The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टिपूच्या वंशातली नूर ब्रिटिशांची हेर आणि हि*टल*रची डोकेदुखी बनली, पण निळ्या रंगाने घात केला

by द पोस्टमन टीम
21 June 2024
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हेरगिरीच्या कथा ऐकायला वाचायला कितिही सुरस असल्या तरीही प्रत्यक्षातलं हेरगिरीचं काम हे सतत चाकूच्या धारेवर चालल्यासारखं असतं. या क्षेत्रात स्त्रियांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे दुसर्‍या महायुध्दात भारतीय वंशाची आणि ब्रिटीश सैन्यात असणारी सुफ़ी पंथाची नूर इनायत खान ही अत्यंत देखणी स्त्री तिच्या अतुलनीय कामगिरीबद्दल ओळखली जाते. ना*झींची हेरगिरी करण्याचं अत्यंत कठीण काम तिनं केलं.

ना*झींच्या नाकाखाली तिचं काम सुरळीत चाललेलं असतानाच नीळ्या रंगानं तिचा घात केला आणि तिची कारकीर्द आणि आयुष्य दोन्हीही संपलं.

नूर इनायत खान हे नाव इतिहासात तिच्या हेरगिरीतल्या कार्यासाठी नोंदवलं गेलं आहे. नूर इनायत खान ही टिपू सुलतानाच्या वंशातली होती (नूरचे वडील टीपूचे खापरपणतू होते). दिसायला अत्यंत सुंदर आणि दहा जणांत उठून दिसणारं खानदानी सौंदर्य असणारी नूर कोणीही पटकन प्रेमात पडावं अशीच होती. मात्र दिसायला नाजूक, कोमल असणारी ही मुलगी तितकीच खतरनाकही होती. तिचे वडील सुफ़ी पंथाचे होते. त्यांनी भारताबाहेर सुफ़ी पंथाचा प्रसार केला. वडिलांचे संस्कार रूजवत मोठी झालेली नूरदेखील कट्टर सुफ़ी पंथीय होती.

तिला हिं*सा मान्य नव्हती आणि खोटारडेपणासुद्धा. तिच्या या दोन गुणांमुळे खरतर ती हेरखात्यासाठी अजिबातच योग्यतेची नव्हती. तिच्या सहकार्‍यांचं मतही हेच होतं.

नूरला हेर बनविणं म्हणजे धोक्याला आमंत्रण असल्याचं त्यांचं मत होतं. हेरगीरीमध्ये सर्वात आधी तुमचं नाव आणि ओळख तुम्हाला खोटी घ्यावी लागते. नूरला खोटेपणा मंजूर नव्हता. मात्र या तत्त्वांपेक्षाही तिच्यातली राष्ट्रभक्तीची प्रेरणा जास्त प्रबळ होती. ज्यामुळेच बनावट नाव आणि ओळखीनं ती ब्रिटिशांची हेर म्हणून दुसर्‍या महायु*ध्दात सहभागी झाली आणि ना*झींवर हेरगिरी करत बहुमोल योगदान दिलं. तिचं काम इतकं चोख होतं की नाझी हैराण झाले होते.



दुसर्‍या महायु*ध्दात ब्रिटनकडून मित्र देशांसाठी हेरगिरी करणारी नूर पहिली आशियायी गुप्तहेर होती. ज्यावेळी ना*झींच्या अ*त्याचारांनी परीसीमा गाठलेली होती त्या काळात त्यांच्या टापूत घुसून हेरगिरी करणं कठीण काम होतं. नूरचं म्हणुनच विशेष कौतुक केलं जातं. मॉस्कोमध्ये जन्मलेली आणि ब्रिटनमध्ये वाढलेली नूर नंतर नाझींच्या ताब्यात असणार्‍या फ़्रान्समध्ये चिरनिद्रेत गेली.

नूरची तीन टोपणनावं होती- नोरा बेकर, मेडेलीन, जिनमरी रेनिया. नूरचं पूर्ण नाव, नूर-उल-निसा इनायतखान असं होतं. १९१४ मध्ये मॉस्कोत तिचा जन्म झाला. वडील भारतीय तर आई अमेरिकन होती. तिचे वडील हजरत इनायत खान हे टीपू सुलतानचे खापरपणतू होते. पाश्चिमात्त्य देशात सुफ़ीवादाचा प्रसार करण्याच्या कार्यासाठी त्यांना ओळखलं जातं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

धर्म प्रसारक वडिलांच्या संस्कारात वाढलेली नूरही धार्मिक आणि श्रध्दाळू होती. संगीताची आवड असणार्‍या नूरनं वीणाही शिकली होती. नूरच्या जन्मानंतर हे कुटुंब लंडनमध्ये स्थलांतरीत झालं. वडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली. उदरनिर्वाहासाठी तिनं संगीताचं क्षेत्र निवडलं. वीणा आणि पियानो शिकवणं आणि संगीताच्या माध्यमातून वडिलांप्रमाणेच सुफ़ी प्रसार करणं चालू ठेवलं. फ़्रेंच रेडिओवरही तिचं काम करत असे.

दुसरं महायु*ध्द चालू झालं आणि तिनं भारतीयांना मित्रराष्ट्रांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. १९ नोव्हेंबर १९४० रोजी ती रॉयल एअरफ़ोर्समध्ये द्वितिय श्रेणी एअरक्राफ़्ट अधिकारी म्हणून रुजू झाली. इथे तिनं वायरलेस ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलं. जून १९४१ मध्ये तिनं एयरफ़ोर्स बॉ*म्बर ट्रेनिंग स्कूलमध्ये कमिशनकडे आर्म्ड फ़ोर्स ऑफ़िसरसाठी अज केला. इथे तिची बढती होऊन असिस्टंट सेक्शन ऑफ़िसर बनवलं गेलं.

