The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज स्टाईल स्टेटमेंट बनलेल्या सनग्लासेसचा इतिहास माहित आहे का..?

by Nachiket Shirude
22 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


आज सनग्लासेस लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. सनग्लासेसशिवाय फॅशनचे जग अपूर्ण आहे. सनग्लासेसचा इतिहास देखील असाच अपरिचित असून त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सनग्लासेसचा सर्वात पहिल्यांदा वापर कुठे करण्यात आला हे सांगणं थोडं कठीण आहे. असं म्हणतात की सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करायला ‘हस्तिदंत’ वापरून तयार करण्यात आलेल्या सनग्लासेसचा उपयोग करण्यात आला होता.

या सनग्लासेसचं डिझाईन थोडं विचित्र होतं. या सनग्लासेसमध्ये एक निमुळता भाग सोडलेला असायचा जेणेकरून डोळ्यांवर सूर्य प्रकाश पडणार नाही व लोक बाहेर देखील बघू शकतील.

बाराव्या शतकात चीनने एक पाऊल पुढे टाकले आणि नवीन प्रकारचे सनग्लासेस बनवण्यात आले. यामध्ये सपाट काचेचा प्रयोग करण्यात आला होता, ज्यामुळे डोळ्यांवर येणाऱ्या किरणांपासून रक्षण व्हायचे. याचा प्रयोग प्रामुख्याने चीनच्या न्यायालयातील न्यायाधीश मंडळी करत असे. न्यायदान करताना ते आपले भाव लपवण्यासाठी याचा वापर करत होते.

काळाबरोबरच यात अनेक लहान मोठे बदल घडत गेले. पण सतराव्या शतकात यात मोठा बदल घडला. १७५२ साली जेम्स एस्कॉफ नावाच्या माणसाने सनग्लासेसमध्ये रंगीत लेन्स वापरण्यास सुरुवात केली. तो मानत होता की रंगीत लेन्समुळे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होते.



एकोणिसाव्या शतकात सनग्लासेसचा वापर साधारण होत गेला. १९२० साली सॅम फॉस्टरने अमेरिकन जनतेसाठी खास सनग्लासेसची निर्मिती केली. त्यातील लेन्सला खास सूर्याच्या किरणांपासून संरक्षण प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आले होते. यानंतर चष्म्यांची एकच क्रेझ निर्माण झाली होती. हे चष्मे अगदी सहजपणे बाजरात उपलब्ध होत होते. समुद्री किनाऱ्यावर हे विकले जाऊ लागले. हे सनग्लासेस गिर्यारोहक आणि पर्यटकांची पहिली पसंत ठरले. वाळवंटी प्रदेशात डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे फार हितकारक सिद्ध झाले होते. पुढे याच काळात सनग्लासेसच्या डिझाईनमध्ये सुधारणा करण्यात आली.

१९३० साली एडविन एच लँड याने सनग्लासेसच्या या प्रवासाला पुढे नेत पेटंटेड पोलोराइड फिल्टरचा सनग्लासेसमध्ये वापर करण्यास सुरुवात केली. त्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला होता. एडविन पहिली अशी व्यक्ती ठरला ज्याने सनग्लासेसला आधुनिक रूप प्रदान केले होते. एडविनने तयार केलेले सनग्लासेस सामान्य लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध झाले. अनेकांनी त्याचा वापर सुरु केला. हॉलिवूड स्टार्समध्ये देखील याची एक वेगळीच क्रेझ होती. बाटे डेव्हिस आणि मार्लिन डिट्रिच यांनी या ग्लासेसला आपल्या दैनंदिन वापराचा भाग बनवले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

काही हॉलिवूड स्टार्स फक्त सामान्य आयुष्य जगता यावं आणि लोकांपासून ओळख लपवता यावी यासाठी या सनग्लासेसचा वापर करत असत. हळूहळू सनग्लासेस ग्लॅमरचे प्रतीक बनले होते. काळानुरुप यांच्या रचनेत बदल करण्यात आले. आता हे गोल, सपाट अशा अनेक लेन्समध्ये उपलब्ध आहेत.

आधुनिक काळात सनग्लासेसमध्ये फार बदल झाले आहेत. सनग्लासेस आज एक स्टाईल आयकॉन बनले आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या कपड्याप्रमाणे सनग्लासेसचा वापर करतांना दिसून येते. तरुणांमध्ये याची क्रेझ अधिक आहे. आज बाजारात रे बॅन, ओकले आणि इंक अशा अनेक ब्रँडेड कंपन्यांचे सनग्लासेस उपलब्ध आहेत. या कंपन्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सनग्लासेस बाजारात लॉन्च करत असतात.

आधुनिक सनग्लासेस अशा पद्धतीने तयार करण्यात येतात की ते आता फक्त फॅशन बनून न राहता, लोकांसाठी लाभदायक देखील सिद्ध होतील. सध्या सनग्लासेसमध्ये यूव्ही फिल्टर देखील बसवण्यात येते, या माध्यमातून अतिनील किरणांपासून होणाऱ्या कॅन्सर आणि तत्सम विघातकी रोगांपासून रक्षणासाठी हे सनग्लासेस उपयुक्त ठरत आहेत .

सनग्लासेस आज लाइफस्टाईलचा एक महत्वपूर्ण भाग बनले आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ही आहे भारताला लुटून खाणाऱ्या ११ आक्र*मकांची संपूर्ण यादी

Next Post

सिगारेट सुटत नाही, तर हे पाच सोपे घरगुती उपाय कराच

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सिगारेट सुटत नाही, तर हे पाच सोपे घरगुती उपाय कराच

समुद्रावर द*हश*तीचे साम्राज्य उभारणारा समुद्री लुटेरा एडवर्ड ब्लॅकबियर्ड

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.