The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई व मुलाच्या पवित्र नात्यावर बोट ठेवणारा सिग्मंड फ्रॉइडचा ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ सिद्धांत काय आहे ?

by द पोस्टमन टीम
5 May 2025
in विश्लेषण, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगातील नात्यांपैकी सर्वांत पवित्र नाते कोणते? असा प्रश्न उपस्थित केल्यावर साहजिकच आपल्या डोळ्यासमोर येईल ते आई आणि मुलाचे नाते, पण कोणी या नात्यालाच संशयाच्या चौकटीत उभे केले तर? या गोष्टीची कल्पना जरी विचित्र वाटत असली तरी जगात एक असा माणूस होऊन गेला आहे ज्याने चक्क आई-मुलगा आणि बाप-लेकीच्या नात्यालाच संशयाच्या चौकटीत उभे केले नाही. एवढेच नाही तर, त्यावर आधारित एक अत्यंत विवादित सिद्धांत देखील रचला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात सिग्मंड फ्रॉइड आहे.

सिग्मंड फ्रॉइड आणि त्याच्या सिद्धांताबद्दल आपण जाणून घेऊया…

६ मे १८५६ ला जन्माला आलेला सिग्मंड फ्रॉइड वयाच्या चौथ्या वर्षी आपला देश ऑस्ट्रिया येथील फरीबर्ग येथून व्हिएन्नाला येऊन पोहचला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने १८८१ मध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने न्यूरोबायोलॉजीवर आपले संशोधन करण्यात सुरुवात केली. सिग्मंड त्याचा मित्र जोसेफ ब्रेयूरच्या कामाने प्रभावित झाले होते.

फ्रॉइड आणि जोसेफ दोघांनी दीर्घकाळ एकत्र काम केले पण मनोरुग्णांमध्ये कामभावना उत्तेजित करण्याच्या फ्रॉइडच्या प्रयोगामुळे व्यथित होऊन जोसेफ वेगळे झाले. असे असले तरीही फ्रॉइडने आपले संशोधन सुरूच ठेवले. काही काळातच फ्रॉइड एक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने अनेक सिद्धांत आणि मनोवैज्ञानिक तंत्रांचा शोध लावला.



विसाव्या शतकात त्याने इडिपस कॉम्प्लेक्स आणि इडिपस ग्रंथीवर संशोधन करून एका नवीन सिद्धांताची रचना केली. या सिद्धांताच्या मदतीने फ्रॉइडने मुलांच्या मनातील घडामोडींचा वेध घेतला.

यात त्याने असे सिद्ध केले की प्रत्येक मुलाच्या मनात आपल्या आईला प्राप्त करण्याची मनोवृत्ती असते आणि तेवढाच द्वेष त्याच्या पित्याविषयी त्याच्या मनात असतो. याउलट मुलीला वडील जवळचे वाटतात आणि आईबद्दल थोडा राग मनात असतो.

फ्रॉइड म्हणतो की, एखाद्या विशिष्ट वयापर्यंत एखाद्या बालकाला त्याचे जे लिंग आहे, त्या समान लिंग असलेल्या जन्मदात्याविषयी राग असतो आणि विरुद्ध लिंग असलेल्या जन्मदात्याविषयी त्याच्या मनात प्रेमभावना असते. हा सिद्धांत निश्चितच चक्रावणारा आहे. पण फ्रॉईडने आपला हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी पर्याप्त उदाहरणे दिली आहेत. ही भावना कशी तयार होते आणि यातून सुटका कशी करून घेता येते, याची तपशिलासह माहिती दिली आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

त्याने आपल्या या अत्यंत क्लिष्ट अशा सिद्धांतामुळे अनेकांचा राग ओढवून घेतला, पण तो शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर कायम राहिला. १८९९ मध्ये फ्रॉइडने हा सिद्धांत त्याच्या इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स या पुस्तकात मांडला होता. पण त्याला इडिपस कॉम्प्लेक्स हे नाव दिले नव्हते. या सिद्धांताला हे नाव १९१० साली देण्यात आले.

हा सिद्धांत समजवून सांगण्यासाठी त्याने ग्रीक पुराणातील इडिपस रेक्सचे उदाहरण दिले होते. इडिपस रेक्सने आपल्या पित्याची ह*त्या करून आपल्या आईशी लग्न केले होते. फ्रॉइड या उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत होता की लहान मुलांच्या मनात आपल्या विरुद्ध लिंगी पालकाविषयी प्रेम तर समलिंगी पालकाविषयी घृणा असते.

