The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तूतनखामेन’च्या शापित थडग्याचा शोध घेणाऱ्या सर्वांचाच रहस्यमय मृत्यू झाला होता

by द पोस्टमन टीम
24 May 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ज्यावेळी इजिप्तच्या थडग्यांची गोष्ट होते त्यावेळी सर्वाधिक चर्चेत येणारे नाव आहे तूतनख़ामेनचे, खामेन इजिप्तचा तो राजा होता, ज्याचा शोध पुरातत्व संशोधक हॉवर्ड कार्टर यांनी घेतला होता. त्याच्या थडग्यात त्याचे सर्व गुपितं दडलेली होती.  असं म्हणतात की या संशोधनानंतर जगभरातील पुरातत्व संशोधकांचे लक्ष इजिप्तकडे वेधले गेले.

९ मे १८७४ रोजी हॉवर्ड कार्टर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एक कलाकार होते आणि त्यांचे लंडनमध्ये फार मोठे नाव होते. लहानपणापासून हॉवर्ड यांना काही गोष्टी समजून घेण्यात अडचणी येत होत्या. यामुळे सामान्य मुलांप्रमाणे त्यांना शाळेत पाठवण्यात आले नाही. याउलट त्यांना नारफोक येथे त्यांच्या आत्याकडे पाठवले. इथे त्यांना घरच्या घरी शिक्षण देण्यात आले.

त्यांचे वडील पुरातत्व संशोधकांसोबत काम करायचे. त्यांच्यामुळे हार्वडचा इजिप्तच्या पुरातत्व वस्तूंशी संबंध येण्यास सुरुवात झाली. हॉवर्ड यांना त्या वस्तूंचे आकर्षण होते. ते त्यांचीच चित्रे काढत बसत असत. त्यांनी लहान वयातच पुरातत्व संशोधकांसमवेत काम करण्याचे निश्चित केले. त्यांनी आपल्या चित्रकलेवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. यातून त्यांना एक नोकरी मिळाली.

१८९१ साली कार्टर यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी पुरातत्व संशोधकांसमवेत काम करण्यास सुरुवात केली. वडिलांच्या ओळखीमुळे त्यांना नोकरी मिळवण्यात जास्त अडचण आली नाही.



१७ वर्षांच्या वयात त्यांनी कामाला सुरुवात केली. नोकरीच्या वेळी त्यांनी अनेक पुरातत्व खात्यातील मंडळीसोबत काम केले. लहान वयातच त्यांनी मोठे ज्ञान कमावले. नोकरी केल्यानंतर त्याने पुरातत्व संशोधक होण्याचे ठरवले.

त्यांना गरज होती ती एका फायनान्सरची, जो त्यांच्या संशोधनावर पैसे लावण्याची तयारी दाखवू शकेल. फायनान्सरच्या शोधात त्यांनी अनेक वर्षे वाया घालवली. अखेरीस त्यांना एक फायनान्सर मिळाला. १९०७ साली लॉर्ड कॉर्नरवोन यांनी हॉवर्ड कार्टर यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला. त्यांनी हॉवर्ड यांना इजिप्तच्या प्रसिद्ध तूतनखामेन येथील थडग्याचा शोध घ्यायला सांगितला. त्याकाळी संपूर्ण जग तूतनखामेनचा थडगा शोधण्यात व्यस्त होते. लोकांना त्याच्या अस्तित्वाची कल्पना होती, पण ते थडगं नेमकं कुठे आहे, याबद्दल लोक साशंक होते.

एका टीमला बरोबर घेऊन हॉवर्ड तूतनखामेनच्या थडग्याच्या शोधात निघाले होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली. थडग्याच्या शोधात त्यांना बरीच मेहनत करावी लागत होती. पण त्यांना थडगं सापडत नव्हतं. दरवेळी ते नवीन कबरीचा शोध घ्यायचे आणि त्यांना वाटायचे की त्यांना तूतनखामेनचं थडगं सापडलं, पण त्यांचा भ्रमनिरास व्हायचा.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

तूतनखामेनच्या थडग्याच्या नादात त्यांनी इतर अनेक थडगे शोधून काढली होती. त्यांनी इजिप्तमध्ये अनेक राजांच्या ममी शोधल्या होत्या. इतकेच नाहीतर प्राचीन इजिप्तमधील काही मंदिरांचा शोध देखील हॉवर्ड कार्टर यांनी लावला होता. अनेक मंदिरे, अनेक भग्नावशेष, अनेक थडगी शोधल्यानंतर देखील त्यांना हवा असलेला तूतनखामेनचा थडगा हावर्ड यांच्या हाती लागत नव्हता.

