The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अलार्म क्लॉक परवडायचे नाही म्हणून झोपेतून उठवायला माणूस ठेवायचे

by द पोस्टमन टीम
26 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


किती लोकांना पहाटे लवकर जग येते? आणि त्यातही किती लोकांना अलार्म न लावता जाग येते? अशा लोकांची गणना करण्याचे ठरवल्यास अलार्म न लावता सकाळी लवकर उठणाऱ्यांची संख्या फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असेल. काहीजण तर अलार्म लावून झोपतात पण अलार्म वाजला की तो बंद करून पुन्हा झोपी जातात. लवकर न उठण्याच्या सवय असेल तर दररोज किती गोंधळ आणि गडबड होते हे तुम्हाला माहितीच आहे.

आजच्या काळात लवकर उठण्यासाठी अलार्मची सोय आहे, पण पूर्वीच्या काळी लोक लवकर उठण्याची सवय लावून घेण्यासाठी कशाचा वापर करत असतील? तर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभा राहतो तो कोंबडा. कोंबडा आरवला की उठणारे अनेकजण तुम्हीही पाहिले असतील. आजही ग्रामीण भागात ज्यांच्या घरी कोंबड्या पाळल्या जातात त्यांच्या दिवसाची सुरूवात कोंबड्याच्या आरवण्यानेच होते.

काही लोकांना मात्र आई ओरडल्याशिवाय जाग येतच नाही. शिक्षणासाठी, नोकरी निमित्त घराबाहेर पडल्यावर रोज सकाळी सकाळी हलवून जागं करणाऱ्या आईचे महत्त्व कळते. खरे तर लवकर उठण्यासाठी यापेक्षा दुसरा उत्तम पर्याय नाही.

माणसाला सकाळी लवकर जाग येण्यासाठी असे “मानवी अलार्म”च जास्त फायद्याचे ठरतात. कारण, घड्याळ किंवा मोबाईलला लावलेला गजरपेक्षा कुणीतरी हलवून जागं केलं तरच लवकर उठून आपण कामाला लागतो. बरोबर ना?

गजराच्या घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी ब्रिटीश आणि आयरिश कामगार सकाळी लवकर जाग यावी यासाठी अशाच व्हिसल ब्लोअरचा उपयोग करत असत. व्हिसल ब्लोअरला आपल्याकडे जागल्या म्हटले जाई. दररोज सकाळी जर कुणा व्यक्तीने तुम्ही उठेपर्यंत तुमच्या दारावर टकटक केली तर काय होईल? किमान कोण दार ठोठावतंय इतक्या सकाळी सकाळी हे पाहायला तरी उठालच ना? अगदी तसेच, लंडन, मॅसाच्युसेट सारख्या औद्योगिक शहरात लवकर उठण्यासाठी लोकांनी (मानवी अलार्म) व्हिसल ब्लोअर ठेवले होते.



तिथे असे मानवी अलार्मची सोय होती जे त्या त्या व्यक्तीच्या घरासमोर उभे राहून मोठमोठ्याने काठीचा किंवा शिट्टीचा आवाज करत किंवा त्याच्या खिडकीवर नेम धरून सुकलेल्या वाटण्याचा मारा करत. म्हणून यांना पी-शुटर देखील म्हटले जात असे.

जोपर्यंत ती व्यक्ती दरवाजा किंवा खिडकी उघडत नाही तोपर्यंत जागे करणाऱ्या व्यक्तीचे शिट्टी वाजवणे किंवा काठी आपटणे थांबत नसे.

आत्ता या जगल्यांना कसे कळत असे की कुठल्या व्यक्तीला किती वाजता उठवायचे आहे? तर ज्यांना कुणाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे असेल ते लोक आदल्या रात्री आपल्या दारावर पाटी लावत आणि त्यावर वेळ लिहित. मोठमोठ्या औद्योगिक शहरात असे व्हिसल ब्लोअरचे काम करणारे अनेक लोक होते. याच्या मोबदल्यात त्यांना चांगले पैसेही मिळत असत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मोठमोठ्या शहरात तर अनेक जणांचा हाच व्यवसाय होता. कधीकधी सकाळच्या वेळेत गस्त घालणारे पोलीसही त्यांना मदत करत असत.

