The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिहीरकुल – आपल्या क्रौर्याने भारतभर तांडव घालणारा ‘हूण’ सम्राट

by द पोस्टमन टीम
8 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हुणांचा ज्यावेळी उल्लेख करण्यात येतो त्यावेळी हुण शासक आत्तीला हुण याचे नाव डोळ्यासमोर येते. याने सम्राट बनल्यावर आपल्या साम्राज्याचा विस्तार आशियापासून युरोपपर्यंत केला होता. इतकंच नाही त्याच्यामुळे हुण वंशाचा प्रसार संपूर्ण आशिया खंडात झाला होता. हा आत्तीला कधी भारतात येऊ शकला नाही पण भारतातील गुप्त वंशियांच्या राजवटीला त्याने हादरा दिला होता. त्याने एकावेळी आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. यामुळेच लोक त्याला भारतातला ‘आत्तीला’ म्हणत.

मिहिरकुल हुणाच्या क्रू*रतेमुळे हुण साम्राज्याचा मोठ्या वेगाने विस्तार झाला. युरोपानंतर आशिया खंडात त्याने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. हुण आक्र*मक हे एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे मोठ्या जलदगतीने प्रवास सुरु करत. ते ज्या ठिकाणी जात तिथे ते स्थानिक धर्माचा स्वीकार करत. त्यांचा स्वतःचा कुठला धर्म नव्हता. त्यामुळे ज्याच्या संपर्कात ते यायचे, त्याच्या धर्माचा स्वीकार करायचे.

पाचव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी भारतात प्रवेश करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. परंतु प्रत्येक वेळा ते असफल होत होते. 

राजा स्कंद गुप्ताने अनेकवेळा त्यांचा पराभव केला होता. इसवी सन ५०० साली श्वेत हुणांचा राजा तोरमण याने माळवा प्रदेश जिंकून घेतला होता. यातूनच त्यांचा भारतात विस्तार होण्यास सुरुवात झाली. ते हळूहळू मजबूत झाले. तोरमणने आपल्या सैन्याला मजबूत करत मारवाड आणि पश्चिम राजस्थानवर ह*ल्ला चढवला. एक एक करत त्यांनी तिथल्या सर्व राज्यांवर विजय संपादन केला. पण इथेच त्यांचा विजयरथ थांबला नाही, त्यांनी गुप्त राजांच्या साम्राज्यावर आक्र*मण करण्याचा प्रयत्न केला.

इसवी सन ५१५ साली तोरमाणनंतर मिहिरकुल गादीवर विराजमान झाला. तोरमण हा एक कुशल शासक होता. परंतु भारतातील त्याचे विजयी अभियान त्याच्यासोबतच समाप्त झाले नाही. त्याचा मुलगा मिहिरकुल हा त्याहून क्रू*र शासक होता. त्याने त्याची राजधानी पंजाबमधून सियालकोटला स्थलांतरित केली. इथेच त्याने त्याच्या विजयी अभियानाचा शुभारंभ केला. त्याचे हे अभियान अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत अविरत सुरु होते. त्याने आपल्या क्रू*रतेचे एक वेगळे उदाहरण प्रस्तुत केले.



त्याला सर्व हूणांनी आत्तीला हे पदवी बहाल केली.

एकदा मिहिरकुलने बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी बौद्ध भिक्षूंना आमंत्रित केले. मिहिरकुल हा एक क्रू*र शासक होता, याच कारणामुळे बौद्ध भिक्षुकाने स्वतः न जाता आपल्या सेवकाला त्याच्याकडे पाठवले. ज्यावेळी मिहिरकुलाला याची माहिती मिळाली त्यावेळी तो क्रोधाने पेटून उठला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्याने बौद्ध धर्मियांच्या सर्वनाशाची प्रतिज्ञा केली आणि यानंतर त्याने बौद्धांचा रक्तपात करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक बौद्ध मंदिरे नष्ट केली.

भारतात हुणांच्या राज्याची सुरुवात जरी तोरमाणच्या काळात झाली तरी त्याला धार आणायचे कार्य मिहिरकुलने पार पाडले. आपल्या क्रू*र आणि हिं*सक यु*द्ध पद्धतीच्या बळावर त्याने कश्मीरसहित अनेक भारतीय राज्यांवर विजय संपादन केला. सम्राट अशोक आणि विक्रमादित्य यांच्यानंतर तो भारताचा एकवेव चक्रवर्ती सम्राट बनला. मिहिरकुलने आपल्या विजयी अभियानात प्रसिद्ध नालंदा विद्यापीठावर विजय संपादन केला. मिहिरकुलने हा ह*ल्ला स्कंदगुप्ताच्या शासन काळात केला होता. पुढे स्कंदगुप्ताच्या वंशजांनी या विद्यापीठाची पुन्हा उभारणी केली होती.

मिहिरकुलाने चारी दिशांना आपली द*हश*त निर्माण केली होती. त्याच्यासमोर कोणाचाच निभाव लागत नव्हता. यातूनच त्याला अहंकार चढला. यातूनच त्याचा अंताकडे प्रवास सुरु झाला. इसवी सन ५३३ साली त्याला भावाकडून करण्यात आलेल्या विद्रोहामुळे पश्चिमेकडे यशोधर्मनकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही, त्याला यामुळे आपले राज्य सोडून पळ काढावा लागला होता.

मिहिरकुलाला पराभव सहन झाला नाही. त्याने आपल्या सैन्य शक्तीला एकत्र करत पटण्याच्या अवतीभवती नवीन साम्राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले. त्याला हे सहज वाटणारे कार्य मुळात प्रचंड कठीण होते.

राजा बालादित्यने त्याला तिथून हुसकावून लावले. यामुळे मिहिरकुलाला स्वतःचा जीव वाचावत पळावे लागले. असं म्हणतात की अंतसमयी तो काश्मिरात गेला होता. यानंतर त्याचे नाव कोणी ऐकले नव्हते. यु*द्धातील पराभवामुळे तो पार खचला होता. हेच त्याच्या मृत्यूचे कारण बनले होते.

मिहिरकुल हा कुठल्या धर्म जातीचा नव्हता, त्याचे पूर्वज मध्य आशियातून भारतात आले होते. हुण लोक ज्या धर्माच्या संपर्कात आले त्याचेच अनुयायी बनले. 

क्रू*र असला तरीही मिहिरकुल हा एक कट्टर शिवभक्त होता. मंदोसर येथील एका शिलालेखानुसार त्याने यशोधर्मनशी झालेल्या यु*द्धाच्या आधी त्याने भगवान शंकरासमोर माथा टेकवला होता. त्याच्या काळातील नाण्यांवर जयतु वृष आणि जयतु नंदी लिहिलेले आढळून येते, त्याने काश्मिरातील महिरेश्वर मंदिर आणि इतर अनेक मंदिरे उभारली होती.

त्याचे एकच लक्ष्य होते ते म्हणजे विजय प्राप्त करणे. यासाठी त्याने अनेक लोकांच्या प्रेतांचे डोंगर रचले होते. त्याच्या याच हिं*सक प्रवृत्तीने त्याला इतिहासात सन्मानाचे स्थान मिळाले नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा आहे चंद्रावर दफन केलेला एकमेव माणूस..!

Next Post

जगाला स्पर्शही न करता जग बदलणाऱ्या चिमुकल्याची गोष्ट

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जगाला स्पर्शही न करता जग बदलणाऱ्या चिमुकल्याची गोष्ट

या तेरा वर्षाच्या मुलाने बनवलीये साबणाचं पाणी रिसायकल करणारी वॉशिंग मशीन

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.