The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सायनाच्या आयुष्यावर आधारित अमेझॉनचा ‘सायना’ चित्रपट कसा आहे.?

by सोमेश सहाने
3 May 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर “सायना” हा सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रदर्शित झाला. या आधी सिंघम 2 मध्ये खलनायकाची भूमिका साकारलेल्या आणि ‘तारे जमीन पर’ हा सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक अमोल गुप्तानेच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

सायना नेहवालच्या आयुष्यावरचा हा बायोपिक ट्रेलरमध्ये वाटतो तसाच जुन्या बाटलीत नवीन दारू भरल्यासारखा आहे, जसं ‘भाग मिल्खा भाग’च्या सुरुवातीलाच दाखवला गेलेला सिन, वर्ल्डकप फायनलला महेंद्रसिंग धोनी जर्सी घालून खेळायला जातानाचा तो सुशांतने साकारलेला सुंदर सिन, दंगलमध्ये आमीर खान तरुण महावीरसिंग फोगाट साकारतानाचा बॉक्सिंग रिंगणातला सिन, तसंच इथेही ३५७ किमी प्रति तासाच्या गतीने मारलेला सायना नेहवालचा स्मॅश. अशाप्रकारे पहिल्या सीनपासून शेवटपर्यंत एकच एक साचा चोरून वापरलाय.

त्या सिननंतर अर्थातच बालपण आलं, मग आईवडिलांचा आधार, ते सकाळी उठून प्रॅक्टिसला जाणं, पालकांची उत्सुकता, खर्चाची जमवाजमव, एक चांगला कोच, सतत मिळणारी बक्षिसं, मग थोडं भरकटणं आणि नंतर पुन्हा मुख्य रस्त्याला लागून, जगात एक नंबर बनणं. 

बस्स! या साच्यात फक्त खेळ, खेळाडूंचे नावं आणि कलाकार बदलले की बायोपिक तयार! मेरी कॉम, गुंजन सक्सेना, सुपर 30, शकुंतलादेवी, सगळ्या बायोपिकमध्ये एकसारखा असणारा हा साचा बघून आता प्रेक्षकही कंटाळलेत.

सुरू आहे ती मॅच आता हा खेळाडू हारणार की अगदी शेवटच्या क्षणी जाऊन जिंकणार हे बघणाऱ्यांना माहीत असतं. अगदी शेवटच्या क्षणी तो सामना हरत असताना बरोब्बर लहानपणीचा फ्लॅशबॅक, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुरू होतो आणि दहा गोळ्या खाऊन दाक्षिणात्य हिरो उठतो तसा तो खेळाडू उठून मॅच जिंकतो.



मग शेवटी देशभक्ती, गुरुभक्ती किंवा आई-वडिलांच्या गळ्यात पडलं की दि एन्ड !

“सायना” हा सिनेमा यातला एकही रकाना रिकामा सोडत नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

बॉलिवूड सिनेमात किंवा सोसायटीच्या पार्किंगमध्ये किंवा पिकनिकला रिसॉर्टवर खेळला जाणारा खेळ म्हणूनच बॅडमिंटन आपल्याला माहीत आहे. पण अचानक एक दिवशी सायना नेहवाल नावाचं कोणीतरी ऑलम्पिक मेडल जिंकतं, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावतं, तेव्हा आपण स्टेटस ठेवायला तिचा फोटो शोधतो. पण तरी त्या फोटो ठेवण्याच्या काळापुरती का होईना पण संपूर्ण देशात जी अभिमानाची लाट आलेली असते, किमान ती लाट तरी सिनेमात बघता यावी अशी भोळी आशा प्रेक्षकांना वाटत असते.

यापुढे जाऊन एक चांगली संघर्ष कथा सांगणं आणि झालाच तर त्या खेळाडूच्या प्रसिद्धी मार्फत त्या खेळाला फायदा करून देणं असं साधारण उद्देश नेहमी बायोपिक बनवताना सांगितलं जातं. त्यातून प्रेरणा मिळावी आणि असं काहीतरी हुबेहूब एक पात्र साकारण्याचं चॅलेंज म्हणूनही अभिनेते अशा प्रोजेक्टसला झुकत माप देताना दिसतायत.

हा फॅमिलीसाठीचा प्रेरणादायी चित्रपट, ज्या माणसावर बनवतोय त्याच्या प्रसिद्धीमुळे चालतोच, अशा अंदाजाने प्रोड्युसरही यावर पैसे लावतात, या सगळ्यांसह बनलेला असा हा बायोपिक सगळं असतो पण फक्त एक चांगला सिनेमा नसतो.

भाग मिल्खा भाग प्रदर्शित झाला तेव्हा हा साचा नव्हता. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यात तशी एक हृदयद्रावक कथाही होती. त्या सगळ्यातून खेळ आणि वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष हे सगळं रंगवायला फरहानचा कसदार अभिनय होता. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी कलर ग्रेडिंगवर केलेलं काम, त्या कथेतला भावनिक प्रभाव जपण्यासाठी ठेवलेला स्कोप, सगळंच नवीन आणि कौशल्यपूर्ण होतं. पण त्यानंतर आलेल्या बायोपिक्सने तो साचा तर चोरलाच पण त्यातलं कौशल्य चोरू शकले नाही.

आमिर खानने दंगलमध्ये साचा तोच ठेवला पण त्यात स्वतःचं ॲडीशन म्हणून दंगल बघताना आपण साचा विसरून त्यातली खरीखुरी कुस्ती बघण्यात, त्या तयारीत दंग होतो. तिथपर्यंतचा गीता फोगटचा प्रवास ज्या बारकाव्यातून उभा केलाय, त्यामुळे आपण तिच्याशी रिलेट करू शकतो. यातून आलेला तो भावनिक हाय पॉईंट प्रेक्षकांना आवडला.

