The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका जहाजावर स्थापन करण्यात आला आहे जगातील सर्वात छोटा देश !

by द पोस्टमन टीम
15 March 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


जगात फक्त एका जहाजाच्या आकाराएवढा एक देश आहे असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना!

पण एक सीलँड नावाचा देश आहे, जो अक्षरशः जहाजाएवढाच आहे. खरंतर, चक्क एका जहाजाचेच देशात रूपांतरित करण्यात आले आहे! या गोष्टीला एका रेडिओ ब्रॉडकॅस्टरची महत्त्वाकांक्षा कारणीभूत ठरली.

आज या देशाची कहाणी जाणून घेऊयात..

१९४३ साली दुसरे महायु*द्ध धगधगत असताना ‘HM Fort Roughs’ उत्तर अटलांटिक समुद्रात बांधला गेला. ब्रिटनच्या जहाजांवर त्यावेळी जर्मनीची लढाऊ विमान गस्ती घालत होती. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिशांनी HM Fort Roughs हा किल्ला बांधला. हा किल्ला म्हणजे दोन भल्यामोठ्या खांबांच्या आधाराने उभे असलेले जहाज आहे.



आजच्या घडीला हा किल्ला म्हणजे एक स्वयंपूर्ण, स्वतंत्र राष्ट्र आहे त्याचे नाव सीलँड !!

सफोकच्या किनार्‍यापासून समुद्रात सात नॉटीकल मैल अंतरावर सीलँड किंवा एचएम फोर्ट वसलेले आहे. १९५६ पर्यंत त्याच्यावर ब्रिटिशांची मालकी होती. त्यानंतर पॅडी रॉय बॅट्स या ब्रिटिश व्यक्तीने हा किल्ला भाडेतत्त्वावर चालवला. जवळपास १९६७ पर्यंत त्याने भाडेतत्त्वावर हा किल्ला चालवला.

बॅट्स हा एक रेडिओ ब्रॉडकास्टर होता आणि हा किल्ला त्याला त्याच्या रेडिओचे रेकॉर्डिंग स्टेशन म्हणून वापरायचा होता. त्याच्या या रेडिओ स्टेशनचे नाव होते रेडिओ एक्सेस. हळूहळू बॅट्सने या किल्ल्यावर स्वतःच्या मालकी हक्क सांगणे सुरू केले. बॅट्सनेच या किल्ल्याला सीलँड हे नाव दिले होते.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ब्रिटीश सरकार आणि बॅट्समध्ये या सीलँडवरून वाद झाले. बॅट्सने ब्रिटनच्या कोर्टात धाव घेतली. १९६८ मध्ये कोर्टाने ब्रिटनच्या विरुद्ध निर्णय दिला आणि स्पष्ट केले की सीलँड हे ब्रिटनपासून तीन नॉटिकल मैलच्या बाहेर आहे. याचाच अर्थ सीलँड ब्रिटनच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. या निर्णयामुळे बॅट्सचा मार्ग मोकळा झाला.

सीलँड हे समुद्रात खांबांवर उभे केलेले जहाज असले तरी बेस्टच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्या झाला देशाचा दर्जा मिळू शकला. बॅट्सने सीलँडसाठी राज्यघटना मांडली, स्वतःचे स्वतंत्र राष्ट्रगीत ठरवले. एवढेच नव्हे तर सीलँडचे स्वतःचे चलन, पासपोर्ट आणि राष्ट्रध्वजसुद्धा ठरवला!

उत्तर समुद्रात असणारा हा एक स्वतंत्र देश तयार झाला. पण तरीही, इतर सार्वभौम राष्ट्रांनी सीलँडची दखल घेतली नाही.

