The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाडं लावण्याची एक जपानी कला

by द पोस्टमन टीम
24 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


प्रकृतीत इतकी विविधता आहे की तिला समजून घेणे व उलगडणे मनुष्याला शक्य नाही. आज पृथ्वीवर असंख्य वृक्ष आहेत काही लहान काही मोठे फळझाडं, फुलझाडं.

पण, आज आम्ही तुम्हाला अशा वृक्षाविषयी सांगणार आहोत हे खरंतर असतात फक्त दिखावटीसाठी, त्यांना ना फळ लागते ना फुल. पण त्यांच्या केलेल्या प्रयोगामुळे त्यांना तसा आकार दिलेला असतो. याला बोन्साय असे म्हटले जाते. विशालकाय आकार असलेल्या वृक्षांना एखाद्या कुंडीत बसतील इतके लहान करणे म्हणजे वृक्षांना बोन्साय करणे होय.

बोन्साय हा जपानी शब्द आहे. पण या कलेची सुरुवात चीनमध्ये करण्यात आली. इसवी सन ७०० साली चिनी लोकांनी साई नावाच्या नवीन कलाप्रकाराला जन्म दिला.

या कलेच्या मदतीने त्यांनी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये बटू आकाराच्या काही वृक्षांना वाढवले. ही कला फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांना अवगत होती. या कलेच्या मदतीने ते काही खास प्रजातीच्या वृक्षांना कुंडीत वाढवू शकत होते. त्याकाळी हे वृक्ष एक मौल्यवान भेट मानले जात होते.

चिनी लोकांना बघून जपानी लोक देखील आपल्या कुंड्यांमधे छोट्या आकाराच्या वृक्षांची वाढ करू लागले. कामाकुरा शासनकाळात बौद्ध धर्मीयांच्या प्रभावाने जापानी लोकांनी अनेक चिनी पद्धतींचा स्वीकार करण्यास सुरुवात केली होती. यात या कलेचा देखील समावेश होता. चीनची सीमा जवळ असल्याने त्यांच्या अनेक कलांचा व जीवनशैलीचा जपानवर प्रभाव पडत होता. जापानी लोकांनी चिनी लोकांच्या कलेत बदल करत त्या कलेला अजून डेव्हलप केले. चीनच्या साई कलेला त्यांनी बोन्साय असे नाव दिले.



१२०० वर्षांपूर्वी जपानमध्ये ही कला विकसीत होत गेली. जापानी लोक मानतात की एखाद्या विशालकाय वृक्षाला कुंडीत तेव्हाच वाढवता येते, ज्यावेळी त्याला वाढवण्याचे काम पूर्ण स्नेहाने आणि प्रेमाने करण्यात येते. ज्यावेळी जापानमध्ये या कलेचा विकास होत होता, त्यावेळी चीनमधून अनेक लोकांनी जापानला स्थलांतर केले. ते लोक या कलेला ब्रम्हांडाच्या सृष्टी सौंदर्याचे रूप मानत होते.

जपानमध्ये हे वृक्ष एका खास कुंडीत लावण्यात येत होते, जी फार खोल असायची, चीनमध्ये मात्र असे नव्हते. त्यामुळे जापानमध्ये याचे हाची नो अर्थात बाउल ट्री असे नामकरण करण्यात आले. या कलेचा जापानच्या लोककथांवर देखील प्रभाव पडला आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जपानच्या एका प्रसिद्ध लोककथेनुसार काही सामुराई यो*द्ध्यांनी आपल्या तीन प्राण प्रिय बोन्साय ट्रीचे बलिदान देऊन तीन संतांचा जीव वाचवला होता. या लोककथेवर आधारित अनेक नाटकांची निर्मिती जापानमध्ये करण्यात आली आहे.

एखाद्या झाडाला बटू स्वरूपात एखाद्या कुंडीत वाढवणे हे फार मेहनतीचे काम आहे. जपानमध्ये राहणारे कोबायाशी नावाचे गृहस्थ गेल्या तीस वर्षांपासून आपल्या परस बागेत बोन्साय वृक्ष वाढवत असून आता ते या क्षेत्रातील तज्ञ बनले आहेत. त्यांनी वृक्षांच्या वाढी आणि विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते सध्या १००० वर्ष जुन्या ज्युपिटर या वृक्षाचे पालन करत आहेत.

