The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा होता हि*टल*रचा एकमेव फेव्हरेट ‘ज्यू’ ज्याला हि*टल*रने अभय दिलं होतं..!

by द पोस्टमन टीम
19 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हि*टल*रचा ज्यू द्वेष तर जगजाहीर आहे. फक्त ज्यू लोकांना मारण्यासाठी आणि त्यांचा अनन्वित छळ करण्यासाठी त्याने छळछावण्या उभारल्या होत्या. या छळछावण्यातल्या ना*झी सैन्याच्या या द*हश*तीला घाबरून कित्येक ज्यूंनी देश सोडला. काहींना ना*झी सैन्याने मारून टाकले तर काही जण यु*द्ध संपेपर्यंत ना*झी सैन्याचा अत्याचार सहन करत राहिले. या छळछावण्यातून जे जिवंत बाहेर पडले त्यापैकी काहींनी आपल्या अनुभवावर पुस्तके लिहिली. त्यांचे हे अनुभव वाचले तर भल्याभल्यांची झोप उडेल.

हि*टल*रला ज्यू धर्मियांविषयी टोकाचा द्वेष होता. शिवाय, तो स्वतःला आर्यवंशीय समजत होता. शुद्ध आर्यवंशीय लोकांनीच जगावर राज्य केले पाहिजे या विचाराने त्याने ज्यू धर्मियांना संपवण्याचा चंगच बांधला. म्हणून तर त्याने जर्मनमधील ज्यूंचा तर अनन्वित छळ केलाच, पण शेजारच्या पोलंडवर आक्र*मण करून तिथल्या ज्यूंचेही शिरकाण केले.

इतका ज्यूद्वेष्टा असलेल्या हि*टल*रने मात्र एका ज्यू न्यायाधीशाला अभय दिले होते. स्वतःहून त्याच्या रक्षणाची काळजी घेतली होती. या न्यायाधीशाला कसलाही धक्का पोहोचता कामा नये असे आदेश त्याने गेस्टापोला दिले होते. त्याच्या ज्यू असण्याने कुठेही त्याला कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्याने त्या ज्यू न्यायाधीशाकडे स्वतःच्या हस्ताक्षरात एक पत्र दिले होते. जेणेकरून नाझी सैन्यामार्फत त्याला कसलाही त्रास दिला जाणार नाही.

पण हा न्यायाधीश होता तरी कोण आणि आपला ज्यू द्वेष बाजूला सारत हि*टल*रने त्याला इतकी सुरक्षितता का दिली? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.



हि*टल*रने संरक्षण दिलेल्या त्या न्यायाधीशाचे नाव होते अर्नेस्ट मॉर्टीझ हेस. अर्नेस्ट आणि हि*टल*र या दोघांनी पहिल्या महायु*द्धात सहभाग घेतला होता. त्यावेळी अर्नेस्ट हेस हा सेकंड रॉयल बेव्हारीयन रिझर्व्ह इन्फंट्रीचा अधिकारी होता. योगायोगाने हि*टल*र याच रेजिमेंटमधे सैनिक होता. हेस एक कर्तबगार अधिकारी होता.

पहिल्या महायु*द्धात त्याने दाखवलेल्या बहाद्दुरीसाठी त्याला ऑनर क्रॉस ऑफ द वर्ल्ड वॉर १९१४/१९१८ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हि*टल*र हेसला चांगलाच ओळखत होता. कारण दोघेही सोमीच्या यु*द्धात जखमी झाले होते आणि दोघांवरही एकाच दवाखान्यात उपचार करण्यात आले होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

हेन्रीच हिम्मर ना*झी सैन्यातील एक प्रमुख अधिकारी होता. त्यानेही पहिल्या महायु*द्धात हेसच्या रेजिमेंटमधेच सेवा बजावली होती. हि*टल*र आणि हेन्रीच दोघेही हेसला जवळून ओळखत होते. म्हणूनच त्यांना हेसला वाचवायचे होते.

१९३६ साली अर्नेस्ट हेसला त्याच्या न्यायाधीश पदावरून जबरदस्तीने निवृत्ती स्वीकारायला भाग पाडले. त्यानंतर हेसने हि*टल*रला पत्र लिहून आपण जातिवंत ज्यू असल्याचे लिहिले. त्याची आई एलिझाबेथ हर्ट्झ ज्यू होती. म्हणूनच जर्मनीतील १९३५ साली करण्यात आलेल्या कायद्यानुसार त्याला जातिवंत ज्यू असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले होते. त्याचे वडील अटर्नी जनरल होते.

हेसने आंतरजातीय विवाह केला होता. तरीही हि*टल*रच्या ना*झी सैनिकांनी त्याला मारहाण केल्यानंतर १९३७ साली तो जर्मन सोडून इटलीला निघून गेला आणि बोल्झानो येथे स्थायिक झाला. हा भाग जर्मनीपासून जवळ असल्याने इथल्या शाळेत जर्मनीतून शिक्षण दिले जात होते. म्हणूनच हेसने याच भागात राहण्याचे निश्चित केले, कारण आपल्या मुलीने जर्मनीतून शाळा शिकावी अशी त्याची इच्छा होती.

