The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन दिवस, अकरा कॉम्पिटिशन्स आणि पाच गोल्ड, पी.टी. उषांनी इंडोनेशियात डंका पिटला होता

by द पोस्टमन टीम
29 May 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात खेळांच्या बाबतीत फक्त पुरुषांनीच नाही, तर महिलांनी देखील एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक महिला खेळाडूंनी भारताचे नाव जगभरात प्रसिद्ध केले आहे. अशाच काही कर्तबगार महिला खेळाडूंपैकी एक आहे पी. टी. उषा.

अत्यंत मोठा संघर्ष केल्यानंतर पी. टी. उषा यांनी सफलता मिळवली होती. त्यांनी या संघर्षकाळात त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या अनंत अडचणींवर मात केली. पी. टी. उषा यांनी ज्यापद्धतीने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली, ते निश्चितच अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

पी.टी. उषाचा जन्म २७ जून १९६४ रोजी केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील एका लहानश्या गावात झाला होता. पिलावुलाकंडी तेकपाराम्बी उषा हे त्यांचे नाव होते, जे उच्चारण्यास सोपे जावे म्हणून त्या ‘पी. टी. उषा’ असे संक्षिप्त नाव वापरण्यास त्यांनी सुरुवात केली.

एका साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या पी. टी. उषा यांना आयुष्यभर संघर्षच करावा लागला होता. एक धावपटू बनण्यासाठी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना लहानपणापासून खेळण्याची आवड होती. शाळेत असताना त्यांनी अनेक खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली म्हणून जिल्हास्तरावरील स्पर्धांसाठी त्यांची निवड करण्यात आली. पैशाच्या कमतरतेमुळे त्यांना यापुढे मजल मारता येत नव्हती. पण पी.टी.उषा यांनी हार मानली नाही. त्यांच्या आयुष्यात एक असे वळण आले, ज्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडत गेले.



खेळांमध्ये त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना २५० रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. १९७९ साली याचे देखील फार महत्त्व होते. आता त्यांना चांगल्या स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.

याच काळात त्यांना माहिती मिळाली की केरळमध्ये नॅशनल गेम्स होणार आहेत, यानंतर उषा यांनी रात्रंदिवस मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि नॅशनल स्कुलगेम्समधे चांगली कामगिरी करण्याची तयारी सुरु केली. याठिकाणी उषा यांनी उत्तम कागिरी केली. त्यावेळी ओ. एम. नाम्बियार या त्याकाळच्या एका प्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षकाने पी. टी. उषा यांची कामगिरी पाहिली आणि ते फार प्रभावित झाले. त्यांनी त्यावेळीच उषा यांना प्रशिक्षण देण्याचा चंग बांधला. नाम्बियार यांच्याकडून प्रशिक्षण घेणे उषा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.

असं म्हणतात की नाम्बियार यांनी पी. टी. उषा यांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना उत्तम धावपटू बनवले. एका छोट्या गावातील मोडकळीस आलेल्या रस्त्यावर पळणारी पी. टी. उषा लवकरच ऑलिम्पिकच्या ट्रॅकवर पळू लागली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले. त्यांनी एक एक करत अनेक पदके जिंकली.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

१९८० साली मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते. पण ही एक ऑलिम्पिक त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती, ८० मीटरच्या शर्यतीत त्यांना पाचवे स्थान मिळाले. कुठलंही पदक न मिळवता त्यांना भारतात परतावे लागले.

मॉस्को येथील ऑलिम्पिक स्पर्धेत खराब प्रदर्शन केल्यानंतर देखील त्या मागे ह्टल्या नाहीत, त्यांनी घाम गाळून आपली मेहनत घेणे सुरू ठेवले. १९८१ साली झालेल्या सिनियर इंटर स्टेट कॉम्पिटिशनमधे त्यांनी चमत्कार घडवला. त्यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे १०० मीटरच्या शर्यतीला ११.८ सेकंदात पूर्ण केले आणि २०० मीटरच्या शर्यतीला २४.६ सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

१९८२ साली दिल्ली येथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्यांनी कमाल केली आणि सिल्व्हर मेडल मिळवले. यानंतर कुवेत सिटीमध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवले. १९८५ साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भारताचा झेंडा उंचावला होता. याठिकाणी त्यांनी सहा पदके जिंकली होती. यात पाच गोल्ड आणि एका ब्रॉन्झ मेडलचा समावेश होतो. हा प्रवास येथेच थांबला नाही, १९८३ ते १९८९ सालापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी १३ सुवर्णपदकं नावावर केली.

मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे अद्वितीय यश कमावल्यामुळे त्यांना ‘क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक’ आणि ‘पय्योली एक्स्प्रेस’ या नावाने ओळखले जात होते.

एक महिला धावपटू म्हणून पी. टी. उषा यांनी अनेक पदके नावावर केली. विदेशात त्यांनी केलेल्या प्रदर्शनामुळे भारतीय महिला देखील कमी नाहीत, हे सिद्ध करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. नॅशनल गेम्समधील उत्तम प्रदर्शनसाठी १९८४ साली पी.टी.उषा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हे वर्ष पी. टी. उषा यांच्यासाठी फार आनंदाचे होते. पी. टी. उषा यांच्या कार्याची माहिती भारतीयांना त्यावेळी झाली जेव्हा त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून अनेक वेळा सन्मानित करण्यात आले. १९८६ साली उत्तम कामगिरीसाठी त्यांना आदिदासचा गोल्डन शु प्रदान करण्यात आला.

१९९१ साली पी. टी. उषा यांनी व्ही श्रीनिवासन यांच्याशी विवाह केला. २००० साली त्यांनी निवृत्ती घेतली, पण यानंतर देखील त्या थांबल्या नाहीत. त्यांनी केरळमध्ये एथलेटिक्स अकॅडमी सुरु केली ज्यात त्या नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देतात.

भारताची धावकन्या पी. टी. उषा यांचा हा संघर्षमय प्रवास निश्चितच भारतातील अनेक महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

वयाच्या दुसऱ्या वर्षी चीनच्या राजगादीवर बसलेला शापित सम्राट!

Next Post

एक तरंगते वेश्यालय : सर्वाधिक कलंकित समुद्रप्रवासाची गोष्ट

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

एक तरंगते वेश्यालय : सर्वाधिक कलंकित समुद्रप्रवासाची गोष्ट

या माणसाच्या पँटला काटेरी लांडगा चिकटला आणि 'वेलक्रो टेप'चा शोध लागला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.