The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिप्थेरियाच्या साथीत या ‘स्लेड डॉग’ने दहा हजार लोकांचा जीव वाचवला होता..!

by द पोस्टमन टीम
28 January 2026
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


वादळ वार्‍याची, बर्फ़वृष्टीची तमा न करता १९२५ सालच्या हिवाळ्यात सायबेरियन कुत्र्यांच्या चमूनं साथीचा रोग आटोक्यात आणणारं एक औषध अविरत प्रवास करत अलास्कामधील नोमला पोहोचवलं आणि हजारोंचे प्राण वाचले. या अचाट मोहिमेला ‘रिले ऑफ़ मर्सी’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या रिलेचा मार्ग गोठलेल्या समुद्रावरून गेला होता आणि याचं नेतृत्व केलं होतं, टोगो या सायबेरियन हस्की कुत्र्यानं. दुर्दैवानं टोगोचं कार्य अंधारातच राहिलं आणि या मोहिमेचा हिरो बनला या रेसची अखेर करणारा सायबेरियन हस्की, बाल्टो.

१९२५ सालच्या हिवाळ्यातले दिवस. अलास्कामध्ये नेहमीप्रमाणेच बर्फ़वृष्टी होऊन तापमानाचा पारा हाडं गोठविण्याइतका खाली उतरला होता. अलास्कामधील नोम बंदरही गोठलं होतंच. दळवळण पूर्ण ठप्प झालं होतं. जीवनावश्यक सामानही कसंबसं पोहोचत होतं. तातडीची औषधं मिळविण्यासाठी डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते आणि अशातच या छोट्या आणि इतर जगापासून फ़टकून असणार्‍या दुर्गम बंदरावर एक दुर्दैवी आपत्ती कोसळली. या बंदरावर डिप्थिरियाचा प्राणघातक उद्रेक झाला आणि लोक अत्यवस्थ बनू लागले. आणखीन वाईट गोष्ट म्हणजे या रोगाचा धोका लहान मुलांना जास्त होता. या भागात राहणाऱ्या १० हजार रहिवाशांच्या जीवाला या उद्रेकानं धोका निर्माण झाला.

साथीचा रोग असल्यानं आणि साथ झपाट्यानं पसरत चालल्यानं लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं. संपूर्ण नोम बंदर एका दु:स्वप्नातून चाललं होतं.

आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली मात्र बचाव कार्यावरही विचार चालू झाला. अखेर या रोगावरचा इलाज सापडला. यावर परिणाम करणारं ॲण्टीटॉक्सिन सापडलं होतं मात्र नोमची या दुर्दैवी परिस्थितीतून इतकी सहजी सुटका होणार नव्हती. एकीकडे औषध सापडलं होतं मात्र दुसरीकडे ते नोम बंदरात येण्याचा एकही मार्ग शिल्लक नव्हता. समुद्र गोठल्यानं जहाज येऊ शकत नव्हतं. त्याकाळात विमान सेवा अस्तित्वातच नसल्यानं तोही मार्ग नव्हता.

संपूर्ण बंदर बर्फ़ानं काही फ़ुट आच्छादलं असल्यानं रस्ते गायब झाले होते. आता नोममध्ये औषध आणण्याचा एकमेव मार्ग होता, डॉग स्लेज.



त्या काळात अलास्कामध्ये डॉग स्लेज मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी वापरल्या जात. याचं कारण यासाठी जे कुत्रे वापरले जात ते, सायबेरियन हस्की इथल्या कडक थंडीतही तग धरणारे असत.बर्फाच्छादित जमिनीवरून मैलोनमैल प्रवास अगदी सहजरित्या करू शकणारी ही कुत्र्यांची सायबेरिन जात स्थानिकांसाठी एखाद्या अनमोल देणगी प्रमाणे होती. तापमानाचा पारा कितीही खाली जावो ही कुत्री अगदी सहजगत्या तगून रहात असत. मात्र त्यांना स्लेज ओढण्याचं, चालकाच्या (मशर) सूचनांनुसार मार्गक्रमण करण्याचं प्रशिक्षणही द्यावं लागत असे.

