The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाला जंगली लांडग्यांनीच पालनपोषण करून लहानाचं मोठं केलंय

by द पोस्टमन टीम
3 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही लोकांना एकटेपणा अजिबात आवडत नाही. थोडा वेळही हे लोक घरात एकटे राहू शकत नाहीत. त्यांना सतत कुणी ना कुणी हवं असतं बोलायला, दंगा-मस्ती करायला. हे लोक बहिर्मुखी असतात. ज्यांना सतत माणसांच्या सहवासात सुरक्षित वाटते. काही लोकं नेमके याच्या उलट असतात. ज्यांना आपण एकलकोंडे म्हणतो. हे कुणाच्यात मिसळत नाहीत. जिथे जातील तिथे अलग होण्याचा, इतरांपासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतील आणि एकटे राहण्याची जितकी संधी मिळेल तितकी शोधत राहतील. एकट्यानेच फिरतील, खातील, आवडती गाणी ऐकतील, पुस्तके वाचतील. माणसाच्या स्वभावाचे हे परस्पर विरोधी पैलू आहेत. या दोन्ही प्रकारात मोडणारी कितीतरी माणसे तुमच्या आजूबाजूलाही असतील, तुम्ही पाहिली असतील.

पण, मार्कोस पँटोजा याची कहाणी काही वेगळीच आहे. त्याला माणसाच्या जगाशी कसे जुळवून घ्यावे हेच कळत नाही. माणसाच्या जगण्याचे, समाजाचे नीतीनियमही कळत नाही. त्याला माणसांचा सहवासच नको वाटतो. शांत, एकांत ठिकाणीच त्याला करमते. त्याला एकटे राहायला फार आवडते.

एकटे राहायला आवडते हे ठीक आहे पण, माणसाच्या जगाशी जुळवून कसे घ्यायचे हा प्रश्न कसा काय पडू शकतो बरे?

पँटोजा तुमच्या-आमच्यासारखा माणसांच्या सहवासात मोठा झालाच नाही. म्हणून त्याला मानवी जीवनाशी जुळवून घेणे म्हणजे खूप किचकट काम वाटते.



पँटोजा लहान असतानात त्याच्या वडिलांनी त्याच्या सावत्र आईच्या जाचाला कंटाळून त्याला एक म्हाताऱ्या मेंढपाळाला विकले होते. तेव्हा पँटोजा फक्त सात वर्षांचा होता.

स्पेनमध्ये जन्मलेला पँटोजाची सावत्र आई त्याला खूप मारहाण करायची. सहा वर्षाच्या पँटोजाला तेव्हापासूनच माणसांविषयी थोडा तिरस्कारच निर्माण झाला. त्याच्या वडिलांनी त्याला एका शेतकऱ्याला विकले आणि त्या शेतकऱ्याने त्याला एका वृद्ध मेंढपाळाच्या हवाली केले. तो मेंढपाळ गावाबाहेरील सिएरा मोरेना डोंगररांगांत राहत होता.

पँटोजा त्या मेंढपाळाच्या संगतीत मेंढ्यांची देखभाल करणे, जंगलातून अन्न गोळा करून आणणे, जंगलातील प्राण्यांचे आवाज काढणे, अशा कितीतरी गोष्टी तो शिकला. त्यानंतर दोनच वर्षात त्या म्हाताऱ्या मेंढपाळाचा मृत्यू झाला. त्या डोंगररांगातील घनदाट जंगलात आता पँटोजा एकटाच पडला होता. त्यावेळी त्याचे वय होते आठ वर्षे. तोपर्यंत जंगलात खाण्यासाठी काय शोधावे आणि काय नाही याचे त्याला पूर्ण ज्ञान आले होते असे नाही, पण त्या म्हाताऱ्याने त्याला सशांची शिकार कशी करायची याचे तंत्र शिकवले होते. त्यामुळे त्याच्यावर अगदीच उपासमारीची वेळ आली नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

जंगली डुकरे त्यांच्यासाठी झाडाखालची माती खणून कंदमुळे काढत असत. त्यांचे खणण्याचे काम पूर्ण झाले की, पँटोजा त्यांना दगडं मारून हाकलवत असे आणि त्यांनी जमिनीतून उकरून काढलेली कंदमुळे खात असे.

