The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इराणने ५२ अमेरिकी नागरिकांना तब्बल ४४४ दिवस ओलीस ठेवले होते..!

by द पोस्टमन टीम
19 June 2025
in राजकीय, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने देश-विदेश फिरण्याची वेळ अनेकांवर येते. कधी कधी हे फिरस्ते स्वतःच्या मायभूमीपासून दूर कुठल्या तरी देशात आपला तळ ठोकून राहतात. ज्या काळात प्रवासाची प्रगत साधने नव्हती त्याकाळातही लोकांनी व्यापार उदीमाच्या निमित्ताने स्थलांतरण केले आहे. आज प्रवासाच्या अतिसुलभ साधनांमुळे प्रत्येक देशात परकीय नागरिक मोठ्या संख्येने आढळून येतात. याचा परिणाम राष्ट्रा-राष्ट्रातील संबंधांवरही होतो. परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या मदतीसाठी आणि आपल्या देशाचे त्या देशाशी असलेले राजकीय, आर्थिक संबंध अधिकाधिक दृढ करण्याच्या उद्देशाने प्रत्येक देशाचा दुसऱ्या देशात एक राजकीय दूतावास असतो.

राजकीय संबंध स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या नागरिकांना नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीच्या वेळी सहाय्य करणे हा या दूतावासाचा उद्देश असतो. पण, जर कधी या दूतावासावरच संकट आले तर काय होईल?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेली कित्येक दशके तणावपूर्ण आहेत. इराणमध्ये खनिज तेलाची विपुलता आढळून आल्यापासून या खाणींवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिका इराणच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करत असल्याचेही आरोप अनेकदा केले गेले आहेत.

या तणावग्रस्त वातावरणात अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी इराणच्या काही संघटनांनी इराणमधील अमेरिकन दूतावासातील नागरिकांनाच ओलीस ठेवले होते. अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाला आव्हान देण्यासाठीच त्यांनी हा मार्ग अवलंबला होता.

इराणमध्ये १९७०च्या दरम्यान इस्लामिक क्रांतीचे वारे वाहू लागले होते. त्याआधी १९५१ मध्ये जेव्हा इराणमध्ये सार्वजनिक निवडणुका पार पडल्या आणि मोहम्मद मुसद्दिक पंतप्रधान पदी निवडून आला. त्याने इराणमधील तेल उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच इंग्लंड आणि अमेरिकेला त्याच्या या निर्णयाचा फार मोठा फटका बसला असता. म्हणून अमेरिकेची गुप्तचर संघटना, सीआयए, आणि ब्रिटीश गुप्तचर संघटनांनी मोहम्मद मुसद्दिकऐवजी त्यांच्या बाजूने विचार करणाऱ्या नेत्याच्या हाती सत्ता कशी येईल याची चाचपणी सुरू केली. मुसद्दिकला हटवण्यासाठी अमेरिकेने त्याच्याच देशात त्याच्या विरोधात भावना भडकवण्यास सुरुवात केली.



सीआयए आणि एमआय 6 या गुप्तचर संघटनांनी शेवटी यात यश मिळवलेच. इराणमध्ये सत्तापालट झाली आणि मोहम्मद मुसद्दिकच्या जागी इराणची सत्ता मोहम्मद रजा शाह पेहलवीच्याकडे आली. अमेरिकेच्या आशीर्वादाने सत्तेत आलेले पेहलवी अमेरिकेच्या हाताचे बाहुले बनून राहिले.

त्याच्या विरोधात सूर उठवणाऱ्याविरुद्ध त्याने दडपशाहीचे सत्र सुरु केले. यामुळे सामान्य जनतेत त्याच्या विरोधातील रोष वाढत होता. आधुनिकीकरणाच्या नावाखाली पेहलवी देशाची इस्लामिक संस्कृती नष्ट करत असल्याचा घोष मौलवींनी आणि धार्मिक नेत्यांनी सुरू केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इराणमधील कट्टरपंथीय इस्लामी धर्मगुरु अयातुल्लाह रुहूल्लाह खोमेनी यांनी पेहलवी विरोधात आंदोलन सुरू केले. यालाच इतिहासात इस्लामिक क्रांती म्हणून ओळखले जाते.

१९७०च्या दरम्यान याचा अचानक स्फो*ट झाला होता. इराणचे लोक आपल्या धर्माबाबत आणि हक्कांबाबत आक्र*मक झाले होते. पेहलवीची उचलबांगडी करण्याचा त्यांनी पक्का निर्धार केला होता. या क्रांतिकारकांनी पेहलवीला सत्ता सोडण्यास भाग पाडले. जीवाच्या भीतीने पेहलवीने इजिप्तला पळ काढला.

खोमेनीच्या नेतृत्वाखाली देशात नवे सरकार स्थापन झाले. इस्लामी मूलतत्त्ववादाच्या आधारावर आलेल्या या सरकारने सत्तेचे इस्लामीकरण केले.

इकडे पेहलवीची तब्येत बिघडत होती. उपचारासाठी त्याला अमेरिकेत जाणे भाग होते. अमेरिकेचे अध्यक्ष जिम कार्टर यांनी त्याला उपचारासाठी अमेरिकेत येण्याची परवानगी दिली. पण इराणमध्ये  याचा वेगळाच अर्थ काढला गेला. अमेरिकेने इराणच्या गद्दार नेत्याला शरण देणे इराणी क्रांतीकारकांना अजिबात रुचले नाही. त्यांनी पेहलवीला अमेरिकेने आपल्या हवाली करावे अशी मागणी केली पण, अमेरिकेने ही मागणी धुडकावून लावली.