सीलँडला स्वतःची अशी ओळख न मिळण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरली आणि ती म्हणजे युनायटेड किंग्डमने १९८७ साली आपली सागरी सीमा तीन नॉटिकल मैलपासून १२ नॉटिकल मैलपर्यंत वाढवली. त्यामुळे सीलँड हे युनायटेड किंग्डमच्या सागरी सीमेअंतर्गत गणले गेले. ‘युनायटेड नेशन्स कवेंशन ऑन दि लाॅ ऑफ सीज’च्या नियमानुसार एखाद्या सार्वभौम देशाच्या सीमेअंतर्गत असे कोणतेही बांधकाम करता येणार नव्हते ज्याला स्वतंत्र देशाचा दर्जा असेल.

सीलँड आता ब्रिटनच्या राजकीय क्षेत्रांतर्गत आला होता. या गोष्टीमुळे सीलँड या स्वतंत्र देशाचे अस्तित्व धोक्यात आले. ब्रिटनच्या अधिकारक्षेत्रात येत असला तरीही तिथे सध्या राजेशाही प्रशासन व्यवस्था सुरू आहे. सध्या बॅट्स घराणे सीलँडची राजवट भूषवतात. रॉय बॅट्सचा मुलगा मायकेल बॅट्सकडे सध्या येथे सत्ता आहे.

तो आजही, ‘His Royal Highness Prince Michael’ असाच किताब धारण करतो!

रॉय बॅट्स प्रिन्सचा किताब धारण करीत होता, तर त्याची पत्नी प्रिन्सेस जॉन म्हणून ओळखली जायची. आयुष्यभर त्याने स्वतः उभारलेल्या देशाचे राजेपद मिरवले होते!

मायकेल बॅट्स हा सध्या इंग्लंडच्या एसेक्स या शहरात राहतो. सीलँडच्या देखभालीसाठी त्याने चाकर नेमलेले आहेत. सीलँड हा प्रदेश खूप निर्जन स्थळी येतो, ही जागा राहण्यासाठी तेवढी योग्य नाही. असे असतानाही रॉयल बॅट्स याने मात्र तिथेच वास्तव्य केले होते.कारण शेवटी छोटेसे का होईना पण ते त्याचे स्वतःचे राज्य होते!

सीलँडचे आजही स्वतःचे चलन आणि पोस्टल स्टॅम्प आहेत. आजही तेथे शाही वास्तव्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे सीलँडला पैसे कमवता येतात. सीलँडने स्वतःची हेवन को नावाची डेटा होस्टींग कंपनी सुरू केली होती. ही बातमी त्यावेळी बरीच गाजली होती. कारण तोपर्यंत सीलँडला देश म्हणून फारशी ओळख मिळालेली नव्हती. ज्या देशांमध्ये डेटा होस्टींग कंपनीला परवानगी नाही अशांसाठी एक डेटा होस्टिंग वेअर हाऊस म्हणून नावारूपास आणणे हे हेवन कोचे उद्दिष्ट होते. पण ते कधीही साध्य होऊ शकले नाही.

क्रीडा क्षेत्रातसुद्धा सीलँडने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या स्पोर्टिंग इव्हेंट्समधे सीलँडच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सीलँडची नॅशनल फुटबॉल टीमसुद्धा स्थापन करण्यात आली. पण कोणतेही स्पोर्टिंग बाॅडीने त्या टीमला स्वतंत्र ओळख मिळू दिली नाही. सीलँडच्या गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्टवर त्यांचा ध्वजसुद्धा रोवला होता.

अलीकडेच सीलँड विकायला काढले गेले तेही फक्त ९०६ मिलियन डॉलर एवढ्या कमी किमतीत!!

असे अजून काही दुर्लक्षित देश तुम्हाला माहिती असतील त्यांच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बालपणी अनौरस आपत्य म्हणून हिणवला गेलेला विल्यम इंग्लंडचा सम्राट बनला होता

Next Post

भारतीय क्रांतिकारकांना घाबरून काँग्रेस पक्षाचा संस्थापक महिलेचा वेश घेऊन पळाला होता !

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

भारतीय क्रांतिकारकांना घाबरून काँग्रेस पक्षाचा संस्थापक महिलेचा वेश घेऊन पळाला होता !

हा गुप्तहेर होता खऱ्या आयुष्यातील जेम्स बॉण्ड !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.