The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिस्की, स्कॉच आणि बर्बनमध्ये नेमका ‘फरक’ काय आहे ?

by द पोस्टमन टीम
30 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दारूला कितीही वाईट म्हटले तरी दारूचे व्यसन सुटत नाही. जोपर्यंत दारू पिणारे आहेत तोपर्यंत त्याची निर्मिती करणारेही आहेत. लॉकडाऊनच्या काळातही इतर सगळ्या सुविधांवर बंदी असतानाही महसूल वाढवण्याचे कारण देत राज्य सरकारने पहिल्यांदा दारूच्या दुकानांनाच परवानगी दिली. यावरून दारू ही किती “महत्त्वाची गोष्ट” आहे हे लक्षात येईलच.

न पिणाऱ्यांनी कितीही नाकं मुरडली तर पिणाऱ्यांचे मद्यप्रेम कमी होत नाही आणि होणारही नाही.

दारूतही किती तरी प्रकार आहेत! व्होडका, रम, बिअर, व्हिस्की, बर्बन, जीन. हे सगळे प्रकार कशावरून ठरतात? तर दारू बनवण्यासाठी कोणते धान्य वापरले? ती कशाप्रकारे बनवली? किती दिवसांसाठी तिचा साठा केला? या सगळ्या गोष्टींवरून हे प्रकार पडले आहेत. प्रत्येक दारूची बनवण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. म्हणूनच त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.

यातल्याच बर्बन, व्हिस्की आणि स्कॉच यामध्ये काय फरक आहे याचे उत्तर आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.



बर्बन हा व्हिस्कीचाच एक प्रकार आहे. पण, कुठलीही व्हिस्की बर्बन नसते. तर स्कॉच हा स्कॉटलंडमध्ये बनवल्या जाणाऱ्या व्हिस्कीचाच एक प्रकार आहे. 

म्हणजे हे तीनही प्रकार व्हिस्कीचेच असले तरी, व्हिस्की, बर्बन आणि स्कॉच यामध्ये बराच फरक आहे.

बर्बन कशी बनवावी किंवा तिचे शुद्धीकरण कसे करावे यासाठी काही नियम आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कायद्यानुसार बर्बन  ही अमेरिकेतच बनवलेली असली पाहिजे. बर्बन बनवताना ५१% मका वापरलाच पाहिजे असा सरकारी नियमच आहे. त्यात अल्कोहोलचे प्रमाण ८०% असले पाहिजे आणि बर्बनला पांढऱ्या ओकच्या बॅरेल्समधेच साठवले पाहिजे. 

यामध्ये पाण्याशिवाय दुसरा कुठलाही पदार्थ मिसळला जात नाही. तसा सरकारी नियमच आहे. किमान दोन वर्षे तरी ही बर्बन साठवलेली असली तर तिला स्ट्रेट बर्बन म्हणतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बर्बन साठवण्यासाठी दर वेळेस नव्याच बॅरल्सचा वापर करावा लागतो. एकदा वापरलेला बॅरेल पुन्हा वापरता येत नाही. आणि त्यासाठी चार्ड अमेरिकन व्हाईट बॅरेलच वापरायला हवा. असाही सरकारी नियम आहे. बर्बन आणि व्हिस्कीमधला हा एक मुलभूत फरक आहे.

केंटकी बर्बन हा स्ट्रेट बर्बनपेक्षा वेगळा. केंटकी बर्बन ही केंटकीमधेच बनवलेली असली पाहिजे.

वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचा लगदा आंबवून व्हिस्की बनवली जाते. तर ब्रँडी ही द्राक्षे किंवा इतर फळांपासून बनवली जाते.

बिअर आणि व्हिस्कीचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया सारखीच आहे. पण, बिअरला जास्त कडवट चव येण्यासाठी त्यामध्ये फ्लेवर्ड हॉप्स मिसळले जातात. तसे व्हिस्कीमध्ये हॉप्स मिसळलेले नसतात. दारूचे शुद्धीकरण केल्यामुळे त्यातील अल्कोहोलची तीव्रता वाढते. त्यामुळे त्याच्यातील नशेची मात्रा वाढते. व्हिस्कीची साठवणूक करण्यासाठी पूर्वी वापरलेले जुने ओक बॅरेल वापरले तर चालतात. दरवेळी नवीनच बॅरेल वापरले पाहिजे असे नाही.

व्हिस्की जितकी जुनी आणि त्यासाठी वापरलेले बॅरेल्स जितके जुने त्यावरही व्हिस्कीचे प्रकार अवलंबून आहेत.

जॅक डॅनिएलची व्हिस्की जी एक जगप्रसिद्ध अमेरिकन व्हिस्की आहे. यांची व्हिस्की बनवण्याची प्रक्रिया फारच वेगळी आहे आणि तीच त्यांच्या व्हिस्कीची खासियत आहे. याला ते टेनेसी व्हिस्की देखील म्हणतात. ते व्हिस्कीचे शुद्धीकरण करण्यासाठी शुगर मॅपलचा (हे अमेरिकेतील एक झाड आहे) कोळसा वापरतात. खरे तर व्हिस्की बनवताना ही प्रक्रिया केली जात नाही. पण, त्यांनी त्यांच्या व्हिस्कीसाठी ही पद्धत वापरली आहे. याच कारणाने त्यांची व्हिस्की इतर व्हिस्कीहून वेगळी ठरते.

यांनी व्हिस्की साठवण्यासाठी जे बॅरेल्स वापरलेले असतात तेच बॅरेल्स स्कॉटलंडला पाठवले जातात. स्कॉटलंडमध्ये बनलेली व्हिस्की म्हणजे स्कॉच.

जॅक डॅनिएल ज्या ठिकाणी या व्हिस्कीची निर्मिती करते तो प्रदेश ड्राय कंट्री म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे जगात प्रसिद्ध असलेली ही व्हिस्की तिथल्या कुठल्याच दुकानात किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मिळणार नाही.

स्कॉच ही बार्लीच्या पिठापासून बनवली जाते. ओक कास्कमध्ये किमान तीन वर्षे तरी ही स्कॉच साठवलेली असली पाहिजे. यातील अल्कोहोलचे प्रमाण ९४.८%पेक्षा कमीच असते. शिवाय, स्कॉच ही स्कॉटलंडमध्येच बनवलेली असते. म्हणून स्कॉच असे नाव असावे. आयरिश व्हिस्की ही स्कॉचसारखीच असते. आयर्लंडच्या उत्तर भागात ही व्हिस्की बनवली जाते. ही व्हिस्की बनवण्यासाठी एक वर्ष आंबलेले धान्य वापरले जाते आणि तीन वर्षे साठवून ठेवली जाते.

व्हिस्की, बर्बन आणि स्कॉचमध्ये नेमका काय फरक आहे हे आता तुम्हाला समजले असेलच. फक्त त्यासाठी वापरली जाणारी पद्धत आणि साठवण्याची पद्धतीवरूनच या सगळ्या प्रकारात फरक केला जातो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

लिंकन नसते तर अमेरिकेचे पण तुकडे झाले असते..!

Next Post

इटलीत एका शालीच्या तुकड्यावर जिझसच्या चेहऱ्याचा ठसा सापडलाय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इटलीत एका शालीच्या तुकड्यावर जिझसच्या चेहऱ्याचा ठसा सापडलाय

पाकिस्तानने या मंदिरावर ३००० बॉ*म्बगोळे फेकले होते, पण एकही बॉ*म्ब फुटला नव्हता !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.