The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रच्या ‘या’ कमांडरनेच त्याला मारण्याचा धाडसी प्रयत्न प्रयत्न केला होता..!

by द पोस्टमन टीम
18 June 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जर्मनी आणि प्रामुख्याने हि*टल*रच्या विस्तारवादी धोरणामुळे दुसऱ्या महायु*द्धाला तोंड फुटले. पहिल्या महायु*द्धात जर्मनीचा पराभव झाला होता. जर्मनीने आपल्या पराभवाचे खापर जर्मनीतील ज्यू जनतेवर फोडले. हि*टल*रने ज्यू विरोध आणि प्रखर राष्ट्रभावनेला खतपाणी घालून जर्मनीची निरंकुश सत्ता हस्तगत केली. पण, हि*टल*रची ही मुजोरी सहन न होणारेही काही लोक त्याच्याच पक्षात आणि सैन्यात होते.

यातीलच एका अधिकाऱ्याने हि*टल*रला संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. कोण होता तो जर्मन अधिकारी आणि त्याची ही योजना का फसली? हि*टल*रच्या ह*त्येचा कट उघडकीस आल्यानंतर पुढे त्याचे काय झाले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख जरूर वाचा.

जर्मनीतील ज्यू देशद्रोही असल्यानेच जर्मनीला हा पराभव पाहावा लागला अशी समजूत असणारा एक मोठा वर्ग जर्मनीत उदयास आला.

पहिल्या महायु*द्धानंतर जर्मनीत कामगार पक्षाचा उदय झाला. ज्यू विरोध, प्रखर राष्ट्रवाद आणि उजवी विचारसरणीची जोपासना हेच या पक्षाचे मुख्य कार्य होते.

पहिल्या महायु*द्धात हि*टल*रने रिझर्व इन्फंट्री रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. पण, त्याला यश मिळाले नाही. या पराभवानंतर हि*टल*रही कामगार पक्षाचा सदस्य झाला. ज्यू विरोध तर त्याच्यात ठासून भरला होताच. हि*टल*रची वक्तृत्व शैली तर चांगलीच होती. आपल्या भाषणातून तो सतत ज्यू विरोध, जर्मनीचा अपमानास्पद पराभव, वर्सोवा तहाची निष्फळता याचाच भडीमार करत असे. आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे लवकर पक्षात त्याची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. पक्षातील त्याच्या समर्थकांची संख्या वाढत होती. हि*टल*रने पक्ष प्रमुख पदापर्यंत मजल मारली आणि त्याने कामगार पक्षाचे राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष असे नामांतर केले. हळूहळू त्याने संपूर्ण जर्मनची सत्ता हस्तगत केली.



१९३३ साली जर्मनची सत्ता मिळाल्यानंतर त्याने जर्मनीत दडपशाहीची नीती अवलंबण्यास सुरुवात केली. अवघ्या सहा वर्षांत त्याने ६० लाख ज्यू धर्मीयांची क*त्तल केली. संपूर्ण जर्मनीला त्याचा विचार पटला होता. विरोधकांच्या बेशुमार क*त्तली सुरू झाल्या. १९३८ साली त्याने ऑस्ट्रियाला जबरदस्ती जर्मनीमध्ये सामावून घेतले. १९३९ साली त्याने पोलंडवर ह*ल्ला केला आणि इथूनच दुसऱ्या महायु*द्धाची ठिणगी पडली. हि*टल*रची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच होती. त्याचा आपल्या सैन्यावर प्रचंड विश्वास होता. त्याचा हा विश्वास सार्थही होता ना*झी सेना हि*टल*रचा शब्द झेलण्यास नेहमीच तत्पर होती.

याच ना*झी सैन्यातील एका अधिकाऱ्याला मात्र हि*टल*रच्या या दडपशाहीची आणि बेबंद हिं*साचाराची घृणा वाटत होती. हि*टल*रने जमर्नीची फसवणूक केल्याचे त्याच्या लवकरच लक्षात आले. त्या अधिकाऱ्याचे नाव होते, क्लॉज वॉन स्टॉफनबर्ग. स्टॉफनबर्ग ना*झी सैन्यात कर्नल होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

स्टॉफनबर्गनेच हि*टल*रच्या ह*त्येचा कट रचला होता, जो अयशस्वी झाला.

स्टॉफनबर्गने असा कट रचण्यापुर्वीही आणखी काही लोकांनी हि*टल*रला मारण्याचे प्रयत्न केले होते, जे अर्थातच अयशस्वी ठरले होते. स्टॉफनबर्गचा हा कट फसला आणि स्टॉफनबर्गला त्याची फळे भोगावी लागली.

स्टॉफनबर्गच्या आधी एका स्विस विद्यार्थ्याने हि*टल*रला मारण्याचा प्रयत्न केला होता. या विद्यार्थ्याने आपल्या पि*स्तुलच्या सहाय्याने हि*टल*रवर निशाणा साधला होता. पण, मध्येच हि*टल*रचे सैनिक आल्याने त्याला अचूक निशाणा साधता आला नाही. हि*टल*रच्या सैनिकांनी या विद्यार्थ्याला पकडून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली होती.

