The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारविरोधात या बौध्द भिक्खूने तोंडातून चकार शब्दही न काढता आत्मदहन केलं होतं

by द पोस्टमन टीम
4 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शांततेसाठी ओळखले जाणारे बौध्द भिक्खू जेव्हा आपल्या हक्कांसाठी लढण्याचं ठरवतात तेव्हा काय होतं? काही दशकांपूर्वी आपल्या मागण्यांसाठी व्हिएतनाममध्ये बौध्द धर्मियांनी आंदोलन छेडलं. या आंदोलनाचा भाग म्हणून बौध्द संताने भर रस्त्यात आत्मदहन केलं.

आज तुम्हाला अशा एका बौध्द संताविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याने स्वत:ला अत्यंत शांतपणे जाळून घेतलं आणि शरीराचा कण न कण जळत असतानाही तोंडून चकार शब्दही काढला नाही. कोण होता हा संत? आणि अशा काय मागण्या होत्या ज्यासाठी एका संताला आत्मदहन करावं लागलं?

ही घटना आहे, १९६३ सालची, व्हिएतनाम देशातली. त्या काळात व्हिएतनाममधील ७० टक्के जनता बौध्द धर्मीय होती. असं असलं तरीही व्हिएतनामी सरकार मात्र बौध्द धर्मीयांचा छळ करत होती. कॅथलिक चर्च आणि ख्रिस्ती जनतेला झुकतं माप देत असतानाच बौध्द धर्मियांवर राजरोस अ*त्याचार होत होते.

हा अ*त्याचार अशा पातळीवर जाऊन पोहोचला की, बौध्द धर्माच्या अनुयायांनी त्यांचा झेंडा फडकावणंही बेकायदेशीर ठरवलं गेलं.

हा आदेश काढल्यानंतर काहीच दिवसांवर गौतम बुद्धांची जयंती होती. अर्थातच या निर्णयाचा बौध्द धर्मियांनी विरोध केला. आपला विरोध दर्शविण्यासाठी म्हणून तमाम बौध्द धर्मीय हातात झेंडे घेऊन Government Broadcasting Station वर चालून गेले. पोलिसांनी या जमावाला थोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव इतका संतापला होता की पोलिसांना परिस्थितीवर काबू मिळवता आला नाही. शेवटी पोलिसांनी या जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात नऊ लोक मृत्युमुखी पडले.



परिस्थिती गंभीर वळण घेत होती. बौध्द धर्मीय काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ११ जूनचा दिवस उजाडला. बौध्द पागोड्यातून जवळ जवळ साडे तीनशे बौध्द भिक्खू आणि संतांचा जथ्था निषेधार्थ रस्त्यावर उतरला. कम्बोडियन दूतावासाजवळ हा जथ्था पोहोचला असता त्यांच्याजवळ एक निळ्या रंगाची गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून थिच क्वांग डक दोन संतांसोबत खाली उतरले. या पैकी एका संतानं शांतपणे भर रस्त्यातच एक उशी नेऊन ठेवली.

थिच क्वांग डक या उशीवर पद्मासन घालून जप करत बसले. दुसर्‍या संतानं कारच्या डिकीतून पाच लिटरचा पेट्रोलचा कॅन काढला आणि यातलं पेट्रोल संत थिच क्वांग डक यांच्यावर शिंपडले. यानंतर त्यांनी जळती काडी थिच क्वांग डक यांच्यावर टाकली आणि क्षणार्धात कोणालाही काहीही कळण्याआधीच त्यांच्या शरीरानं पेट घेतला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

शरीर जळून खाक झाल्यावर त्यांचं पार्थिव पिवळ्या रंगाच्या वस्त्रात लपेटुन लाकडी पेटीतून जवळच्या पागोड्यात नेण्यात आलं. याठिकाणी त्यांच्यावर दुसर्‍यांदा विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. हा पागोडाही पोलिसांनी घेरला होता.

संपूर्ण पागोड्याभोवती ह*त्यारबंद पोलिसांचा घेराव होता. प्रार्थना करणार्‍या बौध्द भिक्खूंना त्यांनी अटक केली आणि रस्त्यावरून फरफटत नेत तुरुंगात टाकलं.

ही कथा इथेच संपत नाही. खरं आश्चर्य यापुढेच आहे. तब्बल दोनदा पूर्ण जाळूनही संत थिच क्वांग डक यांचं हृदय मात्र जसंच्या तसं राहिलं. ते अजिबात जळलं नाही. हा एक दैवी चमत्कार मानला गेला. या ह्रदयाला Xa Loi पागोड्यात एका काचेच्या पेटीमधे सुरक्षित ठेवण्यात आलं.

इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण असं सांगण्यात आलं की, दक्षिण व्हिएतनाममधे सरकार बौध्द धर्मियांवर जे अ*त्याचार करत होतं त्याची सरकारला जाणीव करून देणं. बौध्द धर्मियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वत:चं बलिदान दिलं. अग्निसमर्पण करण्यापूर्वीचे त्यांचे अखेरचे शब्द होते, “मी स्वत:चं जीवन संपवून बुद्धाला शरण जाण्यापूर्वी राष्ट्रपती Ngo Dinh Diem यांना कळकळीनं आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की, त्यांच्या देशातील सर्व धर्मिय जनतेप्रती त्यांनी समान व्यवहार ठेवावा. सर्व जनता ही आपलीच समजून तिच्याप्रती दयाभाव दाखवावा”’.

अर्थातच, या घटनेनं जगभरात खळबळ माजवली आणि व्हिएतनामी सरकारचा जगभरातून निषेध करण्यात आला. सरकारची इतकी कोंडी झाली की अखेरीस बौध्द धर्मियांना न्याय मिळाला.

मात्र हा सगळा घटनाक्रम घडत असतानाच आणखीन एक गोष्ट घडत होती. आपले अ*त्याचार बघणारं आणि त्याचा जाब विचारणारं कोणी नाही या माजात असणारं व्हिएतनामी सरकार नेहमीप्रमाणे बौध्द धर्मिय निषेधाला मोडून काढण्याच्या प्रयत्न करत होतं. पण, एव्हाना जगाच्या नजरा या प्रकारावर खिळल्या होत्या. १० जूनलाही दुसर्‍या दिवशी काहीतरी मोठी खबळजनक घटना घडणार असल्याची कुणकुण काही पत्रकारांना लागली होती.

जगभरातून बौध्द धर्मियांना सहानुभूती मिळत होतीच. या आंदोलनालाही जागतिक मीडियावर नेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि या कामात वृत्तपत्रं अग्रणी होती.

इकडे व्हिएतनामी सरकारनं या आंदोलनात सहभागी असणार्‍यांची धरपकड चालू केली आणि तिकडे द न्युयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राचा पत्रकार माल्कम ब्राऊन, घडलेल्या घटनेला कॅमेर्‍यात बंदीस्त करून त्या फिल्म अमेरिकेकडे सुपूर्द करण्याच्या मोहिमेवर होता. (व्हिएतनाम यु*द्धाच्या वार्तांकनाबद्दल नंतर त्याला पुलित्झर पुरस्कारही मिळाला.) दुसर्‍याच दिवशी सकाळी हे हृदयद्रावक फ़ोटो वृत्तपत्राच्या पहिल्या पानांवर झळकले आणि जगाला व्हिएतनाम सरकारचं क्रौर्य समजलं.

अमेरिकन जनता या छायाचित्रामुळे अस्वस्थ झाली. त्यानं कॅमेर्‍यात बंदीस्त केलेलं हे छायाचित्र व्हिएतनाम यु*द्धाच्या इतिहासात आयकॉनिक मानलं जातं. कालांतरानं ब्राऊन यानं सांगितलं की छायाचित्रात दिसलं ते त्या घटनेचं केवळ प्रतिबिंब होतं. प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहून तो प्रसंग पहाणं, अनुभवणं फ़ार भयानक होतं. तिथला तो पेट्रोलचा आणि शरीराचा जळणारा वास आजही हा फ़ोटो बघताना मला अस्वस्थ करतो. याचबरोबर बौध्द भिक्खूंचा आक्रोशही कानात वाजू लागतो.

घडलं ते अत्यंत दुर्दैवी असलं तरीही किमान व्हिएतनाम सरकार जगासमोर उघडं पडलं आणि बौध्दांना न्याय मिळाला हेही कमी नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फक्त इस्रोच नाही तर दूरदर्शनच्या उभारणीत देखील डॉ साराभाईंचं योगदान आहे

Next Post

चुकून क्रिस्टल मेथच्या ३० गोळ्या खाल्ल्या आणि हा सैनिक न थांबता ४०० किलोमीटर धावला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

चुकून क्रिस्टल मेथच्या ३० गोळ्या खाल्ल्या आणि हा सैनिक न थांबता ४०० किलोमीटर धावला

जिद्दीला पेटल्यावर माणूस काय करू शकतो..? या माणसाने डोंगर फोडला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.