The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डान्सिंग प्लेग – त्या रात्री एक अख्खं शहर शब्दशः नाचून नाचून मेलं होतं

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


संगीत आणि नृत्य हे माणसाला आनंद देणारे कलाप्रकार मानले जातात. जेव्हा कुठे संधी मिळेल त्यावेळी लयबद्ध संगीताच्या ताला-सुरांवर माणसाचे पाय थिरकतातच. नाचणे ही एका प्रकारची मानवी अभिव्यक्ती असून त्याचा सरळ संबंध माणसाच्या मानसिक स्वास्थ्याशी आहे. माणूस जेव्हा अत्यंत उत्साहात आणि आनंदात असतो त्यावेळी संगीताच्या तालावर त्याची पाऊले आपोआप थिरकू लागतात.

नृत्य जरी माणसाच्या आनंदाचे प्रतीक आहे असे आपण मानत असलो, तरी सोळाव्या शतकात युरोपात एक अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती की नाचणे हे एक प्रकारे मृत्यूला आमंत्रित करणे मानले जाऊ लागले होते.

त्यावेळी लोकांना एका विचित्र आजाराने ग्रासले होते ज्यात नाचता नाचता त्यांचा मृत्यू होत असे. वेड्यासारखे नाचता नाचता मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणारा हा आजार ‘डान्सिंग प्लेग’ म्हणून ओळखला जातो.

डान्सिंग प्लेग या डान्सची सुरुवात एका स्त्रीने केली आणि हळूहळू या नाचण्याच्या कार्यक्रमात लोक सहभागी होत गेले आणि ते अगदी बेभान होऊन नाचू लागले, त्यांनी स्वतःवरचे नियंत्रण गमावले होते. ते थांबू शकत नव्हते. ते तेव्हाच थांबले ज्यावेळी त्यांच्या शरीरातून प्राण उडाले होते. ते लोक आजारामुळे डान्स करत होते की अजून काही कारण होते, ही बाब अजूनही रहस्यमय आहे. पण हा नाच करताना तब्बल ४०० लोकांनी आपले प्राण गमावले होते.

इतिहासात ही घटना कधी घडली, याची एखादी विशिष्ट तारीख नोंदवण्यात आलेली नाही. असं म्हणतात की १५१८ साली युरोपातील स्ट्रॉसबर्ग शहरात ही घटना घडली होती. या घटनेनुसार स्ट्रॉसबर्गची रहिवाशी असलेली फाऊ ट्रॉफी नावाची महिला एकदा आपल्या घरातून नाचत बाहेर आली. संगीताची कुठलीही धून तिच्या आसपास वाजत नव्हती, पण ती अगदी बेभान होऊन नाचत होती.



तिला या गोष्टीचा फरकच पडत नव्हता की ती कुठे आणि कोणत्या अवस्थेत नाचते आहे. अगदीच कसलीही तमा न बाळगता ती नाचत होती. तिची पाऊले थांबत नव्हती. ती नाचत नाचत रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. तिच्या या नाचण्याच्या अवताराला बघून घाबरून लोक मागे सरकले. नाचताना तिच्या चेहऱ्यावर कुठलाच आनंद वाहत नव्हता. ती अत्यंत निर्विकार भावाने नाचत होती.

अनेक तास उलटले पण तिचा नाच थांबत नव्हता.

तिचे नाचणे थांबत नाही, हे एकवेळ ठीक होते पण काही काळाने तिच्या आसपासच्या लोकांची पाऊले देखील थिरकायला लागली. तेसुद्धा तिच्यासारखेच बेभान होऊन नाचू लागले. हळूहळू नाचणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली आणि तिच्या अवतीभवती एकाच वेळी तब्बल ३४ लोक नाचत होते. त्यांच्यापैकी कोणीही थांबायला तयार नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लोकांना नाचण्यासाठी कुठल्याही गाण्याची आवश्यकता नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. ते अगदीच बेभान आणि निर्विकार भाव घेऊन नाचत होते. आजूबाजूला काय घडते आहे, याचा परिणाम देखील त्यांच्यावर होत नव्हता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नाचता नाचता रात्र झाली, पण कोणीही अन्नपाणी देखील घेतलं नाही आणि नाचणे थांबवले नाही. हे लोक बहिरे झाले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळ झाली आणि दुसरा संपूर्ण दिवस असाच गेला. अजून एक सकाळ झाली आणि तो दिवस देखील तसाच अन्नपाण्याचा कणही न गिळता लोक नाचण्यात त्या लोकांनी घालवला.