कोबायाशी म्हणतात की, तुम्ही किती तन्मयतेने बोन्साय झाडाला उगवता, यामुळे काही फरक पडत नाही, बोन्साय झाडाला वाढवण्याची एक पद्धत असते, जर तुम्ही त्या पद्धतीची योग्यप्रकारे अंमलबजावणी करत नसाल तर मग झाड जास्त दिवस जगणार नाही.

कोबायाशी सध्या जपानमधील टोकियो येथील शुनकेन बोन्साई म्यूजियममधील बोन्साय वृक्षांची देखभाल करत आहेत. बोन्सायच्या वाढी आणि संगोपनासाठी  आवश्यक असलेली माहिती गोळा करायला त्याला  ६ ते १० वर्ष मेहनत घ्यावी लागली होती. जापानप्रमाणे अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी. सी. येथे यु एस नॅशनल अरबोटरेममध्ये देखील बोन्सायचे एक म्युझियम आहे. याठिकाणी ४०० वर्ष जुन्या व्हाईट पाईन वृक्षाला ठेवण्यात आले आहे. हे तेच वृक्ष आहे, जे हिरोशिमावरील अणु हल्ल्यात देखील बचावले होते.

जर तुम्हाला तुमच्या घरी बोन्साय वृक्ष लावायचे असेल तर तुम्हाला त्याच्याशी निगडित काहीगोष्टी माहिती असणे अत्यावश्यक आहे. जापानी लोक मानतात की बोन्साय वृक्षाला वाढवणे हे एखाद्या लहान मुलाला वाढवण्यासारखे आहे. जर बोन्साय वृक्षाला दीर्घ आयुष्य प्रदान करायचे असेल तर त्याला मोकळ्या वातावरणात ठेवायला हवे. त्याला सजावटीचा सामान म्हणून वापर केल्यास, ते जगत नाही. जोपर्यंत त्याची माती ओलसर होत नाही, तोवर पाणी देत राहणे हाचा त्याच्या उत्तमवाढीसाठी गरजेचे आहे. ओलसर मातीत या वृक्षांची वाढ चांगली होते. या वृक्षाला जितका अधिक सूर्यप्रकाश मिळेल तितके त्याच्या वाढीला उपयोगी ठरते.

बोन्साय वृक्षाची काटछाट करत रहावी लागते, हे काम देखील मोठे कौशल्याचे असून ज्याने याचे प्रशिक्षण घेतले आहे, अशा व्यक्तीनेच ते करावे. एका विशिष्ट लांबीपर्यंत या वृक्षाच्या फांद्या आणि पानांची कापणी करणे गरजेचे असते.

बोन्सायच्या वाढीसाठी वैशिष्ट्यपूर्ण खतांचा वापर करण्यात येतो. हे खत बाजारात उपलब्ध होते. खत झाडाच्या मुळापर्यंत पोहचायला हवे, यासाठी खत पाण्यात मिसळून देण्यात येते. बोन्साय झाडाच्या वाढीसाठी लागणारी माती ऑनलाईन उपलब्ध असून तिच्या मदतीने हे झाड चांगल्याप्रकारे वाढवता येते. बोन्साय झाड ज्या कुंडीत वाढवले जाते, तिला दर वर्षांनी बदलत राहणे गरजेचे आहे.

बोन्साय झाडाचे संगोपन जरी अवघड असले तरी जर तुम्हाला वनस्पतींवर प्रेम आहे, तर तुम्ही त्या वृक्षांची लागवड करू शकता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतातील स्थानिक भाषा संकटात का आहे ?

Next Post

इजिप्तच्या या राणीच्या प्रेमात रोमन सम्राटाने आपलं साम्राज्य धुळीस मिळवलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इजिप्तच्या या राणीच्या प्रेमात रोमन सम्राटाने आपलं साम्राज्य धुळीस मिळवलं होतं

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.