The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खबरदार! चुकूनही फेसबुकवर या प्राण्याचे व्हिडीओ शेयर करू नका

by द पोस्टमन टीम
15 February 2021
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


फेसबुकवर जेव्हा आपल्याला एखाद्या क्युट प्राण्याचा व्हिडिओ बघायला मिळतो त्यावेळी आपल्याला फार आनंद होतो. यामध्ये बऱ्याचदा काही पांडा अथवा अस्वल खेळता बागडताना दिसतात. आपण त्या व्हिडिओला लाईक करतो आणि पुढे निघतो पण आपलं हे क्षणिक प्राणी प्रेम त्या प्राण्यांसाठी नरकयातना घेऊन येते.

लाल पांडा या प्राण्याचे असंख्य व्हिडीओ आपण नेहमी सोशल मीडियावर पाहतो. फायरफॉक्स म्हणून जाणारा हा लाल पांडा जगभरातील प्राणी प्रेमींचा आवडता प्राणी आहे. या प्राण्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर असून या व्हिडिओत हा पांडा अनेक क्युट हालचाली करताना दिसतो, अनेक असे व्यवहार करतो जे बघून आपल्याला आनंद होतो.

पण या व्हिडीओमध्ये दिसणारा हा लाल पांडा नेपाळ आणि चीनच्या घनदाट अरण्यात राहणारा एक फार दुर्मिळ प्राणी आहे. दिवसेंदिवस या प्राण्याचा अधिवास धोक्यात येत आहे.

गेल्या तीन दशकात या प्राण्याची संख्या निम्म्याने घटली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राणी संवर्धनासाठी काम करणारी संस्था International Union for the Conservation of Nature ( IUCN) या संस्थेच्या रिपोर्टनुसार आज पृथ्वीवर फक्त २५०० लाल पांडा शिल्लक आहेत.

२०१० सालापासून रेड पांडा नेटवर्क नावाची संस्था ही दरवर्षी “आंतरराष्ट्रीय रेड पांडा डे” साजरा करते. ही संस्था अनेक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करते. या संस्थेने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार जगभरात लाल पांडाच्या संख्येत मोठी घट होते आहे. लोक सोशल मीडियावर मजेने या पांडाचे व्हिडीओ बघतात पण दुसरीकडे लाओससारख्या देशात प्राणी तस्कर मोठ्या संख्येने या लाल पांडाना जेरबंद करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करतात. रेड पांडा नेटवर्कच्या मते सोशल मीडियावर या पांडाची वाढती लोकप्रियताच या प्रजातीच्या मुळावर उठली असून या लोकप्रियतेमुळे या प्राण्यांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसतेय.



युट्युबवर रेड पांडा क्युट व्हिडीओ असं सर्च केल्यावर आपल्याला अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. घरात खेळणारे बागडणारे पांडा बघून आपल्याला आनंद वाटणे साहजिक असले तरी हे क्रिटचे घर म्हणजे नेपाळ आणि चीनच्या पर्वतीय जंगलात राहणाऱ्या पांडाचा अधिवास नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. एका घरात कोंडून राहणे ही त्यांची मूळ प्रवृत्ती नाही.

लाल पांडासारखीच गत इतरही प्राण्यांची आहे. लोरीस नावाच्या दक्षिण पूर्व आशियात आढळणाऱ्या प्राण्याचा असाच एक व्हिडिओ मागे व्हायरल झाला होता. एका मुलीच्या मांडीवर हा लोरीस बसलेला आणि ती मुलगी त्याला गुदगुल्या करत होती. व्हिडिओत गुदगुलीमुळे लोरीस हात वर करताना दिसत होता. अनेकांना त्या प्राण्याला ते आवडत असल्याचे वाटले होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

पण शास्त्रज्ञांच्या मते ज्यावेळी लोरीस हा प्राणी आपले हात वर उचलतो तेव्हा त्याला राग आलेला असतो. जेव्हा त्याला धोका जाणवतो त्यावेळी हात वर करून तो सावध पवित्रा घेत असतो. रशियात एका फ्लॅटमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता, असे नंतर समोर आले.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्राण्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. २०१३ साली प्रोफेसर ऐना नेकारिस यांनी यावर संशोधन केले. त्या म्हणतात की ज्यावेळी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला, त्यावेळी तब्बल चार महिने असंख्य लोकांनी यावर कमेंट केल्या होत्या व अनेकांनी या प्राण्याला पाळण्याची इच्छा दर्शवली होती. यानंतर अचानक लोरीसच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

बेकायदेशीर पद्धतीने चालणाऱ्या या तस्करीत प्राण्यांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. या प्राण्याची फक्त पाळण्यासाठी तस्करी केली जात नाही, तर पारंपरिक औषधांसाठी देखील यांची शिकार करण्यात येते.

काही दिवसांपूर्वी थायलंडच्या एका बाजारात प्राण्यांच्या होणाऱ्या विक्रीवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. यात एका ठिकाणी १५०० प्राणी विक्रीला ठेवले होते. या सर्व प्राण्यांना आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्राप्त होती आणि यांच्या शिकारी- तस्करीवर ठिकठिकाणी बंदी घालण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे यापैकी एकही प्राणी थायलंडचा नव्हता.

प्राण्यांच्या तस्करीला फक्त सोशल मीडिया कारणीभूत आहे, असं नाही. प्राणी विलुप्त होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी एक सोशल मीडिया आहे.

वन्यजीव संरक्षण संस्था ( WWF) गेल्या कित्येक वर्षांपासून या तस्करीला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांच्या यशस्वी अभियानामुळे प्राणी तस्करीत ८० टक्के घट नोंदवण्यात आली आहे. सध्या इन्स्टाग्रामसारख्या माध्यमावर ज्यावेळी आपण वाघ, पांडा, ओरांगउटन यांसारख्या संकटग्रस्त प्राण्यांचे हॅशटॅग वापरतो तेव्हा त्यांच्या संदर्भातील माहिती देणारी लिंक फ्लॅश होते, ज्यामुळे जनजागृती होण्यास मदत होते आहे.

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्यावर काही गोष्टी क्षणात प्रसिद्ध होतात आणि क्षणात विस्मृतीत जातात. सोशल मीडियावर स्क्रोल करतो तेव्हा आपल्याला बरेच व्हिडीओ बघायला मिळतात. अनेक प्राण्यांचे क्युट व्हिडीओ आपण आवडीने पाहतो. पण हे करताना आपण सजग राहणे आवश्यक आहे. आपण ज्या प्राण्याचा क्युटनेस एन्जॉय करतो, त्या प्राण्याच्या संपूर्ण प्रजातीच्या विनाशाला कारणीभूत नको ठरायला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ही महिला नसती तर भारताच्या परराष्ट्र खात्यात महिला दिसल्या नसत्या !

Next Post

सरदार पटेलांनी दम भरला आणि भोपाळ भारतात विलीन झालं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सरदार पटेलांनी दम भरला आणि भोपाळ भारतात विलीन झालं

सैतानाच्या या मंदिरात गेल्यावर कोणीच परत येत नाही, शास्त्रज्ञांनी शोधलं कारण

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.