The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमच्या गुंतवणुकीची दामदुप्पट केव्हा होणार..? शोधा या सोप्या ‘ट्रिक’ने..!

by द पोस्टमन टीम
29 March 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गुंतवणूक करताना त्याच्या परताव्याचा विचार केला जातो. हा परतावा मोजण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. त्यानुसार तुम्ही आज गुंतवणूक केलेली रक्कम ठराविक कालावधीनंतर तुम्हाला किती परतावा देईल हे निश्चित होते. याचसाठी वापर होतो Rule 72चा.

एखादी गुंतवणूक करताना सगळ्यात आधी काय पाहिलं/ तपासलं जातं? तर त्या गुंतवणूकीचा कालावधी आणि त्यानंतर त्यातून मिळणारा परतावा. अर्थात गुंतवणुकीचा मुख्य हेतूच तो असतो.

तुम्ही जेव्हा एखादी रक्कम गुंतवता तेव्हा ती साधारण किती कालावधीत दुप्पट होईल याचा फ़ॉर्म्युला म्हणजे नियम ७२.

कॅलक्युलेटर्स आणि लांबच्या लांब एक्सेल शीट्स गुंतवलेली रक्कम किती परतावा देईल याची समीकरणं मांडत असते. मात्र सोप्या पध्दतीनं आणि अगदी अचूक नाही पण बहुतांश अचूक असा आकडा काढण्याची रुल ७२ ही पध्दत सामान्यांनाही चटकन समजेल अशी आहे.

गुंतवणूकीच्या संदर्भात आपल्याला प्राथमिक माहिती असतेच म्हणजे, गुंतवणूक कधी, कुठे, काय काय बघून करायची इत्यादी. गुंतवलेली रक्कम दुप्पट कधी होईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फ़ॉर्म्युला ७२ तुम्हाला जाणून घ्यावा लागेल. काय असतो हा फ़ॉर्म्युला? काय आहे नियम ७२?



खरंतर, रुल ७२चा वापर त्या प्रत्येक गोष्टीसाठी करता येतो जी चक्रवाढ पध्दतीनं वाढत असते. उदाहरणार्थ- लोकसंख्या, दर किंवा कर्ज. उदाहरणार्थ जर एकूण घरगुती उत्पन्न (GDP) ४ टक्के वार्षिक दरानं वाढत असेल तर १८ वर्षात अर्थव्यवस्था दुप्पट होईल.

तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या व्याजाची रक्कम दुप्पट कधी होणार हे जाणून घ्यायचं तर त्या व्याजाच्या रकमेला ७२ नं भागायचं आहे. उत्तर म्हणून जी संख्या येईल ती एकदम अचूक असेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही ८ टक्के वार्षिक व्याजावर १० हजार रूपये गुंतवले आहेत तर ७२ भागिले ८=९ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील. म्हणजेच नऊ वर्षात दहाचे वीस हजार होतील. अजून एक उदाहरण बघू, समजा तुम्हाला २४ टक्के व्याजदर मिळाला तर ७२ भागिले २४=३. म्हणजेच तीन वर्षात तुमचा पैसा दुप्पट होईल.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

निवृत्तीनंतर जर आर्थिक परीस्थिती भक्कम ठेवत आयुष्याची सोनेरी वर्षं उपभोगायची असतील तर जितक्या लवकर योग्य गुंतवणूक करत जाल तितकं फ़ायद्याचं आहे. तरूण वयात केलेली गुंतवणूक दुप्पट व्हायला लागणारा वेळ आणि त्याची पुर्नगुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं फ़ायद्याचा सौदा असतो. उलट्या बाजूनं ताळेबंद मांडतही तुम्ही कधी आणि किती रक्कम गुंतवायची आहे हे काढता येतं.

समजा आजपासून पाच वर्षांनी तुम्हाला ठराविक रक्कम लागणार असा तुमचाअंदाज आहे (मुलाची उच्च शिक्षणं, घर घेण्याचं प्लॅनिंग असणं असे खर्च यात येतात) तर त्या वेळची अंदाजे रक्कम लक्षात घेऊन त्याची बेसिक रक्कम आज गुंतवली तर पाच वर्षांनी तुम्हाला हवा असणारा परतावा मिळेल.

इथे रुल ७२ तुमच्या मदतीला येतो. भविष्यातल्या आर्थिक गरजा लक्षात घेत आज अचूक आणि योग्य गुंतवणूक केली तर पुढे कर्जाचे डोंगर कमी उभे रहातात. यासाठी तुम्हाला तुमची बचत मात्र करत गेलं पाहिजे आणि त्यात सातत्यही हवं.

दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी चक्रवाढ हा उत्तम पर्याय आहे. समजा निवृत्तीनंतर तुम्हाला करोडमधली रक्कम बचत म्हणून हवी असेल तर याची सुरवात अर्थातच लवकरात लवकर व्हायला हवी. वयाच्या २५ व्या वर्षी जर ५ हजारांची बचत करणं चालू केलं तर वार्षिक १० टक्के परतावा मिळेल असं गृहित धरलं तर वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे एक करोडहून जास्त रक्कम असेल. वित्तशास्त्रात रुल ७२ व्यतिरीक्त रुल ७० आणि रुल ६९.३ या पद्धतींचाही अवलंब केला जातो.

इथून पुढे गुंतवणूक करताना “रूल ७२”चा वापर करायला विसरू नका!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

युरोपमध्ये जुन्याकाळी औषधासाठी मृतदेहांची तस्करी केली जायची

Next Post

रशियाने खोदली होती नरकात घेऊन जाणारी विहीर!!

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

रशियाने खोदली होती नरकात घेऊन जाणारी विहीर!!

जयचंद - खोट्या इतिहासामुळे गद्दार आणि राष्ट्रद्रोही असा शिक्का बसलेला राजा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.