजीडब्ल्यू नॉरिश लॅबमध्ये एक वर्ष काम केलं. नॉरिशनं फ्रँकलिनची क्षमता ओळखली होती मात्र, त्यांनी आपल्या या विद्यार्थीनीला फारसे प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला नाही. त्यानंतर ‘ब्रिटिश कोल युटिलायझेशन रिसर्च असोसिएशन’ (सीयूआरए) येथे सहाय्यक संशोधन अधिकारी पदाची ऑफर फ्रँकलिनला मिळाली. त्यांनी फेलोशिप सोडून दिली व नोकरी स्वीकारली. सीयूआरए ही एक नवीन संस्था होती आणि त्याठिकाणी काम करण्यासाठी कुठल्याही मर्यादा नव्हत्या. त्यामुळे १९४७ पर्यंत फ्रँकलिनला त्याठिकाणी अगदी मुक्तपणे काम करता आलं. याकाळात ‘फिजिकल स्ट्रक्चर ऑफ कोल’बाबत त्यांनी अनेक रिसर्च पेपर पब्लिश केले.

पुढे फ्रँकलिन पॅरिसला गेली. तिथे एका जुन्या मित्रानं तिची ओळख मार्सल मॅथ्यूशी करून दिली. मॅथ्यू हे पॅरिसमधील संशोधनाच्या कामांवर नियंत्रण ठेवत. ते फ्रँकलिनच्या कामामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी तिला ‘लॅबोरॅटोअर सेंट्रल डेस सर्व्हिसेस चिमिक्स डी एल इटॅटमध्ये’ ‘चेर्चर’ म्हणून काम करण्याची ऑफर दिली. त्याठिकाणी फ्रँकलिननं जॅक मिरिंग यांच्याकडून एक्स-रे विवर्तनाचं तंत्र शिकून घेतले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९५१ मध्ये फ्रँकलिनला लंडनमधील किंग्ज कॉलेजमध्ये तीन वर्षाच्या संशोधन शिष्यवृत्तीची ऑफर मिळाली. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फ्रँकलिन त्याठिकाणी एका नवीन एक्स-रे क्रिस्टलोग्राफी युनिटची स्थापना आणि सुधारणा करणार होती. किंग्ज कॉलेजमध्ये मॉरिस विल्किन्स हे डीएनएची गुंतागुत सोडवण्यासाठी आधीपासूनच एक्स-रे क्रिस्टलोग्राफी वापरत होते. ज्यावेळी फ्रँकलिन कॉलेजमध्ये आल्या त्यावेळी काही कारणास्तव विल्किन्स संशोधनापासून दूर होते. फ्रँकलिनला आपली सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे, असा परत आल्यानंतर विल्किन्सचा समज झाला.

रेमंड गॉसलिंग या विद्यार्थ्यासह मिळून, क्रिस्टलाइज्ड डीएनए फायबरचे दोन चांगल्या प्रतीचे फोटो मिळवण्यात फ्रँकलिनला यश आलं. तिने डीएनएचे दोन वेगळे फायबर वापरले.

दोन्हीही फायबर एकापेक्षा जास्त हायड्रेटेड होते. त्यातूनच फ्रँकलिननं डीएनए स्ट्रॅन्डचं मूलभूत परिमाण कमी केलं. डीएनच्या बाहेरील बाजूस असलेले हे फॉस्फेटस् हे डीएनएचे हेलिकल स्ट्रक्चर होते.

किंग्ज कॉलेजमधील एका व्याख्यानात फ्रँकलिननं त्यांच्याकडील डेटा सादर केला. त्यावेळी जेम्स वॉटसन देखील तिथे उपस्थित होते. वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत डीएनए संरचना सोडवण्याचं एकत्र काम करत होते. फ्रँकलिनला वॉटसन आणि क्रिक तसेच विल्किन्सच्या संशोधनाबाबत माहित नव्हते. फ्रँकलिनने त्यांच्यासोबत मिळून काम केले नाही, असे देखील काही संशोधकांचं म्हणणं आहे.

आपल्या ‘डबल हेलिक्स’ या पुस्तकात वॉटसन यांनी देखील कबूल केले आहे की, त्यांनी फ्रँकलीनच्या संशोधनाकडे कधीही लक्ष दिले नाही. मॉरिस विल्किन्स यांनीच वॉटसन आणि क्रिकला फ्रँकलिन यांचा एक्स-रे डेटा लक्षात आणून दिला. या डेटामुळं वॅटसन आणि क्रिकने तयार केलेल्या डीएनएच्या 3-डी संरचनेला पुष्टी मिळाली. 

१९५३ मध्ये, विल्किन्स आणि फ्रँकलिन यांनी डीएनएच्या संरचनेवर एक पेपर प्रकाशित केला. असाच पेपर वॉटसन आणि क्रिक यांनी देखील प्रकाशित केला. तीन पुरुष संशोधकांनी फ्रँकलिन यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं मात्र, त्यांनी कधीच तिच्या संशोधनाला पाठिंबा दिला नाही.

१९५३ मध्ये फ्रँकलिन यांनी केंब्रिज सोडले आणि तंबाखूवरील मोझेक विषाणूच्या संरचनेवर काम करण्यासाठी बर्कबेक लॅबमध्ये गेल्या. या विषयावर त्यांनी अनेक पेपर्स प्रकाशित केले. गर्भाशयाच्या कर्करोगानं ग्रस्त असताना देखील त्यांनी शेवटपर्यंत आपले काम केले. १६ एप्रिल १९५८ ला वयाच्या लंडनमधील चेल्सा याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.

१९६२ मध्ये वॉटसन, क्रिक आणि विल्किन्स यांना डीओक्सिरीबोन्यूक्लिक ऍसिड(डीएनए)ची रचना निश्चित करण्यासाठी संयुक्तपणे शरीरविज्ञान विभागातील नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र, विल्किन्सची सहकारी असलेल्या रोझालिंड फ्रँकलिन पुरस्कारापासून वंचित राहिल्या.

नोबेल पुरस्कार समितीच्या नियमांनुसार पारितोषिकाची रक्कम तीनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये विभागता येत नव्हती आणि १९७४ पर्यंत मृत्यू पश्चात पुरस्कार देण्याची तरतुद देखील नव्हती, या गोष्टींमुळे फ्रँकलिन यांना पुरस्कार न मिळाल्याचं सांगितलं जातं.

पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये रोझालिंड फ्रँकलिन यांच्यासारख्या कितीतरी महिला शास्त्रज्ञांच्या प्रतिभेचा बळी गेलेला आहे. मग ती पल्सासचा शोध लावणारी जॉसलिन बेल बर्नेल असो, जीवाणूंमधील अनुवांशिकता शोधणारी इस्थर लेडरबर्ग असो, अणुबॉम्बच्या शोधात योगदान देणारी सीन शिंग वू असो किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये संशोधन करणारी लीस मेईटनर.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दीपक चहरने त्यावेळी ग्रेग चॅपलचं ऐकलं असतं तर आपण एका अष्टपैलू खेळाडूला मुकलो असतो

Next Post

स्वतःच वकील बनून गमावलेली वडिलोपार्जित जमीन २३ वर्षांनी परत मिळवली

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

स्वतःच वकील बनून गमावलेली वडिलोपार्जित जमीन २३ वर्षांनी परत मिळवली

अमेरिकेने तंत्रज्ञान द्यायला नकार दिला म्हणून भारताचा सुपरकॉम्प्युटर जन्माला आला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.