धोनीच्या बायोपिकमध्ये असणारी मूळ कथा इंटरेस्टिंग असली तरी धोनीच्या क्रिकेटच्या आयुष्यातले बारकावे न टिपल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतो. पण किमान त्यात सुशांतचा अभिनय आणि क्रिकेट खेळण्याच्या तयारीतले बारकावे तरी होते.

सायना या सिनेमात चोरलेल्या साचात भरायला यातलं काहीच नव्हतं. सायना जिंकते तेव्हा तिने मारलेले शॉट दाखवले गेलेत तसे तिचे चुकीचे शॉट फारसे दिसतच नाहीत. म्हणजे कॉमेंट्री किंवा व्हॉइस ओव्हरमुळे समजतं की ती जिंकते की हारते. पण सलग काही वेळ ओरिजिनल बॅडमिंटनचा सामना सुरु आहे त्यात प्रेक्षकांना भावनिक करतील असे चांगले सीन्सच नाहीत. उलट मूळ गती लपवायला घेतलेले क्लोज कट, मध्येच स्लो मोशन यांचा एवढा भरीमाड आहे की बॅडमिंटन न दिसता फक्त सायनाच दिसत असते.

ही भूमिका साकारलेल्या परिणीती चोप्राने सायनाच्या भाषेतील हरियानवी लहेजा मूडनुसार धरला आणि सोडलाय असं वाटतं. सायनाचा मूळ लहेजा तो असला तरी आपण जे कपिल शर्माच्या शोमध्ये किंवा मुलाखतीत तिला बघितलंय त्याच्याशी तरी मिळतीजुळती देहबोली असावी असं जाणवत राहतं.

उत्कंठा शिगेला पोहोचवेल अशी रंजक मॅच, हळवं करतील असे पारिवारिक भावनिक सीन्स, असं सगळं अपेक्षित असणारं यात आपल्याला मिळतं. म्हणून या कथेबद्दल जिज्ञासा असेल तर हा सिनेमा तुम्हाला निराश करत नाही.

यात मानव कौल सायनाच्या कोचची भूमिका साकारताना दिसतात. त्यांनी अर्थातच स्वतःच्या प्रतिष्ठेप्रमाणे असामान्य अभिनय केलाय. मीडियाच्या झगमगाटीपासून दूर या खेळावर निष्ठा असलेला एक आदर्श गुरू नेहमी लक्षात राहील असा त्यांनी साकारलाय. सायनाच्या आईचं आणि वडिलांचं पात्र देखील शोभून दिसतं. कथेचा फोकस कधी सायनाची आई, आईची जिद्द, कधी कोचिंग, गुरू, तर कधी स्वतः सायना आणि कधीतरी तिची इमेज यात फिरत असतो. त्यामुळे नेमकं हे सगळं कुठं जातंय हे आपल्याला कळत नाही.

हे सगळे तांत्रिक मुद्दे सोडता काही तात्विक मतभेद असू शकतील अशा गोष्टीही यात दाखवल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ सायनाच्या मोठ्या बहिणीच्या पात्राचा यात एकही सिन नाही, ती फक्त आईला घरकामात मदत करताना दाखवली आहे. दोन मुलींसाठी हा वेगवेगळा न्याय इथं समजून सांगितला गेला नाही.

लहानपणी अगदी दहा वर्षांच्या सायनाने जेव्हा दुसरा नंबर मिळवला तेव्हा तिची आई तिला पहिला नंबर का आणू शकली नाही म्हणून सगळ्यांसमोर मारते. आपल्या पाल्याने नेहमी जिंकावच, आणि पहिलाच नंबर आणावा, नाहीतर मार खावा, हा अमानुष छळ आहे; किंवा महान व्हायला अशा जखमा सोसाव्याच लागतात, म्हणूनच तर सायना एवढी मोठी होऊ शकली, असंही तुम्ही म्हणाल.

समजा सायनाला मोठं झाल्यावर गायन करावं वाटलं तर? लहानपणापासून आपल्या स्वप्नांचं ओझं पाल्यावर देऊन त्यांचे इतर रस्ते बंद करणं, हे सिनेमात दाखवावं का? किंवा कसं दाखवावं याबद्दल तात्विक वाद हा सिनेमा बघताना निर्माण होऊ शकतो.

गुंजन सक्सेना सिनेमात, तरुण गुंजनला पायलट व्हायचं असतं. पण ते शक्य नाही झालं म्हणून ती हवाई दलात नोकरीला लागते. तेव्हा तिला फक्त विमान चालवायचंय, पण देशभक्ती वगैरे नाही, मग तिने ही नोकरी करावी का? असा प्रश्न तिला पडतो, आणि त्यांचं खूप सुंदर उत्तर तिचे वडील देतात. बायोपिक बनवताना कशा संवेदनशीलपणे हे तात्विक विषय हाताळावे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ग्रेट वाॅल ऑफ चायनानंतर भारतातल्या या किल्ल्याचा नंबर लागतो

Next Post

या माणसाने टाइम ट्रॅव्हल केल्याचा फक्त दावाच नाही तर पुरावेसुद्धा दिलेत

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या माणसाने टाइम ट्रॅव्हल केल्याचा फक्त दावाच नाही तर पुरावेसुद्धा दिलेत

या आदिवासी यो*द्ध्यामुळे फर्डिनांड मॅगेलनचं विश्वभ्रमंतीचं स्वप्न अपूर्ण राहिलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.