The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ मध्ये भरती कसं व्हायचं?

by द पोस्टमन टीम
27 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सैन्यात भरती झालो तरच आपल्याला देश सेवा करण्याची संधी मिळते असा अनेकांचा समज असतो. देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी फक्त सैनिकांवरच असते असे नाही तर इतरही अनेक घटक यासाठी काम करत असतात. सैनिक प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढून, प्रसंगी प्राणत्याग करून देशाचे संरक्षण करतात आणि इतर नागरिक देशांतर्गत स्थैर्य आणि शांती कायम ठेवण्यास हातभार लावून देश सेवा करत असतात.

पण, देशसेवा करणारा एक तिसरा घटक असतो जो खूपच दुर्मिळ असतो, त्याबद्दल लोकांना फारशी काही माहिती नसते. हा तिसरा घटक म्हणजे देशासाठी काम करणारे गुप्तहेर.

सैन्यात किंवा लष्करात भरती होण्याचे प्रशिक्षण उघडपणे दिले जाते, पण गुप्तचर संस्थेत कसे भरती होतात किंवा देशासाठी गुप्तहेर म्हणून काम करायचे असल्यास कोणते प्रशिक्षण घ्यावे लागते, काय तयारी करावी लागते, ही भरती कधी कुठे होते याबद्दल सामान्य नागरिकांना अजिबात कल्पना नसते. कारण, ही सगळी प्रक्रिया पूर्णतः गुप्त पद्धतीने पार पाडली जाते.

अनेक चित्रपटातून आपण बघितले आहे की हे गुप्तहेर कशा पद्धतीने काम करतात. आपला जीव धोक्यात घालून ते देशासाठी बातम्या कशा मिळवतात. हे काम करत असताना त्यांना त्यांच्या खाजगी जीवनाला पूर्णतः तिलांजली द्यावी लागते.

ते काय काम करतात, कुणासाठी करतात, कुठे करतात याबद्दल पूर्णतः गोपनीयता पाळावी लागते. स्वतःचा जीव धोक्यात घालून ही कामगिरी करत असताना त्यांना कधीची शाबासकी किंवा बक्षीस मिळत नाही ना कधी कुणी त्यांचे तोंडभरून कौतुक करतं. पकडले गेले तरीही हा आपल्याच देशाचा नागरिक आहे, हे सुद्धा कोणी कबुल करत नाही. देशसेवेचे व्रत अंगीकारूनही त्यांना एकप्रकारे हेटाळणीचेच जीवन जगावे लागते.



‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. रॉचे सदस्य कसे निवडले जातात हे मात्र कुणालाही माहिती नाही, कारण रॉ आपल्या कामकाजाची माहिती कुणालाही देत नाही. शक्यतो रॉचे सदस्य हे पोलीस दल किंवा लष्करी दलातूनच निवडले जातात. कारण, यासाठी पूर्ण देश समर्पण करणाऱ्या व्यक्तीची गरज असते.

गुप्तहेर म्हणून काम करायचे तर, शारीरिक मानसिक आणि बौद्धिक तपासणी केली जाते. लष्करी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना याचा अनुभव असतोच म्हणून रॉ त्यांना जास्त प्राधान्य देते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

कधी कधी विद्यापीठातूनही रॉ सदस्यांची निवड केली जाते. परंतु अशा प्रकारे खूपच कमी लोकांची निवड केली जाते. रॉचे सदस्य होण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे खूपच गरजेचे आहे. रॉमध्ये नव्याने भरती झालेल्या सदस्यांवर रॉच्या वरिष्ठ सदस्यांची नजर असते. या पदासाठी निवड होणे वाटते तितकी सोपी गोष्ट अजिबातच नाही. रॉमध्ये भरती होण्यासाठी अनेक खडतर परीक्षा पास कराव्या लागतात.

यातील पहिला टप्पा असतो नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट. या परीक्षेत उमेदवाराची बौद्धिक क्षमता तपासली जाते. कोणत्याही प्रसंगात किती बाजूने आणि किती जलद विचार करू शकता याची चाचपणी केली जाते.

त्यानंतर येतो प्रशिक्षणाचा टप्पा इथेही संपूर्ण बौद्धिक कुवत अजमावली जाते. त्यानंतर मानसिक आणि शारीरिक क्षमता तपासली जाते. ‘रॉ’मधे भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना खूप खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर कळते की, गुप्तहेर बनणे म्हणजे काही खायचे काम नाही. या प्रशिक्षणादरम्यान शरीरिक चाचणी घेतली जाते.

प्रत्यक्ष गुप्तहेर म्हणून काम करताना उपयोगी ठरतील अशी अनेक कौशल्ये इथे शिकवली जातात. शस्त्रास्त्रे चालवण्याचे तर प्रशिक्षण दिले जातेच मात्र शस्त्राशिवाय लढण्याची वेळ आलीच तर तेही शिकवले जाते. स्व-संरक्षणाचे हे प्रशिक्षण घेताना खूपच दमछाक होते. इथे प्रशिक्षण दिल्यानंतर पुढील प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या देशात पाठवले जाते. तिथे जाऊनही लढता येणे महत्वाचे आहे, म्हणून हे प्रशिक्षण असते.

