The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी ‘बुलेट’ला टक्कर देणारी ही बाईक पुन्हा मार्केटमध्ये आली आहे !

by द पोस्टमन टीम
12 May 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


मोटारसायकलचा वापर तसा आता फार नवा नाही राहिला. आज दुचाकीचे अनेक ब्रँड बाजारात पाहायला मिळतात. पण, झेकोस्लोवाकियातील जावा कंपनीच्या गाड्यांनी कधी काळी भारतीयांच्या मनात घर केले होते. आज तब्बल चार दशकानंतर झेकोस्लोवाकियाची ही जावा कंपनी नवा अवतार घेऊन पुन्हा भारतात परतली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत आजची जावा क्लासिक कित्येक बाबतीत सरस आहे.

लाखोंच्या घरात किंमत असलेल्या या मोटार सायकलला भारतीय बाजारपेठेतील मागणी बघितली तर डोळे विस्फारतील. रॉयल एन्फिल्ड आणि जावा मोटार सायकलमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे.

पण, या मोटारसायकलमध्ये नेमकी अशी काय वैशिष्ट्ये आहेत की, लोक लाखो रुपये मोजूनही ही मोटारसायकल घ्यायला तयार आहेत? जुन्या काळीही जावाने लोकांना असेच वेड लावले होते.

चाळीस वर्षापूर्वी देखील या बाईकची लोकप्रियता काही कमी नव्हती. या बाईकची प्रिंट मीडियातील जाहिरात वाचली तर याची कल्पना नक्की येईल. पुरुषांची आवडती बाईक असे या बाईकचे वर्णन केले होते. आणि ही बाईक पुरुषांना का आवडते याचीही कारणे या जाहिरातीत सांगण्यात आली होती. कवितेच्या रुपात पुरुषाच्या मनातील इच्छा या बाईकमुळे कशा पूर्ण होतात याचे एक रसभरीत आणि शृंगारिक वर्णन म्हणजे ही जाहिरात.



“त्याला आवडेल तिकडे तो नेऊ शकतो. त्याला हवी तेंव्हा मी त्याच्याभोवती घुटमळू शकते, घाईत असेल तर मीच त्याच्या मदतीला येते. म्हणूनच मला त्याची बेस्ट फ्रेंड म्हटले जाते.” अशा तोऱ्यात या जाहिरातीची सुरुवात व्हायची. 

पुरुषाला हव्या त्या सगळ्या गोष्टी या बाईकमध्ये असल्यानेच ही बाईक म्हणजे पुरुषाची बेस्ट फ्रेंड असे वर्णन केले जात असे.

अलीकडेच नव्वदी पार केलेल्या कंपनीची सुरुवात झेकोस्लावाकीयामध्ये झाली. १९९६ साली भारतातील “आयडीयल जावा” ही कंपनी बंद पडल्यानंतर २०२२ साली पुन्हा एकदा जावा भारतात आली आहे. त्याकाळी ज्यांनी ज्यांनी जावाची सवारी अनुभवली त्यांच्यासाठी निश्चितच ही एक गोड बातमी आहे. महिंद्रा ग्रुपच्या साथीने जावा पुन्हा भारतात आपला जम बसवणार असे दिसते आहे.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

पूर्वीही भारतीयांनी या बाईकला खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. आताही देतील यात वादच नाही. सध्याची जावा ही आधीच्या जावा मोटारसायकलपेक्षा कित्येक पटीने सरस आहे. त्यामुळे भारतीयांना या गाडीचे आकर्षण राहणारच.

झेकोस्लोवाकियाचा एका मेकॅनिकल ब्रँचच्या विद्यार्थ्याने या कंपनीची स्थापना केली होती. पहिल्या महायु*द्धाच्या काळात फ्रांटिसेक जानेक याने बरेच पेटंट मिळवले होते. १९२९ साली त्याने जर्मनीच्या विंकहोफर यांच्याकडून वांडरर कंपनी विकत घेतली.

वांडररमधील ‘वा’ आणि स्वतःच्या आडनावातील ‘जा’ ही अक्षरे एकत्र करून त्याने आपल्या नव्या कंपनीचे नाव जावा ठेवले. जावा ५०० ओएचव्ही हे त्याच्या कंपनीचे पहिले मॉडेल होते.

