The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ऑपरेशन ब्लु स्टार’ची किंमत जनरल अरुणकुमार वैद्यांना आपल्या प्राणाने चुकवावी लागली

by द पोस्टमन टीम
12 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पंजाबमध्ये वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला जोर चढला होता. या खलिस्तानी अतिरेक्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला. अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची मोहीम आखण्यात आली. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या कार्यवाहीत अनेक अति*रेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे अतिरेक्यांना चांगला धडा मिळेल अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच!

ऑपरेशन ब्ल्यू स्टार  या जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मोहिमेमुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. या मोहिमेला पाठींबा देणारे कॉंग्रेस नेते, याची पाठराखण करणारे राजकारणी, या मोहिमेची अंमलबजावणी करणारे जनरल अरुण कुमार वैद्य आणि लष्कराला ही मोहीम राबवण्याचा आदेश देणाऱ्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी, सगळ्यांनाच याची मोठी किंमत चुकवावी लागली. जनरल अरुण कुमार वैद्य हे भारताचे पहिले असे लष्कर प्रमुख आहेत ज्यांची द*हश*तवाद्यांनी ह*त्या घडवून आणली.

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’सारखी महत्त्वाकांक्षी मोहीम राबवणाऱ्या जनरल वैद्य यांचा प्रेरक आणि थरारक प्रवास जाणून घेऊया या लेखातून.

अरुण वैद्य हे मुळचे मुंबईचे. घरी लष्करी सेवेचा वारसा असलेले अरुणकुमार १९४४ साली सैन्यात दाखल झाले. दुसऱ्या महायु*द्धात अनेक भारतीय जवानांनी जगाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली, अरुणकुमार वैद्यही याला अपवाद नव्हते.



दुसऱ्या महायु*द्धातील बर्माविरुद्धची लढाई खूपच प्रसिद्ध आहे. या यु*द्धात अरुणकुमार यांनीही आपले योगदान दिले होते. भारत-पाक दरम्यानच्या १९७५ सालच्या यु*द्धात ते भारताच्या सशस्त्र तुकडीचे प्रमुख होते.

‘बॅटल ऑफ चायवाला’ हे आशिया खंडात लढल्या गेलेल्या यु*द्धापैकी एक मोठे यु*द्ध होते. या यु*द्धातही अरुणकुमार वैद्य सहभागी होते. त्यांना दोन वेळा महावीर चक्र या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८३ साली ते भारताचे लष्कर प्रमुख म्हणून निवडले गेले. याच काळात पंजाबमध्ये खलिस्तानवादी अ*तिरेक्यांच्या हिं*सक कारवायांनी उच्छाद मांडला होता.

अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे अत्यंत पवित्र स्थळ. याच सुवर्ण मंदिरात या अ*तिरेक्यांनी आसरा घेतला. मोठ्या संख्येने अति*रेकी सुवर्ण मंदिरात जमा झाले होते. या अति*रेक्यांचे नेतृत्व करणारा भिंद्रनवाले या अतिरेक्यांसोबत सुवर्ण मंदिरातच उपस्थित होता. भिंद्रनवालेचा काटा काढून खलिस्तानवादी चळवळ खिळखिळी करणे हा सरकारचा मुख्य उद्देश होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या अति*रेक्यांना धडा शिकवण्यासाठी लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार नावाची मोहीम आखली. ३ जून ते ६ जून १९८४ तीन दिवस ही मोहीम सुरु होती.

अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन करूनही फरक पडला नाही तेव्हा मंदिरात घुसून आत बसलेल्या अति*रेक्यांवर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा भडिमार सुरु होता. संपूर्ण सुवर्ण मंदिर रक्तात न्हाऊन निघाले होते.

लष्कराच्या या मोहिमेत अनेक अति*रेकी आणि त्यांचा म्होरक्या भिंद्रनवाले मारला गेला. हेच ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे यश मानण्यात आले. पण, यानंतर परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी चिघळतच गेली. 

वेगळ्या पंजाबच्या मागणीला पाठींबा देणारे अनेक तथाकथित शीख भारतात आणि भारताबेहरही उपस्थित होते. या ऑपरेशनमध्ये पवित्र स्थळाचे नुकसान झाले होते. अकाली दलाला हानी पोहोचली होती त्यामुळेच शीख समुदायाच्या सरकारविरोधी भावना आणखीनच तीव्र झाल्या. त्यानंतर शिखांचा जो देशभर आकांडतांडव दिसून आला तो कधीच विसरला जाणार नाही असा होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही एक अशी मोहीम होती जी यशस्वी होऊनही अयशस्वी ठरली असे म्हणावे लागेल. कारण त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटले होते.

