The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या ११० वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या एका रोगाने शेकडो लोकांचा जीव घेतला होता

by द पोस्टमन टीम
5 February 2025
in आरोग्य, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


२०२०-२१ साली संपूर्ण देश कोरोना विषाणूचा सामना करत होता. क्वारंटाईन, मास्क, व्हॅक्सिनेशन, लॉकडाऊन या शब्दांनी एक वेगळी निराशा उत्पन्न केली होती. अनेक लोकांचे व्यवसाय बुडाले. रोजीरोटी बंद पडली. जगच ठप्प झाले. या सगळ्या परिस्थितीला काही तज्ञांनी ‘अभूतपूर्व’ म्हटले असले तरीही ही अशी वेळ पहिल्यांदाच ओढवलेली आहे असे मुळीच नाही. यापूर्वीसुद्धा अनेकदा वैश्विक महामारीने थैमान घातले आहे.

अशीच एक गोष्ट आहे १९११ सालातील ‘मंचुरियन  प्लेग’ची. विशेष म्हणजे कोरोना सारखाच याचा उगमसुद्धा चीनमध्ये झाला होता. पण त्यावेळच्या तुटपुंजा साधनांच्या मदतीने त्यांनी यावर कशी मात केली, आणि जगासमोर काय आदर्श ठेवला आहे नक्कीच जाणून घ्यायला हवं.

१९१०-११ मधली ही गोष्ट लिहित असताना आज कोरोनाव्हायरसचा नवा Contagious Strain आढळून आलाय, आणि तो आत्ताच्या व्हायरसपेक्षा तब्बल ७० टक्के जास्त वेगाने पसरतोय. एवढ्या सुविधा असतानाही या वायरसने सर्वांच्या नाकात अगदी दम आणला आहे. मग १९१० मधल्या मंचुरियन प्लेगच्या साथीचे चित्र केवढं भयावह असेल!

बरेच जण मास्क वापरण्याचा कंटाळा करताना दिसत होते आणि मास्कमुळे कोरोनापासून संरक्षण मिळते याची काही गॅरंटी? असं उर्मटपणे विचारत होते. अशा लोकांसाठी १९१० चा मंचुरियन प्लेग इतिहासातील पानं नक्कीच पुरावा ठरू शकतील. कारण या भयावह साथीच्या दरम्यान पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट बनवण्यावर सर्वाधिक भर दिला गेला होता आणि त्यामुळे प्लेगच्या प्रसाराला आळा बसला होता आणि लाखो लोकांचे प्राणसुद्धा वाचले होते.



कोरोना विषाणूचा उगम माणसाच्या शरीरात झाला.

पण मंचुरियन प्लेगचा विषाणू मात्र Tarbagon Marmot या प्राण्याच्या शरीरात सापडला असल्याचे मानण्यात येते. Marmot हा एक उंदीर सदृश प्राणी आहे, जो चीनमध्ये आढळतो.

या खास उंदराची चीनमध्ये शिकार केली जाते आणि त्यावेळी त्याच्या केसांपासून एक विशिष्ट तयार कापड तयार केले जाई. या कापडाला व्यापारात मोठी मागणी होती. शिवाय हिवाळ्यात या कापडाला प्रचंड मागणी वाढत असे, त्यामुळे उंदराच्या शिकारीचे प्रमाणही वाढलं होतं.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

जास्तीत जास्त कापड तयार करण्याच्या लालसेने या उंदरांचा माणसांची येणारा संपर्क वाढतच गेला आणि त्यामुळेच मंचुरियन प्लेगचा जास्त प्रसार व्हायला सुरुवात झाली. जपान आणि रशियातील आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांकडून या कापडाला आणखी जास्त मागणी वाढली. आणि त्यामुळे त्यांच्या किमतीसुद्धा गगनाला भिडल्या. त्यामुळे चांगल्या प्रतीचे उंदीर या कापडासाठी वापरले जाऊ लागले आणि रोगाला बळी पडलेल्या उंदरांचा वापर लोक चक्क जेवणात करू लागले!

काही स्थानिक लोकांच्या आहारात या उंदरांचे प्रमाण वाढू लागले आणि हळूहळू लोकांना डोकेदुखी, ताप, कप आणि श्वास घेण्यातही त्रास होऊ लागला. दुर्दैवाने त्या काळात आजच्यासारखे वैद्यकीय सोयी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे या रोगाने अक्षरशः मृत्यूचे थैमान मांडले होते.

आज कुणाचा विश्वास बसणार नाही एवढा प्रचंड मृत्यूदर त्यावेळी चीनमध्ये वाढला होता. जशी कोरोना महामारीमध्ये लोकांनी गर्दी केली की त्याचा झपाट्याने प्रसार होतो, तसाच त्यावेळीही प्लेग याबाबतीत झाला.

चीनमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार होती आणि त्या निमित्ताने लोक आपल्या आप्तस्वकियांना भेटण्यासाठी प्रवास करीत होते. आणि प्लेगचा प्रसार इतर भागांमध्ये व्हायला हीच गोष्ट कारणीभूत ठरली.

