The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकोणसाठ वर्षांचा मिलिंद सोमण आजही २५ वर्षांच्या पोरांना कॉम्प्लेक्स देतोय..!

by द पोस्टमन टीम
10 June 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


फिटनेसचे महत्त्व आज सर्वांना चांगलेच पटले आहे. फिटनेससाठी कुणी जिमचा आधार घेतं तर कुणी योगाभ्यास करतं. पण भारताचा आयर्नमॅन म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमण आजही जिमपेक्षा धावण्याला जास्त प्राधान्य देतो. हा आयर्नमॅन अलीकडेच कोरोना संक्रमणातूनही बरा झाला आहे. एकोणसाठ वर्षांच्या आसपासचा मिलिंदचा फिटनेस पंचवीस वर्षाच्या तरुणालाही लाजवेल असा आहे.

मिलिंदचे हे फिटनेसचे वेड आजकालचे नाही तर लहानपणापासूनचेच आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून मिलिंद पोहायला शिकला. लवकरच तो पोहण्यात इतका तरबेज झाला की, दहाव्या वर्षी त्याने नॅशनल चँपियनशिपमध्ये पहिल्याच वर्षी रौप्य पदक पटकावले होते.

मिलिंदचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंड येथे झाला. त्यांना तीन बहिणी आहेत, नेत्रा, मेधा आणि अनुपमा. मिलिंदच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचे कुटुंब पुन्हा भारतात परत आले. मिलिंद सोमणचे वडील प्रभाकर सोमण संशोधक होते आणि त्यांची आई उषा सोमण देखील बायो-केमिस्टच्या प्राध्यापिका होत्या. मिलिंद दहा वर्षांचा झाल्यावर त्याचे वडील त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत पाठवू लागले. मिलिंदचे शिक्षण मुंबईच्या अंटोनियो-दे-सिल्वा पब्लिक स्कूलमधून पूर्ण झाले. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगमधून पदवी पूर्ण केली.

१९९५ साली अलिशा चुनॉयचा अल्बम ‘मेड इन इंडिया’मधून त्याने पहिल्यांदा अभिनय केला.



त्यानंतर भारतातील पहिली इंग्लिश सिरीयल ‘अ माउथफुल ऑफ स्काय’मधून त्याने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर त्याला पोहण्यासाठी वेळच मिळत नसे.

सन २००० पासून तो मोठ्या पडद्यावरही झळकू लागला. आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि कसदार अभिनयाच्या जोरावर लवकरच त्याने या क्षेत्रात मोठी लोकप्रियता मिळवली. आजही त्याचे चाहते त्याला पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक असतात. त्याची पौरुषपूर नावाच्या सीरिजला चांगलीच प्रसिद्धी मिळाली, ज्यात तो तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारत आहे.

या क्षेत्रातील व्यस्त जीवनामुळे मिलिंदचा व्यायाम सुटला होता पण, २००३ पासून मिलिंदने पुन्हा एकदा फिटनेसकडे लक्ष देण्याचे ठरवले आणि त्याने घरातच ट्रेड मिलवर धावणे सुरू केले. ट्रेड मिलवर धावता धावता त्याला मॅरेथॉनमध्ये धावण्याची कल्पना सुचली. त्याचवेळी मुंबईत एक मॅरेथॉन आयोजित केली होती. या मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर त्याला धावण्याचा छंदच जडला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

२०१५ मध्ये त्याने जगप्रसिद्ध आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेतला. जगभरातून २००० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत १६ तास धावण्याची शर्यत असते. ज्यात तीन कठीण टास्क पूर्ण करावे लागतात. यातील पहिला टास्क असतो ३.८ किमीपर्यंत पोहत जाणे. मिलिंद पोहण्यात तरबेज होताच पण तरीही तीन किलोमीटर सलग पोहणे म्हणजे काही चेष्टा नसते. त्यानंतरचा टास्क होता १८०.० किमी इतकी सायकलिंग करणे. सायकलिंग करण्याची टास्क मिलिंदसाठी निश्चितच कठीण होती कारण, त्याने याचा कधी सराव केला नव्हता. या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात ४१.४ किमीचे अंतर धावून पूर्ण करावे लागते. अर्थात हे तिन्ही टास्क १६ तासात पूर्ण केले पाहिजे अशी अपेक्षा असते.