भारतीय लष्कराने केलेल्या या कृत्याचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही अशी शपथच या खलिस्तानी अति*रेक्यांनी घेतली. याचाच भाग म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची करण्यात आलेली ह*त्या. इंदिराजींचे अंगरक्षक हे शीखच होते, याच अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची ह*त्या केली.

इंदिराजींनंतर याच कडीतील दुसरी ह*त्या होती जनरल अरुणकुमार वैद्य यांची.

खलिस्तानी अति*रेक्यांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या सुचना त्यांनाही मिळत होत्या. पण, त्यांनी कधीच या धमक्यांना भीक घातली नाही. खलिस्तानवाद्यांकडून त्याच्या जीवाला धोका आहे हे सरकारलाही माहीत होते तरीही अरुणकुमार वैद्य यांच्या सुरक्षेसाठी फक्त एक हवालदार त्यांच्यासोबत तैनात करण्यात आला होता.

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अरुणकुमार आपल्या कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट रोजी १९८६ रोजी आपल्या पत्नीसोबत ते बाजारात खरेदी करण्यासाठी गेले होते. आपल्या कारमधून घरी परतत असतानाच अचानक त्याच्या गाडीसमोर एक दुचाकी येऊन उभी राहिली. या दुचाकीवर दोन तरुण बसले होते. त्यातील मागच्या तरुणाने त्यांच्यावर बरोबर नेम साधला. जनरल अरुणकुमार यांच्यावर नऊ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

जोपर्यंत ते धाराशायी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर गोळीबार सुरूच राहिला. त्यांच्या गळ्यावर आणि छातीवर एकूण नऊ गोळ्या लागल्या होत्या. 

त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीही होत्या. त्याही या ह*ल्ल्यात गंभीर जखमी झाल्या.

स्वतंत्र भारतात एका माजी लष्करप्रमुखाची अशा प्रकारे द*हश*तवाद्यांच्या हल्ल्यात होण्याची ही पहिलीच घटना होती. अरुणकुमार यांची ह*त्या करणाऱ्या त्या दोन तरुणांचे नाव होते जिंदा आणि सुखा.

अरुणकुमार यांची ह*त्या करून हे दोघेही मारेकरी पसार झाले. पोलिसांनी प्रयत्न करूनही या दोघांचा काहीच मागमूस लागत नव्हता. अरुणकुमार यांच्या हत्येनंतर दोघेही एका बँक लुट प्रकरणात पोलिसांच्या हाती सापडले. ९ ऑक्टोबर १९९२ रोजी दोघांनाही पुण्यातील येरवडा जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले.

जिंदा आणि सुखा दोघेही अतिरेकी शीख ऑर्गनायझेशन खलिस्तान कमांडो फोर्स (KCF) चे सदस्य होते. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या या संघटनेचे सदस्य या नात्याने या दोघांनी अनेक हिं*सक कारवायांत सहभाग घेतला. दोघांवरही अनेक आरोपाखाली गुन्हे दाखल झालेले होते.

हरजिंदर म्हणजेच ‘जिंदा’ हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टार पार पडले तेव्हा जिंदा कॉलेजमध्ये शिकत होता, पण या ऑपरेशननंतर त्याने शिक्षण सोडले आणि तो खलिस्तानी अति*रेक्यांना सामील झाला. सुखदेव सिंह म्हणजेच ‘सुखा’ हा राजस्थानचा होता. त्याचे आईवडीलही शेतकरीच होते. ‘ब्ल्यू स्टार’नंतर तोही खलिस्तानी अति*रेक्यांच्या गटात सामील झाला.

या दोघांनी फक्त अरुणकुमार वैद्य यांचीच ह*त्या केली असे नाही तर कॉंग्रेसच्या इतर दोन वरिष्ठ नेत्यांवरही यांनी सूड उगवला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

BCCI चा लोगो आजही गुलामगिरीच्या काळ्या इतिहासाची आठवण करून देतोय

Next Post

या एका फसवणुकीमुळे मानवी उत्क्रांतीचा इतिहास अनेक दशके भरकटला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या एका फसवणुकीमुळे मानवी उत्क्रांतीचा इतिहास अनेक दशके भरकटला होता

या माणसाने रोबोट्सना नियम घालून दिलेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.