आता लोक थकून जमिनीवर पडायला सुरुवात झाली होती. एक एक करत लोक खाली कोसळत होती पण आजूबाजूचे लोक थांबायचे नाव घेत नव्हते. बघता बघता १५ लोक मृत्युमुखी पडले. तरी नाच थांबला नाही. आता मात्र त्या शहराच्या प्रशासनाचे धाबे दणाणले. त्यांनी नाचणारा तो जमाव पांगवण्यासाठी आग लावली. पण याचा देखील नाचणाऱ्या लोकांवर परिणाम झाला नाही. अचानक अशाच प्रकारे लोक वेडे होऊन नाचत असल्याच्या अनेक घटना युरोपात घडत असल्याची माहिती समोर आली. अनेकांना वाटले हे भूत प्रेत आणि काळ्या जादूमुळे घडते आहे, तर अनेक लोकांच्या मते ही एक महामारी होती, जिने त्या नाचणाऱ्या लोकांना ग्रासले होते.

प्रशासन या लोकांना थांबविण्याचा प्रयत्न करत राहिले पण त्यांच्या पदरी निराशाच आली. लोक बेभान होऊन नाचत सुटले होते आणि मरतही होते. ताकद संपल्यावर लोक अन्नपाण्यावाचून तडफडून मेले होते. लोक तरीही नाचत होते. एके दिवशी सकाळी मात्र रस्ता पूर्णपणे रिकामा होता, कोणीही नाचत नव्हते. हा तमाशा थांबला होता, प्रशासनाने यानंतर एक परिपत्रक जारी केले यात हे लोक एका विचित्र प्लेगने ग्रासले असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

तब्बल ४०० लोक या विचित्र आजरामुळे मृत्युमुखी पडले होते. इतिहासकारांनी याला ‘डान्सिंग प्लेग’ असे नाव दिले. फाऊ ट्रॉफी, जिच्यामुळे हा प्लेग सर्वत्र पसरला आणि लोक नाचायला लागले, ती मात्र एकाएकी अदृश्य झाली. पुढे तिचा कुठेच मागमूस लागला नाही.

डान्सिंग प्लेगमुळे नाचणे जरी थांबले असले तरी त्या मागचे गूढ मात्र कायम राहिले आहे. युरोपात २०० व ३०० इसवी सनापासून चांडाळ आणि भूतप्रेतांच्या कथा प्रसिद्ध होत्या. लोक अंधश्रद्धाळू बनले होते, पण मध्ययुगाच्या कालखंडापर्यंत बरीच परिस्थिती पालटली होती. चमत्कार आणि सैतानी शक्तीवरून लोकांचा विश्वास उडून विज्ञानाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली होती, पण काही घटना अशा देखील घडल्या ज्यामुळे लोकांनी अनेक महिलांना चांडाळ व चेटकीण मानून जिवंत जाळले होते.

ज्यावेळी डान्सिंग प्लेगची घटना घडली त्यावेळी लोकांच्या मनात पुन्हा या चेटकीणीची भीती निर्माण झाली. त्यांना वाटले की चेटकीणीने काळी जादू केल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला होता. इतिहासकार जॉन वॉलर यांनी आपल्या पुस्तकात या घटनाक्रमाचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की लोकांना वाटले की एकत्र नाचून कुठला तरी विश्वविक्रम करण्यात येतो आहे, त्यामुळे ते नृत्य करण्यात सहभागी झाले होते. या पुस्तकात त्या नाचणाऱ्या लोकांच्या परिवाराच्या भीतीचे वर्णन करण्यात आले आहे. पण या पुस्तकात देखील या प्लेगचे मूळ कारण स्पष्ट करण्यात इतिहासकाराला अपयश आले आहे.

१५ व्या शतकात मनोविज्ञानाच्या क्षेत्रात आजच्या इतकी प्रगती झाली नव्हती. यामुळे बहुतांशी लोकांनी डान्सिंग प्लेगला काळ्या जादूचा प्रयोग म्हटले होते. लोक यामुळे चर्च आणि धर्मगुरूंच्या शरणी गेले होते. युजीन बॅकमन यांनी १९५२ मध्ये रिलिजन डान्स इन दि ख्रिश्चन वर्ल्ड या आपल्या पुस्तकात डान्सिंग प्लेगमध्ये नाचणाऱ्या लोकांनी देवाप्रतीच्या श्रद्धेपोटी हे केलं असल्याचे लिहिले आहे, ते म्हणतात की चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा भाव न ठेवता फक्त नाचत राहणे हा त्याकाळी लोकांच्या देवभक्तीचा प्रकार होता.