मिलिंदने हे टास्क १५ तास १९ मिनिटातच पूर्ण केले. आयर्नमॅनच्या किताबावर त्याने शिक्कामोर्तब केला तेही वयाच्या पन्नासाव्या वर्षी. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याचा फिटनेस पाहून आयोजकही थक्क झाले होते.

मिलिंदच्या या फिटनेस मागचे रहस्य आहे त्याचा नियमितपणा. सध्या तो रोज धावत नसला तरी आठवड्यातून तीन-चार दिवस तर नक्कीच धावण्याचा सराव करतो. त्याच्या मते शरीर नेहमीच कार्यरत ठेवले पाहिजे. त्यासाठी भरपूर शारीरिक मेहनत करणे आणि पौष्टिक आहार घेणे हेच दोन मार्ग आहेत. मिलिंद कधीही फास्टफूड किंवा पॅक्ड फूड खात नाही. तो नेहमीच ताजे अन्न खाण्याला प्राधान्य देतो.

अलीकडेच त्याने मोबाईलपासून दूर राहण्यासाठी नो मोबाईल संडे नावाचा नवीन फंडा अंमलात आणला आहे. यादिवशी तो स्वतःला मोबाईलपासून आवर्जून दूर ठेवतो. रात्री १०.३० ते ११.०० वाजता झोपायचे आणि पाच वाजता उठायचे हा त्याचा ठरलेला दिनक्रम आहे. साखरेपासून तो स्वतःला जरा दूरच ठेवतो आणि कधी काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झालीच तर तो गुळ किंवा मध खाण्याला प्राधान्य देतो.

महिला आपल्या फिटनेसकडे नेहमीच कानाडोळा करतात. त्यांच्यातही फिटनेस बाबत जागृती घडवण्यासाठी त्याने खास महिलांसाठी मॅरेथॉन आयोजित केली. साडीमध्ये पळणे जमत नाही. या मॅरेथॉनची विशेष बाबा म्हणजे महिला साडी नेसून यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

मिलिंद सोमण आणि विवाद यांचेही एक अतूट नाते आहे. १९९५ सालीच त्याने एका जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट केले होते. या जाहिरातीत मधु सप्रे या मराठी मॉडेलनेही त्याच्यासोबत काही न्यूड पोझेस दिल्या होत्या. तेव्हा दोघांबद्दलही खूप चर्चा झाली होती आणि त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवला गेला होता. या फोटोमध्ये दोघांनी फक्त पायात शूज घातले होते आणि शरीराभोवती एक पायथन फर गुंडाळला होता. यावरूनही दोघांवर खूप टीका झाली वन्यजीव संरक्षण कायद्यान्वयेही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. टफ शूजसाठी त्यांनी हे फोटोशूट केले होते. दोघांवरील हा खटला १४ वर्षे चालला होता त्यानंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले.

२०१८ मध्ये त्याने आपल्यापेक्षा निम्म्या वयाची मॉडेल अंकिता कोंवर हिच्याशी लग्न केले तेव्हाही त्याच्यावर भरपूर टीका झाली. त्याचे पहिले लग्न फ्रांसची अभिनेत्री मिलेन जम्पनोई हिच्याशी झाले होते, अवघ्या दोन वर्षाच्या संसारानंतर दोघांनीही एकमेकांपासून फारकत घेतली.

२०२० मध्ये आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याने गोवा बीचवर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोवरूनही त्याला भरपूर ट्रोल करण्यात आले. या फोटोसाठीही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. काही लोकांनी तर त्याला अंडर गारमेंट्स गिफ्ट केल्या होत्या. त्याचे सोशल मिडियावरील त्याच्या पोस्ट्सही कधी कधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या असतात. तरीही या माध्यमातून तो कधी आपले फिटनेस फंडे शेअर करतो तर कधी जुन्या आठवणींना उजाळा देतो.

मिलिंद सोमणसारखा फिटनेस हवा! असे तुम्हालाही वाटत असेल तर, आधी त्याच्यासारखी इच्छाशक्ती आणि स्वयंशिस्त अंगीकारावी लागेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

वेस्ट इंडिजकडे त्यांचा स्वतःचा सेपरेट क्रिकेटचा देव आहे, त्याचं नाव ब्रायन लारा..!

Next Post

महाबलीपुरमचा हा दगड न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला १३०० वर्षांपासून फाट्यावर मारतोय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

महाबलीपुरमचा हा दगड न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला १३०० वर्षांपासून फाट्यावर मारतोय

फिलिपिन्सच्या या शिक्षिकेने २०० जपानी सैनिकांना यमसदनी धाडलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.