The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीम इंडियाचा भेदक स्पिनर अनिल कुंबळेची भन्नाट वाइल्डलाईफ फोटोग्राफी!

by द पोस्टमन टीम
27 October 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

जगात खूप कमी लोक असे असतात, ज्यांना एकाच वेळी अनेक कलांमध्ये गती असते आणि फक्त गतीच नाही तर त्या-त्या कलांत ते तितकेच पारंगत देखील असतात. एकाच व्यक्तीला क्रिकेट आणि संगीत असा छंद असू शकतो पण, एकतर ती व्यक्ती करिअर म्हणून क्रिकेट निवडेल किंवा मग संगीत. पण, दोन्ही कलांसाठी तितकाच वेळ द्यायला त्याला फुरसत भेटेलच असे नाही.

मात्र, काही व्यक्ती इतक्या हुशार असतात, इतक्या निष्णात असतात की, त्यांना आपल्यातील वेगवेगळ्या कलागुणांना सारखाच न्याय द्यायला जमते. या व्यक्तींच्या ठिकाणी असणारी प्रचंड उर्जा आणि उत्साह त्यांना कधीच शांत आणि स्वस्थ बसू देत नाही.

क्रिकेटपटू अनिल कुंबलेने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्षे झाली. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतरही अनिल कुंबलेच्या चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम कमी झालेले नाही.



अनेकदा आपल्या आक्रमक शैलीने बॉलिंग करत रसिकांना खेळातील अप्रतिम कौशल्याचे दर्शन त्याने घडवलेले आहे.

आजही तो पुन्हा एकदा चर्चेत आहे ते त्याच्यातील एका खास कौशल्यामुळेच! हो पण, या कौशल्याचा आणि क्रिकेटचा मात्र दुरान्वयेही संबंध नाही. तरिही क्रिकेटमुळेच मला या क्षेत्रातील अधिक माहिती मिळाली आणि मी या नव्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकलो, हे काबुल करण्यास कुंबले अजिबात विसरत नाही.

आक्रमक स्पिनर असण्याबरोबरच अनिल कुंबले एक उत्कृष्य वाईल्डलाईफ फोटोग्राफर देखील आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्याने आपल्या ट्विटर आणि इन्स्टा अकाऊंटवर जंगली प्राण्यांचे इतके सुंदर सुंदर फोटो शेअर केलेत की, अनिलच्या या नव्या रूपाच्या प्रेमात पडण्याच्या मोह आवरणे कठीण आहे.

पृथ्वीवरील संपूर्ण सजीवसृष्टीच्या रचनेमागे निश्चितच एक सुसूत्रता आहे आणि पृथ्वीच्या संवर्धनासाठी ही सुसूत्रता जोपासणे आपले कर्तव्य आहे.

पण, अनेकदा लोभापायी या जंगली जनावरांना शिकार बनवून या जीव सृष्टीची विविधता आणि त्यामागील सुसूत्रता धोक्यात येईल अशी कृत्ये अनेकाकडून घडत असतात.

 

अनिलला मात्र या वन्यजीवांबद्दल प्रचंड आस्था आहे. त्यांची सुंदर चित्रे आणि सुंदर क्षण टिपण्यासोबतच तो आपल्या इन्स्टा आणि ट्विटर पोस्टच्या माध्यमातून, पर्यावरणात या प्रत्येकाचे स्थान किती महत्वाचे आहे, याबाबत देखील आवर्जून जागृती करत असतो. कुंबलेची फोटोग्राफी पाहून अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिटतील.

त्याने त्याच्या इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्त केलेले फोटो पाहूनच त्याची फोटोग्राफी जिवंतपणाची अनुभूती देण्यात किती माहीर आहे, हे पाहून आश्चर्याने थक्क व्हायला होते.

एका वळल्या झाडाच्या उंच शेंड्यावर बसलेला एक पक्षी आपल्या पंखात हवा भरून, अगदी दुसऱ्याच क्षणी उडण्याच्या तयारीत असलेला हा पक्षी!

अगदी परफेक्ट टायमिंग साधणारा हा फोटो आपल्याला भारावून टाकल्याशिवाय राहत नाही.

जंगलातील दाटीवाटीने पसरलेल्या वृक्षराजीत एक हत्ती शून्यात नजर लावून उभा आहे. त्याच्या अवतीभवतीचे वातावरण आणि प्रकाशाचा खेळ इतका सुरेख टिपला आहे की, असा फोटो आपण कधीच पाहिला नसेल अशा दुर्मिळ क्षणांचा साक्षात्कार घडवतो.