१९३९ आणि १९४३ मध्येही असे कट रचण्यात आले होते मात्र हे सगळेच कट अयशस्वी ठरले.

स्टॉफनबर्ग हा खरं तर ना*झी समर्थक होता. १९ वर्षाचा असतानाच तो जर्मन सैन्यात भरती झाला होता. तो अतिशय धाडसी आणि शूर होता. अनेक यु*द्धात त्याने आपल्यातील हे गुण सिद्ध करून दाखवले होते. यु*द्धाच्या वेळी त्याने आपल्या सैन्य तुकडीचे नेतृत्वही केले होते. हि*टल*रला मारण्यासाठी त्याने आखलेली योजनाही अतिशय अचूक होती पण शेवटच्या वेळी हि*टल*रच्या एका सैनिकाने थोडीशी ढवळाढवळ केल्याने यातून हि*टल*र सहीसलामत बचावला होता.

स्टॉफनबर्ग आधी हि*टल*रचा चाहता असला तरी नंतर हि*टल*रचा जो क्रू*र चेहरा समोर आला, त्यामुळे तोही हैराण झाला होता. हि*टल*रचे खरे रूप आणि त्याने जनतेसमोर दाखवलेला चेहरा यात किती फरक आहे हे स्टॉफनबर्गला कळून चुकले होते. त्याचा हि*टल*रवरील अविश्वास दिवसेंदिवस वाढतच होता.

उत्तर आफ्रिकेतील एका मोहिमेवर त्याची निवड करण्यात आली होती. त्याच्याकडे शस्त्रास्त्र विभागाच्या देखरेखीचे काम देण्यात आले होते. १९४३ सालच्या यु*द्धात त्याने आपला एक डोळा गमावला होता. यासाठी त्याला सैन्यातून निवृत्ती देण्यात आली होती.

गंभीर जखमी झाल्याने तो आपल्या घरी आराम करत होता आणि याचवेळी काही लोक त्याच्याकडे हि*टल*रला मारण्याची योजना घेऊन आले. ही योजना त्याला पटली होती आणि ही अंमलात आणण्यासही तो तयार झाला. योजना फसली असती तर त्याच्या जीवाला किती जोखीम होईल हेही त्याला माहित होते. तरीही त्याने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. या योजनेला त्यांनी नाव दिले ऑपरेशन वाल्केरी.

यासाठी स्टॉफनबर्गने हि*टल*रच्या विश्वासू वर्तुळात प्रवेश केला. त्याने जर्मनीच्या रिप्लेसमेंट आर्मी कमांडरचे पद मिळवले. या पदामुळे त्याला हि*टल*रच्या आसपास वावरण्याची मुभा मिळाली.

२० जुलै १९४४ रोजी ही योजना अंमलात आणण्याचे ठरले. त्यादिवशी वोल्फ्स लायर मैदानावरील एका तळघरात हि*टल*रची एक गुप्त बैठक होणार होती.

या दिवशी प्रचंड उकाडा असल्याने हि*टल*रने तळघराऐवजी वरच्या मजल्यावरील खोलीत बैठक पार पडण्याचे जाहीर केले. अचानक झालेल्या या बदलाने स्टॉफनबर्ग थोडा गोंधळून गेला. मात्र काही झाले तरी आज हे काम फत्ते करायचेच असा त्याने निश्चयच केला होता. ज्या खोलीत ही बैठक होणार होती त्या खोलीतील हि*टल*रच्या खुर्चीखाली त्याने एक सुटकेस ठेवली, ज्यात बॉ*म्ब ठेवला होता आणि बॉ*म्बस्फो*ट होण्याआधी काही सेकंद तो त्या रूममधून बाहेर पडला.

त्या रूममध्ये हि*टल*रसोबत असणाऱ्या एका सैनिकाने ती सुटकेस थोडीशी बाजूला सरकवली. त्यामुळे जेव्हा स्फो*ट झाला तेव्हा हि*टल*र जखमी न होता इतर तीन सैनिकांचा मृत्यू झाला. हि*टल*र मात्र यात थोडा जखमी झाला होता. त्याच्यावर लगेच उपचार करून त्याला सोडून देण्यात आले.

पुढे या घटनेची चौकशी सुरू झाली. ज्यात स्टॉफनबर्ग आणि त्याच्यासोबत जे या योजनेत सहभागी होते त्या सर्वांनाच अटक झाली आणि गोळ्या झाडून ठार करण्यात आले.

स्टॉफनबर्गचा हा प्रयत्न फसला असला त्याच्या योजनेला यश मिळाले नसले तरी स्टॉफनबर्ग एक धाडसी आणि निडर सैनिक होता हे मात्र खरे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अघोरी साधूंबद्दल आपल्याला माहित असलेल्या निम्म्या गोष्टी अफवा आहेत..!

Next Post

जगाचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं तर या माणसाने..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जगाचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं तर या माणसाने..!

कसोटी पदार्पणातच त्रिशतक मारणाऱ्या 'करूण नायर'चं करियर का संपलं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.