The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘प्रमाणवेळ’ ठरवण्यावरून फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये राडा झाला होता

by द पोस्टमन टीम
28 December 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तंत्रज्ञानाने सगळं जग एकत्र जोडलं गेलं आहे असं आपण म्हणतो. आज भारतीय नागरिक परदेशी कंपन्यांत काम करतात. साहजिकच ते भारतात राहून हे तिथल्या देशाच्या वेळेप्रमाणे काम करतात. पण ही गोष्ट गेल्या काही वर्षांपूर्वी शक्य नव्हती. कारण प्रत्येक देशाने वेळ मोजण्यासाठी आपली वेगवेगळी पद्धत वापरली होती. तेव्हा फारसे आंतरराष्ट्रीय व्यवहारही होत नसत, त्यामुळे वेळ मोजण्याची जगभर ठराविक पद्धत असावी अशी गरजही वाटत नव्हती.

पण जेव्हा रेल्वेचे जाळे विस्तारू लागले, आणि रेल्वे एका देशातील माल दुसऱ्या देशात घेऊन जाऊ लागली, तेव्हा मात्र वेळ मोजण्यात गोंधळ होऊ लागला. हा गोंधळ एवढा प्रचंड होता की अमेरिकेसारख्या देशात एकाच वेळी १०० वेगवेगळ्या वेळा दाखवल्या जात होत्या! यावेळी वेळेमधील तफावतीमुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढू लागले होते. रेल्वेच्या वेळेच्या कन्फ्युजनमुळे एकाच रुळावर एका वेळी अनेक रेल्वे येत आणि एकमेकांना धडकून मोठे अपघात होत.

सरतेशेवटी, हा गोंधळ सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि १८७० साली नॅशनल जिओग्राफिक कॉन्फरन्स आयोजित केली गेली. शून्य अंश रेखावृत्त हे ग्रीनविच या शहरावरून जाईल असे ठरविण्यात आले आणि त्याप्रमाणे वेळेचा आराखडा तयार करण्यात आला. 

पुढील पंधरा वर्षांत इतर देशांनी या आराखड्याला टप्प्या-टप्प्याने मान्यता द्यावी असे या परिषदेत ठरले. यासंदर्भात २२ ऑक्टोबर १८८४ रोजी काही देशांनी वॉशिंग्टन डी.सी. इथे एक बैठक आयोजित केली. तिला इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स असे म्हणतात.या बैठकीत एक आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले वेळापत्रक ठरवावे असे ठरविण्यात आले. रेल्वेचे वेळापत्रक मूळ रेखावृत्त म्हणजेच ‘ग्रीनविच रेखावृत्त’वर आधारित असणार होते.

१८८४ साली झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील २६ देशांचे ४१ प्रतिनिधी उपस्थित होते. स्थानिक वेळेतील तफावतीमुळे होणारा गोंधळ संपवण्यासाठी सर्वमान्य अशी जागतिक वेळ ठरवणे आणि त्यावरूनच रेल्वेचे आणि इतर दळणवळणाचे वेळापत्रक ठरवावे असा संकल्प या परिषदेत करण्यात आला. त्यावेळी रेल्वेच्या काही खाजगी कंपन्यांनी यापूर्वीच ठरवले होते की ग्रीनविच रेखावृत्तावरून यापुढील रेल्वेची वेळापत्रके निश्चित केली जातील. त्या खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या पुढाकारातून ही जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. पण या वेळेच्या बाबतीत खाजगी कंपन्यांचा हस्तक्षेप होईल म्हणून या गोष्टीत सरकारचासुद्धा सहभाग असावा यासाठी विविध देशांच्या सरकारांनी या परिषदेत सहभाग नोंदवला होता.



२२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सभेचे अध्यक्षपद एका प्रतिष्ठित अमेरिकन नेव्ही ऑफिसरने भूषवले होते. त्याचे नाव क्रिस्तोफर रेमंड रॉजर. जगभरातून विविध देशांनी या परिषदेला हजेरी लावली होती. त्यात युरोप खंड, कॅरेबियन बेटे, पूर्व आशियाई देश तसेच आफ्रिकेतील देशांचासुद्धा समावेश होता. शिवाय या कामासाठी लागणारे वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ मंडळी, जसे हेड सर्वेअर्स, ऑब्सरवेटरी डायरेक्टर्स, डिप्लोमॅट, इंजिनियर्स आणि रेल्वे कारागीरसुद्धा उपस्थित होते.