एका वर्षानंतर त्याने हि*टल*रला पत्र लिहून कळवले की त्याची मुलगी हे मिश्र वंशाची असल्याने त्याला आणि तिच्या मुलीला थोडी तरी सवलत द्यावी. हि*टल*रने हेसची ही मागणी मान्य केली. उलट त्याची पेन्शन त्याला इटलीतही मिळेल अशी व्यवस्था केली पण त्यातील काही रक्कम कापून घेतली.

१९३९ साली हेसला नवीन पासपोर्ट दिले ज्यावर लाल रंगातील Jचा शिक्का मारला नव्हता. त्यामुळे हेसेच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर फार काही बंधने आली नाहीत.

१९३९ साली बोल्झानोतील साउथ टॉय भागातील जर्मन भाषिक लोकांनी जर्मनीला निघून जावे असा फतवा इटली सरकारने काढल्यामुळे १९३९ साली हेसला जबरदस्तीने पुन्हा जर्मनीत परतावे लागले.

हेम्मरने त्याच्या सुरक्षेसाठी त्याला एक पत्र दिले आणि गेस्टापो म्हणजे जर्मनीच्या पोलिसांना तशा सूचना देखील दिल्या. पण त्याच्या भोवतीचे हे सुरक्षेचे कडे फार दिवस टिकू शकले नाही. जून १९४१ साली म्युनिचच्या एसएस विभागाने त्याला बोलावून घेतले. त्याने या सुरक्षा रक्षकांना हिटलरने त्याला दिलेले पत्र दाखवले पण, त्यांनी हे पत्र खारीज करून टाकले. हेस आता विशेष व्यक्ती राहिला नव्हता. त्यालाही इतर ज्युप्रमाणेच वागणूक मिळणार होती. पण यावेळी त्याच्या मिश्र विवाहाने त्याला वाचवले. त्याची पत्नी मार्गारेट हेस एक जर्मन प्रोटेस्टंट होती. त्यामुळे त्याला मारण्याऐवजी छळछवणीत डांबून ठेवण्यात आले. इथे त्याने पुढील अनेक वर्षे कामगारासारखे दिवस काढले. पुढे १९४५ मध्ये दुसऱ्या महायु*द्धाला पूर्ण विराम मिळाला आणि ना*झी सैन्याची पुरे वाट झाली. त्यांच्या नेत्याने तर स्वतःला संपवले होतेच. आता ना*झींचे राज्य उरले नव्हते.

जर्मनच्या छळछावणीत हेसप्रमाणेच बंदिस्त असलेले सगळे ज्यू आता स्वतंत्र झाले होते.

हि*टल*रने हेसला जी सुरक्षा पुरवली होती ती त्याच्या एकट्या पुरतीच मर्यादित होती. त्याच्या आईला आणि बहिणीला ना*झी सैन्याने मारून टाकले. त्याची मुलगी मिश्र रक्ताची असल्याने तिला सोडून देण्यात आले.

यु*द्धानंतर जर्मनीत स्थापन झालेल्या सरकारमधे हेसेने जर्मन फेडरल रेल्वेचा अध्यक्षपद स्वीकारले. पुन्हा एकदा हेसेला चांगले दिवस आले.

१९७० साली त्याला ‘ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ दि मेरीट’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

फेडरल जर्मनी सरकारने त्याच्या स्मृतीपित्यार्थ एक फलक देखील बनवून घेतला होता. १४ सप्टेंबर १९८३ रोजी वायच्या ९३व्या वर्षी हेसेचे निधन झाले.

हि*टल*रने सुरक्षा पुरवली असली तरी हेसच्या वाट्याचे दैन्य काही चुकले नाही. सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे हेसला हे आठवतही नव्हते की, हि*टल*र त्याच्या रेजिमेंटमध्ये होता आणि आपण हि*टल*रसोबत कधीकाळी सैन्यदलात काम केले आहे. आपल्या मुलीला उर्सुलाला लिहिलेल्या पत्रात त्याने याचा उल्लेख केला आहे. बहिण आणि आई वाचू शकली नसते तरी या सगळ्या भयप्रद परिस्थितीतून तो आणि त्याची मुलगी तरी सुखरूप बचावले होते.

हेस हि*टल*रच्या रेजिमेंटचा कर्तबगार अधिकारी होता म्हणूनच वाचला नाहीतर त्याचीही अवस्था इतर ज्युंप्रमाणे होण्यास वेळ लागला नसता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ऑस्ट्रेलियातल्या प्रत्येक पिनकोडमध्ये सर डॉन ब्रॅडमनची आठवण दडली आहे..!

Next Post

रोनाल्डोने कोकची बॉटल बाजूला केली आणि कंपनीचं मार्केट कॅप ४ बिलियन डॉलरने पडलं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

रोनाल्डोने कोकची बॉटल बाजूला केली आणि कंपनीचं मार्केट कॅप ४ बिलियन डॉलरने पडलं

जपानमध्ये आजही मियामोटो मुसाशीच्या शौर्याच्या गोष्टी सगळ्यांच्या ओठांवर आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.