मुळातच धडाडीची असणारी नूर एक एक पायरी वर चढत चालली होती. फ़्रेंच भाषेवरचं प्रभुत्व तिच्या कामी येत होतं. फेब्रुवारी महिन्यापर्यंत एअर फ़्रान्समध्ये स्पेशल ऑपरेशन्स कार्यकारी म्हणून तिला बढती देण्यात आली. 

यावेळेपर्यंत तिला हेर बनविण्याचा विचार चालू झाला नव्हता किंवा तिच्या स्वत:च्या मनातही हा विचार कधी आला नव्हता. मात्र लवकरच तिला फ़्रान्समध्ये ब्रिटिशांची हेर म्हणून काम करण्याचे आदेश तिला देण्यात आले. १६ जून १९४३ हा तो दिवस, या दिवशी नूरला रेडिओ ऑपरेटर बनवून फ़्रान्सला रवाना करण्यात आलं. मेडेलिन या नावानं ती फ़्रान्समध्ये काम करू लागली. अत्यंत सफ़ाईनं काम करण्याबद्दल तिची अल्पावधीतच ख्याती झाली.

या कामगिरीत कोणत्याही क्षणी पकडलं जाण्याची आणि बंधक बनून ना*झींच्या नरक यातनांना सामोरं जाण्याचा धोका होता. हा धोका नूरनं हसत हसत स्विकारला होता. जर्मन सिक्रेट पोलिस गेस्टापो या इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सना पटकन पकडू शकत होते आणि त्यांचा स्त्रोतही काढणं त्यांना कठीण नव्हतं. नूर फ़्रान्सला रवाना झाल्यानंतर म्हणूनच एजन्सितल्या अनेकांना असं वाटत होतं की फ़ार फ़ार तर काही आठवडे नूर जिवंत राहू शकेल. नूरचे अनेक सहकारीही अगदी थोड्या दिवसात पकडले गेले मात्र नूर वाचली आणि तिनं तिचं काम चालू ठेवलं.

नूर विंस्टन चर्चिल यांच्या खास मर्जीतली आणि विश्वासू लोकांपैकी एक होती. तीन महिने नर्सच्या रूपात फ़्रान्समध्ये वास्तव्य करून तिनं अत्यंत गोपनिय अशी माहिती दोस्त राष्ट्रांना दिली.

तिच्या कामामुळे ती ना*झींच्या डोळ्यातला काटा बनली. तिचं वर्णन त्यांना समजलं असलं तरीही ती हाताशी लागत नव्हती. सतत हातातून सटकण्यात नूर यशस्वी होत असल्यानं नाझी आणखीनच चिथावले गेले. तिचे धागे दोरे शोधण्याचे कसून प्रयत्न चालू झाले. चारही बाजूंनी फ़ास आवळला जात होता. आता पलायन करण्याची आणि भूमिगत होण्याची वेळ आलेली होती.

पियर वायनॉट या तिच्या सहकार्‍यानं नोंदवून ठेवल्यानुसार नूरला पूर्ण नवा अवतार देण्य़ासाठी ते सलोनमध्ये गेले. याठिकाणी तिचा वार्डरोब बदलण्यात आला. मात्र नुरनं इथे अनावधानानं केलेल्या एक कृतीनं ना*झींना तिला शोधण्यात यश आले.

ना*झींनी तिच्याविषयीची माहिती खणून काढली होती आणि त्यांना असं समजलं होतं की नूरचा अत्यंत लाडका रंग आहे नीळा. ती बहुतेक करून नीळ्या रंगाचे कपडे घालते. नवे कपडे निवडतानाही नूरनं आपला आवडता नीळा रंग निवडला आणि ना*झींना तिच्यावर पाळत ठेवणं सोपं गेलं.

तिच्या दुर्दैवानं तिच्याच सहकार्‍यांपैकी कोणीतरी फितूर बनलं आणि नुरचा ठावठिकाणा ना*झींना दिला. तिला पॅरीसमध्ये अटक करण्यात आली मात्र अटक होतानाही तिनं कडवा संघर्ष केला. सहा हट्ट्या कट्ट्या पोलिस अधिकार्‍यांना तिनं झुंज दिली. एका नाजूकशा मुलीला काबूत आणायला सहा पोलिस अधिकारी लागतात यातच तिचं सामर्थ्य दिसतं. कैदी म्हणून एक वर्ष काढल्यानंतर दक्षिण जर्मनीतल्या एका छळछावणीत तिला पाठविण्यात आलं. अखेर इतर तीन महिला हेरांसोबत नूरलाही गोळ्या घालून मारण्यात आलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या गुप्तचर संघटना हाताबाहेर गेल्यामुळे सरकारांनीच त्यांच्यावर बंदी आणावी लागली होती

Next Post

अमेरिकेच्या CIA ने भारतीय हिमालय रांगात हरवलेलं न्यू*क्लिअर डिव्हाईस अजून सापडलं नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अमेरिकेच्या CIA ने भारतीय हिमालय रांगात हरवलेलं न्यू*क्लिअर डिव्हाईस अजून सापडलं नाही

तीरा आणि वेदिकाला दिलेल्या या इंजेक्शनची किंमत १६ कोटी एवढी का आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.