लोक यामुळे देवाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. ते डान्सिंग प्लेग हा कुठला आजार नव्हता असं मानतात, ते याला श्रद्धेचा एक भाग म्हणून बघतात.

आपल्या संसारिक दुःखातून मुक्त होण्यासाठी लोकांनी या सामूहिक नाचाचा कार्यक्रम केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

धर्माचा आणि भूत प्रेतांचा भाग बाजूला ठेवला तर काही शास्त्रज्ञ आणि इतिहासकार यांनी देखील या घटनेच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला आहे.

वेंडरबिल्ट कॉलेजचे प्रोफेसर टिमोथी जोन्स यांनी या घटनांना १४ व्या व १५ व्या शतकात पडलेल्या सततच्या दुष्काळाच्या घटनांना आणि त्यामुळे उद्भवलेल्या रोगांना दोषी मानले, ते म्हणाले होते की या सर्व बिकट परिस्थितीमुळे लोक मानसिकदृष्ट्या खचले होते, त्यांच्या व्यवहारावर मर्यादा आली होती, त्यांच्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला होता, यामुळे युरोपात त्याकाळी डान्सिंग प्लेगच्या घटनांमध्ये ७ टक्के वाढ झाली होती.

एडिनबर्ग विद्यापीठाच्या इवान क्रोसियर यांनी डान्सिंग प्लेगचे वेगळेच कारण सांगितले होते, त्यांच्या मते हे मंथ ऑफ हिस्टेरियामुळे त्यावेळी लोक रस्त्यावर येऊन नाचू लागली होते. डान्सिंग प्लेगच्या एका घटनेची बातमी युरोपात पसरल्यामुळे लोक मुद्दाम एकत्र येऊन नाचू लागली होते. या मागे काही कारण किंवा आजार नव्हता असं देखील त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की नाचण्यात लोक इतके गुंतले की कधी त्यांचा मृत्यू झाला हे त्यांच्या लक्षात आले नाही. दोन्हीही दावे जरी योग्य वाटत असले तरी कोणाकडे देखील हे सत्य सिद्ध करू शकेल अशी पुरावे नाहीत.

१९६२ साली टांझानिया आणि युगांडामध्ये एक ‘लाफिंग सिंड्रोम’ आला होता, यामुळे लोक अचानक हसायला लागले होते. लोक सलग एक वर्ष हसत होते, काही केल्या त्यांचे हसणे थांबत नव्हते. यामुळे १००० लोकांचा मृत्यू झाला होता.

याची सुरुवात टांझानियाच्या एका मिशनरी शाळेपासून झाली आणि हळूहळू ही महामारी पसरली आणि लोक वेड्यासारखे हसू लागले होते. तब्बल १८ महिने लोक यामुळे हसत असल्याची नोंद आहे. १८४० साली मादागास्कर आयलंडवर देखील असाच एक आजार पसरला आणि लोक पागल होऊन नाचू लागले होते. डॉक्टरांनी या लोकांना बरं करायला बेशुद्ध करणारे इंजेक्शन तयार केले पण लोक मात्र वेड्यासारखे नाचत राहिले आणि अचानक सर्वच लोकांनी नाचणे थांबवून ते सामान्यपणे वागू लागले. हे असं का घडलं हे डॉक्टरांना देखील त्यावेळी उमगलं नव्हतं.

अशा अनेक घटना वेळोवेळी घडल्या असल्या तरी स्ट्रॉसबर्गमध्ये त्यावेळी जे घडले आणि लोकं मेली हे आजवर गूढच आहे, हे गूढ अजूनही उकललेले नाही. लोक अचानक का नाचू लागले आणि अचानक का थांबले, याचे समाधानकारक उत्तर कोणाकडेच नाही, आहेत त्या फक्त गूढकथा आणि कॉन्स्पिरसी थियरीज् !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आग्र्याच्या तुरुंगात काम करणाऱ्या अब्दुलसोबत राणी व्हिक्टोरियाचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या

Next Post

आपल्या फेव्हरेट स्वीप शॉटवर बंदी घालायची मागणी गोलंदाजांनी ICCकडे केली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आपल्या फेव्हरेट स्वीप शॉटवर बंदी घालायची मागणी गोलंदाजांनी ICCकडे केली होती

सायमन गो बॅक, छोडो भारत हे नारे या क्रांतिकारकाने दिले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.