आताही नोममध्ये जी परिस्थिती उद्भवली होती त्यात या कुत्र्यांची मदत घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता, मात्र अडचण अशी होती की जे अंतर या कुत्र्यांना कापायचं होतं ते प्रचंड होतं आणि औषध किमान पाच दिवसात तरी पोहोचणं गरजेचं होतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

नोम बंदरापासून सर्वात जवळचं रेल्वेस्थानक होतं, नेनान. इथपर्यंत रेल्वे चालू असल्यानं सिरम पोहोचू शकणार होतं मात्र नेनान ते नोम अंतर होतं ६७४ मैल. त्यातच बर्फ़ाचं वादळ चालू झाल्यानं हे सिरम नेनानपासून नोमला आणायचं कसं? हा प्रश्न होता. आता स्लेज डॉग टीमची मदत घेण्यात आली. प्रवासाचं अंतर आणि दिवस वाचविण्यासाठी गोठलेल्या समुद्र मार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला मात्र या भागातला बर्फ़ कमालीचा अस्थिर होता. कधी पृष्ठभाग तडकेल आणि जलसमाधी मिळेल याचा नेम नव्हता. मात्र हा धोका पत्करण्यावाचून इलाजही नव्हता. चार टीममध्ये हा रिले आखण्यात आला. कुत्र्यांच्या चार टीम त्यांच्या चालकासह (मशर) तयार करण्यात आल्या.

स्लेज ओढताना सर्वात पुढे जो कुत्रा असतो तो महत्त्वाचा असतो. यात अलास्काचा प्रसिध्द मशर लेनर्ड सफ़ाला आणि त्याचा कुत्रा “टोगो” यांचाही समावेश होता. अविश्वसनीय असा हा प्रवास या चार टिमने केवळ साडेपाच दिवसांत पूर्ण करून सर्वांना थक्क केलं.

टोगोनं आपल्या टीमचं नेतृत्व केलं होतं आणि धोकादायक अशा समुद्रमार्गावरून आपल्या टीमला नीट मार्गदर्शन करत, अत्यंत धाडसानं त्यानं हा प्रवास सुखरुप पार पाडला. दुर्दैवानं बर्फ़ाळ वादळामुळे चारही टीममधील काही कुत्री प्रवासात मरण पावली. हा प्रवास आजही एक विक्रम समजला जातो. अवघ्या १२७.५ तासांत सिरम नोममध्ये पोहोचलं होतं!

हे सिरम नोममध्ये सगळ्यात शेवटी ज्यानं आणलं तो बोल्टो कुत्रा या मर्सी रिले रनचा हिरो समजला जातो मात्र अलास्कातल्या लोकांच्या दृष्टीनं या मर्सी रनचा खरा हिरो आहे, टोगो.

या घटनेनंतर काही वर्षांनी टोगोची थरारक गोष्ट उजेडात आली. टोगोनं कशा प्रकारे टीमला वाट दाखवली आणि या प्रवासातला सर्वात कठीण असा टप्पा त्यानं कसा पार केला याच्या गोष्टी कालांतरानं प्रसिध्द झाल्या. त्यावेळेस १२ वर्षाचा असणार्‍या टोगोनं एकट्यानं २६४ मैल अंतर कापलं होतं. त्याच्या इतर साथीदार कुत्र्यांनी प्रत्येकी ३१ मैल अंतर कापलं होतं. या अचाट मोहिमेचा हिरो म्हणून बाल्टोचाच गवगवा इतका झाला की जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. न्युयॉर्क येथील सेंट्रल पार्कमधे त्याच्या सन्मानार्थ त्याचा पुतळाही उभा करण्यात आला. मात्र उशिरानं का होईना टोगोला त्याच्या हक्काचं श्रेय मिळालं आणि मर्सी रनचा खरा हिरो म्हणून त्याच नाव कोरलं गेलं.

२००१ मध्ये त्याच्या सन्मानार्थही न्युयॉर्कमध्ये पुतळा उभा करण्यात आला आणि २०१९ साली त्याच्या या धाडसी प्रवासावर चित्रपटही बनला. या चित्रपटात टोगोचा वंशज असणार्‍या डिजेलनं टोगोची भूमिका साकारली आहे.