ही इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स १ ऑक्‍टोबर १८८४ रोजी सुरू झाली आणि पुढील तीन आठवडे तिचे कामकाज सुरू होते. त्यानंतर मांडलेल्या ठरावाला संमती देण्यात आली आणि काही आठवडे चर्चा केल्यानंतर हा युनिव्हर्सल टाईमचा ठराव जगभरात लागू करण्यात आला.

युनिव्हर्सल टाईम झोनचा ठराव आपल्याला डार्क हाऊज यांच्या ग्रीनविच टाईम या पुस्तकात सुटसुटीत मांडलेला आढळतो. त्यातील मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे-

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

  1. या सभेद्वारे असा निर्णय घेण्यात येत आहे की, सर्व देशांनी आपले पूर्वीचे वेळ रेखावृत्त रद्द करून सर्वमान्य असे एकच रेखावृत्त वेळेसाठी स्वीकारावे.
  2. येथे उपस्थित असलेल्या सर्व देशांना असे सांगण्यात आले की, ग्रीनविचमधून जाणारे रेखांश हेच मुळ रेखांश मानण्यात येईल.
  3. यामुळे कशापासून दोन्ही देशांना 180 अंशावर बाकीचे रेखावृत्त मानता येतील. त्यात मुळ रेखावृत्ताच्या पूर्वीची धन मानले जातील तर त्याच्या पश्चिमेचे रेखावृत्त ऋण रेखावृत्ते मानले जातील.
  4. या ठरावानुसार अंतरराष्ट्रीय वारसुद्धा ठरवला जावा. ज्या दैनंदिन व्यवहारांमध्ये त्याची गरज असेल तिथे हा वार वापरता येईल, पण त्यामुळे स्थानिक वाहनांमध्ये गोंधळ निर्माण होत असेल तर ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे वापर करावा.
  5. आंतरराष्ट्रीय वार किंवा दिवस म्हणजे एक पूर्ण सोलर डे असेल. मुळ रेखावृत्तावर होणारी मध्यरात्र ही सगळ्या जगाची मध्यरात्र मानण्यात येईल. आणि आंतरराष्ट्रीय दिवस त्या मध्यरात्रीपासून सुरू झाल्याचे मानण्यात येईल. हा दिवस शुन्यापासून सुरू होऊन चोवीस तासांचा असेल.
  6. अशा प्रकारे हा ठराव लागू झाल्यानंतर या मध्यरात्रीप्रमाणे खगोलशास्त्रीय व नाविक दिवस मोजण्यात यावेत.
  7.  या परिषदेत असेही सांगण्यात आले की वेळ मोजण्यास संदर्भातील तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर ज्या ज्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय वेळेची गरज आहे, क्षेत्रात त्या त्या सर्व क्षेत्रांमधे ही पद्धत लागू केली जाईल.

या परिषदेमुळे जगभरातील कामकाज सुरळीत झाले असले तरीही, काही देशांनी या ठरावाला विरोध दर्शवलाच. ग्रीनविच मीन टाईम या आंतरराष्ट्रीय वेळेत ब्रिटनच्या शहराचे नाव घातल्यामुळे फ्रान्सने विरोध दाखवला होता. त्यांच्या मते या नावांमधे सर्व मान्यता असायला हवी. त्यामुळे ठराव लागू झाल्यानंतरही कित्येक दशके फ्रान्सने या ठरावाला विरोधच दर्शवला.

त्यानंतर फ्रान्सने जागतिक  प्रमाण वेळेचे नामकरण करण्यासाठी एक ठराव पास केला होता. ज्यात असे स्पष्ट लिहिले होते की, ही गोष्ट जागतिक असल्यामुळे कुठल्याही देशाच्या प्रभावी तटस्थ नाव असायला हवे. युरोप-अमेरिकेसारख्या महासत्तांच्या गंध त्याला असता कामा नये. पण काही अपवाद वगळता १८८४ नंतर ग्रीनविच स्टँडर्ड टाईम जगभर स्वीकारण्यात आले.

काही वर्षे संघर्ष केल्यानंतर फ्रान्सची इच्छासुद्धा पूर्ण झाली. आज आपण याच ग्रीनवीच स्टॅंडर्ड टाईमला युनिव्हर्सल स्टॅंडर्ड टाइम म्हणून ओळखतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सचिन-कांबळी खेळत असताना बॅटींगची वाट पाहणाऱ्या ‘त्याची’ प्रतीक्षा कधी संपलीच नाही

Next Post

नैसर्गिक अधिवास सोडून लांडगे मानवी वस्तीत का येत आहेत..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

नैसर्गिक अधिवास सोडून लांडगे मानवी वस्तीत का येत आहेत..?

वजनाच्यावर दुकानदार आजही चार दाणे जास्त टाकतात ते अल्लाउद्दीन खिलजीमुळे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.