The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेशल्स बेटावर पायरेट्सनी लपवलेल्या खजिन्याच्या शोधात आजही कित्येक लोक आयुष्य घालवत आहेत

by द पोस्टमन टीम
17 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


“गोवा के सेंट सबॅस्टिन गार्डन मे एक बडेसे डब्ल्यूके नीचे दस करोड रुपये छुपाये हैं”

असं म्हणून चित्रपटातील व्हिलनचा आधीच दि एंड होतो आणि मग सगळे हिरो तो दस करोडचा खजिना शोधण्याच्या मागे लागतात. त्यासाठी ते कुणाकुणाशी पंगा घेतात आणि शेवटी पैशाच्या लोभापायी त्यांच्यात्यांच्यात कशी फुट पडते. ही सगळी स्टोरी अगदी हसत-खेळत चवीने आपण पडद्यावर पहिली आहे. धमालच्या या कथानकाने त्यावेळी खरेच धमाल केली होती.

छुपा खजिना शोधण्याच्या कल्पनेवर आजवर कित्येक सिनेमे, कादंबऱ्या आल्या तरीही ट्रेझर हंटिंगची कल्पना आपल्याला खरेच एका जागी खिळवून ठेवते, हे मान्य करायला हवे. चित्रपटात किंवा कादंबऱ्यामध्ये ट्रेझर हंटिंगची कल्पना आपण किती चवीने पाहतो किंवा वाचतो.

पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात जर तुम्हाला कुणी एखाद्या खजिन्याचा शोध घ्यायला सांगितला तर काय कराल? तुमचा खरेच विश्वास बसेल की हे असलं काही वास्तव आयुष्यात घडत नसतं म्हणून सोडून द्याल?



परंतु एका मौखिक कथेनुसार हिंद महासागराच्या एका बेटावर १०० दशलक्ष युरोचा खजिना दडलेला आहे. हा खजिना शोधण्यात दोन व्यक्तींनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही कथा सेशल्स आणि ला रियुनियन बेटांवरील माणसे पिढ्यानपिढ्या ऐकत आली आहेत.

तसे तर या बेटांवरील अनेक लोकांनी या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण आजवर कुणालाच यश मिळालेले नाही. परंतु यातील दोन व्यक्तींनी मात्र अखेरपर्यंत या खजिन्याचा शोध घेण्याचं काम सोडलेलं नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सेशल्स बेटावरील रीगीनाल्ड हर्बर्ट क्रुज-विल्किन्स ज्याला ट्रेझर मॅन याच टोपण नावाचे ओळखले जात असे, याने आपल्या आयुष्यातील ७२ वर्ष या खजिन्याचा शोध घेतला. इतका प्रदीर्घ प्रयास करूनही त्याला यात यश मिळाले नाही. त्याचाच मुलगा जॉन आता या खजिन्याचा शोध घेतो आहे.

जॉनला आता हा खजिन्याची नेमकी जागा सापडली आहे. या खजिन्याच्या जो नकाशा होता, त्याचेही अक्षरश: तूकडे तुकडे झाले होते. त्याच्या वडिलांनी आणि त्याने या खजिन्याचा नकाशा बनवून ती जागा व्यवस्थित शोधून काढली आहे. जॉनला विश्वास आहे की, या परिसरात उत्खनन केल्यावर त्याला नक्कीच तो खजिना मिळणार आहे.

हा खजिना येथे कसा आला याची गोष्ट मुळातच जॉनच्या तोंडून ऐकणं फारच मजेशीर आहे. पण १७१६ मध्ये ऑलिव्हर लॅव्हासेर ज्याला ‘ला ब्युज’ म्हणूनही ओळखले जात असे, कारण तो खूप वेगाने शत्रूवर हल्ला करत असे. तो आला कधी आणि त्याने हल्ला केला कधी हे शत्रूलाही समजत नसे. म्हणून त्याचे टोपण नाव ‘ला ब्युज’ पडले होते. तर, ला ब्युज एक गुप्तहेर म्हणून काम करू लागला.

१७२१ मध्ये तो आणि त्याचे काही सहकारी (साधारण ७५० वगैरे असतील) एका जहाजातून बर्बन बेटाजवळून प्रवास करत होते. ला रियुनियन बंदराजवळ त्यांना एक ब्रिटीश जहाज दिसले. ते जहाज जवळ येताच ऑलिव्हर पटकन त्यांच्यात घुसला आणि त्याने जहाजावरील सर्व ब्रिटीश खलाशांना मारून टाकले.

सर्व खलाशांना संपवल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, त्याने ताब्यात घेतलेले जहाज साधेसुधे जहाज नाही तर, एक सोने नाणी, दुर्मिळ रत्ने, हिरे-माणके यांनी भरलेले ते जहाज आहे. ते जहाज म्हणजे जणू संपत्तीचा खजिनाच होता.