रॉ सदस्यांना दिले जाणारे मुलभूत प्रशिक्षण निव्वळ दहा दिवसांचे असते. या प्रशिक्षणा दरम्यान त्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप कशाप्रकारचे असेल हे समजवून दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिले जाते ऍडव्हान्स प्रशिक्षण.

यावेळी त्यांना वेगवेगळ्या अहवालांचा अभ्यास करावा लागतो. ज्यामुळे प्रत्यक्ष काम कसे असते याची माहिती मिळते. रॉबद्दल सगळी माहिती त्यांना दिली जाते. विविध देशांच्या गुप्तचर यंत्रणा, त्यांची काम करण्याची पद्धती यांचीही माहिती दिली जाते. हे प्रशिक्षण कधीकधी एक ते दोन वर्षेही चालते.

या प्रशिक्षणादरम्यान खडतर परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते आणि त्यात या उमेदवारांना आपली योग्यता सिद्ध करण्याचे आव्हान दिले जाते. यासाठी कुठलेही नाटक केले जात नाही तर “रिअल लाईफ” प्रसंगात आपली योग्यता कसे सिद्ध करतात हे तपासले जाते.

त्यांना एखाद्या मिशनवर पाठवले जाते. यामध्येच उमेदवारांना आपला बचाव कसा करावा हेही सांगितले जाते. इतरांच्या नजरेसही न पडता, कशा पद्धतीने चलाखीने आपले काम करायचे हेही शिकवले जाते.

आपले काम करवून घेण्यासाठी आवश्यक त्या लोकांशी संपर्क कसा साधायचा. त्यांच्याकडून आपल्याला हवी ती माहिती कशी काढून घ्यायची आणि ती माहिती आपल्या यंत्रणेपर्यंत कशी पोहोचवायची हे सगळे शिकवल्यानंतर मग त्यांची अंतिम निवड केली जाते.

गुप्तहेर म्हणून जगणे वाटते तितके सोपे नाही कारण, गुप्तहेराला स्वतःची ओळख नसते. त्याला अनेक रूपे, अनेक नवे अनेक वेश धारण करावे लागतात. त्याच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असते, त्यामुळे त्याचे वैयक्तिक जीवन तर राहतच नाही. चित्रपटात गुप्तहेर म्हणजे किती थरारक अनुभव वाट्याला येतात आणि ते जगताना तो हिरो किती आनंद लुटतो हे दाखवले जात असले तरी तो चित्रपट असतो. वास्तवात असा कुठलाही थरार नाही तर पावलोपावली फक्त सतर्कता बाळगावी लागते.

एखाद्या देशात पकडले गेलोच तर आपलाच देशसुद्धा अशावेळी वाचवण्यासाठी पुढे येत नाही. खुद्द रॉदेखील ओळख नाकारते. जीव धोक्यात घालून काम करत असले तरी गुप्तहेरांना त्यांच्या या कामगिरीसाठी कुठलेही मेडल मिळत नाही. प्राण गेल्यानंतरही कोणी त्यांना मानवंदना देत नाही. साधे कौतुकाचे आणि श्रद्धांजलीचे दोन शब्दही कुणी बोलत नाही.

रवींद्र कौशिक यांचे नाव गुप्तहेरांमध्ये खूपच आदराने घेतले जाते. कारण, पाकिस्तानी सैन्यात भरती होऊन पाकिस्तानी लष्कराची गुप्त माहिती देण्याची जोखीम त्यांनी पत्करली होती. सर्वसामान्य घरातून आलेले रवींद्र यांच्याकडे उत्तम अभिनय कौशल्य होते म्हणूनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. कित्येक वर्षे त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सतर्कतेने पार पडली.

पण, शेवटी पाकिस्तानी सैन्याला त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. पाकिस्तानी तुरुंगात त्यांचा अतोनात छळ करण्यात आला परंतु त्यांनी देशाविषयी कुठलीच गोपनीय माहिती सांगितली नाही.

१६ वर्षे त्यांना असेच हालहाल करून मारण्यात आले पण, त्यांनी कधीही देशाविरोधात तोंड देखील उघडले नाही. किती ती देशनिष्ठा आणि किती तो त्याग!

खरोखरच कसलीही अपेक्षा न करता जीव टांगणीला लावून देशसेवा करणे म्हणजे खूपच धैर्याचे काम आहे. आजपर्यंत अशा अनेक गुप्तहेरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थितपणे पार देखील पडली आहे. अशा सर्व अज्ञात गुप्तहेरांबद्दल सच्चे भारतीय या नात्याने आपण आदरांजली व्यक्त करूया.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या ‘गाझी’चा भुगा केला होता

Next Post

या सेनापतीमुळे चंगेज खान सिकंदरहून मोठं साम्राज्य उभारू शकला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या सेनापतीमुळे चंगेज खान सिकंदरहून मोठं साम्राज्य उभारू शकला

भेटा जगातील सर्वात अलिप्त आणि खुंखार जमातीशी संपर्क साधणाऱ्या पहिल्या महिलेला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.