The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या आदिवासी यो*द्ध्यामुळे फर्डिनांड मॅगेलनचं विश्वभ्रमंतीचं स्वप्न अपूर्ण राहिलं

by द पोस्टमन टीम
26 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


‘लापु लापु’ याला फिलिपाईन्सचा पहिला हिरो म्हणतात. १५२५ साली लापु लापु हा फिलिपाईन्सचा पहिलाच स्वकीय राजा होता ज्याने परदेशी साम्राज्यविस्तार, धर्मप्रसार या अन्यायकारक गोष्टींचा विरोध केला. फिलिपाईन्सच्या नाण्यांवर त्याची छबी उमटवलेली आहे. इथल्या पोलिसांच्या लोगोवर लापु लापुच्या आकृतीचं चिन्ह आहे.

पण, या लापु लापुला फिलिपाईन्समधली लोक एवढं का मानत असतील? नेमकं त्याने केलं तरी काय?

भारतातील चोल साम्राज्याचा एक राजपुत्र ‘राजमुदा लूमया’ याने फिलीपाईन्सला जाऊन ‘सेबु’ इथं आपलं साम्राज्य उभारलं. त्याच्याच वंशातील शेवटचा राजा होता ‘राजाह तुपास’. तुपासच्या कार्यालयीन कागदात लापु लापुचा सर्वांत जुना उल्लेख आढळतो. त्यानुसार याच वंशाचा राजा हुंबाराच्या काळात तिथे एक तरुण आला आणि त्याने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जागा मागितली. राजाने त्याला मांडाऊ (Mandaue) या बेटावरची जागा दिली. पुढे या भागात व्यापार वाढला.

लापु लापु त्याच्या पराक्रमामुळे इथल्या लोकांचा नेता बनला होता. त्याच्या अखत्यारीत ओपोंग नावाचं बेटंही होतं. लापु लापुने इथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांची लुटालूट सुरू केली.

यामुळे व्यापारावर परिणाम होऊ लागला, यातूनच सेबुच्या राजाचं आणि लापु लापुचं खटकायला लागलं. पण स्थानिकांच्या आधारामुळे राजा काहीच करू शकला नाही.



१९२० साली स्पेनच्या राजाच्या आश्रयाने फर्डीनांड मॅगेलन नावाचा महान खलाशी जगातील पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला होता. नेहमीच्या आफ्रिका, हिंद महासागर करत इंडोनेशियाच्या मसाल्यांच्या बेटावर पोहोचण्याऐवजी त्याने पर्यायी मार्ग निवडला. पृथ्वी गोल आहे या भाकितावर विश्वास ठेवून त्याने विरुद्ध बाजूने मोर्चा वळवला. पॅसिफिक महासागर ओलांडून तो किनाऱ्याला लागला तेव्हा त्याचा अन्नसाठा संपला होता, त्याचे सहकारी आजारी पडले होते, त्यांचं एक जहाज खराब झालं होतं. अशा अवस्थेत तो सेबुच्या किनाऱ्यावर आला.

त्याने तिथल्या आदिवासी जमातींना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला. तिथल्या राजाला त्याने स्पेनच्या अधिपत्याखाली राज्य करायला मनवलं, आणि पुढील मोहिमेसाठी सहकार्य करायची विनंती केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पण तिथल्या राजाने या बदल्यात ‘लापु लापु’चा बंदोबस्त करायची अट घातली. ही अट मान्य करण्याशिवाय स्पॅनिश लोकांकडे मोहीम सुरू ठेवायला दुसरा पर्याय नव्हताच. म्हणून राजाच्या सैन्यातील २०-३० लढाऊ जहाजं आणि फर्डिनांडच्या निवडक ६० लोकांनी लापु लापुच्या ओपोंग बेटावर ह*ल्ला करण्याची योजना बनवली.

अत्याधुनिक शस्त्र, तोफा, बंदुका असलेल्या या सैन्यासमोर लापु लापुची १५०० आदिवासी लोकांची स्थानिक शस्त्र (बांबू, धनुष्यबाण, भाला) असलेली फौज होती. फर्डीनांडने सकाळ होण्याआधीच तिथली घरं तोफांनी जाळली. त्याची जहाजं किनाऱ्यावरच्या दगडांमुळे बेटाच्या फार जवळ येऊ शकत नव्हती. आदिवासींकडे अत्याधुनिक शस्त्र नसली तरी शिस्त आणि ‘लापु लापु’सारखा प्रेरणा देणारा लढवैय्या नेता होता.