सिग्मंड फ्रॉइडने लहान मुलांमध्ये असलेल्या या मानसिक दुर्बलतेसाठी आणि सायकोन्युरोसिससाठी इडिपस ग्रंथीला कारणीभूत ठरवले. एखादी वस्तू किंवा व्यक्तीबद्दल प्रेम आणि दुसऱ्याबद्दल तिरस्कार वाटण्याला इडिपस ग्रंथी जबाबदार आहे.

फ्रॉइडचे म्हणणे आहे की “इडिपस कॉम्प्लेक्स” ही मनस्थिती लहान मुलांमध्ये तयार होते, पण या मनस्थितीतून स्वतःला बाहेर काढायचे की या मनस्थितीच्या आहारी जायचे ते आपण ठरवायला हवे.

ही मनस्थिती लक्षात घेण्यासाठी मुलांच्या काही सवयींवर लक्ष ठेवण्यास फ्रॉइड सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार १८ महिन्यांत मुलांमध्ये या ग्रंथीचे परिणाम दिसू लागतात. स्तनपान करताना जर मुलं अधिक काळासाठी स्तनपान करत असतील तर हे देखील इडिपस कॉम्प्लेक्सचे एक लक्षण आहे.

३ ते ६ वर्षांच्या आयुत लहान मुलांच्या मनात आपल्या आईविषयी अधिक संवेदना जागृत होते, ज्यावेळी ही मुले आपल्या पित्याला आपल्या आईला मारहाण करताना अथवा चुंबन घेताना बघतात, त्यावेळी त्यांच्या मनात तिरस्काराची भावना उत्पन्न होत असते. अनेक लोक याला स्वभाव म्हणतात पण फ्रॉइडच्या मते हा इडिपस कॉम्प्लेक्सचा एक गुणदोष आहे.

खरंतर फ्रॉइडचा हा सिद्धांतच समजून घ्यायला खूपच कठीण आहे, त्यामुळे त्याने स्वतःच पुढाकार घेऊन यावर समाधान देखील सुचवले आहे. फ्रॉइड सांगतो की लहान मुले मानसिक संक्रमणावस्थेतून गेल्यानंतरच त्यांच्यातून एका स्वस्थ आणि वयस्क व्यक्तीची निर्मिती होत असते. वयस्क आणि स्वस्थ व्यक्ती होण्याआधी मुलाच्या मनात त्याच्या समान लिंग असलेल्या माता अथवा विरुद्ध लिंग असलेल्या पित्याबद्दल एकच भावना तयार होणे गरजेचे असते. जर त्याच्यात ही भावना आकारास येत नसेल तर त्याला योग-मार्ग शिकवावा लागतो.

या मनस्थितीवर फक्त योग आणि ध्यानाच्या माध्यमातूनच नियंत्रण मिळवता येते असे त्याचे म्हणणे आहे. या स्थितीत एक आत्मरक्षक मेकॅनिझम देखील शरीरात काम करत असते जे मनात अहंकराची उत्पत्ती करतात. यामुळे असे नकारात्मक विचार दबण्यास मदत होते, ज्यामुळे मुलाच्या मनात आईविषयी कामुक भावना आणि पित्याविषयी द्वेष भावना जागृत होत असते.

जर या मनस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाहीतर मुलाच्या मनात आईशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा जागृत होते तर मुलीच्या मनात पित्याविषयी ही भावना जागृत होते. फ्रॉइड म्हणतात की ही फार गंभीर मनस्थिती आहे. फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार वयस्क व्यक्तीने आपल्या माता पित्याप्रमाणेच आपल्या जोडीदाराचा शोध घेतला पाहिजे. यामुळे त्यांच्या मनातील भावनेची तृप्ती होते आणि या मनस्थितीवर नियंत्रण प्रस्थपित करण्यास मोठी मदत होते.

२३ सप्टेंबर १९३९ रोजी फ्रॉइड हे जग सोडून गेला आणि त्यांच्यापाठी हा विवादित सिद्धांत जगाला देऊन गेला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वयाच्या ११ व्या वर्षी पहिली गुंतवणूक करणाऱ्या वॉरेन बफे कसे बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती..?

Next Post

या चार प्रजतीच्या कुत्र्यांमुळे भारतीय सैन्य मजबूत झाले

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या चार प्रजतीच्या कुत्र्यांमुळे भारतीय सैन्य मजबूत झाले

समुद्राखाली आहे हे पोस्ट ऑफिस, पत्र टाकायला नऊ फूट पाण्याखाली पोहत जावे लागते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.