The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोळे मिचकावणारी ‘ममी’ पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण झालेत

by द पोस्टमन टीम
9 December 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


माणूस मेल्यानंतर लवकरात लवकर त्याचे दहन किंवा दफन केले जाते. कितीही प्रेम असले आणि कितीही जवळचा माणूस असला तरी लोक त्याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचा फोटो फ्रेम करून लावतात. कुणीही त्याचा मृतदेह जतन करून ठेवण्याच्या फंदात पडत नाही.

मृतदेह जतन करून ठेवण्याची पद्धत इतिहासातील अनेक संस्कृतीत सापडते. पण आज ही पद्धत बऱ्यापैकी लुप्त झालेली दिसते. इजिप्तच्या पिरॅमिड संस्कृतीत मृतदेह जतन करून ठेवण्याची परंपरा होती. पण, हेही मृतदेह फार काळ जसेच्या तसे राहिले नाहीत. अशा जतन करून ठेवण्यात आलेल्या मृतदेहाला ममी म्हणतात.

असाच १९२० साली रोजलीया या दोन वर्षाच्या मुलीचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. रोजलीयाच्या ममीकडे पाहिल्यास तो मृतदेह आहे असे कुणाला वाटणार नाही इतका जिवंतपणा त्या ममीत आहे. हा ममी पाहणाऱ्या अनेकांनी असे सांगितले की, हा मृतदेह डोळे मिचकावतो.

कधीकधी तर हा मृतदेह आपल्याकडे रोखून पाहतो आहे असेही वाटते. पण हे नेमके कशामुळे घडते? डोळे मिचाकावणाऱ्या या ममीचे रहस्य काय जाणून घेऊया, या लेखातून.



साल होते १९२०.

रोजलीया लोम्बार्डो नावाच्या एक दोन वर्षाच्या मुलीला न्युमोनिया झाला होता. तिच्या आई-वडिलांनी त्याकाळी या आजारावर जे काही आधुनिक उपचार उपलब्ध होते ते सगळे करून पहिले. पण, रोजलीयाच्या कमकुवत रोगप्रतिकार शक्तीमुळे ती या आजारातून बरी होऊ शकली नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

तिच्या वडिलांना हे दु:ख पचवणे थोडे अवघडच होते. तिचा दुसरा वाढदिवस होऊन आताच कुठे आठवडा झाला होता. इतक्यात ती या जगात नाही हे सत्य स्वीकारणे तिच्या वडिलांना अजिबात शक्य झाले नाही. त्यात स्पॅनिश फ्लूची साथही अजून रेंगाळत होती. कदाचित याच विषाणूने माझ्या लेकीचा बळी घेतला असावा असा तिच्या वडिलांचा समज झाला. त्यांना तिच्या मृत्युचं खापर फोडण्यासाठी कुणीतरी हवं होतं. डॉक्टर, सरकारी यंत्रणा, मिळणाऱ्या सुविधा असं कुणावरही आणि कशावरही त्यांना आपला राग काढायचा होता.

आपल्या मुलीच्या अशा अवेळी जाण्याने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिच्या वडिलांनी तिच्या मृतदेहाचे दफन करण्यास नकार दिला.

त्यांनी अल्फ्रेडो सालाफिया यांची भेट घेतली. अल्फ्रेडो सालाफिया हे त्याकाळातील एक नामवंत केमिस्ट होते. मृतदेहांचे जतन करण्याच्या तंत्रात ते खूपच निष्णात होते. रोजलीयाच्या वडिलांनी अल्फ्रेडोला विनंती केली की, ‘तिचा मृतदेह चांगल्या पद्धतीने जतन करा. ती मेली आहे असे नाही वाटले पाहिजे. ती जिवंत आहे असाच भास झाला पाहिजे.’ मृतदेह अधिक काळ आणि चांगल्या पद्धतीने टिकून राहावे यासाठी काय करता येईल याबाबत अल्फ्रेडो यांनी बरेच संशोधन केले होते.