त्याच्यासोबतचे जे सहकारी होते त्यांना ऑलिव्हरने काही हिरे, सोने वगैरे भेट दिले आणि उरलेला सगळा खजिना त्याने स्वतःकडेच ठेवून घेतला. अधिकाऱ्यांनाही त्याने काही जास्तीचे धन दिले. मग स्वतःजवळचे सगळे धन त्याने एका गुहेत दडवून ठेवले. काही काळाने त्याला वाटले की या गुहेत हे धन सुरक्षित राहणार नाही.

मग त्याने आपल्या वीस सहकाऱ्यांना सोबत घेतले आणि तो खजिना एका गुप्त जागी पुरून ठेवला. नंतर त्याने या सहकाऱ्यांना मारून टाकले. त्यामुळे आता खजिना कुठे आहे याची माहिती फक्त ऑलिव्हरलाच होती.

इकडे ब्रिटीश नौदल ऑलिव्हरला शोधत होतेच. ७ जुलै १७३० रोजी ऑलिव्हर ब्रिटिशांच्या हाती लागला. त्याला मृत्युदंड देण्यात आला. पण ऑलिव्हरने तो खजिना कुठे लपवून ठेवला आहे हे कोणालाच सांगितले नाही. त्याने सांकेतिक भाषेत या जग्याचा एक नकाशा तयार करून ठेवला होता. तो हवेत भिरकावून देत, तो एवढेच म्हणाला की, “हा घ्या माझ्या खजिन्याचा नकाशा.”

त्याला भर चौकात मृत्युदंड देण्यात आला, त्यावेळी त्याचा जमातीचे काही लोक तिथे उपस्थित होते आणि त्याने याच लोकांच्या दिशेने हा नकाशा फेकला. त्याने नकाशा फेकताच असंख्य लोकांनी त्यावर उडी घेतली आणि त्याचे बरेच तुकडे तुकडे झाले.

त्यानंतर कित्येक लोकांनी या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जॉनच्या वडिलांनी तर संपूर्ण हयात घालवली. पण, ते निराश झाले नाहीत. जॉनही कधीच निराश झाला नाही. हा खजिना आपल्याला मिळणारच यावर त्याचा दृढविश्वास आहे.

ऑलिव्हर एक अतिशय हुशार ग्रीक आणि लॅटिन विद्वान होता. त्याने सांकेतिक भाषेत तयार केलल्यात्या नकाशातील माहितीच उलगडा करणे तितके सोपे काम नव्हते.

क्रुज विल्किन्सने अनेक वर्षे हा नकाशा वाचण्यातच घालवली. त्याने यासाठी शक्य त्या सर्व शास्त्रांचा आणि भाषांचा अभ्यास केला. टॉरक्विज समुद्राने वेढलेल्या बेल ओम्ब्रेच्या उत्तर किनाऱ्याच्या आसपास कुठेतरी ही जागा म्हणजेच धन असल्याचा त्याचा कयास होता.

माहे हे एक इतके छोटे बेट आहे जिथे अगदी मोजकेच लोक राहतात. इथल्या लोकांमध्येही ही गोष्ट पूर्वापार सांगितली जाते. पण, इथल्या कुणाचाच त्यावर विश्वास नाही. जॉन जेव्हा या माहे बेटावर खजिन्याच्या शोधासाठी आला तेंव्हा रिक्षावाल्यापासून हॉटेलवाल्या मावशींपर्यंत सर्वांनी त्याची या गोष्टीवरून टिंगल केली आणि म्हणाले की, लहानपणीपासून हीच गोष्ट ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत.

जॉन म्हणतो, की लोक मला वेडा समजतात, माझ्या वडिलांनाही वेडाच समजत होते. पण, मी त्याबद्दल विचार करत नाही. मी माझ्या यशाच्या जवळ पोहचलो आहे. इथल्या सरकारने मला जमीन खोदण्यासाठी परवानगी दिली तर निश्चितच मला तो खजिना सापडेल. तिथल्या सरकारने त्यासाठी त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे, जे काही धन राहिले आहे, त्यातील ५०% वाटा सरकारचा राहील.

जॉनला याबद्दल काहीही अडचण नाही कारण, १०० दशलक्ष युरो ही काही छोटी रक्कम नाही. म्हणून तो पुन्हा या ठिकाणी उत्खनन करण्यास सुरुवात करणार आहे. तो म्हणतो मला मानसिक खजिना तर सापडला आहे आता फक्त हा भौतिक खजिना मिळवणे बाकी आहे.

जॉनला विश्वास आहे की, तो एकदिवस हा खजिना त्याचाच होणार आहे! आता खरंच जॉनला खजिना सापडतो की ही एक भाकडकथा आहे हे तर येणारा काळच सांगू शकेल..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मुस्लिम बहुल इंडोनेशियात उभं राहतंय हिंदू विद्यापीठ !

Next Post

मिथेन उत्सर्जनामुळे वाढतोय ग्लोबल वार्मिंगचा धोका..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मिथेन उत्सर्जनामुळे वाढतोय ग्लोबल वार्मिंगचा धोका..!

पाटेश्वर मंदिराचा हा अपरिचित इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.