हळूहळू त्याच्या परिसरात राहणाऱ्या काही जंगली प्राण्यांशी त्याचा परिचय वाढला. असाच एके दिवशी जंगलात इकडे तिकडे भटकताना त्याला एक गुहा दिसली. तिथे काही लांडग्यांची पिल्ली होती. तो त्या छोट्या छोट्या पिल्लांसोबत खेळण्यात रमून गेला आणि तिथेच त्याला झोप लागली. थोड्या वेळात त्या पिलांची आई त्यांच्यासाठी खायला घेऊन आली. तोपर्यंत पँटोजालाही जग आली. तिने त्याला पहिल्यांदा पहिले तेव्हा तिला त्याचा खूप राग आला होता. ती रागाने लालबुंद झाली त्याच्यावर गुरुगुरु लागली.

तिने जंगलातून शिकार करून आणलेले मांस आपल्या पिल्लांना खायला दिले. पँटोजालाही भूक लागली होती. त्याने पिल्ल्यांच्या पुढ्यातील मांसाचा तुकडा चोरण्याचा प्रयत्न केला इतक्यात त्यांच्या आईने पँटोजाच्या हातावर झपाट्याने वार केला आणि त्याला मागे ढकलून दिले. घाबरलेला पँटोजा तिथेच शांत बसून राहिला. पिल्लांचे पोट भरल्यावर त्यांच्या आईने राहिलेला एक मांसाचा तुकडा पँटोजा समोर आणून ठेवला, पण तो खूप घाबरला होता. त्याने मांसाला हात देखील लावला नाही.

तेव्हा त्या पिल्लांची आई पँटोजाच्या जवळ आली आणि त्याला चाटू लागली. जणू त्याला समजावत होती की घाबरू नको हा खाऊ तुझ्यासाठीच आहे. तेव्हा पँटोजाला तिच्या स्पर्शात प्रेमाची उब जाणवली आणि तो त्या लांडग्याच्या कुटुंबाचा एक सदस्यच बनला.

पँटोजाच्या मते एका सापाशीही त्याची मैत्री होती. कधी कधी त्याला आपल्या या मित्रांचे आवाज ऐकू येत नसत तेव्हा त्याला वाटे की तो एकटा पडला आहे. मग तो स्वतःच एकामागून एक सगळ्यांच्या आवाजाची नक्कल करी. हरीण, कोल्हे अशा अनेक प्राण्यांच्या आवाजाची त्याला नक्कल करता येत असे. मग तेही त्याला प्रतिसाद देत. त्यांचे प्रतिसाद आल्यावर पँटोजाला खात्री पटत असे की, तो एकटा नाही, त्याचे मित्र त्याच्यासोबत आहेत.

त्यांचे आवाज कानावर पडले की तो निश्चिंत मानाने झोपत असे. कित्येकदा तो साप देखील त्याच्यासोबत त्याच्या गुहेतच झोपत असे. पँटोजाच्या मते त्याने अनेकदा त्या सापाला दुध पाजले होते. जंगलात कुठेही गेला तरी तो साप त्याची पाठ सोडत नसे, उलट तो साप पँटोजाचे सरांक्षण करत असे.

पँटोजाने बारा वर्षे मानवी समाजापासून दूर जंगलातच काढली त्यामुळे त्याला मानवी समाजाचे रीतीरिवाज, राहण्या-खाण्याच्या पद्धती यांची काहीच माहिती नव्हती. तो जंगलातच जंगली प्राण्यांतील एक बनून राहत असे. १९६५ साली तो स्पॅनिश सैनिकांच्या नजरेस पडला आणि त्यांनी त्याला जंगलातून मानवी समाजात आणले. इतक्या वर्षे मानवी समाजापासून दूर राहिलेल्या पँटोजाला मानवी समाजाच्या चालीरीती शिकणे खूपच अवघड गेले. कारण आतापर्यंत तर तो फक्त लांडग्यांच्या आणि इतर प्राण्यांच्याच सहवासात राहिला होता.

त्याला बोलताही यायचे नाही, तो नुसताच लांडग्यांसारखा ओरडायचा. सुरुवातीला त्याला कुणाशीच संवाद साधता यायचा नाही.

त्याला जेव्हा त्याच्या वडिलांकडे नेण्यात आले तेव्हा त्यांनी त्याला तू कसा आहेस? कसे दिवस काढलेस असे काही आपुलकीचे प्रश्न विचारण्याऐवजी घरातून जाताना तुझ्या अंगात ते जकेट होते ते कुठे आहे?, असे विचारले.