टोगोची जीवनकथाही त्याच्या या साहसी मोहिमेप्रमाणेच रंजक आहे. सेपल हा एक व्यावसायिक मशर होता. अनेक सायबेरियन हस्की कुत्रे त्याच्याकडे होते आणि त्यांना प्रशिक्षण देऊन तो प्रवासासाठी तयार करत असे. असंच एके दिवशी एक छोटं पिल्लू या ताफ़्यात आलं. त्याचं नाव टोगो. टोगो जेंव्हा लहान पिल्लू होता तेंव्हा त्याची तब्येत आणि प्रकृती बेताची होती. स्लेज प्रवासासाठी तो “अनफ़िट” समजला गेला होता. असा कामासाठी बिन उपयोगाचा कुत्रा सेपलनं घरी नको म्हणून आधी शेजार्‍याला देऊन टाकला. तिथे टोगोनं इतके उपद्व्याप केले की हैराण होत त्यानं टोगोची रवानगी पुन्हा सेपलकडे केली. यानंतर पुन्हा एकदा टोगोला देऊन टाकण्यात सेपल यशस्वी झाला मात्र यावेळेस टोगोनं काचेच्या खिडकीतून उडी मारून पलायन केलं आणि तो पुन्हा सेपलच्याच आश्रयाला आला.

अत्यंत व्रात्य आणि सतत खोड्या करत रहाणार्‍या, चंचल अशा या बिन उपयोगाच्या कुत्र्याचं काय करावं हे सेपलला कळत नव्हतं. त्यानं नाईलाजानं टोगोला इतर कुत्र्यांसह सांभाळायला सुरवात केली. इतर कुत्र्यांचं प्रशिक्षण चालू असताना टोगो ते बघून त्याच्या साथीदारांसोबत धावत असे.

स्लेजला लावण्यासाठी त्याचं वय अद्याप लहान असल्यानं आणि शारीरिकदृष्ट्या तो अनफ़िट असल्यानं सेपलनं टोगोला या कामापासून दुरच ठेवलं होतं. मात्र जेंव्हा टोगोनं ७५ मैलांचं अंतर न थकता कापलं तेंव्हा अखेर सेपलनं एक संधी अजमावत टोगोला काम देण्याचं निश्चित केलं.

त्याचा हा निर्णय त्यालाच चकीत करणारा ठरला आणि अल्पावधीतल्या टोगोच्या प्रगतीनं तो आश्चर्यचकीत झाला होता. अनफ़ीट कुत्रा ते प्रवासासाठी सर्वात लायक लिडर कुत्रा असा प्रवास टोगोनं पार केला होता. टोगोमध्ये नैसर्गिकरीत्याच एक जाणिव आणि जिगरबाजपणा होता. अल्पावधीतच टोगो त्याच्या फ़िटनेस आणि हुशारीसाठी अलास्कात ओळखला जाऊ लागला. सेपेल आणि टोगो ही जोडगोळी अलास्कात लोकप्रिय बनली.

मर्सी रनच्यावेळेस खरं तर दोघेही इतरांपेक्षा वयानं जास्त असणारे सहभागी होते. टोगो १२ आणि सेपेल ४७ वर्षांचा होता. मात्र अलास्काच्या रहिवाशांचा या दोघांवर पूर्ण विश्वास होता आणि हे दोघे त्यांची अखेरची आशाही होते. अविश्वसनिय वाटणारा प्रवास केवळ हे दोघेच पूर्ण करू शकतील ही त्यांना खात्री होती. लोकांचा विश्वास सोबत घेऊन टोगो आणि सेपेला प्रवासाला निघाले. या संपूर्ण प्रवासातील सर्वात धोकादायक असा गोठलेल्या समुद्रावरचा मार्ग या टिमला पार करायचा होता.

तडकणार्‍या पृष्ठभागावरून टोगोनं स्लेज ओढत त्याच्या वाटणीचा रिले पूर्ण केला. इतर टीममधील स्लेज डॉगनी प्रत्येकी ३१ मैलांचं अंतर कापलं मात्र टोगोनं एकट्यानं अडीचशेहून अधिक मैल कापले. यात असा एक टप्पाही आला ज्यात सेपेलला बर्फ़ामुळे पुढचा मार्ग समजणही बंद होऊन त्याचं व्हिजन गेलं. त्यानं टोगोच्या तल्लख बुध्दीवर भरवसा ठेवत हा प्रवास पूर्ण केला.

स्थानिकांच्या आणि सेपेलाच्या या विश्वासाला टोगोनं सार्थ केलं आणि हजारोंचे प्राण वाचविले!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

Next Post

५००० रुपये घेऊन मार्केटमध्ये एंट्री केली आता २०,००० कोटींचं साम्राज्य उभं केलंय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

५००० रुपये घेऊन मार्केटमध्ये एंट्री केली आता २०,००० कोटींचं साम्राज्य उभं केलंय

या राजाने जगातली पहिली लिखित न्यायव्यवस्था उभी केली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.