The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक अस्वल चक्क हि*टल*रच्या विरोधात लढलं होतं!

by द पोस्टमन टीम
18 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


यु*द्धाच्या गोष्टी जितक्या शुरतेने आणि करुणेने भरलेल्या असतात, तितक्याच अद्भुत असतात. दुसऱ्या जागतिक महायु*द्धातील कित्येक अशाच गोष्टी आजही जगासमोर आलेल्या नाहीत. खरे तर या गोष्टी वाचल्यावर त्या सत्यकथेपेक्षा काल्पनिकच जास्त वाटतील. दुसऱ्या महायु*द्धात एका अस्वलानेही सैनिक म्हणून भाग घेतला होता आणि त्याने यु*द्धभूमीवर पराक्रम गाजवला होता, हे जर तुम्हाला कोणी सांगितले तर निश्चितच तुम्ही त्याला खुळ्यात काढाल. पण, ही गोष्ट सत्य आहे. एका अस्वलाने ब्रिटीश सैन्याच्या वतीने ना*झींच्या पराभवात मोठे योगदान दिले आहे.

१९४१ साली जेव्हा पॉलिश सैनिक इराणमार्गे इराकला जात होते तेव्हा वाटेत त्यांना एक अस्वलाचे पिल्लू सापडले. बहुतेक पिल्लाची आई शिकाऱ्यांच्या तावडीत सापडली होती आणि पिल्लू अनाथ झाले होते. त्या शिपायांनी त्या अस्वलाच्या पिल्लाला स्वतःसोबत ठेवून घेतले. त्या अस्वलाचे पोरकेपण आणि सैनिकांचे पोरकेपण यात तसा फरक काहीच नव्हता. त्यांनी या पिलाचे नाव वॉयटेक ठेवले. वॉयटेक म्हणजे आनंद देणारा सैनिक. 

वॉयटेक त्यांची करमणूक करण्यासोबतच त्यांची जबाबदारीही वाटून घेणार होता हे त्यांना माहिती नव्हते.

पॉलिश सेकंड कॉर्प्स नावाच्या या सैनिकांच्या कंपनीने सुरुवातीला वॉयटेकला लपवण्याचा प्रयत्न केला. पण, जसजसा वॉयटेक मोठा होत गेला तसे त्याला लपवणे कठीण होऊ लागले. सैनिकांना वाटत होते की वरिष्ठांना जर आपल्यासोबत सैन्यात एक अस्वल असल्याचे कळले तर ते त्याला ठेवून घेण्याची परवानगी देणार नाहीत. पण खरे तर उलटेच झाले. त्यांच्या वरिष्ठांनी वॉयटेकला सैन्यात ठेवून तर घेतलेच पण त्याची निगा राखण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी या वरिष्ठांनी एक स्वतंत्र माणूस नेमला. ज्याचे नाव होते. पीटर प्रेंडीस. 

वॉयटेकला चांगलेचुंगले खायला मिळेल याकडे प्रेंडीस अगदी काळजीपूर्वक लक्ष देत असे. तो स्वतः खाऊपिऊ शकत नाही तोपर्यंत त्याने वॉयटेकला बाटलीतून दुध पाजले. वॉयटेक मोठा झाला, तेव्हा त्याचे वजन २२० किलोग्रॅम होते.



वॉयटेकच आतापर्यंतचं सगळं आयुष्य सैनिकांच्याच सहवासात गेले होते. सैनिकांसोबत राहून, त्यांना बघून बघून तोही थोडाफार त्यांच्यासारखा वागू लागला. सैनिक परेड करत असतील तेव्हा तोही त्यांच्यासारखी परेड करण्याची प्रॅक्टिस करत असे. आश्चर्य म्हणजे तो माणसांप्रमाणेच त्याच्या मागच्या दोन पायांवर ताठ उभा राहू शकत असे. सैनिकांसोबत शेकोटीभोवती बसताना तोही त्यांच्यासोबत स्मोकिंग करत आणि बिअर पीत असे. त्याला बिअर प्यायला खूप आवडत असे, पण त्याला कधीच बिअरची नशा चढली नाही. तो स्वतःला सैनिकच समजत असे आणि अनेकदा सैनिकांशी यु*द्ध-यु*द्ध खेळत असे.