यु*द्ध सुरु झालं. स्पॅनिश लोकांना ही टोळी दुबळी आहे असं वाटलं आणि त्यांनी एकत्र एका दिशेने पाण्यात पळत जाऊन ह*ल्ला केला. सुरुवातीला बंदुकीच्या गोळ्या लागून काही आदिवासी पडले. पण दुसरी गोळी भरायला लागणाऱ्या वेळात आदिवासींच्या धनुष्यातून बाणांचा वर्षाव होऊ लागला. दगडांच्या आडून धातूची टोकं असलेले भाले स्पॅनिश तुकडीला थांबवू लागले.

लापु लापुने आपल्या तुकड्यांना खूप शिस्तीने योजनाबद्ध केलं होतं. त्यामुळे त्यांच्यातल्या त्या आत्मविश्वासाने ते या परकीय लोकांचा शौर्याने पराभव करू लागले. फर्डीनांड तितकाच शूर होता. पण आपल्या लोकांना वाचवायला त्याने माघार घ्यायची घोषणा केली. पण पळणाऱ्या सैनिकांवरही ह*ल्ले झाले. फर्डीनांडच्या संक्षणासाठी असणारे काही सैनिक आणि तो तिथेच धारातीर्थी पडले. यातून सुरक्षित निसटून गेलेल्या एकाने या लढाईचा वृत्तांत लिहून ठेवला आहे. त्याच्या या लेखामुळेच लापु लापुच्या शौर्याचा आणि कुशल नैतृत्वाचा प्राथमिक पुरावा जगाला मिळाला.

हा पुरावा वगळता ‘लापु लापु’बद्दल फक्त मौखिक परंपरेतून आलेल्या शौर्याच्या गोष्टीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे बराच काळ “लापु लापु” हे एक पद आहे, असा समज इतिहासकारांना झाला होता.

फर्डीनांडसोबत झालेल्या यु*द्धाने लापु लापुला इतिहासात अजरामर केलं. याची धसकी एवढी बसली होती की तिथून पुढची ५० वर्षे फिलीपाईन्सवर परकीय आक्र*मण झाले नाही.

फर्डीनांडसोबतचे सुटून गेलेले सहकारी बऱ्याच हालअपेष्टा सहन करत त्यांच्या निर्धारित बेटावर पोहोचले. त्यांनी माहितीतला हिंद महासागरातील रस्ता निवडला आणि मसाले घेऊन परत स्पेनला पोहोचले. त्यांच्या या पराक्रमामुळे या महिमेची जगभर स्तुती झाली, इतिहासातली कित्येक पानं, चित्रं त्यांच्या पराक्रमाने भरली. पहिली पृथ्वी प्रदक्षिणा कणारा म्हणून फर्डीनांडचं नाव अजरामर झालं. हा विक्रमही पुढची कित्येक वर्षे त्याच्याच नावावर राहिला. पण परकीय आक्र*मणांपासून स्वकीयांना वाचविण्यासाठी यशस्वीपणे लढलेल्या लापु लापुला मात्र अशी प्रसिद्धी मिळाली नाही.

कालांतराने इतिहासकारांनी खणून काढलेल्या गोष्टींमुळे लोकांपर्यंत लापु लापु आणि त्याचा पराक्रम पोहोचला. विसाव्या शतकात लापु लापुचा मोठा पुतळा फिलिपाईन्समध्ये उभारला गेला. त्यानंतर बऱ्याच जागी असे पुतळे उभारण्यात आले. २०१७ साली फिलिपाईन्सच्या राष्ट्रपतींनी २७ एप्रिलला ‘राष्ट्रीय लापु लापु दिवस’ म्हणून घोषित केलं.

भारतात ज्याप्रमाणे जनांदोलनांना गांधीजींची प्रेरणा असते किंवा विद्रोहाला भगतसिंगची, त्याचप्रमाणे फिलीपाईनमध्ये लापु लापुच्या प्रेरणनेने लोक न्यायाच्या बाजूने उभे राहतात. फक्त फिलीपाईन्समध्येच नाही तर अमेरिकेतील रस्त्याला लापु लापुचं नाव देण्यासाठी मागण्या आहेत.

आज लापु लापु हा जगभरातील लोकांसाठी अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा म्हणून जिवंत आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने टाइम ट्रॅव्हल केल्याचा फक्त दावाच नाही तर पुरावेसुद्धा दिलेत

Next Post

दीक्षित-दिवेकर सोडा या कार्यकर्त्याने ३८२ दिवस उपाशी राहून वजन कमी केलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

दीक्षित-दिवेकर सोडा या कार्यकर्त्याने ३८२ दिवस उपाशी राहून वजन कमी केलं होतं

मेणाच्या पुतळ्यांच्या 'मॅडम तुसाँ' संग्रहालयाचा रंजक इतिहास माहिती आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.