The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माणूस जगण्यासाठी काय काय करू शकतो याचं हा माणूस उदाहरण आहे

by द पोस्टमन टीम
30 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


साहसकथा वाचायला कितीही रम्य असल्या तरिही त्या जेव्हा वास्तवात एखाद्या आयुष्याचा भाग बनतात तो थरार मनाचा थरकाप उडवणारा असतो. एरन रॉल्स्ट्न या गिर्या रोहकाच्या आयुष्यातही असे थराराचे आले १२७ तास ज्यानं त्याचं आयुष्य बदलून गेलं.

इतर चार सामान्य तरूणांसारखाच एरन रॉल्स्ट्न हा तरूण. मौज मजेत आयुष्य चाललेलं होतं. व्यवसायानं इंजिनियर असणार्‍या एरनला गिर्यारोहणाची आवड होती. तो एक पारंगत गिर्यारोहक होता. तो कधी एखाद्या ग्रुपसोबत तर कधी एकटाच ट्रेकिंगला जात असे. २६ एप्रिल २००३ चा दिवस मात्र वेगळा उगवला होता. नेहमीप्रमाणेच एरननं एक मोहिम आखली आणि सगळा जामानिमा करून तो निघाला. अमेरिकेतील उटाह राज्यातील ग्रॅण्ड केनियन पर्वतरांगेत तो एकटाच मोहिमेसाठी निघाला.

मोहिमेला एकट्यानं जाणं त्याला नवीन नव्हतं. याही वेळेस तो निघाला मात्र त्याच्या या मोहिमेचा पत्ता त्याच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना, कोणालाच नव्हता.

सगळं काही नेहमीसारखंच होतं. सोबत एरनचा डिजिटल कॅमेराही होता. यावेळी त्यानं मोबाईल जवळ बाळगला नव्हता. कारण एकतर प्रवासात तो सांभाळणं कटकट व्हायची आणि त्याच्या चार्जिंगचा प्रश्नही असायचाच. फ़क्त फ़ोटो काढायला म्हणून डिजिटल कॅमेरा सोबत बाळगला होता.

नेहमीसारखीच चढाई करत असतानाच वरून एक मोठी दरड कोसळली आणि ती नेमकी एरनवर येत होती. यावेळेस त्यानं आधाराला जो कडा पकडला होता तिथे एक अत्यंत चिंचोळा भाग होता. वरून गडगडत आलेली दरड या चिंचोळ्या भागात अडकली. सुदैवानं एरनच्या डोक्यावर ती पडण्यापासून वाचली मात्र त्याचा हात दरड आणि कपार यांत अडकला. तो इतका गच्च अडकला की एरनला परतही जाता येईना की पुढेही जाता येईना.



मदत मागायची तर नेमका मोबाईलही जवळ नाही. दूरदूरपर्यंत पसरलेले निर्जन सुळके आणि माणसांची वर्दळही नसणारा भाग. मदत मागायची तरी कोणाला? आणि कशी? हात अडकल्यानं होणार्‍या वेदना वेगळ्याच. धड वर नाही धड खाली नाही, मैलोंगणती आपला आवाज ऐकू जाईल अशी परिस्थिती नाही. एखादा असता तर टेन्शननं अर्धमेला झाला असता. मात्र एरननं त्याही परिस्थितीत गडबडून जाता धीर गोळा केला. शेवटच्या श्वासापर्यंत सुटकेचा प्रयत्न करायचाच ठरवलं. सुटण्यासाठी जे जे शक्य ते ते सगळं करण्याचा त्याचा निश्चय होता.

एक हात कपारीत, एकच हात काम करत होता आणि अधांतरी लोंबकळलेल्या अवस्थेत डोकं स्थिर ठेवत काही विचार करणंही खूप होतं.

मनोबल वाढवण्यासाठी त्यानं सगळ्यात आधी मी इथून सुटणार आहेच हे स्वत:ला समजावलं. वाटेत भेटलेल्या दोन सुंदर मुलींना पुन्हा भेटायचं ठरवलं. कुटुंब आणि मित्रांसोबतचे छान छान क्षण आठवून मन आनंदी ठेवलं. इथून परतल्यावरही पुन्हा अशा आठवणी गोळा करण्याचं निश्चित केलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हे सगळं असलं तरीही जसजसे तास पुढे सरकत होते तसतशी सुटकेची शक्यता कमी कमी होत होती. आधी त्याला आशा होती की कोणी न कोणी तर त्याला पाहिल, तिकडून त्याच्यासारखाच एखादा गिर्यारोहक जाईल आणि त्याला मदत मागता येईल. पण सूर्य उगवत होता आणि मावळत होता. घडत काहीच नव्हतं.

मग त्यानं जवळच्या सामानाची तपासणी सुरू केली. दगड फ़ोडणं हा एकच पर्याय समोर होता. त्यानं एक काम चलाऊ करवत तयार केली आणि दगड फ़ुटतोय का बघायला सुरवात केली. अवाढव्य दगड हटण्याची काही चिन्हं दिसेनात. आता कपारीतच आपला अंत होईल की काय अशी शंका त्याला येऊ लागली. त्यानं आपल्याजवळच्या कॅमेर्‍यात फ़ोटो काढले. मित्र आणि कुटुंबियांसाठी संदेश रेकॉर्ड केला. जेणेकरून कधी न कधी कोणाला न कोणाला आपण सापडू आणि आपलं नेमकं काय झालं? शेवटचे दिवस आपण कसे काढले? हे जगाला कळेल. सोबत न पाणी न जेवण. तो किती काळ तग धरू शकेल शंकाच होती. जखमेतून येणार्‍या रक्तानं त्याच्या मरणाची तारीख त्या दगडावर लिहिली.

हे सगळं करत असताना त्यानं अखेरीस एक धाडसी निर्णय घेतला. एवीतेवी मरण समोर उभंच आहे तर शेवटचा निकराचा प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि अडकलेला हात कापून टाकायचं ठरवलं.

आपलाच हात कापणं सोपं नव्हतंच. धीर गोळा करत आणि वेदनांनी टाहो फ़ोडत त्यानं हे काम केलं. कारण जो चाकू त्यानं यासाठी वापरला त्याला धारही नव्हती. काही तासांच्या प्रयत्नानंतर अखेरीस अडकलेला हात कपारीतच ठेवत त्यानं स्वत:ची सूटका करून घेतली. हातातून वहाणार्‍या रक्ताला कसंबसं कापड गुंडाळत त्यानं थोडंफ़ार थोपवायचा प्रयत्न केला आणि झपाट्यानं निकराचा प्रयत्न करत खाली उतरला कशीबशी त्यानं मदत मिळवली.

या भयानक अनुभवानंतर एखाद्यानं आयुष्यात कायमची हबकी खाल्ली असती मात्र कृत्रीम हात लावून एरन पुन्हा गिर्यारोहण करू लागला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बंपर कमाई करून देणारा पेट्रोल पंप कसा सुरु करायचा? काय आहे प्रोसेस?

Next Post

द डिसायपल – एका मराठी दिग्दर्शकाच्या या चित्रपटाचं जगभर कौतुक का होतंय..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

द डिसायपल - एका मराठी दिग्दर्शकाच्या या चित्रपटाचं जगभर कौतुक का होतंय..?

अलार्म क्लॉक परवडायचे नाही म्हणून झोपेतून उठवायला माणूस ठेवायचे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.