माणसात आल्यावर जर अशी वागणूक मिळणार असेल, तर कोणाला माणसात राहावंसं वाटेल. पँटोजाचेही तसेच झाले. त्याला या मानवी जगात अजिबात करमत नव्हते.

आजूबाजूचे जग कितीतरी वेगाने बदलत होते. सिव्हील गार्ड्सनी पँटोजाला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हे हॉस्पिटल नन्सद्वारा चालवले जाई. त्यांनी पँटोजाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या जसे की ताठ उभे राहून कसे चालायचे, भांड्याचा वापर करून कसे जेवायचे, कपडे कसे घालायचे आणि बोलायचे कसे, अगदी लहान मुलाला शिकवावे तशा पँटोजाला या छोट्या छोट्या गोष्टी शिकवाव्या लागल्या.

अर्थात यात त्याची चूक ती काय? पण, हा सगळा बदल त्याच्यासाठी खूपच त्रासदायक होता. पहिल्यांदा त्याचे केस कापण्यात आले तेव्हाही तो खूप घाबरला होता. अंथरूण-पांघरूण घेऊन झोपण्याची सक्ती करणाऱ्या नन्सचा त्याला खूप राग यायचा.

पँटोजाला मानवी समाजात राहण्यायोग्य बनण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला, तेही अनिच्छेने. हळूहळू तो या वातावरणाशी जुळवून घ्यायला शिकला. पुढे काही वर्षे त्याने स्पॅनिश सैन्य दलातही काम केले. नंतर तो कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करू लागला. मानवी जगातील धोके माहित नसलेल्या पँटोजाची अनेकदा फसवणूक झाली. या सगळ्या वातावरणाचा त्याला खूप त्रास होत असे.

या सगळ्याला कंटाळून त्याने पुन्हा एकदा आपले पूर्वीचे जंगली जीवन जगण्याचा निर्णय घेतला. तो तिथे वरचेवर जात राहिला पण आता जंगली प्राण्यांनी त्याला ओळखण्यास नकार दिला.

त्याला आता कळून चुकले की आपण आता त्यांच्यापेक्षा कितीतरी वेगळे दिसतो. त्याच्या शरीराला आता मानवी वस्तीचा वास लागला होता. त्यामुळे प्राणीही त्याला पुन्हा स्वीकारण्यास उत्सुक नव्हते.

पँटोजाच्या या सगळ्या जीवन कहाणीवर २०१० साली एक चित्रपटही येऊन गेला, ज्याचे नाव होते ‘अमंग वोल्व्ज.’ अनेक टीव्ही चॅनेल्सनी त्याची मुलाखतही घेतली. वर्तमानपत्रातूनही त्याची गोष्ट प्रकाशित झाली. अनेक संस्था-संघटना त्याला आपल्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊ लागल्या. लोकांना त्याच्याच तोंडून त्याची जीवनकहाणी ऐकण्यात खूप रस होता.

त्याच्या जीवनावर आधारित एक पुस्तकही नंतर प्रकाशित झाले. १९८२ सालीच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव होते ‘मार्कोस, वाईल्ड चाईल्ड ऑफ द सिएरा मोरेना.’ आज पँटोजा सत्तर वर्षांचा आहे. तो सध्या स्पेनमधील ऑरेंस या गावात राहतो. त्याला काही दानशूर व्यक्तींकडून आजही मदत मिळते त्यावरच तो गुजराण करतो. आजूबाजूच्या परिसरातील शाळांना भेटी देतो तिथल्या मुलांना आपली गोष्ट सांगतो.

तरीही त्याच्या पूर्वीच्या आयुष्याचा त्याला पूर्णत: विसर पडलेला नाही. त्याचे ते कुटुंबीय, त्याच्या आठवणी आजही त्याच्यासाठी ताज्या आहेत. आजही तो जंगली प्राण्यांचे आवाज काढतो. ते जीवन गमावल्याची खंत त्याला आजही सलते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फंदफितुरी झाली नसती तर ‘राणा सांगा’ने बाबराला हुसकावून लावलंच असतं

Next Post

आज मैलाच्या दगडावरच्या या रंगांचा अर्थ माहिती करून घ्या !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आज मैलाच्या दगडावरच्या या रंगांचा अर्थ माहिती करून घ्या !

ना*झी सैन्यात झालेल्या कन्फ्युजनमुळे २५० किलोमीटर लांब ट्राफिक जॅम झालेलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.