वजनाने हलकी, किफायतशीर आणि चालवायला सोपी असल्याने झेकोस्लोव्हेकियामध्ये लवकरच या गाडीला चांगली प्रसिद्धी मिळाली. समाजवादी राजवटीत या उद्योगाला चांगले प्रोत्साहन मिळाले. लवकरच ही बाईक देशाबाहेरही निर्यात केली जाऊ लागली.

१९६०च्या दशकात जावाचे भारतात आगमन झाले. त्यावेळी रुस्तम आणि फारुख इराणी यांनी भागीदारी करून आयडीयल जावा लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीद्वारे ते जावा बाईक भारतात वितरीत करीत असत.

त्याकाळी अशा स्टायलीश बाईक फारशा नव्हत्या. राजदूत, जावा आणि बुलेट यांच्यातच तीव्र स्पर्धा होती. या तिन्हीपैकी जावा दिसायलाही आकर्षक होती. त्यामुळे तिच्याविषयी ग्राहकांमध्ये खास आकर्षण निर्माण झाले होते.

झेकोस्लोवाकियातून जावा मागवण्याऐवजी इराणी बंधूंनी भारतातच तिचे उत्पादन करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना पुण्यातच या गाडीचा प्लांट उभारायचा होता. पण, एका शहरात गाड्यांच्या निर्मितीचे दोन प्लांट उभारता येत नाहीत असा नियम होता.

पुण्यात बजाजचा प्लांट असल्याने त्यांना पुण्यात हा प्लांट उभारण्याची परवानगी मिळाली नाही.

फारुख इराणी यांची मैसूरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चांगली पोहोच होती. त्यामुळे त्यांनी तिथे प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मैसूरचे तत्कालीन महाराजा जयचामराजेंद्र वाडियार यांनी यात विशेष लक्ष घातले आणि त्यांचे काम मार्गी लावले. मैसूरचे हे महाराजा उद्योगधंद्याला चालना देणारे होते आणि ते त्याकाळी गव्हर्नर असल्याने त्यांना हे काम शक्य होते. शेवटी मैसूरमध्ये आयडियल जावाचा प्लांट उभा राहिला. महाराजांना या कंपनीचे चेअरमनपद स्वीकारण्याचा आग्रह करण्यात आला पण, या कंपनीच्या संचालक मंडळापासून दूर राहिले. पण, त्यांचा बाहेरून कंपनीला पाठींबा होताच.

जावा ही विशेषत: रेसर बाईक होती. याच वैशिष्ट्यामुळे भारतात या बाईकचा खप प्रचंड वाढला होता. जाहिरातीचा भडीमार करण्यापेक्षा जावा बाईक सरळ रेसिंग ट्रॅकवरच उतरवल्या जात असत. त्यामुळेच बाईक रेसर्समध्ये याची विशेष क्रेझ होती. याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या ब्रँडची इमेज तयार केली. यासाठी त्यांनी बाईक रेसिंगलाही प्रोत्साहन दिले.

फारीबोर्झ इराणी, सी. के. चीन्नाप्पासारख्या रेसर्समधे तर ही बाईक विशेष प्रिय होती. जावा कंपनीची त्यांची स्वतःची रेसर टीम होती. म्हणूनच तरुणांची पहिली पसंती जावालाच होती.

आज जावा पुन्हा नव्या रुपात येत आहे. याची अनेक भारतीयांना उत्सुकता लागून राहिली आहे. जुन्या गाड्यांविषयी आजही ओढ आहे. या गाड्या त्याच्या तरुणपणीचा आणि बालपणीचा काळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी देतात. त्या रम्य आठवणी पुन्हा एकदा अनुभवता येतात. म्हणूनच जुन्याच गाड्यांना आजही जास्त पसंती मिळते.

नव्या दमाची जावा पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर आपला ठसा उमटवेल अशी अपेक्षा आहे. तिच्या पुनरागमनामुळे तिचा इतिहासही पुन्हा एकदा जिवंत झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मंगळावर अतिक्रमण केलं म्हणून तीन कार्यकर्त्यांनी ‘नासा’वरच केस ठोकली होती

Next Post

मेटल डिटेक्टरचा शोध लागायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची ह*त्या कारणीभूत आहे

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

मेटल डिटेक्टरचा शोध लागायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची ह*त्या कारणीभूत आहे

गालिबच्या शायऱ्या वाचून सिंगल पोरांना पण उगाच ब्रेकअप झाल्यासारखं वाटतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.