१९०७ ते १९२२ एवढ्या दीर्घ कालखंडात त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांना पैसे पुरवणाऱ्या फायनान्सरला देखील आर्थिक अडचण आली होती आणि त्याचा देखील हॉवर्ड यांच्यावरील दबाव वाढत चालला होता. फायनान्सरने त्यांना इजिप्तमध्ये जाऊन थडगं शोधण्याची शेवटची संधी दिली. यावेळी जर थडगं शोधून काढण्यात अपयश आलं तर त्यांना पैसे देणे बंद करण्यात येईल, अशी सक्त ताकीद हावर्ड यांना देण्यात आली होती. यामुळे करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाल्याने हॉवर्ड यांनी तत्काळ आपल्या शोधमोहिमेला गती दिली.

त्यांनी एका भुयारघराचा शोध लावला. हे भुयारघर त्यांनी या अगोदरच शोधून ठेवली होती, फक्त त्यांनी कधी त्या त्याचे दरवाजे उघडले नव्हते. यावेळी त्यांनी दरवाजे उघडले तर त्यांच्या आनंदाला उधाण आले. इतके दिवस इजिप्तच्या रखरखीत वाळवंटात ज्या थडग्याचा शोध घेण्याचा प्रयत्न हॉवर्ड करत होते, तो त्यांनी आधीच शोधून काढला होता, फक्त दुर्लक्ष केल्यामुळे ते त्या थडग्याला जगासमोर आणू शकले नव्हते.

तूतनखामेनच्या थडग्याची ओळख पटली आणि हॉवर्ड यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

तूतनखामेनच्या थडग्याचा शोध हॉवर्ड यांनी लावला आणि त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली खरी, पण यानंतर त्यांना एका पारलौकिक संकटाचा सामना करावा लागला. असं म्हणतात की इजिप्तमधील थडगे हे शापित आहेत. जो त्या थडग्यांना हात लावतो, तो मरतो. पण हॉवर्ड यांचा या अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता, पण तूतनखामेनचं थडगं जगासमोर आणल्यानंतर एक एक करून त्यांच्या टीममधील प्रत्येक सदस्याचा मृत्यू होत गेला.

७ वर्षांत त्यांच्या टीमच्या १२ सदस्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे तूतनखामेनच्या थडग्याचे एक वेगळेच भय लोकांच्या मनात बसले होते. यादरम्यान १९२३ साली हॉवर्ड यांच्या फायनान्सरचा देखील मृत्यू झाला. असं असलं तरी त्याच्या पत्नीने हॉवर्ड यांना पैसे दिले होते. हॉवर्ड यांनी त्या पैशाच्या बळावर शोधमोहीम देखील राबवली होती. ते नेहमी तूतनखामेनचं थडगं शापित आहे हे नाकारायचे.

१९३९ साली वयाचा ६४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अद्याप त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. हॉवर्ड यांच्या मृत्यूमुळे तूतनखामेनच्या थडग्याचा शाप खरा असल्याचे लोक मानायला लागले.

तूतनखामेनच्या थडग्याविषयी अनेक रहस्ये हॉवर्ड यांना माहिती होती. पण त्यांच्या मृत्यूमुळे ते रहस्य अजूनही कायम आहे. थडगं शापित आहे की नाही हा विषय वादातीत असला तरी हावर्ड यांच्या संशोधनामुळे इजिप्तच्या पिरॅमीड आणि प्राचीन संस्कृतीकडे जगाचे लक्ष आकर्षिले गेले होते.

यानंतर इथे पुरातत्व संशोधकाच्या रांगा लागल्या त्या कायमच्याच….


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दुसऱ्या महायु*द्धात हा कार्यकर्ता चक्क धनुष्यबाण घेऊन लढला होता

Next Post

हेन्री फोर्डने ‘लवासा’पेक्षा भारी सिटी उभारली होती जी लवासापेक्षा जास्त फ्लॉप गेली

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

हेन्री फोर्डने 'लवासा'पेक्षा भारी सिटी उभारली होती जी लवासापेक्षा जास्त फ्लॉप गेली

मीर कमरुद्दीन - मुघलांसोबत बंड करणारा पहिला निझाम

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.