तिकडे पेहलवीला अमेरिकेत राहण्याची अनुमती देताच इकडे हे क्रांतिकारक सरळ सरळ अमेरिकेच्या दुतावासात घुसले आणि दूतावासातील अमेरिकन कर्मचाऱ्यांना सरळसरळ बंदी बनवून ठेवले. पेहलवीच्या बदल्यात या नागरिकांची अमेरिकेने सुटका करून घ्यावी अशी त्यांची मागणी होती. पेहलवीवर खोमेनीला देशद्रोहाचा कायदेशीर खटला चालवायचा होता.

अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी या क्रांतिकारकांशी चर्चा करून त्यांच्यावर दबाव आणून पहिला. सलग सहा महिने अमेरिकेचे हे प्रयत्न सुरू होते. पण, सारेच प्रयत्न वाया गेले. शेवटी जिम कार्टर यांनी लष्करी कारवाई करण्याची संमती दिली. या कारवाईसाठी लष्कराने ऑपरेशन इगल क्लॉ नावाची योजना आखली. यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाला फ्लोरिडा आणि एंडर्सन हवाईतळावर पाच महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पाच महिने सराव केल्यानंतर ऑपरेशनचा पूर्ण नियोजन आखण्यात आले. २४ एप्रिल रोजी हे ऑपरेशन अंमलात आणण्याचे ठरवले गेले.

ऑपरेशनचा पहिला टप्पा होता या सगळ्या विमानांचे इराणमध्ये गुप्तपणे लँडिंग करणे. यातील पहिले विमान एमसी-१३० तर सुरक्षितपणे लँड झाले. पण दुसरी विमाने येईपर्यंत त्या मार्गावर एक बस आली जिने हे विमान लँड झालेले पहिले. या बसमधील सगळ्या प्रवाशांना डांबून ठेवावे लागले. तोपर्यंत एक ट्रक आला त्याला अडवताना ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तोपर्यंत दुसरी विमाने आली. विमानांनी पुढचा प्रवास सुरू केला तोवर एक विमान वाटेतच खराब झाले. बाकी विमाने पुढे जाऊ लागली तोवर मोठे वादळ उठले.

आकाशात वाळूंचे ढिगारे जमत होते. जोरात सुटलेला वारा आणि त्यात उडणारे वाळूचे लोट यामुळे विमानांना पुढचा प्रवास करणे निव्वळ अशक्य झाले. नाईलाजाने या विमानांना परतण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेली काही विमाने अपघातग्रस्त झाली. अमेरिकेच्या आठ सैनिकांचा नाहक बळी गेला.

परतत असतानाही खराब वातावरणामुळे या टीमला खूप त्रास झाला. हेलिकॉप्टरचे नुकसान झाले. काही पायलट गंभीररित्या जखमी झाले. एकंदरीत अमेरिकेचे हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले. अपघातग्रस्त विमानातील या ऑपरेशनची गुप्त फाईल देखील जाळून खाक झाली. अमेरिकेने असे अपयश यापूर्वी कधीही पाहिले नसेल.

शेवटी आपल्या नागरीकांची सुटका करून घेण्यासाठी अमेरिकेला युएनची मदत घ्यावी लागली. युएनने हस्तक्षेप करत इराणच्या व्यापारिक संबंधावर बंदी आणली. त्यांचा तेलाचा व्यापार बंद करण्याचे प्रयत्न केले गेले. इराणच्या आर्थिक स्थितीवर प्रहर केल्यास इराण जेरीस येईल असा अंदाज होता.

दुसरीकडे इराकने इराणवर ह*ल्ला केला. इराक-इराण यु*द्धात अमेरिकेने इराकला मदत केली. इराणच्या सैन्याचे यात खूप नुकसान झाले. इराणला देखील पुन्हा मदतीसाठी संयुक्त राष्ट्राचा दरवाजा ठोठवावा लागला. संयुक्त राष्ट्रानेही त्यांना अमेरिकेच्या नागरिकांची सुटका केली तरच मदत मिळेल असे सुनावले. इराणने यावेळी माघार घेतली.

अमेरिका आणि इराण यांच्यात अल्जेरियाने मध्यस्थी केली. १९८१ साली या दोन्ही देशात सामंजस्य करार संमत करण्यात आला. या करारानुसार अमेरिकेने इराणवर लादलेले सगळे प्रतिबंध मागे घेतले. त्यांचा गोठवलेला पैसाही परत केला. इराणनेही अमेरिकन नागरिकांची सुटका केली.

या सगळ्या नाट्यमय घडामोडीवर हॉलीवूडमध्ये आर्गो नावाचा एक चित्रपटही चित्रित झाला होता. २०१२ साली आलेल्या या चित्रपटाने त्यावर्षीचा ऑस्कर मिळवला होता.

आजही अमेरिकेला या अपयशी ऑपरेशनची सल बोचत असते. शेवटी एक मुंगीही हत्तीला मात देऊ शकते हेच खरे. बरोबर ना?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कसोटी पदार्पणातच त्रिशतक मारणाऱ्या ‘करूण नायर’चं करियर का संपलं..?

Next Post

क्रिस काईल – जगाच्या इतिहासातला सगळ्यात डेडली स्नायपर

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

क्रिस काईल - जगाच्या इतिहासातला सगळ्यात डेडली स्नायपर

चेटकीण असल्याच्या संशयावरून इंग्लंडमध्ये १५० स्त्रियांना फासावर लटकवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.