The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहेत जगाच्या इतिहासातील माहित नसलेली महत्त्वाची यु*द्धं..!

by द पोस्टमन टीम
7 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगाच्या इतिहासात अनेक यु*द्धं होऊन गेली आहेत. कित्येक यु*द्धांचे दीर्घकालीन परिणाम आपण पाहिलेले आहेत. आज आपण अशाच काही युद्धांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे जगाचा इतिहासच बदलून गेलाय पण, या यु*द्धांबद्दल आजही फार कमी लोकांना माहिती असेल.

त्सुशिमाचे यु*द्ध १९०५

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानची महत्त्वाकांक्षा वाढली होती. त्याला मांचुरिया आणि कोरिया यांच्यात विभाजन घडवून दोन स्वतंत्र, पण प्रभावी गट निर्माण करायचे होते. परंतु रशियाला त्यांची ही कल्पना अजिबात आवडली नाही आणि रशियाने त्यांच्या या कामात खोडा घातला. याचा सूड उगवण्यासाठी जपानने ८ फेब्रुवारी १९०४ रोजी आर्थर बंदरावरील रशियन सैन्यावर ह*ल्ला केला.

अचानक झालेल्या या ह*ल्ल्याला तोंड देण्यास रशियन सैन्य सज्ज नव्हते आणि या यु*द्धात त्यांचा पराभव झाला. यानंतरही रशियाने जपानची खरी ताकद ओळखली नाही. एकामागून एक पराभव त्यांच्या वाट्याला येत गेले.

आर्थर बंदर तर जपानच्या ताब्यात गेलेच, पण, रशियन सैन्याचेही बरेच नुकसान झाले. एकामागून एक पराभवांची मालिका सुरु असतानाही रशियन झार निकोलस दुसरा याला मात्र रशियाच्या बाल्टिक सैन्यावर खूप भरोसा होता. रशियन ॲडमिरल झिनोवी रोझेसट्वेंस्की जपानच्या ॲडमिरलला त्याच्या पायावर लोळण घायला भाग पाडेल अशी स्वप्नं ते पाहत होते. परंतु त्सुशिमा समुद्रधुनीमध्ये सुरु झालेल्या या यु*द्धात दोनच दिवसात रशियाची तीन जहाजे पाली पडली.

संपूर्ण जग दोन्ही देशातील यु*द्धांचा हा तमाशा फक्त पाहत होते. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी रशियाची समजूत काढली आणि दोन्ही देशात सामंजस्य करार घडवून आणला. या करारानुसार जपानची कोरियावरील सत्ता रशियाला मान्य करावी लागली आणि आर्थर बंदर जपानकडे सुपूर्द करावे लागले. याशिवाय, सखालीन इस्लानचा काही भाग आणि लीओतुंग पेनिन्सुलाचा प्रदेशही जपानला द्यावा लागला.



या यु*द्धात विजय मिळाल्यानंतर जपानकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. जपान एक आधुनिक सत्ताधारी देश म्हणून स्वतःची ओळख सिद्ध करू पाहत होता. जपानच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा याच काळात वाढल्या.

१०६६ सालचे हास्टिंगचे यु*द्ध

हास्टिंगचे यु*द्ध हे नॉर्मंडीच्या ड्युक विल्यम आणि इंग्लडचा राजा हेरॉल्ड गॉडविन्सन यांच्यामधे लढले गेले. १२ ऑक्टोबर १०६६ साली राजा हेरॉल्ड गॉडविन्सनचे सैन्य सेन्लॅक हिलजवळ तळ ठोकून बसले होते. एका यु*द्धावरून नुकतेच परतलेले हे सैन्य खूप थकून गेले होते. परंतु, नॉर्मंडीच्या ड्युकने ह*ल्ला केल्यावर यु*द्ध सुरु झाले तेव्हा ते आपल्याभोवती संरक्षक भिंत निर्माण करून आपल्या पारंपारिक पद्धतीने लढू लागले. शत्रू सैन्य ताज्या दमाचे होते आणि त्यांच्याकडे मजबूत घोडदळ आणि पायदळ होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसभर यु*द्ध सुरूच होते परंतु हेरॉल्ड गॉडविन्सनच्या सैन्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. परंतु दिवस संपला आणि सैन्याचा वेढा सैल झाला.

नॉर्मन्सनी इंग्लिश सैन्य ढिले पडल्याचे पहिले आणि त्यांनी पूर्वकल्पना नसताना निश्चिंत असलेल्या गॉडविन्सनच्या सैन्यावर ह*ल्ला चढवला. अचानक झालेल्या या ह*ल्ल्यात गॉडविन्सनच्या सैन्याचा पाडाव झाला. खुद्द गॉडविन्सनदेखील या ह*ल्ल्यात मृत्युमुखी पडला. एकामागून एक करत सर्व इंग्लिश सैनिकांना मारून टाकण्यात आले.