थोडसं धुकं, थोडीशी धूळ आणि त्यांना भेदत जाणारा सूर्यप्रकाश, अशा वातावरणात उभा असलेला हा हत्ती,

जणू आपल्याशी काही हितगुज साधण्यासाठीच उभा आहे असा भास होतो आणि या क्षणचित्राच्या आपसूक प्रेमात पडायला होतं.

अजून एक फोटो आहे. आळसावलेल्या चित्त्याचा! जणू जंगलातून मनसोक्त उंडारुन झाल्यावर अतिशय दमलेला, थकलेला हा चित्ता फांदीच्या आधाराने आपला थकवा घालवण्यासाठी निवांत बसला आहे.

हा प्राणी अगदी आता नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. या प्रण्याबाबत शक्य तितकी जागृती त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

त्याचे हे कौशल्य नुसतेच वाखाणण्याजोगे नाही तर आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे आहे.

वाईल्डलाईफ बद्दल त्याला असणारी आस्था, प्रेम आणि ओढ या सर्वांचे प्रतिबिंब या फोटोग्राफीमध्ये पाहायला मिळते. अलीकडेच महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या ताडोबा अभयारण्याला भेट दिली आणि तेथील प्राण्यांचे काही फोटो त्याने ट्विटरवर शेअर केलेत.

twitter

आपल्या प्रदेशाबाबत वाघ आणि वाघिणी फारच जागरूक असतात. त्या ठराविक प्रदेशात जर दुसरा एखादा वाघ किंवा वाघीण दाखल झाली तर त्यांना हे अजिबात सहन होत नाही.

ताडोबाच्या जंगलातील माया वाघिणीने आपल्या प्रदेशात घुसलेल्या दुसऱ्या वाघिणीला आपल्या प्रदेशातून हुसकावून लावले.

या दोन वाघिणींमधील आक्रमक आणि दुर्मिळ जुगलबंदी कुंबलेनी तितक्याच कुशलतेने आणि धैर्याने आपल्या डीएसएलआर कॅमेऱ्यात खूपच नजाकतीने टिपलेत. शेवटी माया वाघीण त्या घुसखोर वाघिणीला आपल्या हद्दीतून कशी हुसकावून लावण्यात यशस्वी होते, हे देखील कॅमेऱ्याने अचूकतेने टिपले आहे.

अनिल कुंबलेच्या चाहत्यांनी त्यांच्या या नव्या कौशल्याला देखील तितक्याच उत्साहाने प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या ट्विटर पोस्टवर आलेल्या कमेंट्स मधून या कलाकाराला त्यांच्या चाहत्यांनी कसे प्रोत्साहित केले आहे आणि त्याच्या या कलेचा कसा आदर आणि स्वीकार केला आहे, हे पटकन जाणवते.

navbharat times

एका ट्विटर फॉलोअरने लिहिले आहे,

सर तुमच्या या फोटोग्राफीने मला भारावून टाकले आहे. हे शॉट्स पाहून मला साउथ आफ्रिकेचा पशुप्रेमी आणि निरीक्षक असलेल्या ऑस्टिन स्टीव्हनची आठवण झाली.

दोन वाघिणींच्या लढाईला इतक्या जवळून पाहण्यासाठी देखील खूप धीराचे काळीज लागते, वाघ पाहून कुणालाही तत्क्षणी तिथून काढता पाय घेण्याची नैसर्गिक भावना होईल. पण, तशातही त्यांचे इतके सुंदर फोटो टिपणे म्हणजे, तुमच्या धाडसाला सलामच,” अशी मन:पूर्वक दाद दिली आहे. फोटो किती सुंदर आणि आकर्षक आहेत हे सांगणाऱ्या तर अनेक कमेंट्स आहेतच.

यापुर्वीही अनेकदा कुंबळेने आपल्या फोटोग्राफीच्या अनोख्या कौशल्याचे दर्शन चाहत्यांना घडवले आहेच. निसर्ग आणि फोटोग्राफी ही आता त्याच्यासाठी एक नवी धावपट्टी बनली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

प्रेमाची भाषा शिकवणारा कालातीत कवी : रूमी

Next Post

भारताच्या अंतराळ संशोधनात क्रांती आणणाऱ्या दुर्लक्षित शास्त्रज्ञाची कथा…

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारताच्या अंतराळ संशोधनात क्रांती आणणाऱ्या दुर्लक्षित शास्त्रज्ञाची कथा...

हिंदी चित्रपट संगीताला श्रीमंत करणारा मराठी माणूस- लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.