आपल्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर रहावे म्हणून एखादी कंपनी स्वतःहून आपल्या कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर जागं करण्यासाठी असे जागले नेमत असे. त्यामुळे कामगारही वेळेत कामावर पोहोचत असत. लंडन सारख्या औद्योगिक शहरात तर १९५० पर्यंत हा व्यवसाय सुरु होता.

१९३० च्या दरम्यान लंडनमध्ये अशीच एक पी-शुटर होती, ॲने स्मिथ. लंडनवासीयांची ही लाडकी ॲने त्यांना लवकर जाग येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असे. यासाठी ती रोज पाहटे तीन वाजता उठून इतरांना उठवण्याच्या मागे लागलेली असे. अगदी एका सामान्य खाण कामगारापासून ते शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांना जागे करण्याचे काम ॲने करत असे.

जॉन टॉपहॅम यांनी वाटाणा फेकून मारणाऱ्या ॲनेचा फोटो वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होता आणि तिच्या कामाबद्दलही लिहिले होते. ॲने आपल्या या कामाचा मोबदला म्हणून आठवड्याला सहा पेन्स इतके मानधन घेत असे.

ॲनेला तर लहान मुलांच्या गोष्टीतही स्थान मिळाले होते. ती नेहमीच सकाळीसकाळी शेजाऱ्यांनाही लवकर उठून ग्रीटींग्ज देत आपले काम करत असे. ॲनेनंतर तिची मुलगी मेरीनेही हाच व्यवसाय स्वीकारला.

इतरांनी कामावर लवकर जावे म्हणून त्यांना लवकर जागे करणाऱ्या या व्हिसल ब्लोअरवर कधी कधी खत्रूड माणसं खेकसतही असे. असे लोक उठत आणि झोपमोड झाल्याबद्दल त्रागा करत. याउलट नम्र आणि हसतमुख स्वभावाच्या व्यक्ती हसून प्रतिसाद देत आणि लवकर जागे केल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करीत. अशा लोकांमुळे व्हिसल ब्लोअर्सना आणखीन प्रोत्साहन मिळे. चिडचिड करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत ते आपले काम सुरू ठेवत.

भारतात जेव्हा बलुतेदारी पद्धत होती. त्यातही असे जागल्या रात्रभर गावातून गस्त घालत फिरत. एखाद्यावेळी गावावर कोणते संकट आले तर हेच जागल्या सगळ्या गावाला जागे करत असत. अशा जागल्यांमुळेच सारा गाव निर्धास्त झोपत असे. याशिवाय त्यांच्याकडे गावाच्या राखणीचेही काम असे. यासाठी त्यांना वर्षातून एकदाच धान्याच्या स्वरुपात मोबदला दिला जात असे.

आज अलार्म क्लॉक आहेत, मोबाईलमधले अलार्मिंग ॲप आहेत जे सकाळी सकाळी मधुर संगीतासह आपल्याला जागे करतात. पण, मानवी अलार्ममुळे जितक्या लवकर जाग येते तसा मात्र अलार्मचा परिणाम होत नाही हे नक्की. आजच्या काळातही जर कुणी आपल्याला असे दरवाजावर टकटक करून उठवले तर ते जास्त परिणामकारक ठरेल असे वाटत नाही का? आणि एखाद्या गरजू व्यक्तीसाठी रोजगाराचे एक नवे साधनही उपलब्ध होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

द डिसायपल – एका मराठी दिग्दर्शकाच्या या चित्रपटाचं जगभर कौतुक का होतंय..?

Next Post

फंदफितुरी झाली नसती तर ‘राणा सांगा’ने बाबराला हुसकावून लावलंच असतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

फंदफितुरी झाली नसती तर 'राणा सांगा'ने बाबराला हुसकावून लावलंच असतं

या माणसाला जंगली लांडग्यांनीच पालनपोषण करून लहानाचं मोठं केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.