The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिद्दीची गोष्ट – एका मजुराची मुलगी आता हावर्ड विद्यापीठात शिकणार आहे

by द पोस्टमन टीम
29 April 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही लोकांच्या पाचवीलाच अठरा विश्व दारिद्र्य पुजलेले असते. पण, मनात जिद्द घेऊन जगणारे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणे सोडत नाहीत. चिकाटीने स्वप्नाचा पाठलाग करणारे पुढे जाऊन नक्कीच यशस्वी होतात. झारखंडच्या दाहू या छोट्याशा गावातील तरुणी सीमा कुमारीचा प्रवासही काहीसा असाच आहे. स्वतःच्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या बळावर आज तिने हॉवर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवलेली आहे. झारखंडमधील दाहू या एका छोट्याशा खेड्यातून आलेली सीमा कुमारीची ही कथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

सीमाचे आई-वडील निरक्षर आहेत. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ते मोलमजुरी करतात. तिचे वडील एका सुत कारखान्यात कामगार आहेत. अशा परिस्थितीतही सीमाने शिक्षणाची कास सोडली नाही. जिथे संधी मिळेल त्याच्या तिने फायदा घेतला.

२०१२ मधे तिने युवा इंडिया नावाच्या एका संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत प्रवेश घेतला. शाळेचा खर्च भागवण्यासाठी ती त्याच संस्थेत फुटबॉल कोच म्हणून काम करू लागली.

फुटबॉल खेळताना तिला आणि फुटबॉल शिकणाऱ्या मुलींनाही शॉर्ट्स घालावे लागत. यावरून तिची आणि तिच्या विद्यार्थिनींची खूप चेष्टा केली गेली. पण, तिच्यावर हसणाऱ्या लोकांकडे तिने कधीच लक्ष दिले नाही. तिच्यात स्वतःच्या हिमतीवर शिकण्याची जिद्द आहे. तिच्या कुटुंबात विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणारी ती एकमेव व्यक्ती आहे. युवा स्कूल या संस्थेकडूनही तिला तिच्या शिक्षणासाठी भरपूर मदत झाली.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबात आजही मुलींची लहान वयातच लग्न लावून देण्याची पद्धत रूढ आहे. मुलींचा मासिक धर्म सुरू झाला की त्यांचे लग्न लावून दिले जाते. सीमाने मात्र या प्रथेला छेद दिला आणि आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले. आपली स्वप्नं पूर्ण करायची असतील तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे तिने किती लहान वयातच जाणले. सीमाचे हे धाडस खरोखर वाखाणण्याजोगे आहे.



सीमाने हॉवर्डसह इतरही मोठ्या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. यावेळी ही परीक्षा खुपच कठीण होती. जगातील कानाकोपऱ्यातून कित्येक विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करतात. मात्र, यावर्षी हॉवर्डबे प्रवेशपत्र स्वीकारण्याची क्षमताच कमी करण्यात आली होती.

फक्त ३.४% विद्यार्थ्यांचीच प्रवेश अर्ज मान्य करण्यात आले. अशा तीव्र स्पर्धेच्या काळातही तिने मिळवलेले यश अनन्यसाधारण असेच म्हणावे लागेल.

हॉवर्डमधे जाऊन सीमा कुठल्या विषयावर अभ्यास करणार हे अजून तिने ठरवलेले नाही. पण तिला लिंगभाव समानतेसाठी काही तरी ठोस काम करायचे आहे आणि याबद्दलचा तिचा आराखडाही तयार आहे. तिचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. ती ज्या गावात, ज्या समाजात राहते, तिथली लैंगिक विषमता संपुष्टात आणणे हे तिचे ध्येय आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी लैंगिक समानता आवश्यक असल्याचे तिचे म्हणणे आहे. कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, लिंगभावाविषयीची असमानता यामुळे स्त्रियांना खूप काही सोसावे लागते हे तिने पहिले आहे. आजूबाजूला स्त्रिया या परिस्थितीत जगत आहेत ते चित्र तिला बदलायचे आहे.

तिच्या आजूबाजूच्या स्त्रियांचे सामाजिक स्थान सुधारण्यासाठी तिला एक संस्था चालवायची आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे यासाठी त्यांना सक्षम बनवण्याचा या संस्थेचा उद्देश असेल. या महिलांना एखादा छोटा उद्योग व्यवसाय उभा करण्यासही ही संस्था मदत करेल. सीमाची स्वप्ने खूप मोठी आहेत आणि तितकीच मोठी तिची जिद्द आहे.

महिलांना त्यांच्या मुलभूत अधिकारांची जाणीव झालेली नाही. त्यांना ही जाणीव करून देण्यासाठीही तिला काम करायचे आहे. महिलांचे एक व्यक्ती म्हणून काय अधिकार आहेत, हे त्यांना समजले पाहिजे, असे तिचे मत आहे.

हॉवर्डव्यतिरिक्त सीमाला अशोका युनिव्हर्सिटी, मिडिलबरी कॉलेज आणि ट्रिनिटी कॉलेजनेही प्रवेश मंजूर केला आहे. एकाच वेळी चार परदेशी शिक्षण संस्थांनी सीमाला आपल्या संस्थेचे दरवाजे शिक्षणासाठी खुले केले आहेत.

सीमाच्या या यशाबद्दल युवा इंडिया या संस्थेने ट्विटर पोस्ट केल्यानंतर नेटवर ही बातमी चांगलीच व्हायरल झाली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सीमाच्या या यशाचे कौतुक करत तिचे अभिनंदन केले आहे. प्रियांका आपल्या ट्विटमध्ये म्हणते, मुलींना शिकवा. कारण ती जग बदलू शकते.

प्रियांकाने सीमाचा पुढचा प्रवास पाहण्याची उस्तुकतादेखील व्यक्त केली आहे. प्रियांकाने युवा इंडीयाचे ट्विट रीट्विट केल्यानंतर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानेही सीमाचे अभिनंदन केले आहे. अनेक मोठमोठ्या लोकांनी सीमाच्या या कर्तृत्वाची दाखल घेतली.

युवा इंडियाच्या कामामुळे सीमासारख्या गुणवंत विद्यार्थिनीला तिचा मार्ग शोधणे शक्य झाले. युवा इंडियाला देखील आपल्या या विद्यार्थिनीचा आणि कोचचा सार्थ अभिमान वाटत आहे.

सीमा कुमारीने तिच्या प्राप्त परिस्थितीला तोंड देत मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेषत: ग्रामीण मुलींनी सीमाच्या या लढाऊ आणि जिद्दी वृत्तीचा धडा गिरवायला हवा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पाकिस्तानचा बाजार उठवण्यात ‘जिया उल हक’चा सिंहाचा वाटा आहे

Next Post

बंपर कमाई करून देणारा पेट्रोल पंप कसा सुरु करायचा? काय आहे प्रोसेस?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

बंपर कमाई करून देणारा पेट्रोल पंप कसा सुरु करायचा? काय आहे प्रोसेस?

माणूस जगण्यासाठी काय काय करू शकतो याचं हा माणूस उदाहरण आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.