प्रवास करण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करत असत त्यातून आणखी जास्त रोग प्रसार झाला. चीनमध्ये बिजिंग, वूहान येथे आणि शिवाय मंचुरियन या भागापासून तब्बल दोन हजार मैलांवर दूर असलेल्या शांघायलासुद्धा प्लेग येऊन पोहोचला होता.

मंगोलियन प्रांतातील Manzhauli या शहराची तर कल्पनाही करवत नाही. येथील रस्त्यांवर अक्षरशः प्रेतांचे ढीग पडलेले होते. कारण परिस्थिती एवढी बिकट होती की प्लेगमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा दफनविधी करायला त्याचे कुटुंबीयसुद्धा जवळ जात नव्हते. दवाखान्यांमध्ये नवीन पेशंट भरती करून घ्यायला जागा उरली नव्हती. त्यामुळे रेल्वेच्या डब्यांचा वॉर्ड म्हणून उपयोग केला गेला होता.

मृत्यूचे तांडव सुरू असताना यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी वैद्यकीय क्षेत्र काम करू लागले. ॲनी केंब्रिज स्कूलचे फिजिशियन डॉक्टर वू लीन तेह  यांनी यावर एक उपाय शोधून काढला. त्यांचा तेव्हाचा उपाय आपण आजही वापरात आणत आहोत. त्यांनी पर्सनल प्रोटेक्टिवे इक्विपमेंट जसे म्हणजेच सेफ्टी ड्रेस आणि मास्क वापरण्यावर सर्वाधिक भर दिला. तेव्हा ही कल्पना कितीही हास्यास्पद वाटत असली तरीही आज आपल्याला तिचे महत्त्व कळूच शकते.

एवढेच नव्हे तर तेव्हाही डॉक्टर वू यांनी quarantine, isolation आणि प्रवास बंदी यांचा कठोर वापर करायला सल्ला दिला होता. याहीपुढे जाऊन त्यावेळेस सर्वाधिक लागण झालेली घरेसुद्धा जाळण्यात आली होती.

डॉक्टर वू यांच्या कठोर उपाययोजनेमुळे प्लेग हा निदान मंचुरियन प्रांतापुरता थोपवण्यात यश आले होते. आणि चीनसारख्या महाकाय देशाला मोठ्या संकटातून वाचवले गेले होते. या योगदानाव्यतिरिक्त खरेतर डॉक्टर वू हे एका वेगळ्या वैशिष्ट्याकरता ओळखले जातात. ते म्हणजे या संकटानंतर त्यांनी प्लेगविरोधी मल्टी नॅशनल मेडिकल रिस्पॉन्स उभा करण्यासाठी पावले उचलली.

एप्रिल १९११ मध्ये त्यांनी Mukden येथे इंटरनॅशनल प्लेग कॉन्फरन्स आयोजित केली. जागतिक स्तरावर एक आरोग्यासाठी एकवटलेली ही अशी पहिलीच परिषद म्हणता येईल. कदाचित याच परिषदेत आजच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे बीज पेरले गेले असावे.

मंचुरियन प्लेगच्या साथीदरम्यान चीनमध्ये डॉक्टरची इंटरनॅशनल टीम, एपिदेमिओलॉजी ईस्ट, नर्सेस इत्यादी लोक दिवसरात्र मेहनत घेत होते. असे असले तरीही मास्क वापरणे, विलगीकरणात राहणे हे उपाय सगळ्यांनाच पटत होते असे नाही. पण या कारणामुळे अनेक निष्पापांचे बळी गेले.

Gerald Mensy नावाचे फ्रेंच डॉक्टर मास्क वापरायला नकार देणाऱ्यांना सेवा पुरवत होते. त्यांची ही मोहीम सुरू होऊन काही दिवस होताच त्यांना प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्या वर्षी प्लेगने बळी घेतलेल्या साठ हजार लोकांपैकी ते एक होते.

आज आपल्याला बर्‍याच वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत. तेव्हाच्या काळातील मास्क आणि पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटपेक्षा बरीच सुटसुटीत साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण त्याचा वापर करण्याचा कंटाळा करण्यात काहीच अर्थ नाही. चीनच्या इतिहासातील मंचूरियन प्लेगचे हे उदाहरणपण आपल्याला आज हाच सल्ला देत असावे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: COVID19Machurian Plague
ShareTweet
Previous Post

जवाहरलाल नेहरूंनी का दडवून ठेवले होते सुभाषबाबूंच्या मृत्यूचे रहस्य ?

Next Post

भारतीय संघाच्या पहिल्या ओपनरला पुण्याच्या साखर कारखान्यात वॉचमनचे काम करावे लागले होते

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
Next Post

भारतीय संघाच्या पहिल्या ओपनरला पुण्याच्या साखर कारखान्यात वॉचमनचे काम करावे लागले होते

भटकंती : शिवकालीन संघर्षाच्या आठवणी जपत आपल्याला प्रेरित करणारा 'राजगड'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.