या युद्धाने युरोपचा इतिहासच बदलून गेला. इंग्लंडवर परकीय आक्र*मकांची सत्ता स्थापन झाली ज्यामुळे त्यांच्या समाजिक आणि राजकीय जीवनातही आमूलाग्र बदल झाले.

लेचफेल्डचे यु*द्ध (९५५)

हंगेरीच्या लुटारूंनी मध्य युरोपात प्रचंड लुटालूट सुरु केली होती. यांच्या द*हश*तीने लोक स्वतःहून स्वतःजवळचे दागिने किंवा पैसे देऊन टाकत. अशा या हंगेरी लुटारूंना फ्रँक्स म्हणजेच चार्लमॅग्नेच्या पूर्वेकडील प्रदेशातही खूप रस होता. या प्रदेशात जर अंतर्गत वाद उफाळलाच तर हे मॅग्योर म्हणजेच हंगेरी लुटारू या प्रदेशवर ह*ल्ला करण्यास सज्ज होते.

९३६ मध्ये ओट्टो नावाचा एक सॅक्सन नेता इस्ट फ्रँक्स आणि सॅक्सन यांच्या वतीने गादीवर बसला. आपण चार्लमॅग्नेचे खरे वंशज आहोत असा त्याचा दावा होता. हळूहळू ओट्टो एक हुकुमशहा झाला त्याच्या जुलुमाने इस्ट फ्रँक्स आणि सॅक्सन जनता त्रस्त झाली.

ओट्टोचा मुलगा लुईडॉल्फ ऑफ सर्बिया यानेच एक दिवस आपल्या पित्याच्या या हुकुमशाहीविरोधात बंड पुकारले. ओट्टोला त्याच्या घरातूनच विरोध होतो आहे हे पाहून राज्यातील अनेक छोटे सरदार या बंडखोरीत सामील झाले. लुईडॉल्फ ऑफ सर्बियाला त्याच्या मेव्हण्याचाही पाठींबा होता. यामुळे इस्ट फ्रँक्समध्ये अंधाधुंदीचे वातावरण तयार झाले आणि अशा परिस्थितीत हंगेरी लुटारूंनी म्हणजेच मॅग्योरनी देखील आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. ९५४ मध्ये त्यांनी फ्रांकोनिया आणि बव्हारियामधे ह*ल्ला केला. इथे त्यांनी प्रचंड लुटालूट माजवली. बरगंडी, फ्रांस आणि लोंबार्डीमध्येही त्यांनी उच्छाद मांडला.

परंतु, ओट्टोच्या सैनिकांनी या सगळ्याला जशास तसे उत्तर दिले. मॅग्योर गटातील शेवटचा सैनिक संपत नाही तोपर्यंत त्यांनी लढाई सुरूच ठेवली. तीन दिवसात अगदी एकेका मॅग्योरला त्यांनी शोधून शोधून मारले आणि हे यु*द्ध संपले. मॅग्योर लोकांची द*हश*त तर संपलीच, पण त्यामुळे ओट्टो शक्तिशाली राजा म्हणून पुढे आला. ९६२ मध्ये बारावा जॉन याने ओट्टोला रोमचा सम्राट घोषित केले. ओट्टोने रोमन साम्राज्याला नवसंजीवनी तर दिलीच, पण त्याने आजच्या जर्मनीचाही पाया घातला.

मेटॉर्सचे यु*द्ध (इसपू २०७)

इसपू २०७ मध्ये झालेल्या या मेटॉर्सच्या यु*द्धामुळे रोमन साम्राज्याला एक नवी दिशा मिळाली. त्यावेळी रोम आणि कार्थेज या जगातील दोन महासत्ता होत्या. दुसऱ्या पुनिक यु*द्धाच्या काळातच हे छोटेसे यु*द्ध होऊन गेले.

कॅर्थागो हस्दृबल बरका हा कॅर्थागो सैन्याचे नेतृत्व करीत होता. तर जीअस क्लॉडिअस निरो आणि मार्कस लीव्हीयस हे रोमन सैन्याच नेतृत्व करीत होते. दोन्ही सैन्य पराक्रमी, मेहनती आणि शिस्तबद्ध होते. रोमने यातील तिन्ही यु*द्धे जिंकली होती. या यु*द्धात कार्थाजीनीयस राज्याचे नावच कायमचे मिटले.

यु*द्धांचा परिणाम हा जितका गंभीर तितकाच दूरगामीही असतो. या चार यु*द्धांबद्दलची ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला हे पटलेच असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मार्व्हलचा थॉर या लढवय्या जमातीचा देव आहे

Next Post

नील आर्मस्ट्राँगच्या मृत्यूचं प्रकरण त्याच्याच पोरांनी पैसे घेऊन दाबलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

नील आर्मस्ट्राँगच्या मृत्यूचं प्रकरण त्याच्याच पोरांनी पैसे घेऊन दाबलं होतं

ज्याच्याशिवाय आपलं पान हलू शकत नाही त्या इंटरनेटचा शोध नेमका कोणी लावला?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.