रोजलीयाच्या मृत्यूची कहाणी ऐकल्यानंतर आणि तिच्या वडिलांची झालेली अवस्था पाहून रोजलीयाच्या मृतदेहाचे ममीफिकेशन करण्यास ते तयार झाले. त्यासाठी त्यांनी काहीच फी घेतली नाही. तिचा मृतदेह अधिकाधिक जिवंत वाटावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

आल्फ्रेड सालाफिया यांनी रोजलीयाच्या मृतदेहाचे खूपच चांगल्या पद्धतीने ममीफिकेशन केले आहे. त्यांनी यासाठी शक्य त्या सगळ्या शास्त्रीय पद्धतींचा वापर केला. तिच्या चेहऱ्यावरील निरागस सौंदर्यही तसेच अबाधित राहील याचीही त्यांनी काळजी घेतली.

१९७० च्या काळात रोजलीयाच्या मृतदेहाचे ममीफिकेशन करताना नेमकी काय प्रक्रिया करण्यात आली याचे वर्णन सापडले आहे. यामध्ये तिचा मृतदेह अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी काही वेगळे रासायनिक घटक वापरल्याचे म्हटले होते. यासाठी ग्लिसरीन, सच्यूरेटेड फॉर्मोल, झिंक सल्फेट, सॅलीसील अल्कोहोल आणि क्लोरीन अशा रासायनिक घटकांचा वापर करण्यात आला होता.

तिचे शरीर सुकून जाऊ नये म्हणून ग्लिसरीनचा वापर करण्यात आला. सॅच्यूरेटेड फॉर्मोल आणि सॅलीसील अल्कोहोलमुळे मृतदेहामध्ये जे जंतू निर्माण होतात त्यांची वाढ रोखली गेली. तिचे मृत शरीर अधिक कडक होण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर करण्यात आला.

तिची ही ममी पामेरोच्या ‘कॅटाकॉम्बे दि कॅपकिनी’ इथे ठेवण्यात आला आहे. याठिकाणी अनेक ममी ठेवण्यात आल्या आहेत. थोडक्यात हा ममीजचा संग्रह आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिथे फिरायला येणाऱ्या अनेक लोकांचे असे म्हणणे होते की, रोजलीयाची ममी डोळे मिचकावते असे वाटते. काही लोकांना हा एखादा चमत्कार किंवा जादू वाटते. आता यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांनी या ममीचा अभ्यास केला.

रोजलीयाची ममी डोळे मिचकावते असे वाटते, पण हा एक भ्रम आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. तिच्या चेहऱ्यावर इथरमधे विरघळवलेल्या पॅराफिनचा थर देण्यात आला आहे. यामुळे ती थेट पाहणाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतेय असे वाटतेय. शिवाय ज्या इमारतीत ही ममी ठेवण्यात आली आहे त्या इमारतीतील विशिष्ट प्रकाशयोजनेमुळे पाहणाऱ्याला असे वाटते की ही ममी डोळे मिचकावते.

थोडे जवळून पाहिल्यास असे लक्षात येते या ममीचे डोळे अर्धे उघडेच आहेत. अल्फ्रेडो सालाफियाने ममीफिकेशन करताना मुद्दाम तिचे डोळे असे अर्धोन्मलीत ठेवले. ज्यामुळे ती अधिकाधिक जिवंत वाटेल.

या ममीचे आणखी एक सगळ्यात अनोखे आणि आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे, जेव्हा या ममीचा एक्सरे काढण्यात आला तेव्हा तिच्या शरीरातील अवयवसुद्धा अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. म्हणजेच तिचे आतील अवयवही जास्त काळ टिकून राहतील याची काळजी घेतली आहे.

आज इतक्या वर्षानंतरही त्या ममीला पाहणाऱ्याला त्यातला ममीचा जिवंतपणा जाणवत राहतो. रोजलीया कदाचित तिचे खरे आयुष्य पूर्णपणे जगली असती तर ती लोकांच्या इतकी लक्षात राहिली असती की नाही कुणास ठावूक.

पण, अल्पकाळात आणि कित्येक वर्षापूर्वी हे जग सोडून गेलेली रोजलीया खरे तर अजूनही जिवंत आहे, म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकन मिलिटरीने एकदा चंद्रालाच उडवून टाकायचा प्लॅन केला होता

Next Post

तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्तान आपल्याकडून नेहमीच हरत आलाय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्तान आपल्याकडून नेहमीच हरत आलाय

विनोबांच्या आंदोलनामुळे कसणारे हात जमिनीचे मालक झाले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.