The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिथेन उत्सर्जनामुळे वाढतोय ग्लोबल वार्मिंगचा धोका..!

by द पोस्टमन टीम
12 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पर्यावरणात हानिकारक वायूंचे प्रमाण वाढणे धोकादायक आहे. ग्रीनहाऊस गॅसेस ग्लोबल वाॅर्मिंगला वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात संशोधनकर्त्यांनी ग्रीनहाऊस गॅस मिथेनच्या वैश्विक उत्सर्जनाविषयी नवीन माहिती जगासमोर आणली आहे.

अमेरिकेसारख्या देशातील वाढत्या जीवाष्म इंधनाच्या वापरामुळे आणि विकसनशील देशांत वाढणाऱ्या शेतीमुळे वैश्विक उत्सर्जनात वाढ झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या तेल उत्खननामुळे आणि विकसनशील देशांतील वाढत्या शेतीमुळे ग्रीनहाऊस गॅसेसचे उत्सर्जन वाढत आहे. हे फक्त एका रिसर्चमधून नाहीतर अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. हा एक खूप मोठा बदल आहे कारण या अगोदर उत्सर्जनाचे प्रमुख कारण कोळश्याच्या खाणी होत्या.

या नवीन संशोधनानुसार जगभरात २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण फार वाढले आहे. जीवाष्म इंधन प्रणाली आणि खाद्यान्न उत्पादनात वाढ याला कारणीभूत आहे.

जगभरात मांसाहाराचे वाढते प्रमाण याला जास्त कारणीभूत आहे. अमेरिका हा जगातील सर्वाधिक तेल आणि नैसर्गिक गॅसचे उत्पादन करणारा देश बनला आहे. दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत कृषि क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. या सर्वच गोष्टी मिथेनच्या वाढत्या उत्सर्जनाला कारणीभूत ठरल्या आहेत.

चीनमध्ये जीवाष्म उत्पादकांचा वापर वाढला आहे. पर्यावरणतज्ज्ञ आणि संशोधक बेन पोल्टर यांच्या मते जीवाष्म इंधन आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांनी मिथेनचे उत्सर्जन वाढवण्यात समान भूमिका बजावली आहे.



या शास्त्रज्ञांचे संशोधन अर्थ सिस्टम सायन्स डेटा ॲंड एनवायर्नमेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले. या संशोधनामुळे मिथेन उत्सर्जनाविषयी उपलब्ध असलेल्या माहितीत मोलाची भर घातली आहे. याला ग्लोबल मिथेन बजेट म्हटले जाते. या अगोदर २०१६ साली मिथेनवर संशोधन करण्यात आले होते. यात २०१२ सालापर्यंतच्या उत्सर्जनांचा समावेश होता.

मिथेन गॅस कार्बन डायऑक्साइडच्या तुलनेत जास्त उष्णता आकर्षित करतो. ही उष्णता वातावरणात जास्त काळ टिकत नाही. मिथेनचे उत्सर्जन कमी करून आपण जलवायू परिवर्तनाच्या धोक्यांना टाळू शकतो.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

२००० पासून २०१७ पर्यंत फक्त युरोपात मिथेन उत्सर्जनाच्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे.

युरोपमध्ये मिथेन उत्सर्जन इतके नाही, यामागे एक विशेष कारण आहे. युरोपात मांसाहार करणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे आणि इथे जमिनीत कचरा पुरण्याविरोधात फार कडक कायदे आहेत. जमिनीत कचरा पुरल्यामुळे त्याच्या विघटन प्रक्रियेतून मोठ्याप्रमाणात मिथेनचे उत्सर्जन होत असते. युरोपमध्ये कायद्यांच्या कडक अंमलबजावणीमुळे मिथेनचे उत्सर्जन घटले आहे.

हे संशोधन करताना उत्सर्जनाचे प्रमाण मोजण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करण्यात आला होता. जमीन आणि सॅटेलाईट अवलोकन या माध्यमातून मिथेनच्या वातावरणातील टक्केवारी काढण्यात आली. ज्या भागातून जास्तीत जास्त उत्पादित होत आहे, त्यांचा शोध घेण्यात आला. या संशोधनामुळे मिथेनच्या उत्सर्जनसाठी कारणीभूत ठरणाऱ्या नेमक्या गोष्टींचा बोध झाला आहे. या संशोधनामुळे भविष्यात मिथेन उत्सर्जन नियंत्रणात आणणे सहज शक्य होणार आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात की जगभरात विविध कंपन्या मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करू शकतात, पण त्या तसं करत नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सेशल्स बेटावर पायरेट्सनी लपवलेल्या खजिन्याच्या शोधात आजही कित्येक लोक आयुष्य घालवत आहेत

Next Post

पाटेश्वर मंदिराचा हा अपरिचित इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पाटेश्वर मंदिराचा हा अपरिचित इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

कहाणी आयर्लंडमधील बटाट्यांच्या दुष्काळाची !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.