१९४२ साली पॉलिश सैनिक ब्रिटीश सैन्याचा भाग बनले. ब्रिटीश कमांडर सैन्यात प्राण्यांना अजिबात येऊ देत नसत. त्यामुळे वॉयटेकचे काय करायचे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. लष्कराच्या आवारात प्राण्यांना मज्जाव करण्यात आला होता. पण, या नियमाला फाटा देऊन वॉयटेकला मात्र लष्कराच्या आवारात आसरा मिळाला. 

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

शिवाय, त्याला लष्करात सैनिकाचा दर्जाही मिळाला. लष्कराच्या सगळ्या कामात त्यालाही सहभागी करून घेतले जात होते. इतकेच नाही तर त्याला एखाद्या अधिकृत सदस्याचा दर्जा होता.

जर्मनीतील मॉंटे कॅसिनोतील माउंटन फोर्टरेसवर ह*ल्ला करण्याची वेळ आली तेव्हा वॉयटेकला प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. या यु*द्धात वॉयटेकने महत्त्वाची भूमिका पार पाडली. सैनिकांना लागणारी जड शस्त्रे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असे. या सगळ्या कामात त्याने कुठेही जरा देखील चूक केली नाही की ढिलाई पडू दिली नाही. एकही शस्त्र त्याच्या हातून खाली पडले नाही.

या पर्वतीय भागात वॉयटेकने दिलेले हे योगदान फार महत्त्वाचे होते. त्याच्या या कामाची दाखल घेऊन त्याला सैन्यात बढती देण्यात आली. वॉयटेकची सैन्यातील ही बढती म्हणजे खरोखरच आश्चर्याचा विषय होता. कारण, सैनिक, म्हणजेच माणसे, एका प्राण्याच्या हाताखाली काम करणार होते.

यु*द्ध संपल्यानंतर वॉयटेकला स्कॉटलंडमधील एडीनबर्ग प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले. लष्करातील बहुतांश सैनिक आपापल्या सामान्य जीवनात परतले होते. त्यामुळे वॉयटेकला आता सैन्यात राहणे शक्य नव्हते. परंतु हे सगळे सैनिक त्याला प्राणीसंग्रहालयात भेटायला जात. आपल्या जुन्या मित्रांशी भेटून वॉयटेक खूप खुश होत असे अशी नोंद या संग्रहालयाच्या प्रमुखांनी करून ठेवली आहे.

एक अस्वल असूनही दुसऱ्या महायु*द्धात ना*झींना हरवण्यात त्याचाही मोठा वाटा राहिला आहे.

म्हणूनच प्राणीसंग्रहालयात असतानाही तो अनेकदा प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेत असे. सातत्याने वृत्तपत्रात तो एक चर्चेचा विषय बनत असे. वॉयटेक शेवटपर्यंत माध्यमांच्या चर्चेचा विषय राहिला. डिसेंबर १९६३ मध्ये त्याचे निधन झाले. परंतु एक शूर, लढवय्या अस्वल म्हणून त्याला सगळेच स्मरणात ठेवतील.

ब्रिटनने ना*झींचा पराभव केला आणि दुसरे महायु*द्ध संपुष्टात आले. या पराभवात वॉयटेकचे योगदान विसरून चालणार नाही. एका प्राण्याने मानवजातीला सं*हारापासून आणि अराजकाच्या खाईत लोटण्यापासून वाचवले. खरे तर ही गोष्ट आज कुणालाही काल्पनिक वाटेल. पण वॉयटेकने एक उदाहरण घालून दिले.

ज्यांच्या संगतीत आपण राहतो त्यांचा आपल्यावर प्रभाव पडतोच. एखादा प्राणीही माणसाच्या संपर्कात आला तर तोही किती बदलतो हे वॉयटेकच्या उदाहरणावरून लक्षात येते. म्हणून “संगत का असर” नाकारून चालणार नाही.

वॉयटेकच्या या कथेतून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली ते कमेंट करून नक्की सांगा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

 

ShareTweet
Previous Post

रशियाने त्यांच्या हद्दीत घुसलेलं अमेरिकन विमान पाडलं म्हणून आपल्याला GPS वापरायला मिळतंय

Next Post

आयर्लंडची क्रिकेट टीम आज हवा करतेय पण त्यांचा फायनान्सर भारतीय आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आयर्लंडची क्रिकेट टीम आज हवा करतेय पण त्यांचा फायनान्सर भारतीय आहे

सचिन-कांबळी खेळत असताना बॅटींगची वाट पाहणाऱ्या 'त्याची' प्रतीक्षा कधी संपलीच नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.